पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेसबुक मुख्यालयातील भेटीच्या पार्श्वभूमीवर फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गने सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ अभियानाला पाठिंबा देण्यासाठी स्वत:चा ‘प्रोफाईल फोटो’ बदलला. झकरबर्गचा हा तिरंगी रंगातील प्रोफाईल फोटो अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. भारतीय सरकार देशातील ग्रामीण समाजाला इंटरनेटशी आणि जास्तीत जास्त लोकांना ऑनलाईन माध्यमावर आणण्याचे प्रयत्न करत आहे. त्यांचा या प्रयत्नांना माझा पाठिंबा असल्याचे झकरबर्गने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. झकरबर्गच्या या पाठिंब्याबद्दल आभार जाहीर करताना नरेंद्र मोदी यांनीदेखील फेसबुकवरील स्वत:चा ‘प्रोफाईल फोटो’ बदलला आहे.
‘डिजिटल इंडिया’ला पाठिंबा देण्यासाठी मार्क झकरबर्गचा खास ‘प्रोफाईल फोटो’
फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गने सरकारच्या 'डिजिटल इंडिया' अभियानाला पाठिंबा देण्यासाठी स्वत:चा 'प्रोफाईल फोटो' बदलला
Written by रोहित धामणस्कर
Updated:
First published on: 27-09-2015 at 23:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zuckerberg has updated his profile picture with hues of the tricolor in support of the digital india initiative