Diwali New Saree Looks 2023 : सणासुदीला प्रत्येकाला खास तयार व्हायला आवडतं. विशेषत: महिलांना सणानिमित्त वेगवेगळा फॅशन ट्रेंड फॉलो करण्याची आवड असते. यात साडी हा कधीही कालबाह्य न होणारा असा स्टायलिंग फॅशन ट्रेंड आहे. नेहमीच कोणताही सण असला तरी साडीचा विषय येतो. यामुळे यंदा दिवाळीत तुम्हालाही साडीतील सुंदर, ट्रेडिन्शल क्लासी लूक ट्राय करण्याचा विचार करत असाल तर काही अभिनेत्रींनी नेसलेल्या साड्यांचा पर्याय नक्की ट्राय करु शकता. यामुळे तुम्हाला साडी खरेदी करताना कोणतीही अडचण येणार नाही. चला बघूया दिवाळीनिमित्त साड्यांचे खास पर्याय… (Diwali Fashion 2023)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिक्वेन्स वर्क साडी

साडीमध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या डिझाइन्स बाजारात पाहायला मिळतील. हे पाहून तुम्ही तुमच्या आवडीची साडी खरेदी करू शकता. यावेळी तुम्ही सिक्वेन्स वर्क साडीची निवड करु शकता. मौनी रॉयनेही सिक्वेन्स वर्कची काळी साडी परिधान केली आहे. हा पर्याय तुम्ही यंदा दिवाळीत ट्राय करुन पाहू शकता. यात तुम्हाला वेगवेगळे कलर्सही मिळतील. मौनी रॉयची ही साडी Rouje कलेक्शनमधील आहे.

यामध्ये तुम्हाला अनेक चांगल्या डिझाईन्स पाहायला मिळतील. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ब्लाउजचे डिझाईन शिवून घेऊ शकता. या साडीची खास गोष्ट म्हणजे ती रात्री खूप छान दिसते, त्यामुळे तुम्ही दिवाळीला ती नेसू शकता. ही साडी तुम्हाला १००० ते २००० रुपयांपर्यंत मिळेल.

तुम्ही या साडीसोबत स्टोन वर्क इअररिंग्स आणि बोल्ड आय मेकअप करू शकता.

हेवी वर्क सिल्क साडी

जर तुम्हाला हेवी वर्कच्या साड्या नेसायला आवडत असतील तर तुम्ही सोनाली बेंद्रेचा हा साडीचा पर्याय वापरून पाहू शकता. यामध्ये तिने सिल्क ग्रीन कलरची साडी नेसली आहे, ज्यावर फुलांची डिझाइन आहे. यासोबत तिने मखमली रंगाचा ब्लाउज घातला आहे. तिने श्रेया माहेश्वरीची स्टाइल केली आहे. सध्या अशा साड्यांचा ट्रेंडही पाहायला मिळतोय, विशेषत: महाराष्ट्रीय महिला अशा साड्यांना प्राधान्य देताना दिसत आहे. या प्रकारची साडी तुम्ही दिवाळी खरेदी करू शकता. तुम्हाला ती बाजारात २००० ते ३००० रुपयांपर्यंत मिळतील.

तुम्ही या साडीबरोबर टेंपल ज्वेलरी घालू शकता. किंवा ट्रेडिन्शल मोत्यांची ज्वेलरीही परिधान करु शकता.

जरी वर्क साडी

यंदा दिवाळीत तुम्ही साध्या वर्कची जरीवाली साडी नेसू शकता. यामध्ये तुम्हाला संपूर्ण साडीवर जरीचे वर्क मिळेल. तर साडीच्या खालच्या बॉर्डवरही हेवी जरी वर्क पाहायला मिळाले. पण त्यासोबत येणारा ब्लाउज साधा असेल. जे तुम्ही कट स्लीव्हज ब्लाउज डिझाइनमध्ये तयार करू शकता. तुम्ही यंदाच्या दिवाळीत माधुरी दीक्षितचा जरी वर्क साडीतील हा लुकही ट्राय करु शकता, ज्यामुळे तुम्ही खूप सुंदरही दिसाल. या प्रकारची साडी बाजारात १५०० ते ५००० रुपयांपर्यंत मिळेल. यात प्रत्येक वर्कनुसार किंमत बदलते.

साडी हेवी असल्याने तुम्ही दागिने आणि मेकअप लाइट ठेवा. यामुळे तुम्ही अधिक सुंदर दिसाल.

मराठीतील सर्व दिवाळी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali 2023 saree ideas best ready to wear sarees for diwali 2023 diwali saree looks for woman sjr