मराठी अभिनेत्री अदिती सारंगधरसाठी आजचा दिवस फारच खास आहे. आजपासून दिवाळीला सुरूवात झाली हे तिच्या आनंदाचं एक कारण तर आहेच शिवाय तिचा आज वाढदिवसही आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वाढदिवस आल्याने ती फारच आनंदी आहे. दिवसाची सुरूवात कामापासून करुन संध्याकाळी मराठी सिनेसृष्टीतील खास मित्र-मैत्रिणींसाठी तिने आपल्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले आहे.

आपल्या या खास दिवाळीबद्दल सांगताना अदिती म्हणते की, मला जेवण करायला फार आवडतं. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून मिळालेला तो निवांत वेळ असतो असं मला वाटतं. फक्त जेवण करायलाच नाही तर इतरांना जेवू घालायलाही मला फार आवडतं. आमच्याकडे प्रत्येक वर्षी दिवाळीची छोटेखानी पार्टी असते. माझा मुलगा अरिन पुढच्या महिन्यात एक वर्षाचा होईल. अरिनची ही पहिली दिवाळी आहे, त्यासाठीही आम्ही उत्साही आहोत. पण अरिन आधीही आम्हाला एक ८ वर्षांचा मुलगा आहे तो म्हणजे आमचा कुत्रा. तो आम्हाला अगदी मुलासारखाच आहे. ज्या घरात कुत्रा असतो ते घर सर्वार्थाने पूर्ण असतं असे म्हणतात. आमचं घर आमच्या याच मोठ्या मुलामुळे पूर्ण झालंय असं आम्हाला नक्कीच वाटतं.

nagpur, akshay tritiya, gold prices drop, gold prices drop in Nagpur, gold, gold ornaments, Nagpur news, gold price news, marathi news,
अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दर घसरले..
Onion exports continue but Onion prices rate down in market
कांद्याची निर्यात सुरू; तरीही दरात पडझड
two Children Drown While Swimming, Surya River, palghar taluka, One Rescued, two dead Body Found , two Children Drown in Surya River, palghar news, Drown news,
सूर्या नदीत दोघांचा बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश
chaturang
सांधा बदलताना : सोबतीचे बळ!
Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
loksatta ulta chasma
उलटा चष्मा: होऊ द्या ध्वनिप्रदूषण!
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ

मला स्वतःला वेगवेगळे पदार्थ बनवायची आवड असल्यामुळे मी यंदा चिवडा, शंकरपाळ्या केल्यात. येत्या दिवसात लाडूही करणार आहोत. दिवाळी सेलिब्रेट करण्याचं म्हणाल तर आम्ही फटाके फोडणं केव्हाच बंद केलंय. दिवाळी सणाचा आनंद फक्त फटाके उडवूनच येतो असे नाही. याशिवायही असे अनेक पर्याय आहेत ज्यांनी तुम्ही कुटुंबाशी आणि मित्र- मैत्रिणींसोबत एकत्र येऊ शकता. आतापर्यंत दिवाळी साजरी करताना पहिल्या आंघोळीवेळी असणारी कडाक्याची थंडी आठवते.

पण यावर्षी मात्र सगळ चक्रच उलटं झालेलं दिसतंय. थंडी तर सोडाच पण किमान ऊन तरी असेल का, असा प्रश्न पडतो. आता ऋतू असे काही उरलेच नाहीत. उन्हाची मनमानी करुन झाल्यावर आता पाऊसही त्याची मनमानी करत आहे. आता फक्त हिवाळा राहिला आहे, त्याचं काय होतंय हे थोड्याच दिवसात कळेल. पण ही दिवाळी सर्वांनाच नवीन काही देऊन जाईल अशी आशा मी करते. सर्वांनाच माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.