Dhantrayodashi 2024:  धनत्रयोदशी या दिवाळीच्या पहिल्या दिवसाला हिंदू संस्कृतीत खूप महत्त्व आहे. दिवाळीनिमित्त भारतातच नाही, तर जगभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून येते. यंदा ३१ ऑक्टोबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होत आहे. त्यातही धनत्रयोदशीपासून दिवाळीला खरी सुरुवात होते. दिवाळीच्या एक दिवस आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते. म्हणजे या वर्षी २९ ऑक्टोबर २०२४ रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे.

या दिवशी लोक आयुर्वेदाची देवता धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात. संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक असणारा हा सण धनतेरस म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी सोने, चांदी, भांडी इत्यादी खरेदीचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, यामुळे संपत्तीचा देव कुबेर प्रसन्न होतो आणि आपल्यावर धनाचा वर्षाव होतो. त्याशिवाय दिवाळीत झाडू खरेदी करण्यालाही विशेष महत्त्व आहे. पण, धनत्रयोदशीलाच झाडू खरेदी करण्यामागे नेमकी काय परंपरा आहे याविषयी जाणून घेऊ…

Bhau Beej 2024 Date Time Shubh Muhurat Rituals in Marathi
Bhau Beej 2024 Date Shubha Muhurat: २ की ३ नोव्हेंबर, केव्हा साजरी केली जाणार भाऊबीज? जाणून घ्या तिथी, महत्त्व आणि भावाचे औक्षण करण्याची योग्य वेळ
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Gurupushyamrut yog
Gurupushyamrut Yoga : गुरुपुष्यामृताचा शुभ योग साधण्यासाठी उमेदवारांची धडपड, मुहुर्तावर कोण-कोण अर्ज भरणार?
Kartik Month Rashifal
‘या’ ५ राशींची होणार चांदी; १३ दिवसांनंतर देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूंची होणार कृपा, मिळणार बक्कळ पैसा
Diwali 2024 Dhanteras 2024
Dhanteras 2024: यंदा कधी आहे धनत्रयोदशी, २९ किंवा ३० ऑक्टोबर? जाणून घ्या पूजा, मुहूर्त आणि सणाचे महत्त्व
15th October Rashi Bhavishya In Marathi
१५ ऑक्टोबर पंचांग: वैवाहिक अडथळे दूर ते कर्जमुक्ती; मंगळवारी मेष ते मीनपैकी ‘या’ राशींची होणार इच्छापूर्ती; वाचा तुमच्या कुंडलीत कसं येणार सुख
9th October Rashi Bhavishya In Marathi
९ ऑक्टोबर पंचांग: कालरात्री देवी मेष, कन्यासह ‘या’ राशींना करणार प्रसन्न; जोडीदाराची साथ ते प्रत्येक कामात मिळेल यश; वाचा तुमचे राशिभविष्य
kushmanda devi google trend Why is Kushmanda worshiped on the fourth day of Navratri
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी का केली जाते कुष्मांडाची पूजा? गूगलवर ट्रेंड होणारी कुष्मांडाची पौराणिक कथा जाणून घ्या

धनत्रयोदशीला दागिने आणि भांड्यांबरोबरच झाडूलाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते.

का केली जाते झाडूची पूजा? (Dhantrayodashi  2024 Significance Of Purchasing Broom On Dhanteras)

हिंदू धर्मात धनत्रयोदशीला झाडू खरेदी करण्याची फार पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. झाडूला संपत्ती, समृद्धी व लक्ष्मीचे रूप मानले जाते. असे मानले जाते की, झाडू हे घरातील दारिद्र्य, वाईट व नकारात्मकता गोष्टी काढून टाकण्याचे प्रतीक आहे. या दिवशी झाडू खरेदी केल्याने घरात सुख-शांती येते आणि संपत्ती वाढते. त्याशिवाय घरातून गरिबीही दूर होते. दिवाळीला झाडू खरेदी करण्याबाबत आणखी एक असा समज आहे की, असे केल्याने लक्ष्मी घरातून बाहेर पडत नाही. यासोबतच काही लोकांचा असाही विश्वास आहे की, या दिवशी घरात झाडू आणल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सकारात्मकता पसरते.

हेही वाचा – दिवाळीपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब, १२ वर्षांनंतर गुरुच्या वक्रीमुळे मिळणार अपार पैसा अन् यश

एवढेच नाही, तर नवीन घरात प्रवेश करताना झाडू घेऊनच प्रवेश करणे शुभ मानले जाते. त्यात घर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक कुटुंबात झाडूचा नियमित वापर केला जातो. स्वच्छता ही देवी लक्ष्मीला आकर्षित करते, असे म्हटले जाते. त्यामुळे धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते.

धनतेरस हा शब्द ‘धन’ आणि ‘तेरस’ या दोन शब्दांपासून बनला आहे. धन संपत्तीचे प्रतिनिधित्व करते आणि तेरस हा शब्द तेरावा दिवस दर्शवितो. पाच दिवसांचा दिवाळी सण अधिकृतपणे या दिवशी सुरू होतो. असे मानले जाते की, या दिवशी समुद्रमंथन किंवा समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी दुधाच्या सागरातून प्रकट झाली .

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहितके आणि माहितीवर आधारित आहे.)