उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना प्रयागराज वैद्यकीय महाविद्यालयाजवळ त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्यात दोघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, दोघांच्या हत्येसाठी हल्लेखारांनी ज्या बंदुकीचा वापर केला, त्याबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
हेही वाचा – अतिक अहमदच्या हत्येनंतर योगी सरकार अॅक्शन मोडवर, १७ पोलिसांवर कारवाई, प्रयागराजमध्ये इंटरनेट बंद
अतिकला संपवण्यासाठी ‘या’ बंदुकीचा वापर
अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांच्यावर हल्ला करण्यासाठी हल्लेखोरांनी ‘जिगाना’ नावाची बंदूक वापरल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे ही बंदुकीवर भारतात बंदी आहे. या बंदुकीची निर्मिती २००१ मध्ये टर्कीतील एका कंपनीने केली होती. याची किंमत सहा ते सात लाख असल्याचं सांगण्यात येत आहे. भारतासह काही देशांमध्ये ही बंदुकीवर बंदी असली तरी मलेशिया, अजरबैजान आणि फिलिपीन्सच्या आर्मीमध्ये या बंदुकीचा वापर केला जातो.
हेही वाचा – Atiq Ahmed Killed : अतिकच्या मारेकऱ्यांवर पोलिसांनी गोळ्या झाडल्या का? प्रत्यक्षदर्शींचा मोठा दावा, म्हणाले…
हल्लेखोरांना ‘जिगाना’ बंदूक नेमकी कशी मिळाली?
दरम्यान, याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. लवलेश तिवारी, मोहित सनी, आणि अरुण मोर्य अशी या तिघांची नावे आहेत. पोलिसांनी तिघांविरोधात भादंविच्या कलम ३०२ आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच भारतात बंदी असताना हल्लेखोरांना ‘जिगाना’ बंदूक नेमकी कशी मिळाली याबाबत तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा – Atiq Ahmed Shot Dead : गँगस्टर अतिक-अशरफ हत्या; ‘कस्टोडियल डेथ’ कायदा नेमकं काय सांगतो, जाणून घ्या…
प्रयागराजमध्ये इंटरनेट बंद
अतिक अहमद आणि अशर्रफ अहमद यांच्या हत्येनंतर उत्तर प्रदेश सरकारकडून पोलिसांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. अतिक आणि अशर्रफ यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेले १७ पोलीस निलंबित करण्यात आले आहेत. तसेच प्रयागराजमधील शांतता आणि सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यासह कलम १४४ लागू करण्यात आले आहे.