ऑनलाइन फूड डिलेव्हरी करणाऱ्या झोमॅटोला IPO बाजारात आणण्याची परवानगी मिळाली आहे. या माध्यमातूत झोमॅटो तब्बल ९,३७५ कोटींचं भांडवल उभारणार आहे. देशातील एका स्टार्टअपकडून येणार हा सर्वात मोठा IPO असणार आहे. सेबीकडून परवानगी मिळाल्याने पुढच्या आठवड्यात IPO बाजारात येईल. १४ जुलैला IPO ची दारं सर्वसामान्यांना खुली होणार असून १६ जुलैपर्यंत अवधी असणार आहे. यातून ९ हजार कोटींचं भांडवल गोळा करणार आहे. ३७५ कोटी ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून उभे केले जाणार आहेत. ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून गुंतवणूकदार आपला हिस्सा विकतात. तर जवळपास ६५ लाख इक्विटी शेअर्स हे कंपनीच्या कामगारांसाठी राखीव असणार आहे.

झोमॅटोच्या एका शेअर्सची किंमत ७२ ते ७६ रुपये दरम्यान ठरवण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना किमान १९५ इक्विटी शेअर्स घ्यावे लागतील. जर एका शेअर्सची किंमत सर्वात अधिक ७६ रुपये पकडली. तर १९५ शेअर्सची किंमत १४,८२० इतकी होते. मात्र यावरही गुंतवणूकदारांना चार्ज भरावा लागणार आहे. कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, मॉर्गन स्टेनली इंडिया कंपनी आणि क्रेडिट सुइस सेक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेट यावरही आयपीओ विक्रीचं व्यवस्थापन करण्यात आलं आहे.

दिग्गज नेत्यांना डच्चू मात्र या युवा नेत्याला मिळाली पदोन्नती! जाणून घ्या अनुराग ठाकूर यांच्याविषयी…

आर्थिक वर्ष २०२० मध्ये झोमॅटोच्या उत्पादनात ९६ टक्क्यांनी वाढ झाली होती. कंपनीचा महसूल २०१९ मध्ये १ हजार ३९८ कोटीवरून २०२० या आर्थिक वर्षात २ हजार ७४३ कोटी रुपये झाला होता. मात्र करोना संकटामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात झोमॅटोच्या उत्पादनात घट झाली. झोमॅटोनं आर्थिक वर्षे २०२१ च्या पहिल्या तिमाहीत १ हजार ३६७ कोटींचा महसूल जमा केला. तर कंपनीचा खर्च जवळपास १,७२४ कोटी रुपये इतका होता. त्यामुळे कंपनीला ६८४ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. मात्र असं असलं तरी या कंपनीचं भविष्य उज्ज्वल असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. झोमॅटो कंपनीचं पब्लिक कंपनीत रुपांतरण झालं आहे. त्याचबरोबर मेमोरॅन्डम ऑफ असोसिएशनमध्ये बदल केला आहे. येत्या काळात अॅपवरून होणारी वाढती मागणी पाहता कंपनीचा व्यवसाय वाढत जाईल, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

Story img Loader