देशात करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आपला व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी डॉमिनोझ आणि मॅकडोनाल्डच्या धर्तीवर आता स्विगी आणि झोमॅटोनंही आता झिरो कॉन्टॅक्ट फूड डिलिव्हरी सेवा सुरू केली आहे. यापूर्वी देशातील १ हजार ३२५ ठिकाणी डॉमिनोझनं ही सेवा सुरू केली होती. या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडे डॉमिनोझचे नवे अॅप असणं आवश्यक आहे. याव्यतिरिक्त ऑर्डर करताना झीरो कॉन्टॅक्ट डिलिव्हरीचा ऑप्शनही सिलेक्ट करावा लागणार आहे.
ग्राहकानं ऑर्डर दिल्यानंतर कंपनीचा सेफ डिलिव्हरी एक्सपर्ट ती ऑर्डर घेऊन ग्राहकाकडे येईल. तसंच त्यांची ऑर्डर ग्राहकांसमोर ठेवेल आणि काही अंतरावर जाऊन उभा राहिल. जोपर्यंत ग्राहक स्वत: ती ऑर्डर घेत नाही तोवर डिलिव्हरी एक्सपर्ट त्या ठिकाणाहून जाणार नाही अशा प्रकारची ही सुविधा असणार आहे. मॅक डोनाल़्डनंही अशा प्रकारची कॉन्टॅक्टलेस सेवा सुरू केली आहे.
सर्व ऑर्डरवर सेवा
ही सेवा सर्व ऑर्डर्सवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त डॉमिनोझनं आपल्या कामकाजाच्या ठिकाणाची आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छतेबाबतच्या नियमांचं पालन करण्याचा आदेश दिला आहे.
अशी मिळणार ऑर्डर
ग्राहकांनी दिलेल्या ऑर्डरला कोणताही कर्मचारी उघड्या हातांनी स्पर्श करणार नाही. तसंच स्वच्छतेसंबंधी घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करेल. डिलिव्हरी करण्यासाठी आलेली व्यक्ती घराबाहेर संबंधित पार्सल ठेवेस त्यानंतर ग्राहक जोपर्यंत ते पार्सल घेत नाही, तोवर त्या ठिकाणाहून जाणार नाहीत.