माक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेलांना पुत्रशोक झाल्याची माहिती मायक्रोसॉफ्टने जारी केलीय. सत्या आणि त्यांची पत्नी अनु यांचा मुलगा झैन नाडेलाचं निधन झालं आहे. झैन हा २६ वर्षांचा होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मायक्रोसॉफ्टने कंपनीमधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये झैन नाडेलाच्या मृत्यूसंदर्भातील माहिती दिलीय. कंपनीने जारी केलेल्या पत्रकामध्ये नाडेला कुटुंबाला या दु:खाच्या प्रसंगी खासगी वेळ द्यावा अशी विनंती करण्यात आलीय. तसेच तुमच्या प्रार्थना आणि सहवेदना नाडेला कुटुंबासोबत असतील अशी इच्छाही व्यक्त करण्यात आलीय.

झैनला ‘सेरेब्रल पाल्सी’चा त्रास होता. सत्या यांनी ऑक्टोबर २०१७ च्या ब्लॉग पोस्टमध्ये मुलाच्या या आजारासंदर्भात भाष्य केलं होतं.

“अनु गरोदर असताना ३६ व्या आठवड्यामध्ये अचानक एका रात्री तिला गर्भामध्ये बाळ हलचाल करत नसल्याचं लक्षात आलं. याबद्दल तिला आश्चर्य वाटलं. आम्ही त्यावेळी बेलीव्हू येथील स्थानिक रुग्णालयाच्या आपत्कालीन सेवा मिळणाऱ्या केंद्रात धाव घेतली. हे एखादं रुटीन चेकअप असेल असं वाटलेलं. नवीन पालक म्हणून आम्हाला थोडं बैचन व्हायलाही होत होतं. खरं तर मला आपत्कालीन सेवेसाठी लागणारा वेळ आणि पहावी लागणारी वाट यामुळे फार अस्वस्थ व्हायला झालेलं. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी तातडीने सीझेरियन पद्धतीने प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. झैनचा जन्म १३ ऑगस्ट १९९६ रोजी ११ वाजून २९ मिनिटांनी झाला. तो जन्माला आल्यानंतर रडला नाही,” असं सत्या यांनी ब्लॉगमध्ये लिहिलेलं.

(Photo courtesy Microsoft and Seattle Children’s)

“झैनला नंतर त्या रुग्णालयामधून लेक वॉशिंग्टन आणि नंतर सिएटलमधील मुलांच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. दुसरीकडे अनु प्रसुतीनंतर रिकव्हर होतं होती. मी रात्रभर तिच्यासोबत असायचो आणि नंतर दुसऱ्या दिवशी झैनला भेटण्यासाठी जायचो. आमचं आयुष्य कायमचं बदलून जाईल याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. पुढील काही वर्षांमध्ये आम्हाला गर्भशयामध्ये श्वास अडकल्याने बाळाला झालेल्या त्रासासंदर्भात अधिक माहिती मिळाली. त्यानंतर झैनला व्हिलचेअरची गरज भासणार याची आम्हाला जाणीव झाली. तो नंतर ‘सेरेब्रल पाल्सी’मुळे कायम आमच्यावर निर्भर असणारं हे सुद्धा जाणवलं. यामुळे मी पूर्णपणे निराश झालेलो. मात्र अनु आणि माझ्यासोबत जे झालं त्यामुळे मी फार निराश झालेलो हे नंतर जाणवलं,” असं नाडेला ब्लॉगमध्ये म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zain nadella death microsoft ceo satya nadellas son is no more scsg