मेष : यशाचे धनी
आपला स्वभाव महत्त्वाकांक्षी आहे. प्रत्येक गोष्ट मनपसंत होईपर्यंत तुम्ही स्वस्थ बसत नाही. नूतन वर्षीही तुमचे ध्येय साकार होईपर्यंत तुम्ही स्वस्थ बसणार नाही. सातत्य ठेवून यशाचे स्वामी व्हाल. ग्रहमानाची छान मदत मिळू शकेल. स्वत:चे म्हणणे इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. त्यांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. आरोग्य ठीक राहील. आर्थिक गोष्टी कौशल्याने पूर्ण कराल. मात्र, बचतीकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. स्थावर मालमत्तेचे प्रश्न सुटतील. नूतन वर्षांत आपणास आनंदवार्ता समजतील. मन:स्वास्थ्य प्राप्त होईल.
नोव्हेंबर २०१३ : या महिन्याच्या पूर्वार्धात काही अनुकूल घटना घडतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. अर्थप्राप्ती होईल. मनासारखा खर्च कराल. समयसूचकता दाखवाल. आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. संयम ठेवावा.
डिसेंबर २०१३ : नोकरी-व्यवसायात छान प्रगती होईल. मंगळ ग्रह शुभयोगात आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवाल. मेहनतीस यश मिळेल. कामाचे नीट नियोजन कराल. प्रगतीसाठी नवीन संधी प्राप्त होतील. स्पर्धा जिंकाल. आरोग्य छान राहील.
जानेवारी २०१४ : परिस्थितीत अनुकूल बदल होईल. कामे मार्गी लागतील. अर्थप्राप्ती छान होईल. नोकरी-व्यवसायात अनुकूल घटना घडतील. १४ जानेवारीपासून सूर्य अनुकूल होईल. घरगुती प्रश्न सुटतील. गृहसौख्य लाभेल. आरोग्यात सुधारणा होईल. उत्साह वाढेल.
फेब्रुवारी २०१४ : ग्रहमान उत्तम आहे. सूर्य, मंगळ, बुध व शुक्र शुभयोगात राहतील. आर्थिक लाभ होतील. उद्योग, व्यवसायातील गुंतवणुकीवर लाभ होतील. प्रिय घटना घडतील. महत्त्वाचा पत्रव्यवहार होईल. आनंदवार्ता समजतील. स्पर्धा जिंकू शकाल.
मार्च २०१४ : महत्त्वाची कामे पूर्वार्धात करा. ती यशस्वी होतील. कुंभेचा सूर्य १४ मार्चपर्यंत अनुकूल राहील. आर्थिक लाभ होतील. इतरांचे देणे फेडाल. मनावरचा ताणतणाव दूर होईल. कार्यक्षमता वाढेल. कार्यतत्परता दाखवाल. मंगळ, बुध शुभयोगात आहेत.
एप्रिल २०१४ : मंगळ, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. घरातील खर्चाचे प्रश्न सुटतील. व्यवहारी राहाल. बचतीकडे जास्त लक्ष द्याल. विरोधक माघार घेतील. प्रगतीचा वेग वाढवू शकाल. प्रसंगावधान दाखवाल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील.
मे २०१४ : ग्रहमान उत्तम आहे. मंगळ, बुध, शुक्र शुभयोगात आहेत. अर्थप्राप्तीत वाढ होईल. बचतीकडे लक्ष द्यावे लागेल. प्रवासयोग येतील. विरोधक माघार घेतील. प्रगतीचा वेग वाढवू शकाल. आरोग्यात छान सुधारणा होईल. महिलांना गृहसौख्य लाभेल.
जून २०१४ : परिस्थितीमध्ये अनुकूल बदल होईल. १५ जूनपासून मिथुनेचा सूर्य शुभयोगात येईल. कन्येचा मंगळ षष्ठस्थानी अनुकूल आहे. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक येणे वसूल होईल. स्पर्धा, पैजा जिंकाल. आनंदवार्ता समजतील.
जुलै २०१४ : पूर्वार्ध जास्त चांगला जाईल. १६ जुलैपर्यंत मिथुनेचा सूर्य अनुकूल राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. मंगळ, बुध व शुक्र प्रसन्न आहेत. नोकरी-व्यवसायात आनंददायी घटना घडतील. आरोग्यावरचा ताणतणाव दूर होईल. मन:स्वास्थ्य उत्तम राहील.
ऑगस्ट २०१४ : ग्रहमान उत्तम आहे. बुध, शुक्र अनुकूल आहे. तुमची कार्यक्षमता वाढेल. गणरायाचा शुभाशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. नोकरीच्या शोधात असाल तर कामे मिळतील. प्रवास कार्यसाधक होतील. कौटुंबिक प्रश्न सुटतील. आरोग्य ठीक राहील.
सप्टेंबर २०१४ : १७ सप्टेंबरपासून कन्येचा सूर्य अनुकूल होईल. रेंगाळलेली सर्व कामे मार्गी लागतील. अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. प्रियजनांच्या भेटीगाठी होतील. आनंद वाटेल. सुसंवाद साधून कामे कराल. सरकारी कामे मार्गी लागतील. स्पर्धा जिंकाल.
ऑक्टोबर २०१४ : ग्रहमान उत्तम आहे. सूर्य, बुध व शुक्र प्रसन्न आहेत. खर्च वाढेल; परंतु तो योग्य कारणांसाठी होईल. अर्थप्राप्ती होईल. घरगुती प्रश्न कौशल्याने सोडवाल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. नवीन ओळखी होतील.
एकंदरीत हे नूतन वर्ष आपणास बरेच मोठे यश देणार आहे. तुमच्या स्वप्नांची पूर्तता करणार आहे.
वृषभ : दैव अनुकूल
या नूतन वर्षी ग्रहमान अतिशय उत्तम आहे. आपली स्थिती ‘देता किती घेशील दो करानी’ अशी होणार आहे. मिथुनेचा गुरू १९ जूनपर्यंत अनुकूल आहे. तुळेचा शनी षष्ठस्थानी शुभयोगात आहे. आत्मविश्वास हे यशाचे खरे रहस्य आहे. या वर्षी प्रत्येक काम तुम्ही आत्मविश्वासाने करणार आहात. आपल्या सामर्थ्यांत वाढ होणार आहे. विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्यास ग्रहमान मदत करणार आहे. तुमच्या प्रयत्नास छान यश मिळवून देणारे या वर्षीचे ग्रहमान आहे. विरोधक माघार घेणार आहेत.
नोव्हेंबर २०१३ : मिथुनेचा गुरू आणि तुळेचा शनी शुभयोगात आहेत. चिंता करू नका. सर्व गोष्टी मनाप्रमाणे होतील. राजकारणातील डावपेच यशस्वी होतील. गृहसौख्य मिळेल. आध्यात्मिक साधना सफल होईल. आप्तेष्ट, मित्रांच्या भेटीगाठी होतील.
डिसेंबर २०१३ : प्रगतीची घोडदौड चालूच राहील. ग्रहमान अनुकूल आहे. नवीन संधी प्राप्त होतील. कलावंतांना लाभ होतील. मानसन्मान प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. नवीन ओळखी होतील. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील. आरोग्य ठीक राहील.
जानेवारी २०१४ : ग्रहमान उत्तम आहे. बुध, गुरू, शुक्र व शनी प्रसन्न आहेत. आर्थिक लाभ होतील. उद्योग-व्यवसायात यश मिळेल. आर्थिक गुंतवणुकीवर लाभ होतील. प्रियजनांच्या भेटीगाठी होतील. महत्त्वाचा पत्रव्यवहार होईल. आनंदवार्ता समजतील.
फेब्रुवारी २०१४ : प्रारंभी अडचणी येतील. चिंता करू नका. १२ फेब्रुवारीपासून कुंभेचा सूर्य अनुकूल होईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. बढतीचे योग येतील. बुध, गुरू, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. आरोग्यात छान सुधारणा होईल.
मार्च २०१४ : ग्रहमान चांगले आहे. सूर्य, मंगळ, बुध, गुरू, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल. अनपेक्षित लाभ होतील. उद्योग-व्यवसायात छान प्रगती होईल. राजकारणातील डावपेच यशस्वी होतील. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य राहील.
एप्रिल २०१४ : प्रत्येक कामात यश मिळेल. स्पर्धा-पैजा जिंकाल. ग्रहमानाची मदत मिळेल. मीनेचा सूर्य १४ एप्रिलपर्यंत शुभयोगात आहे. आनंदवार्ता समजतील. सरकारी कामे मार्गी लागतील. आरोग्य छान राहील. कामात उत्साह राहील. यश मिळेल.
मे २०१४ : बुध, गुरू, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. देवाची मर्जी राहील. कठीण कामे मार्गी लागतील. प्रियजनांच्या भेटीगाठी होतील. प्रवास कार्यसाधक होतील. अनपेक्षित लाभदायक घटना घडतील. मंगल, धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. यशस्वी व्हाल.
