Zakir Naik heated exchange with Pashtun girl on paedophilia in Islam : स्वयंघोषित इस्लामिक धर्मगुरू आणि अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेला आरोपी झाकीर नाईक हा धार्मिक प्रवचनं देण्यासाठी पाकिस्तानला गेला आहे. महिनाभर त्याचा पाकिस्तानमध्येच मुक्काम असणार आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये प्रवचनाच्या कार्यक्रमात एका पश्तून तरुणीने विचारलेल्या प्रश्नावर झाकीर नाईक संतापल्याचं पाहायला मिळालं. तसेच तो तिला म्हणाला, “तू इस्लामवर गंभीर आरोप करत आहेस, तातडीने माफी माग”. या तरुणीने झाकीरला विचारलं होतं की “मी ज्या भागातून आले आहे, तिथले लोक स्वतःला मुस्लीम म्हणवतात. परंतु, लहान मुलांचं लैगिंक शोषण करतात, मुलींना घराबाहेर पडण्याची परवानगी दिली जात नाही”. या प्रश्नावर झाकीर नाईकचा तिळपापड झाला होता.

ही तरुणी झाकीर नाइकला म्हणाली, “मी जिथे राहते, त्या भागात पश्तो भाषा बोलली जाते. मी जिथून आले आहे तिथे आजूबाजूला केवळ मुस्लीम समाज आहे. परंतु, त्या भागात महिला कोणत्याही महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू शकत नाहीत. तिथे दर जुम्म्याच्या दिवशी (शुक्रवारी) तब्लिगी जमातच्या लोकांची वेगवेगळी फर्मानं येतात. अलीकडेच आमच्या येथे मोठा तब्लिगी इज्तिमा झाला. आमच्या भागातील लोक खूप धार्मिक आहेत. असं असलं तरी या भागात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी होते, तरुणांना ड्रग्स घेण्याचं व्यसन लागलं आहे, लहान मुलांचं लैंगिक शोषण केलं जात आहे. खंडणीचे प्रकारही घडत असतात, भरपूर व्याज आकारत सावकारी कर्जे दिली जातात. आपली समाजव्यवस्था ढासळत चालली आहे. लहान मुलांचं लैगिंक शोषणा करणाऱ्यांना उलेमा काहीच बोलत नाहीत, त्यांच्यात बदल घडवून आणत नाहीत, असं का घडतंय? लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना उलेमा समजावत का नाही?”

no india pakistan bilateral talks during sco meet says s Jaishankar
पाकिस्तानबरोबर द्विपक्षीय चर्चा नाही : जयशंकर
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
zakir naik in pakistan
भारतात वॉन्टेड झाकीर नाईक पाकिस्तानात; मुस्लीम धर्मोपदेशकाचा पाकिस्तानला जाण्यामागे हेतू काय?
IND vs PAK Mudassar Nazar says match-fixing incident cannot be repaired.
‘पाकिस्तान भारताकडून हरला की मॅच फिक्सिंगचे आरोप व्हायचे…’, पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
Defence Minister Rajnath Singh
“…तर भारताने पाकिस्तानला आयएमएफपेक्षा जास्त पैसा दिला असता”; राजनाथ सिंह यांचे विधान चर्चेत!
polio cases rising in afganistan
तालिबानने पोलिओ मोहिमेला स्थगिती दिल्याने अफगाणिस्तानमध्ये विनाशकारी परिणाम? नक्की घडतंय तरी काय? भारतावरही परिणाम होणार का?
India response to Pakistan in the United Nations General Assembly
दहशतवादाचे परिणाम भोगावे लागतील! संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर
Saudi Arabia On Pakistan
Saudi Arabia : “भिकारी पाठवू नका”, पाकिस्तानला सौदी अरेबियाची इशारावजा धमकी

हे ही वाचा >> Mohammad Muizzu India Visit : “भारत मालदीवचा सर्वात जवळचा मित्र”, मोहम्मद मुइज्जू यांच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदींचं विधान

तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाईक काय म्हणाला?

तरुणीचा हा प्रश्न ऐकून झाकीर नाईक संतापून म्हणाला, “तू जो प्रश्न विचारला आहेस त्यात खूप विरोधाभास आहे. कोणत्याही इस्लामिक परिसरात, इस्लामिक वातावरणात लहान मुलांचं लैंगिक शोषण होऊ शकत नाही. हे बिलकूल शक्य नाही. त्यामुळे तू माफी मागायला हवीस. तुझा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. तू चुकीची आहेस. तुला हे स्वीकारावं लागेल. तू इस्लामवर आरोप करत आहेस. तुला माफी मागावी लागेल, आत्ताच्या आत्ता माफी माग.