Zomato Delivery Boy as Santa Claus: बुधवारी ख्रिसमसच्या निमित्ताने देशात विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नाताळाच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या जात होत्या. ख्रिश्चन समुदायामध्ये मोठं आनंदाचं वातावरण पहायला मिळालं. बाजारपेठांनाही नाताळाचा साज चढल्याचं दिसून आलं. पण त्याचवेळी झोमॅटोच्या एका डिलीव्हरी बॉयला नाताळाच्या निमित्तानं घातलेले सांताक्लॉजचे कपडे काढायला लावल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओवरून सणासुदीच्या दिवसांमध्ये घडणाऱ्या अशा गोष्टींची चर्चा होऊ लागली आहे.

नेमकं काय आहे व्हिडीओमध्ये?

हा व्हिडीओ मध्य प्रदेशच्या इंदौर शहरातला असल्याचं इंडिया टुडेनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. तसेच, या डिलीव्हरी बॉयला कपडे काढायला लावणारे सदस्य हे हिंदू जागरण मंच या संघटनेचे असल्याचंही या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये संबंधित गटाचे सदस्य या डिलीव्हीरी बॉयला हटकून त्याची उलटतपासणी घेताना दिसत आहेत. तसेच, त्यांच्यापैकीच एकानं हा व्हिडीओ शूट केल्याचंही स्पष्ट होत आहे. व्हिडीओत कपडे काढायला लावणारी व्यक्ती डिलीव्हरी बॉयला हिंदू सणांच्या दिवशी प्रभू श्रीरामासारखे कपडे, भगव्या रंगाचे कपडे का घालून जात नाही? असा प्रश्नही करत असल्याचं ऐकू येत आहे.

vasai municipal schools
“बजेट वाढवा पण शाळा सुरू करा”, स्नेहा दुबेंकडून पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप

“हिंदू सणांवेळी त्यानुसार वेशभूषा का करत नाही?”

“सांताक्लॉज बनून डिलीव्हरी ऑर्डर करायला जाताय का ख्रिसमस आहे म्हणून? मग कधी दिवाळी वगैरेच्या दिवशी प्रभू श्रीरामांचा किंवा भगव्या रंगाचा वेश करून कधी लोकांच्या घरी जाता का तुम्ही? या ऑर्डर जास्त करून हिंदू लोकच मागवतात. कारण इतर लोकांची संख्या एवढी नाहीये. त्यामुळे कधी आपले सण येतील तेव्हा भगवे कपडे घालून वगैरे जात जा ना. हे सांताक्लॉज बनून आपण कुटुंबांना काय संदेश देत आहोत? आपण हिंदू आहोत. सांताक्लॉजचे कपडे घालून काय संदेश देतोय आपण? सांताक्लॉज बनून जाणं गरजेचं आहे का? घरोघरी जाताना भगतसिंग व्हा, चंद्रशेखर आझाद व्हा”, असं सदर व्यक्ती डिलीव्हरी बॉयला सुनावताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला अन् हिमाचलमध्ये सापडली २५ वर्षांपूर्वी कर्नाटकातून हरवलेली महिला

“असं काही नाही, पण कंपनीनं आम्हाला हे घालायला सांगितलं आहे. काही लोकांना दिले आहेत असे कपडे”, असं डिलीव्हरी बॉय सांगत असूनही संबंधित व्यक्तींचा आग्रह चालूच राहिल्यानंतर शेवटी या डिलीव्हरी बॉयनं सांताक्लॉजचे कपडे काढले. यानंतर ‘जय श्री राम’ म्हणत या गटाचे सर्व सदस्य तिथून निघून गेले.

Story img Loader