जून २०१४ : बुध, गुरू, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. अनपेक्षित लाभ होतील. आप्तेष्ट, मित्रांच्या भेटीमुळे आनंद वाटेल. व्यवहारचातुर्य दाखवाल. संधीचे सोने कराल. सामाजिक कार्यामध्ये भाग घ्याल. शरीरस्वास्थ्य राहील. आनंद वाटेल.
जुलै २०१४ : प्रगतीसाठी नवीन संधी प्राप्त होतील. १६ जुलैपासून कर्केचा सूर्य अनुकूल होईल. धाडसी कृती कराल. सूचक घटनांद्वारे मार्गदर्शन कराल. १४ जुलैपासून तुळेचा मंगळ अनुकूल होईल. धार्मिक, मंगल कार्यात भाग घ्याल. आरोग्य ठीक राहील.
ऑगस्ट २०१४ : महत्त्वाची कामे १७ ऑगस्टपूर्वी करून घ्या. कर्केचा सूर्य अनुकूल राहील. बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. परिस्थितीत छान सुधारणा होईल. नवीन संधी प्राप्त होतील. खर्चाचे प्रश्न सुटतील. आरोग्यात सुधारणा होईल.
सप्टेंबर २०१४ : दैवाची मदत मिळेल. बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. इतरांचे छान सहकार्य मिळेल. हातून चांगले कार्य पार पडेल. ताणतणाव दूर होतील. बचतीकडे अधिक लक्ष द्याल. विरोधकांचा विरोध मावळेल. प्रगतीचा वेग वाढवाल.
ऑक्टोबर २०१४ : तुळेचा सूर्य १७ ऑक्टोबरपासून अनुकूल होईल. कर्तव्यपूर्तीसाठी वेळ व पैसे खर्च कराल. समाधान प्राप्त होईल. आनंददायक घटना घडतील. समस्या सुटतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. व्यवहारी राहाल. बचत कराल.
हे नूतन वर्ष आपल्या प्रगतीच्या नवीन संधी प्राप्त करून देणारे आहे. १९ जून २०१४ पर्यंत मिथुनेचा गुरू तुमच्या राशीवर प्रसन्न राहणार आहे. आर्थिक लाभ होणार आहेत. तुळेचा शनी अनुकूल असल्याने या वर्षी कौटुंबिक प्रश्न सुटणार आहेत.
मिथुन : प्रगतीचे वर्ष
माणसाला सुखी व्हायचे असेल तर प्रथम त्याला समर्थ बनावे लागते. या नूतन वर्षी तुम्हास सामथ्र्य प्राप्त होणार आहे. प्रारंभी काही अडचणी आल्या तरी चिंता करू नका. १९ जून २०१४ रोजी कर्क राशीत प्रवेश करणारा गुरू तुम्हाला महान यश प्राप्त करून देणारा आहे. रेंगाळलेली सर्व कामे मार्गी लागतील. उत्कर्षांचे दिवस प्राप्त होतील. योग्य निर्णय योग्य कृती झाल्याने आर्थिक लाभ होणार आहेत. सामाजिक कार्यात भाग घेण्याची संधी प्राप्त होणार आहे. नूतन वर्षी प्रगतीसाठी नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.
नोव्हेंबर २०१३ : या महिन्यात सामंजस्य दाखवून प्रश्न सोडवावे लागतील. बुध- शुक्र शुभयोगात आहेत. कार्यक्षमता वाढेल. कामांचा उरक राहील. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील. नवीन ओळखी होतील. वेळेचा व संधीचा योग्य उपयोग करून घ्यावा लागेल.
डिसेंबर २०१३ : महत्त्वाचा पत्रव्यवहार होईल. स्वभाव महत्त्वाकांक्षी राहील. उद्योग व्यवसायात छान प्रगती होईल. प्रगतीसाठी नवीन संधी प्राप्त होतील. जमीन खरेदी-विक्री व्यवहारात लाभ होतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. आरोग्य छान राहील.
जानेवारी २०१४ : पूर्वार्धात धनूचा सूर्य अनुकूल राहील. प्रत्येक कामात यश मिळेल. अर्थप्राप्ती होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. वेळेचा व संधीचा योग्य उपयोग करून घ्याल. तुमचे मनोबल वाढेल. शरीरस्वास्थ्य राहील. मन:स्वास्थ्य राहील.
फेब्रुवारी २०१४ : जमाखर्चाची स्पर्धा राहील. व्यवहारी राहावे लागेल. द्विधा मन:स्थितीमुळे निर्णय घेणे कठीण जाईल. कामात वाढ होईल. मन:स्वास्थ्यास जपावे लागेल. शरीरस्वास्थ्यास जपावे लागेल. अध्ययन ठीक चालेल. संयमाने वागावे लागेल.
मार्च २०१४ : प्रारंभी काही अडचणी आल्या तरी चिंता करू नका. १४ मार्चपासून मीनेचा सूर्य अनुकूल होईल, आर्थिक प्रश्न सुटतील. बुध-शुक्र शुभयोगात आहेत. महत्त्वाचा पत्रव्यवहार होईल. शुभ घटना घडतील. वेळेचा छान उपयोग करून घ्याल, यशस्वी व्हाल.
एप्रिल २०१४ : कार्यतत्परता दाखवाल. इतरांची मने जिंकून घ्याल. सूर्य, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. खर्चाचे प्रश्न सुटतील. इतरांचे सहकार्य मिळेल. पूर्वीच्या चुका सुधारण्याची संधी प्राप्त होईल. प्रवास कार्यसाधक, मनाजोगे होतील. आरोग्य छान राहील.
मे २०१४ : १४ मेपर्यंत मेषेचा सूर्य अनुकूल राहील. कामे यशस्वी होतील. अर्थप्राप्ती चांगली होईल. उद्योग-व्यवसायात अधिक गुंतवणूक कराल. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. कामात उत्साह राहील. विद्यार्थ्यांना अध्ययनात उज्ज्वल यश प्राप्त होईल.
जून २०१४ : मागील काही दिवस ताणतणावाचे गेले. आता परिस्थितीत सुधारणा होईल. १९ जूनपासून कर्केचा गुरू अनुकूल होईल. प्रत्येक कामात यश मिळेल. नोकरी व्यवसायात छान प्रगती होईल. महिलांना गृहसौख्य प्राप्त होईल. आरोग्य ठीक राहील.
जुलै २०१४ : कर्केचा गुरू धनस्थानी शुभ योगात आहे. अर्थप्राप्ती चांगली होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. व्यवहारी राहून बचत करू शकाल. नवीन ओळखी होतील. आरोग्यात छान सुधारणा होईल. कामात उत्साह राहील. प्रवास मनाजोगे होतील.
ऑगस्ट २०१४ : १७ ऑगस्टपासून सिंहेचा सूर्य अनुकूल होईल. रेंगाळलेले प्रश्न सुटतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पूर्ण कराल. बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. वेळेचा व संधीचा छान सदुपयोग कराल. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य राहील.
सप्टेंबर २०१४ : सिंहेचा सूर्य १७ सप्टेंबपर्यंत शुभयोगात राहील. बुध, शुक्र व गुरू शुभयोगात आहेत. तुमचे अंदाज खरे ठरतील. आर्थिक प्रश्न सुटतील. प्रसंगावधान दाखवाल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल, आरोग्यात सुधारणा होईल, गृहसौख्य मिळेल.
ऑक्टोबर २०१४ : मंगळ, बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. उद्योग-व्यवसायातील अडचणी दूर होतील. अर्थप्राप्ती झाल्याने कौटुंबिक खर्चाचे प्रश्न सुटतील. आप्तेष्ट, मित्रांच्या भेटीगाठी होतील. धन्यता वाटेल. आनंद वाटेल. शाबासकी मिळवाल.
प्रारंभी काही आर्थिक अडचणी आल्या तरी चिंता करू नका. नोकरीत अधिकार प्राप्तीचे योग येणार आहेत.
कर्क : कर्तृत्वाला संधी
मनाला उचित विचारांची सवय लागली की उचित कृती आपोआप घडत जाते. या वर्षी याचा अनुभव येईल. आर्थिक प्रश्न सुटतील. सहनशीलता हीच सर्व गुणांची कसोटी असते. प्रत्येक काम एकाग्रतेने करण्यावर जास्त भर द्याल. कर्तृत्व दाखविण्यासाठी नवीन संधी प्राप्त होतील. चांगल्या मित्रांचे वर्तुळ लाभेल. इतरांचे सहकार्य मिळविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. वेळेचा उपयोग कराल. ग्रहमान छान मदत करतील. नूतन वर्ष उत्तम आरोग्याचे जाईल. अनपेक्षित लाभ होतील.
