फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झकरबर्ग यांनी सुरू केलेल्या ‘इंटरनेट डॉट ऑर्ग’ या प्रकल्पावर टीकेचा भडिमार सुरू असतानाच ही योजना असंख्य लोकांसाठी कशी फायद्याची आहे, हे समजाविण्याचा प्रयत्न झकरबर्ग यांनी सुरू केला आहे. या प्रकल्पामुळे इंटरनेट समानतेला बाधा निर्माण होईल, अशी सार्वत्रिक टीका केली जात आहे. मात्र झकरबर्ग यांनी ही टीका चुकीची असून, ‘इंटरनेट डॉट ऑर्ग’ हा प्रकल्प इंटरनेट समानतेच्या विरोधात नाही, असे सांगितले. इंटरनेट समानतेच्या पुढाकारासाठीच या प्रकल्पाद्वारे काही सेवा ग्राहकांना मोफत दिल्या जाणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
‘इंटरनेट डॉट ऑर्ग’ या प्रकल्पाचा फायदा भारतातील लाखो लोकांना होणार आहे. या प्रकल्पामुळे अनेक इंटरनेट संकेतस्थळे एकाच छत्राखाली येणार असून, त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होईल, असे झकरबर्ग यांनी सांगितले.
‘इंटरनेट डॉट ऑर्ग’ या प्रकल्पाचा फायदा काही संकेतस्थळांनाच होणार आहे आणि अन्य संकेतस्थळांना मोठा फटका बसेल, हा आरोप चुकीचा आणि तथ्यहीन आहे, असे झकरबर्ग यांनी सांगितले.
इंटरनेट समानतेच्या विरोधात नाही-मार्क झकरबर्ग
फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झकरबर्ग यांनी सुरू केलेल्या ‘इंटरनेट डॉट ऑर्ग’ या प्रकल्पावर टीकेचा भडिमार सुरू असतानाच ही योजना असंख्य लोकांसाठी कशी फायद्याची आहे, हे समजाविण्याचा प्रयत्न झकरबर्ग यांनी सुरू केला आहे.
First published on: 18-04-2015 at 03:49 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zuckerberg cant have it both ways on net neutrality