सणासुदीला कोणते कपडे घ्यायचे, त्यांचं स्टायलिंग कसं असलं पाहिजे, मेकअप कसा केला तर शोभून दिसेल हे हमखास पडणारे प्रश्न. म्हणूनच यंदाच्या फेस्टिव्ह सीझनसाठी सोप्या आणि पटकन करता येईल अशा
मेकअप आणि हेअर स्टाइल टिप्स-
रंग : सणासुदीचे दिवस म्हणजे पिंक, यलो, ऑरेंज, ब्लू, ग्रीन असे रंगीत आऊटफिट्स आपल्याला आठवतात. पण या वर्षी सटल रंगाचे कपडे वापरून बघा. यंदा डिझायनर्सनी व्हाइट रंगाबरोबरच पेस्टल शेड्स रॅम्पवर उतरवल्या होत्या. या उन्हाळ्यात अतिभडक रंग वापरण्यापेक्षा तुम्ही पिंक, ब्लू, रेड, येलो, ग्रीन यांच्या पेस्टल शेड्स वापरा. पेस्टल शेड्सचा ट्रेण्ड सध्या खूपच इन आहे. त्यामुळे या फेस्टिव्ह सीझनला तुमच्या वॉड्रोबमध्ये पेस्टल शेड्स असल्याच पाहिजेत.
फॅब्रिक्स : जॉर्जेट, शिफॉन अशा प्रकारची फॅब्रिक्स सणासुदीच्या आऊटफिट्समध्ये जास्त वापरली जातात आणि तरुणाईला ती आकर्षित करतात. परंतु या फॅब्रिक्सचा काहींना त्रास होतो. त्यामुळे यंदा डिझायनर्सनी ट्रॅडिशनल खादी, कॉटन, मलमल, लिनन या फॅब्रिक्सना पसंती दिली आहे. कुर्ती, साडी, लेहेंगा, ब्लाउज, स्लिट कुर्ती, केप टॉप्स इत्यादी फेस्टिव्ह आऊटफिट भारतीय फॅब्रिक्समध्ये उपलब्ध आहेत. दिसायला रिफ्रेशिंग असलेले हे फॅब्रिक्स वापरायलाही छान आणि हलकेफुलके वाटतील.
लेयरिंग : यंदाचा फेस्टिव्ह सीझन हा लेयरिंग्सचा आहे असं म्हटलं तरीही चालेल. जॅकेट्स, केप जॅकेट्स, ओढण्या, लहान जॅकेट्स यांचा वापर करून डिझायनर्सनी लेयरिंग्स सादर केले. जॅकेट्स, स्कार्फस, लेयर्स फेस्टिव्ह गाऊन, मलमल कुर्ती आणि फेस्टिव्ह स्कर्ट, फ्लेयर्ड कुर्ती विथ स्ट्रेट पँट्स सध्या ट्रेण्ड इन आहेत. तुमच्याकडे ते नक्कीच असले पाहिजेत.
रोड शॉपिंग : डिझायनर वेअर्सना पर्याय म्हणजे स्ट्रीट शॉपिंग. स्ट्रीट शॉपिंगमध्ये तुम्ही चंकी नेकपिस, कानातले, बांगडय़ा, छान वेगवेगळ्या डिझाइनच्या ओढण्या, वर्क केलेली जॅकेट, चप्पल हमखास विकत घेऊ शकता. परंतु हे सगळं घेताना वस्तू तपासून बघा. स्ट्रीट शॉपिंग करताना तुम्हाला खूप पर्याय असतात. त्याचा पुरेपूर वापर करा. एकाच दुकानातून सगळं घेण्यापेक्षा सगळीकडे फिरून मगच शॉपिंग करा.
या झाल्या कपडे खरेदी करण्याच्या काही टिप्स, त्यामध्ये कोणते रंग निवडावे कोणते फॅब्रिक निवडावे, इत्यादी समजले. आता बघू या फेस्टिव्ह सीझनसाठीच्या काही सोप्या हेअर स्टाइल टिप्स –
* मेकअप करताना काही वेळा आपल्याला फाऊंडेशन, कन्सिलर लावण्यासाठी वेळ होत नाही, किंवा काही काही वेळा ही प्रॉडक्ट्स नीट वापरता येत नाहीत, त्यामुळे चेहऱ्यावर प्लेन बेसऐवजी पॅचेस असलेला बेसचा थर लागतो. अशा वेळी तुमच्याजवळ असलेलं चेहऱ्याला सूट होणार क्रीम लावावं, त्यामुळे चेहऱ्याला तुकतुकी येईल. त्यावर नेहमीची टाल्कम पावडर लावा. आणि त्यांनतर रेड, र्बगडी, मारून, मर्सला अशा कोणत्याही डार्क शेडमधला लीप कलर लावा. त्यामुळे चेहरा ब्राइट आणि उठावदार दिसेल.
* गोल्ड, रोजपिंक, ब्रॉन्झ, कॉपर या रंगांचे आयश्ॉडोज कोणत्याही रंगाच्या आऊटफिट्सवर उठून दिसतात. त्याचबरोबर काजळ, आयलायनर लावून तुमचे डोळे पाणीदार आणि सुंदर दिसायला मदत होते. विंग आयलायनर लावण्यापेक्षा स्मोकी आइज करून बघा. खूप क्लासी लूक मिळेल.
* डोळे उठावदार आणि सुंदर दिसण्यासाठी मस्कारा नक्कीच वापरा. पापण्या सुंदर आणि लांबसडक दिसण्यास मदत होईल. तसेच खोटय़ा पापण्या सध्या उपलब्ध असतात, त्यांनीसुद्धा डोळे आकर्षक दिसायला मदत होईल.
* डोळ्याला आणि चेहऱ्याला आय ब्राऊजमुळे खूप छान लुक मिळतो. थिक आणि डार्क आयब्राऊज खूप ट्रेण्ड इन आहेत. त्यांनी डोळ्यांना फ्रेम मिळते तसेच चेहरा उठावदार आणि खूप यंग दिसतो.
* दिवाळीच्या वेळी आपल्याला काही न काही छान हेअर स्टाइल करायच्या असतात. पण त्यासाठी केसांमध्ये भरपूर क्लिप्स किंवा लहान रबर वापरू नये. कालांतराने डोकं दुखू शकतं. त्यामुळे सोप्या हेअर स्टाइल कराव्यात. अंबाडा, वेगवेगळ्या वेण्या किंवा सुट्टय़ा केसांच्या काही हेअर स्टाइल खूप छान दिसतील.
* हेअर स्टाइल्स करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, हल्ली खूप छान छान हेअर अॅक्सेसरीज उपलब्ध असतात. त्यातल्या काही आपण वापरू शकतो. जास्त हेअर अॅक्सेसरीज एका वेळी वापरू नयेत. ओव्हरसाइज मांगटिका, माथा पट्टी खूप ट्रेण्ड इन आहे. मेसी आणि क्लीन दोन्ही प्रकारच्या हेअर स्टाइल्सबरोबर या अॅक्सेसरीज खूप छान दिसतात. ओपन कर्ल्ससुद्धा सध्या खूप ट्रेण्ड इन आहे.
* केसांचा बन बांधताना कृत्रिम अॅक्ससेरीज वापरण्याऐवजी गुलाब किंवा मोगऱ्याचा सुंदर जाडसर गजरा वापरून त्याला स्टाइल करा. मेसी ब्रेड्ससुद्धा खूप इन आहेत. त्यालाही फुलं वापरून मस्त स्टाइल करता येईल.
प्राची परांजपे
सौजन्य – लोकप्रभा
response.lokprabha@expressindia.com