नोव्हेंबर २०१३ : उद्योग व्यवसायात अधिक गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. नोकरीत बढतीचे योग येतील. कल्पकता दाखवाल. आर्थिक लाभ होतील. महत्त्वाच्या भेटीगाठी होतील. दैव अनुकूल आहे. महिलांना गृहसौख्य मिळेल. शरीरस्वास्थ्य राहील.
डिसेंबर २०१३ : १५ पासून धनूचा सूर्य अनुकूल होईल. रेंगाळलेले प्रश्न सुटतील. मनावरचा ताणतणाव दूर होईल. प्रयत्न सार्थकी लागतील. यश मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील. सुसंवाद साधून कामे कराल. आनंदवार्ता समजतील.
जानेवारी २०१४ : छान प्रगती होईल. सूर्य, मंगळ व बुध शुभयोगात आहेत. योग्य निर्णय घ्याल. योग्य कृती कराल. आर्थिक येणे वसूल होईल. ताणतणाव दूर होईल. प्रसंगावधान दाखवाल. महिलांना गृहव्यवस्थापनात यश मिळेल.
फेब्रुवारी २०१४ : पूर्वार्धात मकरेचा सूर्य अनुकूल राहील. कर्तव्यपूर्तीकडे जास्त लक्ष द्याल. प्रवास कार्यसाधक होतील. महत्त्वपूर्ण घटना घडतील. अनावश्यक खर्च टाळण्यात यशस्वी व्हाल. संधीचे सोने कराल. अध्ययनात छान प्रगती होईल. यश मिळेल.
मार्च २०१४ : मंगळ, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. त्यामुळे खर्चाचे प्रश्न सुटतील. अनावश्यक खर्चावर बंधने घालावी लागतील. प्रवास कार्यसाधक होतील. महत्त्वाची बोलणी यशस्वी होतील. आरोग्यात सुधारणा होईल.
एप्रिल २०१४ : प्रारंभी काही अडचणी आल्या तरी चिंता करू नका. १४ एप्रिलपासून मेषेचा सूर्य अनुकूल होईल. उद्योग-व्यवसायात अधिक गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. मंगळ, बुध व शुक्र तुमच्यावर प्रसन्न आहेत. आरोग्य ठीक राहील.
मे २०१४ : सूर्य, मंगळ, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. शेती – बागायती, जमीन खरेदी-विक्री व्यवहारात लाभ होतील. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील. आनंदवार्ता समजतील. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य राहील. स्पर्धा जिंकाल, उत्साह वाढेल.
जून २०१४ : महत्त्वाची सर्व कामे १५ जूनपूर्वी करून घ्या. वृषभेचा सूर्य अनुकूल आहे. कामे मार्गी लागतील. कन्येचा मंगळ पराक्रमस्थानी शुभयोगात आहे. स्वावलंबी व्हाल. प्रिय घटना घडतील. इतरांचे आर्थिक देणे फेडाल. आरोग्य सुधारेल.
जुलै २०१४ : कन्येचा मंगळ १४ जुलैपर्यंत मदत करील. शुक्र शुभयोगात आहे. खर्च वाढेल. परंतु तो योग्य कारणांसाठी होईल. अधिकारप्राप्तीचे योग येतील. कल्पकता दाखवाल. चातुर्याने वागाल. कलावंतांना मानसन्मान प्राप्त होतील.
ऑगस्ट २०१४ : अर्थप्राप्ती होईल. बुध, शुक्र मदत करतील. खर्चाविषयीचे आपले अंदाज चुकतील. प्रलोभने टाळावी लागतील. प्रयत्नात सातत्य ठेवावे लागेल. मन:स्वास्थ्यास व शरीरस्वास्थ्यास जपावे लागेल. संयमाने वागावे.
सप्टेंबर २०१४ : कन्येचा सूर्य १७ सप्टेंबरपासून अनुकूल होईल. बुध, शुक्र शुभयोगात आहेत. नोकरीत अधिकारप्राप्तीचे योग येतील. वरिष्ठांची मर्जी राहील. ओळखींचा छान उपयोग कराल. तब्येतीच्या तक्रारी दूर होतील.
ऑक्टोबर २०१४ : कन्येचा सूर्य १७ ऑक्टोबपर्यंत मदत करील. प्रापंचिक खर्चाचे प्रश्न सुटतील. आत्मविश्वास वाढेल. प्रयत्न सार्थकी लागतील. नवीन ओळखींचा छान उपयोग होईल. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य राहील.
नूतन वर्षी आपणास अधिक बचत करता येईल. आर्थिक प्रश्न सुटण्यासाठी ग्रहमान मदत करू शकेल. मोठय़ा व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. त्यांच्या अनुभवांचा उपयोग होईल. कर्तव्यपूर्तीचे समाधान प्राप्त होईल. इतरांना दिलेली आश्वासने तुम्ही पूर्ण करू शकाल. नूतन वर्षी कौटुंबिक प्रश्न कौशल्याने सोडवाल. महिलांना हे वर्ष मन:स्वास्थ्य प्राप्त करून देणारे आहे. मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. मुलांकडून प्रगतीच्या बातम्या समजतील. तब्येतीत छान सुधारणा होईल. पूर्वीच्या तक्रारी दूर होतील. कामात उत्साह वाढेल.
सिंह : स्वप्ने साकारतील
नूतन वर्षी ग्रहमान प्रसन्न आहे. तुमची स्वप्ने साकार होण्यासाठी तुम्हाला ग्रहमान मदत करणार आहे. मिथुनेचा गुरू १९ जून २०१४ पर्यंत शुभयोगात राहील. तुळेचा शनी तृतीयस्थानी अनुकूल राहील. आर्थिक प्रश्न सुटतील. तुम्ही योग्य निर्णय घ्याल. योग्य कृती कराल. नोकरी व्यवसायात छान प्रगती होईल. वेळेचा आणि संधीचा योग्य उपयोग करून घ्याल. नवीन ओळखींचा चांगला उपयोग होईल. समाजकार्यात भाग घ्याल. मानसन्मान प्राप्त होतील. महिलांना मन:स्वास्थ्य मिळेल. विवाहेच्छुकांची स्वप्ने साकार होतील.
नोव्हेंबर २०१३ : तुळेचा सूर्य पराक्रमस्थानी शुभयोगात राहील. त्यामुळे महत्त्वाची कामे १६ नोव्हेंबपर्यंत करून घ्या. ती यशस्वी होतील. नवीन आव्हाने स्वीकारू शकाल. छान प्रगती होईल. मिथुनेचा गुरू मदत करील, आरोग्य छान राहील.
डिसेंबर २०१३ : ग्रहमान चांगले आहे. गृहसौख्य प्राप्त होईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. प्रतिष्ठा वाढेल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. आत्मविश्वास वाढेल. परोपकाराची संधी मिळेल. नवीन ओळखी होतील. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील.
जानेवारी २०१४ : १४ जानेवारीपासून मकरेचा सूर्य अनुकूल होईल. रेंगाळलेले प्रश्न सुटतील. व्यवहारकौशल्य दाखवाल. आर्थिक लाभ होईल. नोकरी व्यवसायात छान प्रगती होईल. कवीक्षेत्रातील व्यक्तींना मानसन्मान प्राप्त होतील. आनंद वाटेल.
फेब्रुवारी २०१४ : चिंता करण्याचे काहीच कारण नाही. सूर्य, मंगळ, बुध, गुरू, शुक्र व शनी अनुकूल आहेत. प्रत्येक कामात यश मिळेल. ग्रहमान उत्तम आहेत. नोकरी व्यवसायात छान प्रगती होईल. आरोग्यात छान सुधारणा होईल. यशस्वी व्हाल.
मार्च २०१४ : कुंभेचा सूर्य १४ मार्चपर्यंत अनुकूल राहील. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील. मंगळ, गुरू व शनी शुभयोगात आहेत. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. खर्चाचे प्रश्न सुटतील. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. अध्ययनात छान प्रगती होईल.
एप्रिल २०१४ : बुध, गुरू व शनी शुभयोगात आहेत. प्रत्येक कामात यश मिळेल. ज्येष्ठ, श्रेष्ठ मंडळींचे मार्गदर्शन मिळेल. प्रियजनांच्या भेटीगाठी होतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारून त्या यशस्वी करून दाखवाल. आपले अंदाज खरे ठरतील.
मे २०१४ : १४ मेपासून वृषभेचा सूर्य अनुकूल होईल. बुध, गुरू, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. कर्तृत्वाला संधीची जोड मिळेल. हातून चांगली कामे पार पडतील. समाजकार्यात भाग घ्याल. राहत्या घराविषयीचे प्रश्न सुटतील. आरोग्य सुधारेल.
जून २०१४ : मिथुनेचा गुरू १९ जूनपर्यंत मदत करील. सूर्य, बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारून त्या यशस्वी करून दाखवाल. कलावंत, साहित्यिक क्रीडापटू यांना मानसन्मान प्राप्त होईल. आरोग्य ठीक राहील.
