वर्ष संपत आले की पुढच्यावर्षी गणपती दसरा, दिवाळी कधी असणार याचे वेध लागतात. मग त्यावर्षी किती सुट्ट्या मिळणार हे पाहिले जाते. मग त्यानुसार ट्रीपला जायचे किंवा इतर गोष्टींचे नियोजन केले जाते. यावर्षी दिवाळी खूपच लवकर आली आहे.  यंदा पाऊसही लांबला आहे आणि त्यातच दिवाळी सुरु झाली आहे. पुढच्यावर्षी येणाऱ्या अधिक महिन्यामुळे असे झाले आहे. मात्र पुढच्या वर्षी बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा या वर्षीपेक्षा १९ दिवस उशीराने आला आहे. याबाबत माहिती देताना खगोलशास्त्राचे अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा.कृ.सोमण म्हणाले पुढील वर्षी पाडवा ८ नोव्हेंबर २०१८ रोजी येणार आहे.

त्यानंतरच्या वर्षी म्हणजे २०१९ मध्ये पाडवा आणखी १० दिवस उशीरा म्हणजे  २८ ऑक्टोबर रोजी येणार आहे. तर २०२० मध्ये तो १६ नोव्हेंबर रोजी येईल. २०२१ मध्ये ५ नोव्हेंबर, २०२२ मध्ये २६ ऑक्टोबर, २०२३ मध्ये १४ नोव्हेंबर, २०१४ मध्ये २ नोव्हेंबर तर २०२५ मध्ये २२ ऑक्टोबर, २०२६ मध्ये १० नोव्हेंबर,२०२७ मध्ये ३० ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदा येणार असल्याचे दा.कृ. सोमण यांनी सांगितले आहे. त्यामुळे आपल्याला पुढील १० वर्षांचे दिवाळीचे काही नियोजन करायचे असल्यास ते करणे सोपे होणार आहे.

Story img Loader