Zoologist Adam Britton : प्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञ ॲडम ब्रिटन यांनी अतिशय किळसवाणे आणि माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केल्याचे समोर आले आहे. यामुळे त्यांना आता न्यायालयाने २४९ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. प्राणी अत्याचाराचे एकूण ६० गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले होते. ज्यामध्ये ४२ श्वानांचा छळ करून त्यापैकी ४९ श्वानांचा खून केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एवढेच नाही तर या किळसवाण्या कृत्याचे त्यांनी व्हिडीओ रेकॉर्डिंगही केले होते. यूकेतील मिरर या दैनिकाने दिलेल्या बातमीनुसार श्वानांवर बलात्कार, छळ आणि खूनाचा आरोप ब्रिटन यांच्यावर दाखल झाला असून ऑस्ट्रेलियात त्यांना २४९ वर्षांची शिक्षा झाली आहे. मागच्या वर्षी ६० प्रकरणात त्यांच्यावर दोषारोप सिद्ध झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुरुवारी ऑस्ट्रेलियाच्या एनटी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मायकल ग्रँट यांनी याप्रकरणी निकाल दिला. ते म्हणाले, मूक्या प्राण्यांवर अतिशय विकृत अत्याचार झालेले आहेत. न्यायालयाने अंतिम निकाल देण्यापूर्वी ब्रिटन यांच्या वकिलाने न्यायालयासमोर नवे पुरावे सादर केले आणि त्याचा विचार करण्याची मागणी केली. तुरुंगात असताना ब्रिटन यांच्यावर ३० तास समुपदेशन करण्यात आले होते. समुपदेशाकाचा अहवाल विचारात घ्यावा, अशी वकिलांची मागणी होती.

हे वाचा >> श्वानावर अनैसर्गिक अत्याचार, भारतीय न्याय संहितेत कलमाबाबत अस्पष्टता

प्रकरण काय आहे?

एबीसी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, प्राणीशास्त्रज्ञ ॲडम ब्रिटन यांनी ऑस्ट्रेलियातील डार्विन शहरातील आपल्या घरात श्वानांची छळछावणी उभारली होती. या छावणीत ते श्वानांचा विकृत छळ करून त्यांना हालहाल करून मारत असत. सदर विकृतीचे त्यांनी व्हिडीओ रेकॉर्डिंगही केले. तसेच एका शिपिंग कंटेनरमध्ये त्यांनी ही छावणी तयार केली होती. तिथे ते श्वानांवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे सांगितले जात आहे.

हे ही वाचा >> विश्लेषण: प्राणी का ठरतात मानवी वासनेचे बळी? काय आहे झूफिलिया आणि बेस्टीयालीटी?

२४९ वर्षांची शिक्षा कशी मिळणार?

प्राणीशास्त्रज्ञ ब्रिटन हे मगर प्रजातीचे तज्ज्ञ असल्याचे म्हटले जाते. त्यांच्यावर पशू अत्याचाराचे आठ गुन्हे दाखल आहेत. ज्यामध्ये त्यांना प्रत्येकी तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. बाल शोषणाशी संबंधित सामग्री बाळगणे आणि त्याचे वितरण करण्याचे चार गुन्हे आहेत, ज्यामध्ये कमीत कमी १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसेच ३७ गुन्हे प्राण्यांवरील विकृत अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये प्रत्येकी पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती ऑस्ट्रेलियाच्या सन वृत्तसंस्थेने दिले आहे.

हे ही वाचा >> कुत्र्याला अमानुष मारहाण; प्राणी संरक्षण कायद्यात बदल होणार?

ॲडम ब्रिटन यांना मानसिक विकृती असल्याचे म्हटले जात आहे.

ब्रिटन हे झूफिलियाग्रस्त?

प्राण्यांकडे लैंगिकदृष्ट्या आकर्षित होणाऱ्या मानवी प्रवृत्तीसाठी झूफिलिया हा शब्द वापरला जातो. तर बेस्टीयालीटी हा शब्द प्राण्यांवर होणाऱ्या बळजबरीकरता वापरला जातो. आज बहुतेक देशांमध्ये प्राण्यांशी लैंगिक संबंध असलेली पोर्नोग्राफी दाखविणे बेकायदेशीर आहे. जगभरात प्राणी आणि मानव यांच्यातील लैंगिक संबंधांच्या विरोधात अनेक कायदे आहेत. असे असले तरी ज्या देशांमध्ये झुफिलिया या प्रकारावर बंदी नाही. अशा ठिकाणी या पोर्नोग्राफीचे चित्रण केले जाते आणि जगभरात त्याचे वितरण होते. ब्रिटन यांच्यावर बेस्टीयालीटी प्रकरणी गुन्हे दाखल झाले असून त्यांच्या मानसिक स्थितीचा अभ्यास केला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zoologist adam britton sentenced 249 year jail for raping killing over 60 dogs kvg