जुलै २०१४ : मिथुनेचा सूर्य १६ जुलैपर्यंत शुभयोगात राहील. तुळेचा मंगळ १४ जुलैपासून शुभयोगात येईल. सरकारी तसेच कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील. मेहनतीस न्याय मिळेल. प्रियजनांच्या भेटीगाठी होतील. शरीरस्वास्थ्य राहील.
ऑगस्ट २०१४ : ग्रहमान उत्तम आहे. मंगळ, बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. दैवाची मर्जी राहील. अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. अनपेक्षित फायदा करून देणाऱ्या घटना घडतील. महत्त्वाचा पत्रव्यवहार होईल. इतरांना मदत, मार्गदर्शन कराल.
सप्टेंबर २०१४ : दैव अनुकूल राहील. ग्रहमान उत्तम आहे. बुध, शनी शुभयोगात आहेत. लाभदायक घटना घडतील. इतरांचे छान सहकार्य मिळेल. तुमचे डावपेच यशस्वी होतील. घरगुती प्रश्न सुटतील. बचतीकडे लक्ष द्याल.
ऑक्टोबर २०१४ : तूळेचा सूर्य १७ ऑक्टोबरपासून शुभयोगात येईल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. आनंदवार्ता समजतील. बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. तुमच्या मेहनतीला न्याय मिळेल. तुमची कार्यक्षमता वाढेल. तब्येतीच्या तक्रारी दूर होतील. आनंदवार्ता समजतील.
नूतन वर्षी मिथुनेचा गुरू आणि तुळेचा शनी तुमच्या राशीसाठी शुभयोगात आहेत. अर्थप्राप्तीच्या दृष्टीने नूतन वर्ष छान प्रगतीचे असणार आहे. आर्थिक गुंतवणुकीवर चांगला फायदा होईल. राहत्या घराविषयीचे प्रश्न सुटणार आहेत. कार्यक्षमता वाढेल. योग्य निर्णय घ्याल. नूतन वर्षी प्रवास कार्यसाधक होणार आहेत. महिलांना छान गृहसौख्य प्राप्त होईल. कलाक्षेत्रात छान प्रगती साधता येईल. अधिकारप्राप्तीचे योग येतील. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. सामंजस्य दाखवाल.
कन्या : अनुकूल बदल
नूतन वर्षी ग्रहमानात अनुकूल बदल होणार आहेत. १९ जून २०१४ रोजी कर्क राशीत प्रवेश करणारा गुरू शुभयोगात येत आहे. तो तुमच्या मार्गातील अडथळे दूर करील. प्रगतीसाठी नवीन संधी उपलब्ध करून देईल. सुसंवाद साधून कामे करण्यावर भर द्याल. प्रसन्न मन आणि नम्र स्वभाव यामुळे सारे जग जिंकू शकाल. प्रत्येक काम मनापासून एकाग्रतेने कराल. आर्थिक येणे वसूल होईल. प्रवास कार्यसाधक होतील. नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांची स्वप्ने साकार होतील. तुम्ही इतरांना मदत मार्गदर्शन करू शकाल. यशस्वी व्हाल.
नोव्हेंबर २०१३ : ग्रहमान अनुकूल आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. छान प्रगती होईल. उद्योग-व्यवसायात वाढ होईल. नोकरीत अनुकूलता राहील. महिलांना गृहसौख्य मिळेल. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. यशस्वी व्हाल.
डिसेंबर २०१३ : वृश्चिकेचा सूर्य १५ डिसेंबपर्यंत शुभयोगात राहील. महत्त्वाची कामे तोपर्यंत करून घ्या. ती यशस्वी होतील. मनोबल वाढविणाऱ्या घटना घडतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. गृहसौख्य लाभेल. आनंद वाटेल.
जानेवारी २०१४ : बुध, शुक्र शुभयोगात आहेत. संयम, सहनशीलता आणि सावधानता ठेवावी लागेल. प्रयत्नात सातत्य ठेवावे लागेल. आर्थिक मोठी गुंतवणूक करताना जास्त काळजी घ्यावी लागेल. आरोग्यावर ताण पडेल. प्रवासयोग येतील.
फेब्रुवारी २०१४ : १२ फेब्रुवारीपर्यंत कुंभेचा सूर्य अनुकूल राहील. बुध-शुक्र शुभयोगात आहेत. कठीण, रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. आप्तेष्ट, मित्रांच्या भेटीगाठी होतील. आरोग्यात छान सुधारणा होईल. स्पर्धा-पैजा जिंकाल.
मार्च २०१४ : सूर्य, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना कामे मिळतील. पूर्वीच्या चुका सुधारू शकाल. इतरांची शाबासकी मिळवाल. महिलांना गृहसौख्य लाभेल. गृह व्यवस्थापनात यश येईल. समाधान लाभेल.
एप्रिल २०१४ : मीनेचा सूर्य १४ एप्रिलपर्यंत अनुकूल राहील. नोकरीत कामामध्ये वाढ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. बुध, शुक्र शुभयोगात आहेत. तब्येतीच्या तक्रारी दूर होतील. महत्त्वाचा पत्रव्यवहार होईल. समयसूचकता दाखवाल. यश मिळेल.
मे २०१४ : बुध, शुक्र शुभयोगात आहेत. खर्चाचे अंदाज चुकतील. अनावश्यक खर्च टाळणे हिताचे होईल. इतरांना दिलेला शब्द पाळाल. पत-प्रतिष्ठा वाढेल. प्रलोभने टाळावी लागतील. कामात वाढ होईल त्याचा ताण आरोग्यावर पडेल. संयम ठेवावा.
जून २०१४ : १९ जूनपासून कर्केचा गुरू शुभयोगात येईल. १५ जूनपासून मिथुनेचा सूर्य अनुकूल होईल. मनींची स्वप्ने साकार होतील. आरोग्यात छान सुधारणा होईल. अर्थप्राप्ती चांगली झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. उत्साह वाढेल.
जुलै २०१४ : कर्केचा गुरू लाभस्थानी आहे. पत-प्रतिष्ठा वाढेल. सामंजस्य दाखवून इतरांची मने जिंकून घ्याल. आरोग्यात छान सुधारणा होईल. परोपकाराची संधी मिळेल. इतरांना मदत कराल. महिलांना कलाक्षेत्रात प्रगती साधता येईल.
ऑगस्ट २०१४ : कर्केचा सूर्य १७ ऑगस्टपर्यंत मदत करील. बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. गृहसौख्य लाभेल. कलावंत, क्रीडापटू यांना मानसन्मान प्राप्त होतील. विद्यार्थ्यांना अध्ययनात यश मिळेल.
सप्टेंबर २०१४ : बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. ४ सप्टेंबरपासून वृश्चिकेचा मंगळ पराक्रमस्थानी येईल. कौटुंबिक, आर्थिक प्रश्न कौशल्याने सोडवाल. धाडसी कृती कराल. इतरांची मने जिंकून घ्याल, प्रश्न सोडवाल.
ऑक्टोबर २०१४ : मंगळ, बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. नवीन ओळखी होतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. बचतीकडे जास्त लक्ष द्याल. सरकारी कामे मार्गी लागतील. दैवाची मर्जी राहील. लाभ होतील.
नूतन वर्षी परिस्थितीत छान सुधारणा होईल. १९ जून २०१४ रोजी लाभस्थानी येणारा कर्केचा गुरू तुम्हाला प्रगतीसाठी संधी उपलब्ध करून देईल. उद्योग-व्यवसायात नवीन संधी प्राप्त होतील. अधिक गुंतवणूक कराल. नोकरीत बढतीचे योग येतील. जमीन खरेदी-विक्री व्यवहारात लाभ होतील. शेअर्स खरेदी-विक्री व्यवहारात चांगला फायदा मिळवू शकाल. मोठय़ा योजना कार्यान्वित कराल. समयसूचकता दाखवाल. व्यवहारी राहाल. आप्तेष्ट मित्रांच्या भेटीगाठी होतील. महिलांना हे नूतन वर्ष सुखसमृद्धीचे असणार आहे. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. मनाची उमेद, उत्साह वाढेल. विद्यार्थ्यांना छान यश प्राप्त होईल.
तूळ : पूर्वार्ध चांगला
नूतन वर्षांचा पूर्वार्ध जास्त चांगला जाईल. १९ जून २०१४ पर्यंत मिथुनेचा गुरू अनुकूल राहील. महत्त्वाची कामे तोपर्यंत करून घ्या. ती यशस्वी होतील. नोकरी- व्यवसायात महत्त्वपूर्ण लाभदायक घटना घडतील. संधी आणि वेळ यांचा तुम्ही योग्य उपयोग करून घ्याल. आत्मविश्वासाने कामे कराल. व्यवहारी राहून नूतन वर्षी बचतीकडे आणि आर्थिक गुंतवणुकीकडे जास्त लक्ष द्याल. स्वावलंबी होण्यावर जास्त भर द्याल. प्रवासाने काही महत्त्वाची कामे पूर्णत्वास न्याल. कौटुंबिक प्रगतीच्या काही घटना घडतील. समयसूचकता दाखवाल. इतरांची मने जिंकून घ्याल.
