झी मीडियाचे प्रमुख आणि राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी एनडीटीव्ही इंडियावरील एक दिवसाच्या बंदीचे समर्थन केले आहे. एनडीटीव्हीवर एक दिवसाची बंदी ही खूप सौम्य शिक्षा असल्याचे ट्विट त्यांनी केले. त्याचबरोबर या मुद्दाबाबत त्यांनी पाच ट्विट केले आहेत. एनडीटीव्हीवर एक दिवसाची बंदी योग्य नाही. ही शिक्षा खूप कमी आहे. मला तर इतका विश्वास आहे की, ते जर न्यायालयात गेले तर न्यायालयही त्यांना फटकारेल. या वेळी त्यांनी यूपीए सरकारच्या काळातील एका घटनेचा उल्लेख करत ज्यावेळी झी समूहावर बंदी घालण्याची चर्चा सुरू होती. तेव्हा याच बुद्धिजीवींनी मौन बाळगले होते, अशी खंत व्यक्त केली.
यूपीए सरकारच्या काळात ‘झी’ वर बंदीबाबत चर्चा सुरू होती. त्यावेळी एनडीटीव्ही आणि तथाकथित बुद्धिजीवींनी मौन बाळगले होते. एडिटर्स गिल्डनेही चुप्पी साधली होती. पण आज चुकीला चूक म्हटल्यानंतर काही लोक त्याला आणीबाणी म्हणत आहेत. देशाच्या सुरक्षिततेचे काहीच महत्व नाही? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
सुभाष चंद्रा यांनी एनडीटीव्हीवरील बंदीचे समर्थन केले आहे. ते ट्विटमध्ये पुढे म्हणतात, देशाच्या सुरक्षिततेबाबत दुमत असू शकत नाही. सरकारचा हा निर्णय योग्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पठाणकोट हल्ल्याचे प्रक्षेपण करताना एनडीटीव्हीने नियमांचा भंग केल्याचे कारण देत सरकारने त्यांच्यावर ९ नोव्हेंबर रोजी एक दिवसाची बंदी घातली आहे. सरकारच्या या निर्णयावर मोठी टीका होताना दिसत आहे. अनेकजण ही आणीबाणी असल्याची म्हणत आहेत तर एनडीटीव्हीने योग्य वार्तांकन केल्याचे काहींचे म्हणणे आहे.
एडिटर्स गिल्ड या संस्थेनेही ही बंदी अयोग्य असल्याचे म्हटले आहे. ही बंदी उठवण्याची एडिटर्स गिल्डने मागणी केली आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठी ही कारवाई केल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्री वेंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.
याच व्हिडिओमुळे एनडीटीव्ही इंडियावर एकदिवसाची बंदी घालण्यात आली आहे.
NDTV पर 1 दिवसीय प्रतिबन्ध नाइंसाफी है, यह सजा बहुत कम है! देश की सुरक्षा से खिलवाड़ के लिए उन पर आजीवन प्रतिबन्ध लगाना चाहिए था (1/5)
— Subhash Chandra (@subhashchandra) November 6, 2016
मेरा तो यह भी विश्वास है की अगर NDTV न्यायालय में जाए तो उसे वहां से भी फटकार ही मिलेगी (2/5)
— Subhash Chandra (@subhashchandra) November 6, 2016
UPA काल में Zee पर प्रतिबन्ध की बात चली थी तब NDTV, बाकि तथाकथित बुद्धिजीवीयों ने मौन धारण करा था, Editors Guild भी चुप्पी साधे हुआ था (3/5)
— Subhash Chandra (@subhashchandra) November 6, 2016
पर आज गलत को गलत कहने पर, कुछ लोग आपातकाल कह रहे है! क्या देश की सुरक्षा का कोई भी महत्त्व नहीं? (4/5)
— Subhash Chandra (@subhashchandra) November 6, 2016
देश की सुरक्षा में दो मत नहीं हो सकते। सरकार द्वारा NDTV इंडिया पर एक दिवसीय प्रतिबन्ध को मैं बिलकुल सही मानता हूँ! (5/5)
— Subhash Chandra (@subhashchandra) November 6, 2016