अमेरिका, आशिया, इंग्लंड व ऑस्ट्रेलियासह जगभरात बुधवारी सकाळी YouTube सुमारे दोन तास ठप्प झाले होते.  YouTube सुरू केल्यानंतर स्क्रीनवर internal error 500 असा मेसेज येत होता. अखेर युट्यूबने तांत्रिक समस्येवर मात करत ही सेवा पूर्ववत सुरु केली आहे.

युजर्सनी ट्विटरवर युट्यूब एररचे स्क्रीनशॉट टाकले. युट्यूबने या प्रकाराबद्दल जगभरातील युजर्सची माफी मागत यावर त्वरीत तोडगा काढण्याची ग्वाही दिली होती. अखेर सकाळी आठच्या सुमारास युट्यूब सेवा पूर्ववत सुरु झाली. युट्यूब ठप्प झाल्याने युजर्समध्ये गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या महिन्यात देखील काही तांत्रिक कारणामुळं युजर्सना लॉग इन करण्यास अडचणी येत होत्या. मात्र काही वेळातच ही समस्या सोडवण्यात आली होती.

तत्पूर्वी, व्हिडिओ म्हटल्यावर युट्यूब हे समीकरण आता पक्के झाले आहे. आतातर अनेक कंपन्या व्हिडिओवर जास्त लक्ष देऊ लागल्याने युट्यूबला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे. बुधवारी सकाळी जगभरातील ग्राहकांना युट्यूब वापरण्यात अडचण आली. अनेक ग्राहकांनी युट्यूब बंद पडल्याची माहिती सोशल मीडियावर देत त्याचे स्क्रीनशॉट्सही पोस्ट केले.

डेस्कटॉप आणि मोबाइल अशा दोन्ही ठिकाणी यूट्यूब वापरताना अडचणी येत आल्या. अनेकांनी यूट्यूबवर लॉगइन करण्याचा, व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. अनेक युजर्सनी स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर युट्यूबने उत्तर देत समस्येवर काम सुरू असून लवकरच तोडगा काढला जाईल असे म्हटले होते.

ट्विटरवर #YouTubeDOWN  या हॅशटॅगसह युजर्सनी आपला राग व्यक्त केला. काही नेटिझन्सने याची खिल्लीही उडवली.

Story img Loader