नोव्हेंबर २०१३ : मिथुनेचा गुरू शुभस्थानी आहे. कामात यश मिळेल. योग्य निर्णय घ्याल. योग्य कृती कराल. कलावंतांना मानसन्मान प्राप्त होतील. आर्थिक गुंतवणुकीवर छान फायदा मिळवू शकाल. घरगुती प्रश्न सुटतील. गृहसौख्य मिळेल. शरीरस्वास्थ्य राहील.
डिसेंबर २०१३ : अर्थप्राप्ती झाली तरी खर्च खूप होईल. अनावश्यक खर्च प्रथमपासून टाळावा लागेल. संयमाने वागावे लागेल. उत्तरार्ध जास्त चांगला जाईल. प्रलोभनांपासून जपावे लागेल. व्यवहारी रहावे लागेल. राजकारणात नवीन डावपेच लढवावे लागतील.
जानेवारी २०१४ : धनूचा सूर्य १४ जानेवारीपर्यंत अनुकूल राहील. महत्त्वाची कामे तोपर्यंत करून घ्या. ती यशस्वी होतील. बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. कल्पकता दाखवाल. व्यवहारी रहाल, बचतीकडे लक्ष द्याल, आरोग्यात सुधारणा होईल.
फेब्रुवारी २०१४ : ग्रहमान चांगले आहे. बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. मेहनतीस न्याय मिळेल. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. महिलांना गृहसौख्य लाभेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. आनंदवार्ता समजतील. आरोग्य छान राहील.
मार्च २०१४ : उत्तरार्ध जास्त चांगला जाईल. १४ मार्चपासून मीनेचा सूर्य अनुकूल होईल. रेंगाळलेले प्रश्न सुटतील. इतरांचे छान सहकार्य मिळेल. ग्रहमानाची मदत मिळेल. अनपेक्षित लाभदायक घटना घडतील. आनंदवार्ता समजतील. शरीरस्वास्थ्य राहील.
एप्रिल २०१४ : सूर्य, बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. अनपेक्षित, लाभदायक घटना घडतील. रेंगाळलेली कठीण कामे मार्गी लागतील. धार्मिक, मंगलकार्यात भाग घ्याल. प्रवास मनाजोगे होतील. मानसन्मान प्राप्त होतील.
मे २०१४ : मेषेचा सूर्य १४ मेपर्यंत शुभयोगात राहील. महत्त्वाची कामे तोपर्यंत करून घ्या. ती यशस्वी होतील. खर्च मात्र खूप होईल. अनावश्यक खर्च प्रथमपासून टाळावा लागेल. कर्तव्यपूर्तीकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. शरीरस्वास्थ्यास जपावे लागेल.
जून २०१४ : १९ जूनपर्यंत मिथुनेचा गुरू शुभयोगात राहील. महत्त्वाची कामे तोपर्यंत करून घ्या. ती यशस्वी होतील. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. प्रियजनांच्या भेटीगाठी होतील. आरोग्यात छान सुधारणा होईल, यश येईल.
जुलै २०१४ : कर्केचा सूर्य १६ जुलैपासून अनुकूल होईल. पूर्वी न जमलेली कामे तुम्हाला जमू शकतील. महिलांना गृहसौख्य लाभेल. गृहव्यवस्थापनात यश मिळेल, आरोग्यात छान सुधारणा होईल. पूर्वीच्या तक्रारी दूर होतील.
ऑगस्ट २०१४ : सूर्य बुध, शुक्र अनुकूल आहेत. प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हाल. धार्मिक, मंगल कार्यात सहभागी व्हाल. सामंजस्य दाखवून प्रश्न सोडवाल. कर्तव्यपूर्तीसाठी प्रयत्न कराल. गृहसौख्य मिळेल. मन:स्वास्थ्य राहील. यश मिळेल.
सप्टेंबर २०१४ : उद्योग-व्यवसायात मोठी गुंतवणूक जपून करा. सिंहेचा सूर्य १७ सप्टेंबपर्यंत मदत करील. स्पर्धा-पैजा जिंकण्यासाठी खूप मेहनत पडेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे. आरोग्यावर ताण पडेल. संयमाने वागावे.
ऑक्टोबर २०१४ : धनूचा मंगळ १८ ऑक्टोबरपासून शुभयोगात येईल. प्रश्न सुटतील. स्पर्धा-पैजा जिंकाल. आर्थिक येणे वसूल होईल. सूचक स्वप्नांद्वारे मार्गदर्शन मिळेल. कामात कल्पकता दाखवाल. इतरांची मने जिंकून घ्याल.
अर्थप्राप्तीच्या दृष्टीने हे नूतन वर्ष आपणास खूप चांगले जाईल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न कौशल्याने सोडवाल. विवाहेच्छुकांना स्वप्नपूर्तीसाठी १९ जून २०१४ पर्यंतचा काळ उत्तम आहे. महिलांना स्वत:च्या प्रगतीसाठी प्रयत्न करता येतील. कलाक्षेत्रात छान प्रगती साधता येईल. आरोग्याच्या दृष्टीने हे नूतन वर्ष आपणास खूप चांगले जाईल.
वृश्चिक : आनंददायक घटना
‘जितक्या गरजा कमी तितका माणूस श्रीमंत’ असे म्हणतात; परंतु नूतन वर्षी गरजा वाढूनही तुम्ही श्रीमंतीसौख्य अनुभवू शकाल. १९ जून २०१४ पासून कर्क राशीत प्रवेश करणारा गुरू शुभयोगात येत आहे. तो तुमची स्वप्ने साकार होण्यासाठी मदत करील. नूतन वर्षी राहत्या घराचा प्रश्न तुम्ही सोडवू शकाल. कौटुंबिक प्रगतीच्या दृष्टीने हे वर्ष खूप महत्त्वाचे असणार आहे. महिलांना गृहव्यवस्थापनात छान यश मिळेल. कौटुंबिक प्रश्न मोठय़ा कौशल्याने सोडवू शकाल. आनंददायक घटना घडतील.
नोव्हेंबर २०१३ : शेतजमीन खरेदी-विक्री व्यवहारात लाभ होतील. शेअर्स खरेदी-विक्री व्यवसायात फायदा होईल. कामात उत्साह राहील. वेळेचा योग्य उपयोग करून घ्याल. इतरांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. आरोग्य ठीक राहील.
डिसेंबर २०१३ : कन्येचा मंगळ लाभस्थानी शुभयोगात आहे. इतरांना कठीण करणारी कामे तुम्ही यशस्वी करून दाखवाल. प्रलोभने टाळण्यात यशस्वी व्हाल. बचतीकडे लक्ष द्याल. घरगुती प्रश्न कौशल्याने सोडवाल. आनंदवार्ता समजतील.
जानेवारी २०१४ : या महिन्याच्या उत्तरार्धात आनंददायक घटना घडतील. १४ जानेवारीपासून मकरेचा सूर्य शुभयोगात येईल. व्यवहारचातुर्य दाखवाल. इतरांना मदत कराल. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य चांगले राहील. कर्तव्यपूर्तीकडे जास्त लक्ष द्याल. अध्ययन ठीक चालेल.
फेब्रुवारी २०१४ : मकरेचा सूर्य १२ फेब्रुवारीपर्यंत अनुकूल राहील. कामे मार्गी लागतील. वादविवाद स्पर्धा जिंकाल. मंगळ, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. योग्य निर्णय घ्याल. योग्य कृती कराल. कामात उत्साह राहील. अध्ययन छान चालेल.
मार्च २०१४ : मंगळ, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. मनावरचे दडपण दूर होईल. खर्च मात्र वाढेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. महत्त्वपूर्ण घटना घडतील. कामात उत्साह राहील. अध्ययनात यश मिळेल.
एप्रिल २०१४ : प्रारंभी विरोध जाणवेल. चिंता करू नका. १४ एप्रिलपासून मेषेचा सूर्य अनुकूल होईल. मंगळ, बुध व शुक्र प्रसन्न आहेत. नोकरी-व्यवसाय छान चालेल. खर्चाचे प्रश्न सुटतील. आरोग्यात सुधारणा होईल. आरोग्य ठीक राहील.
मे २०१४ : सूर्य, मंगळ, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. ग्रहमान उत्तम आहे. दैवाची मर्जी राहील. आर्थिक गुंतवणुकीवर चांगला फायदा होईल. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. आरोग्यात छान सुधारणा होईल. प्रवास लाभदायक होतील.
