‘झायडस कॅडिला’च्या ‘झायकोव्ह डी’ला मान्यता

‘झायडस कॅडिला’च्या ‘झायकोव्ह डी’ या तीन मात्रांच्या लशीला भारताच्या महाऔषधनियंत्रकांनी मान्यता दिली आहे. जगातील ही पहिली डीएनए लस असून ती भारतात तयार करण्यात आली आहे. ती १२ वर्षांपुढील व्यक्तींना देता येईल, अशी माहिती जैव तंत्रज्ञान विभागाने शुक्रवारी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

केंद्रीय औषध प्रमाणीकरण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने या लशीच्या आपत्कालीन वापराची शिफारस केली होती. आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितले की, ‘झायकोव्ह डी’ ही लस १२ ते १८ वयोगटातील मुलांना आणि त्यावरील वयोगटातील नागरिकांनाही देता येईल.  आता मुलांचे लसीकरण लवकरच सुरू करण्यात येईल. परंतु त्याचा वेग ही लस किती प्रमाणात उत्पादित होईल त्यावर अवलंबून आहे. मागणी पुरवठ्यात आता तफावत असून चालणार नाही.

‘झायकोव्ह डी’ या लशीला केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. तज्ज्ञ समितीने ‘झायडस कॅडिला’च्या अर्जावर गुरुवारी विचार केल्यानंतर अखेर या लशीच्या वापरासाठी शिफारस केली.  अहमदाबाद येथील ‘झायडस कॅडिला’ कंपनीने १ जुलै रोजी आपत्कालीन वापरासाठी केंद्रीय औषध प्राधिकरणाकडे अर्ज केला होता.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शर्विल पटेल यांनी सांगितले, की कॅडिला हेल्थकेअर या कंपनीने तयार केलेल्या या लशीला अंतिम मान्यता मिळाली आहे. ही लस प्रौढांनाच नव्हे, तर १२ ते १८ वयोगटातील मुलांनाही देता येईल.

‘सीरम’ची कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन या लशींना भारतात मंजुरी दिली गेली आहे. ‘झायकोव्ह डी’ ही डीएनए आधारित लस त्वचेखाली इंजेक्क्षनच्या मदतीने दिली जाते.

१२ ते १८ वयोगटाचे लसीकरण शक्य

‘झायकोव्ह डी’ लशीमुळे १२ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. ही लस प्रोढ नागरिकांनाही देता येईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितले.

वैशिष्ट्ये

’‘झायकोव्ह डी’ ही करोनावरील देशी बनावटीची जगातील पहिली डीएनए लस.

’या तीन मात्रेच्या लशीचे संशोधन-

उत्पादन भारतीय कंपनीतर्फे.

’२८ हजारांहून अधिक स्वयंसेवकांवर चाचण्या.

’लशीची परिणामकारकता ६६.६ टक्के.

’भारतातील मान्यताप्राप्त लशी सहा.

जगातील पहिली डीएनए आधारित लस भारतात तयार करणे, ही भारतीय शास्त्रज्ञांची नावीन्यपूर्ण आणि महत्त्वाची कामगिरी आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान   