Zakir Naik in Pakistan, Shehbaz Sharif Government Rolls Out Red Carpet for wanted fugitive Islamic preacher : स्वयंघोषित इस्लामिक धर्मगुरू आणि अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेला आरोपी झाकीर नाईक पाकिस्तानात दाखल झाला आहे. पाकिस्तानात त्याचं भव्यदिव्य स्वागत करण्यात आलं. तिथे त्याची भेट घेण्यासाठी अनेक मोठ्या नेत्यांनी रांग लावल्याचं पाहायला मिळालं. झाकीर नाईक हा भारतातील मॉस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीतला एक गुन्हेगार आहे. भारताचा हा शत्रू पुढील काही दिवस पाकिस्तानात राहणार असून तिथे वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. दरम्यान, झाकीर नाईक याने नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. भारतातील प्रस्तावित वक्फ बोर्ड विधेयकाविरोधात सर्व मुस्लिमांनी एकत्र येण्याचं त्याने आवाहन केलं आहे. तसेच गोमांसावर मोठं वक्तव्य केलं आहे.

पाकिस्तानमध्ये झाकीर नाईकच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आलं आहे. सोमवारी (३० सप्टेंबर) तो पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये दाखल झाला आहे. तो २८ ऑक्टोबरपर्यंत पाकिस्तानमध्येच मुक्काम करणार आहे. दरम्यान, पाकिस्तान मुस्लीम लीगचे नेते व पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे राणा मशहूद, धार्मिक व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सय्यद अला-उर-रहमान, धार्मिक व्यवहारांचे संसदीय सचिव शमशेर मजारी आणि इतर अनेक नेते तथा अधिकारी नाईकच्या स्वागतासाठी इस्लामाबाद विमानतळावर हजर होते.

हे ही वाचा >> Israel Iran War: इराण-इस्रायल संघर्ष चिघळणार? भारतीय दूतावासांकडून भारतीयांसाठी ॲडव्हायजरी जारी

पाकिस्तानचे उपपंतप्रधान मोहम्मद इशाक डार यांनी देखील नाईकची भेट घेतली आहे. नाईकने डार यांच्याबरोबरचे फोटो समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत. झाकीर नाईक हा इस्लामाबाद, कराची आणि लाहोरमधील जनतेला संबोधित करणार आहे. नाईक २०१६ पासून मलेशियात राहतोय. मलेशियन सरकारने झाकीर नाईकचं भारताला प्रत्यार्पण करावं यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे.

हे ही वाचा >> “आम्ही कुणालाही लग्न करायला वा संन्यासी व्हायला सांगत नाही”, जग्गी वासुदेव यांच्या ‘इशा फाऊंडेशन’चं ‘त्या’ आरोपांवर स्पष्टीकरण!

गोमांसाबाबत केलं मोठं वक्तव्य

दरम्यान, इस्लामाबादमधील एका कार्यक्रमावेळी प्रसारमाध्यमाच्या एका प्रतिनिधीने झाकीर नाईक याला विचारलं की भारतात गोमांसावर बंदी घालण्यात आली असून तिथल्या मुसलमानांनी या बंदीचं पालन करायला हवं का? त्यावर नाईक म्हणाला, यावर माझं एक वैयक्तिक मत आणि एक इस्लामिक मत आहे. इस्लामिक शरीयतनुसार तुम्ही ज्या देशात राहता त्या देशाचे कायदे पाळले पाहिजेत. परंतु, तो देश अल्लाह व पैगंबरांच्या नियमांच्या विरोधात नाही ना, हे तपासायला हवं. उदाहरणार्थ, एखाद्या देशाने नमाजवर बंदी घातली तर तो कायदा मानता येणार नाही. कारण इस्लाममध्ये नमाज पठण करणं अनिवार्य आहे.भारतातील गोमांसावरील बंदी हा राजकीय मुद्दा आहे. खरंतर कोट्यवधी हिंदू देखील गोमांस खातात.