जून २०१४ : आता परिस्थितीतील अनुकूल बदल होईल. १९ जूनपासून कर्केचा गुरू भाग्यस्थानी येईल. तुमच्या मेहनतीस तो न्याय देईल. कन्येचा मंगळ लाभस्थानी आहे. प्रियजनांच्या भेटीगाठी होतील. शरीरस्वास्थ्य व मनस्वास्थ्य चांगले राहील.
जुलै २०१४ : कर्केचा गुरू भाग्यस्थानी शुभयोगात आहे. विरोधकांचा विरोध मावळेल. मार्गातील अडथळे दूर होतील. वेळेचा व संधींचा योग्य उपयोग करून घ्या. आनंदवार्ता समजतील. आरोग्यात छान सुधारणा होईल.
ऑगस्ट २०१४ : १७ ऑगस्टपासून सिंहेचा सूर्य अनुकूल होईल. प्रसंगावधान दाखवाल. कामे मार्गी लागतील. विरोधक माघार घेतील. मार्गातील अडथळे दूर होतील. प्रगतीचा वेग वाढवू शकाल. कामात उत्साह राहील. यशस्वी व्हाल.
सप्टेंबर २०१४ : सूर्य, बुध, गुरू शुभयोगात आहेत. तुमची स्वप्ने साकार होतील. मनोबल वाढेल. आनंदवार्ता समजतील. इतरांना मदत- मार्गदर्शन कराल. शेती- बागायतीत लाभ होतील. आपले अंदाज खरे ठरतील. आरोग्य ठीक राहील.
ऑक्टोबर २०१४ : कन्येचा सूर्य १७ ऑक्टोबपर्यंत अनुकूल राहील. कठीण प्रश्न सुटतील. आपण योग्य निर्णय घ्याल. योग्य कृती कराल. नोकरीत प्रगतीसाठी नवीन संधी प्राप्त होतील. अधिकारप्राप्तीचे योग येतील.
या नूतन वर्षांच्या प्रारंभी थोडी प्रतिकूलता जाणवली तरी चिंता करू नका. १९ जून २०१४ पासून कर्केचा गुरू प्रत्येक कामात यश मिळवून देईल. नोकरी-उद्योगात छान प्रगती होईल. छान अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे सर्व प्रश्न सुटतील. इतरांना दिलेला शब्द खरा करून दाखवाल. पत-प्रतिष्ठा वाढेल. कलावंत मंडळींना हे नूतन वर्ष खूप छान जाईल. अर्थप्राप्तीबरोबरच मानसन्मान प्राप्त होतील. विवाहेच्छुकांना आनंदाची बातमी १९ जून २०१४ नंतर कळेल. सुसंवाद साधून इतरांची मने जिंकून घ्याल. राजकारणातील तुमचे डावपेच यशस्वी होतील.
धनू : प्रसन्न ग्रहमान
हे नूतन वर्ष आपणास सुख-समृद्धीचे आणि आनंदाचे जाणार आहे. या वर्षी ग्रहमान तुमच्या धनू राशीवर प्रसन्न झाले आहे. मिथुनेचा गुरू वर्षांरंभापासून १९ जून २०१४ पर्यंत अनुकूल आहे आणि तूळेचा शनी वर्षभर शुभयोगात आहे. जे काम हाती घ्याल त्याचे सोने कराल. नोकरी-व्यवसायात तुम्ही केलेल्या मेहनतीला न्याय मिळेल. पूर्वीच्या चुका दुरुस्त करण्याची संधी तुम्हाला प्राप्त होईल. कलावंत, क्रीडापटू यांना या वर्षी मानसन्मान प्राप्त होतील. नवीन कार्यक्षेत्राशी ओळख होईल. तुमच्या मैत्रीचे वर्तुळ मोठे होईल. आनंद वाटेल.
नोव्हेंबर २०१३ : प्रगती होईल. मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने कराल. या महिन्यात अर्थप्राप्ती चांगली होईल. आपले अंदाज खरे ठरतील. कौटुंबिक प्रश्न कौशल्याने सोडवाल. मनोबल वाढेल. आरोग्यात छान सुधारणा होईल.
डिसेंबर २०१३ : पूर्वी केलेल्या कष्टाचा आता फायदा होईल. मेहनतीस न्याय मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. आनंददायक घटना घडतील. नवीन ओळखी होतील. सामंजस्य दाखवून प्रश्न सोडवाल. यश मिळेल.
जानेवारी २०१४ : बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. श्रद्धा-सबुरी ठेवून कामे करावी लागतील. आर्थिक गुंतवणुकीत लाभ होतील. कामात वाढ होईल. आरोग्यावर ताण पडेल.
फेब्रुवारी २०१४ : प्रारंभी काही अडचणी आल्या तरी चिंता करू नका. १२ फेब्रुवारीपासून कुंभेचा सूर्य अनुकूल राहील. प्रश्न सुटतील. मनावरचा ताणतणाव दूर होईल. कर्तव्यपूर्तीकडे जास्त लक्ष द्याल. आरोग्य ठीक राहील.
मार्च २०१४ : महत्त्वाची कामे १४ मार्चपूर्वी करून घ्या. कुंभेचा सूर्य अनुकूल राहील. व्यवसाय-उद्योगात अधिक गुंतवणूक कराल. मंगळ, बुध, गुरू, शुक्र व शनी प्रसन्न आहेत. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, आरोग्यात सुधारणा होईल.
एप्रिल २०१४ : बुध, गुरू, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. सर्व प्रश्न सुटतील. उत्साह वाढेल. दैवाची मर्जी राहील. अर्थप्राप्ती होईल. गृहसौख्य मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. आरोग्यात छान सुधारणा होईल. उत्साह वाटेल.
मे २०१४ : प्रारंभी काही अडचणींशी सामना करावा लागेल. १४ मेपासून वृषभेचा सूर्य अनुकूल होईल. बुध, गुरू, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. उद्योग-व्यवसायात तसेच नोकरीत छान प्रगती होईल. शरीरस्वास्थ्य मिळेल.
जून २०१४ : सूर्य, गुरू, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. दैव अनुकूल राहील. अनपेक्षित लाभ होतील. सरकारी तसेच कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील. पूर्वीच्या चुका दुरूस्त करू शकाल. संधीचे सोने कराल. उत्साह राहील.
जुलै २०१४ : महत्त्वाची कामे पूर्वार्धात करून घ्या. ती यशस्वी होतील. व्यवहारचातुर्य दाखवाल. आर्थिक गुंतवणुकीवर चांगला फायदा होईल. प्रवास मनाजोगे कार्यसाधक होतील. तूळेचा मंगळ १४ जुलैपासून मदत करील. शरीरस्वास्थ्य राहील.
ऑगस्ट २०१४ : मंगळ, बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. तुमचे अंदाज खरे ठरतील. व्यवसाय-उद्योगात छान लाभ होतील. योग्य कृती कराल. योग्य निर्णय घ्याल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील. इतरांची मने जिंकाल.
सप्टेंबर २०१४ : कन्येचा सूर्य १७ सप्टेंबरपासून अनुकूल होईल. कल्पकता दाखवून कामे कराल. बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. घरात प्रसन्न वातावरण राहील. आरोग्यात सुधारणा होईल. कामात उत्साह राहील.
ऑक्टोबर २०१४ : सूर्य, बुध, शुक्र अनुकूल आहेत. तूळेचा शनी व्ययस्थानी आहे. छान प्रगती होईल. इतरांची मने जिंकून घ्याल. विरोधक माघार घेतील. मार्गातील अडथळे दूर होतील. आरोग्य छान राहील.
या नूतन वर्षांचा प्रारंभ शुभ घटनेने होईल. वर्षांरंभापासून १६ जून २०१४ पर्यंत गुरूमहाराजांची कृपा राहील. शनी देवांचा वर्षभर तुमच्यावर कृपावर्षांव होत राहील. आर्थिकदृष्टय़ा हे वर्ष अतिशय चांगले जाईल. आरोग्याच्या दृष्टीनेही तुम्ही सुखी व्हाल. तब्बेतीच्या पूर्वीच्या तक्रारी दूर होतील. कामात उत्साह वाटेल. महिलांना हे वर्ष उत्तम आरोग्याचे आणि उत्तम मन:स्वास्थ्याचे जाईल. कलावंतांना कलासाधनेसाठी अनुकूलता लाभेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश प्राप्त होईल. कला-क्रीडा क्षेत्रातही प्रगती साधता येईल. शुभघटनांमुळे हे वर्ष आनंदात जाईल.
मकर : चांगले बदल
नूतन वर्ष तुमच्यासाठी काही अनुकूल बदल घेऊन येत आहे. तुमचे प्रश्न तुम्हीच सोडविणार आहात. मात्र तशी संधी हे ग्रहमान तुम्हाला आणून देईल. या जगात जे यशस्वी झाले आहेत त्यांनी अडचणीत संधी शोधल्या आहेत आणि जे अयशस्वी झालेले आहेत, ते लोक संधी आली असता अडचणी सांगत बसलेले आहेत. कर्केचा गुरू १९ जून २०१४ पासून अनुकूल होणार आहे. तो छान प्रगतीसाठी छान संधी आणून देईल. तुमचे ग्रहमान तुमच्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणार आहेत. तुम्ही त्याचा योग्य उपयोग करून घ्या.
नोव्हेंबर २०१३ : या महिन्याचा पूर्वार्ध जास्त चांगला जाईल. ग्रहमानाची छान मदत मिळेल. बुध-शुक्र शुभयोगात आहेत. आर्थिक लाभ होतील. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. अधिकारांचा योग्य उपयोग कराल. महत्त्वाचा पत्रव्यवहार होईल. यशस्वी व्हाल.
डिसेंबर २०१३ : ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्या. मोठी गुंतवणूक करताना सावधानता ठेवा. नोकरी-व्यवसायात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. दूरदृष्टीने निर्णय घ्यावे लागतील. सरकारी कामे मार्गी लागतील. व्यवहारी राहावे. आरोग्य ठीक राहील.
जानेवारी २०१३ : तुमच्या मेहनतीस ग्रहमानाची मदत मिळेल. योग्य निर्णय घ्याल. योग्य कृती कराल. व्यवहारचातुर्य दाखवाल. प्रयत्नात सातत्य ठेवाल. बुध-शुक्र प्रसन्न आहेत. कामात वाढ होईल. त्याचा ताण आरोग्यावर पडेल. संयमाने वागावे.
फेब्रुवारी २०१४ : ग्रहमान प्रतिकूल आहे. मेहनत वाढवावी लागेल. प्रयत्नात सातत्य ठेवावे लागेल. अनावश्यक खर्च नियंत्रणात ठेवावा. परिणामांचा विचार करून कृती करावी. इतरांच्या प्रश्नात स्वत:ला गुंतवू नका.
मार्च २०१४ : १४ मार्चपासून मीनेचा सूर्य अनुकूल होईल. प्रारंभी काही अडचणी आल्या तरी चिंता करू नका. सर्व प्रश्न सुटतील. श्रद्धा आणि सबुरी ठेवा. संयमाने वागाल. समाजकार्यात भाग घ्याल. आरोग्य ठीक राहील.
एप्रिल २०१४ : महत्त्वाची सर्व कामे १४ एप्रिलपर्यंत करून घ्या. ती यशस्वी होतील. मीनेचा सूर्य अनुकूल राहील. बुध-शुक्र शुभयोगात आहेत. तुमची स्वप्ने साकार होतील. आरोग्यात छान सुधारणा होईल. उत्साह वाटेल.
मे २०१४ : बुध-शुक्र प्रसन्न आहेत. कर्तबगारी दाखविण्याची संधी मिळेल. संधीचा योग्य उपयोग कराल. गृहसौख्य मिळेल. आनंदवार्ता समजतील. नवीन आव्हाने स्वीकारून ती पूर्ण करून दाखवाल. आरोग्य ठीक राहील.
जून २०१४ : १९ जूनपासून कर्केचा गुरू सप्तमस्थानी शुभयोगात येईल. बुध-शुक्रही अनुकूल आहेत. नोकरीच्या शोधात असाल तर कामे मिळतील. स्वप्ने साकार होतील. दैवाची मर्जी राहील. आरोग्य ठीक राहील.
जुलै २०१४ : कर्केचा गुरू सप्तमस्थानी शुभयोगात राहील. सूर्य, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. जे काम हाती घ्याल. त्यात यश मिळेल, मनोबल वाढेल. पूर्वीच्या चुका सुधारू शकाल. महत्त्वपूर्ण भेटीगाठी होतील.
ऑगस्ट २०१४ : तुम्ही नवीन आव्हाने स्वीकारून ती यशस्वी करून दाखवाल. कर्केचा सूर्य १७ ऑगस्टपर्यंत मदत करील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. अधिकारप्राप्तीचे योग येतील. घरगुती प्रश्न सुटतील. आरोग्य ठीक राहील.
सप्टेंबर २०१४ : वृश्चिकेचा मंगळ ४ सप्टेंबरपासून अनुकूल होईल. बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. अर्थप्राप्ती चांगली झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. महत्त्वाचा पत्रव्यवहार होईल. महिलांना गृहव्यवस्थापनात यश मिळेल. आरोग्य ठीक राहील.
ऑक्टोबर २०१४ : तूळेचा सूर्य ७ ऑक्टोबरपासून शुभयोगात येईल. आनंदवार्ता समजतील. प्रियजनांच्या भेटीगाठी होतील. मार्गदर्शन मिळेल. प्रवास कार्यसाध्य होतील. दैवाची मर्जी राहील. आरोग्य छान राहील. मन:स्वास्थ मिळेल.
या नूतन वर्षी आर्थिक स्थैर्य लाभणार आहे. नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांसाठी तशी संधी प्राप्त होईल किंवा चालू असलेल्या नोकरीत बढतीचे योग येतील. तुमचे कर्तृत्व तुम्ही दाखवू शकाल. विवाहेच्छुकांची स्वप्ने साकार होतील. गृहसौख्य प्राप्त होईल. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. कामात मनाची एकाग्रता साधता येईल. पूर्वीच्या चुका सुधारण्याची संधी मिळेल. महिलांना कलाक्षेत्रात छान प्रगती साधता येईल. विद्यार्थ्यांना अध्ययनात उज्ज्वल यशप्राप्ती होईल. स्पर्धेमध्ये नेत्रदीपक यशप्राप्ती होईल. आत्मविश्वास वाढेल.
कुंभ : समाधानाचे वर्ष
या नूतन वर्षी कुंभ राशीसाठी ग्रहमान अनुकूल आहे. दैवाची ही अनुकूलता तुमची प्रगती घडविण्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. वर्षांरंभापासून १९ जून २०१४ पर्यंत मिथुन राशीचा गुरू पंचमस्थानी शुभयोगात राहणार आहे. त्यामुळे छान प्रगती होणार आहे. आत्मविश्वास वाढेल. मोठी कामे हाती घेऊन ती यशस्वी करून दाखवाल. उद्योग-व्यवसायात कार्यविस्तार, अधिक गुंतवणूक करू शकाल. तशी संधी प्राप्त होईल. कलावंतांना हे नूतन वर्ष समाधानाचे जाणार आहे. त्यांच्या हातून सुंदर कलाकृतींची निर्मिती होणार आहे, तसेच क्रीडापटूंना मानसन्मान प्राप्त होणार आहेत.
नोव्हेंबर २०१३ : वृश्चिकेचा सूर्य १६ नोव्हेंबरपासून शुभयोगात आहे. उद्योग-व्यवसाय छान चालेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. मनासारखा खर्च करू शकाल. महिलांना गृहव्यवस्थापनात छान यश मिळेल. घरातील वातावरण प्रसन्न राहील.
डिसेंबर २०१३ : अनपेक्षित फायदा करून देणाऱ्या घटना घडतील. पूर्वीच्या चुका सुधारण्याची संधी मिळेल. बेकारी असल्यास कामे मिळतील. नवीन ओळखी होतील. महिलांना गृहसौख्य मिळेल. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. आनंद वाटेल.
जानेवारी २०१४ : धनूचा सूर्य १४ जानेवारीपर्यंत अनुकूल राहील. बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. प्रसंगावधान दाखवाल. सरकारी तसेच कोर्ट-कचेरीची कामे मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात छान प्रगती होईल. आरोग्य ठीक राहील.
फेब्रुवारी २०१४ : गुरू, शुक्र शुभयोगात आहेत. आर्थिक येणे वसूल होईल. दैवाची मर्जी राहील. प्रश्न सुटतील. मेहनतीस न्याय मिळेल. इतरांना दिलेला शब्द पाळाल. पत-प्रतिष्ठा वाढेल. सरकारी कामे मार्गी लागतील.
मार्च २०१४ : गुरू, शुक्र प्रसन्न आहेत. स्वप्ने साकार होतील. योग्य निर्णय घ्याल. योग्य कृती कराल. कर्तव्यपूर्तीसाठी पैसे व वेळ खर्च कराल, मनोबल वाढेल. स्पर्धा-पैजा जिंकाल. गृहसौख्य मिळेल. उत्साह राहील.
एप्रिल २०१४ : १४ एप्रिलपासून मेषेचा सूर्य अनुकूल होईल. बुध, गुरू व शुक्र अनुकूल आहेत. मनातल्या इच्छा पूर्ण होतील. कार्यक्षमता वाढेल. महत्त्वाचे निर्णय घ्याल. आर्थिक व्यवहारात लाभ होतील. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य राहील.
मे २०१४ : महत्त्वाची कामे १४ मेपर्यंत करून घ्या. मेषेचा सूर्य अनुकूल राहील. पूर्वीच्या चुका दुरुस्त करू शकाल. इतरांची शाबासकी मिळवाल. नवीन आव्हाने स्वीकारून ती यशस्वी करून दाखवाल. आरोग्य ठीक राहील.
जून २०१४ : मिथुनेचा गुरू १९ जूनपर्यंत शुभयोगात राहील. महत्त्वाची कामे तोर्यपत करून घ्या. ती यशस्वी होतील. उद्योग-व्यवसायात छान प्रगती होईल. शरीरस्वास्थ्य राहील. मन:स्वास्थ्य मिळेल. उत्साह राहील.
जुलै २०१४ : १६ जुलैपासून कर्केचा सूर्य अनुकूल होईल. कल्पकता दाखवून कामे कराल. नवीन ओळखी होतील. महिलांना मौल्यवान वस्तूंची खरेदी करता येईल. घरगुती प्रश्न कौशल्याने सोडवाल. आरोग्य छान राहील.
ऑगस्ट २०१४ : सुसंवाद साधून कामे करण्यावर भर द्याल. सूर्य, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. आप्तेष्ट मित्रांच्या भेटीगाठी होतील. प्रयत्नांत सातत्य ठेवाल. आरोग्यात छान सुधारणा होईल. कामात उत्साह वाटेल.
सप्टेंबर २०१४ : सिंहेचा सूर्य १७ सप्टेंबपर्यंत अनुकूल राहील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नवीन ओळखी होतील. ग्रहमानाची मदत मिळेल. इतरांना कठीण वाटणारी कामे तुम्ही यशस्वी कराल. आरोग्यात छान सुधारणा होईल.
ऑक्टोबर २०१४ : १८ ऑक्टोबरपासून धनूचा मंगळ अनुकूल होईल. आर्थिक प्रश्न सुटतील. आरोग्य ठीक राहील. बुध-शुक्र अनुकूल आहेत. प्रगतीसाठी योग्य संधी प्राप्त होईल. तुमचे विचार इतरांना पटतील.
या वर्षांकरिताची शक्य असलेली महत्त्वाची कामे १९ जून २०१४ पूर्वी करून घ्या. ती यशस्वी होण्यासाठी मिथुन राशीतील गुरूचे पाठबळ मिळेल. अर्थप्राप्तीच्या दृष्टीने वर्षांरंभापासून १९ जूनपर्यंतचा काळ हा सर्वोत्तम असेल. आरोग्याच्या दृष्टीने हे संपूर्ण वर्ष अतिशय चांगले जाईल. तब्बेतीच्या तक्रारी दूर होतील. कामे उत्साहाने कराल. व्यवहारी राहून बचतीकडे जास्त लक्ष द्याल. प्रवासयोग कार्यसफल होतील.
मीन : इच्छापूर्तीचे वर्ष
या नूतन वर्षी तुमच्या कर्तृत्वाला छान संधीची जोड मिळेल. त्यामुळे हातून अद्भुत कार्ये घडतील. पूर्वी न जमलेली किंवा अर्धवट राहिलेली कामे या वर्षी यशस्वी होतील. १९ जून २०१४ रोजी कर्क राशीत प्रवेश करणारा गुरू ग्रह पंचमस्थानी शुभयोगात येत आहे, तो तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हास साहाय्य करील. राजकारणातील तुमचे डावपेच यशस्वी होतील. नोकरीत अधिकारप्राप्तीचे योग येतील. उद्योगव्यवसायातही छान प्रगती होईल. एकंदरीत हे वर्ष अनेक संधी घेऊन तुमच्या भेटीसाठी येत आहे. अवश्य लाभ घ्या.
नोव्हेंबर २०१३ : बुध-शुक्र शुभयोगात आहेत. सिंहेचा मंगळ २६ पर्यंत शुभयोगात आहे. कर्तव्यपूर्तीचे समाधान लाभेल. वेळेचा व संधीचा छान उपयोग कराल. दिलेला शब्द पाळाल. व्यवहारचातुर्य दाखवाल. आरोग्य ठीक राहील.
डिसेंबर २०१३ : उत्तरार्धात अनपेक्षित फायदा करून देणाऱ्या घटना घडतील. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील. धनूचा सूर्य अनुकूल राहील. प्रश्न सुटतील. मनावरचा ताणतणाव दूर होईल. प्रवास मनाजोगे होतील. तब्येतीत सुधारणा होईल.
जानेवारी २०१४ : ग्रहमान उत्तम आहे. सूर्य, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. अर्थप्राप्ती चांगली झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. महत्त्वाचा पत्रव्यवहार होईल. महिलांना गृहसौख्य लाभेल. नवीन ओळखी होतील. स्पर्धा-पैजा जिंकाल.
फेब्रुवारी २०१४ : मकरेचा सूर्य १२ फेब्रुवारीपर्यंत अनुकूल राहील. स्पर्धा-पैजा जिंकाल. बुध, शुक्र शुभयोगात आहेत. गृहसौख्य लाभेल. मन:स्वास्थ्य व शरीरस्वास्थ्य राहील. अनपेक्षित लाभ होतील. आनंदवार्ता समजतील. यश मिळेल.
मार्च २०१४ : बुध-शुक्र अनुकूल आहेत. खर्च वाढेल, परंतु तो योग्य कारणांसाठी होईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. प्रलोभने टाळणे योग्य होईल. इतरांचे सहकार्य मिळवावे लागेल. कामात वाढ होईल. आरोग्यावर ताण पडेल.
एप्रिल २०१४ : ग्रहमानाची मदत मिळणार नाही. मेहनतीवरच भर द्यावा लागेल. प्रयत्नात सातत्य ठेवावे लागेल. बुध-शुक्र थोडीफार मदत करू शकतील. अनावश्यक खर्च टाळावे लागतील. संयम, सावधानता व सहनशीलता ठेवावी लागेल.
मे २०१४ : चिंता करू नका. १४ मेपासून वृषभेचा सूर्य अनुकूल होईल. बुध, शुक्र शुभयोगात आहेत. नोकरीत शुभ घटना घडतील. सुसंवाद साधून कामे कराल. आरोग्यात छान सुधारणा होईल. मन:स्वास्थ्य प्राप्त होईल.
जून २०१४ : मागील काही दिवस खूप ताणतणावाचे गेले. आता परिस्थितीत अनुकूल बदल होईल. १९ जूनपासून कर्केचा गुरू शुभयोगात येत आहे. दैव अनुकूल होईल. तब्येतीच्या तक्रारी दूर होतील. अर्थप्राप्ती होईल.
जुलै २०१४ : कर्केचा गुरू सप्तमस्थानी शुभयोगात आहे. बुध-शुक्र अनुकूल आहेत. मुलांकडून प्रगतीच्या बातम्या समजतील. आर्थिक येणे वसूल होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. आरोग्यात छान सुधारणा होईल.
ऑगस्ट २०१४ : १७ ऑगस्टपासून सिंहेचा सूर्य अनुकूल होईल. आर्थिक प्रश्न सुटतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारून त्या यशस्वी करून दाखवाल. बुध, गुरू, शुक्र तुमची स्वप्ने साकार होण्यासाठी मदत करतील. मन:स्वास्थ्य चांगले राहील.
सप्टेंबर २०१४ : सूर्य, बुध, गुरू शुभयोगात आहेत. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य चांगले राहील. आर्थिक येणे वसूल होईल. स्वप्ने साकार होतील. कलावंतांचा मूड राहील. कामात उत्साह राहील. आनंदवार्ता समजतील. अध्ययन ठीक चालेल.
ऑक्टोबर २०१४ : कर्केचा गुरू पंचमस्थानी शुभयोगात आहे. प्रिय घटना घडतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारून त्या यशस्वी करून दाखवाल. बचतीकडे जास्त लक्ष द्याल. महिलांना गृहसौख्य मिळेल. अध्ययन छान चालेल.
अर्थप्राप्तीच्या दृष्टीने हे नूतन वर्ष मीन राशीसाठी अतिशय उत्तम असणार आहे. उद्योग व्यवसायात तुम्ही अधिक गुंतवणूक करणार आहात. तसेच कार्यविस्तार करण्याची संधी प्राप्त होणार आहे. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटल्याने मनावरचा ताणतणाव दूर होणार आहे. समाजकार्यात भाग घ्यावयाची संधी आपणास मिळणार आहे. प्रियजनांच्या भेटीगाठी होतील. आनंदवार्ता समजतील. विवाहेच्छुकांची स्वप्ने साकार होतील. महिलांना गृहव्यवस्थापनात यश मिळेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त होईल.
(हे भविष्य प्राचीन भारतीय ज्योतिषशास्त्राप्रमाणे स्थूलमानाने वर्तविण्यात आलेले आहे, याची सर्वानी नोंद घ्यावी.)