दिवाळी हा हिंदू सण आहे. दिवाळीला दिपावली असेही म्हणतात. दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृतमधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. ‘दीप’ म्हणजे ‘दिवा’ आणि “आवली” म्हणजेच ‘ओळ’ म्हणजेच ‘दिव्यांची ओळ’ किंवा ‘दिव्यांची रांग’असा शब्दाची अर्थ होतो. आता दिवा म्हटलं तुमच्या डोळ्यासमोर पटकन एखादी पणती येते ज्यात तेल टाकून, वात लावून एक ज्योत पेटवली जाते. सर्वसाधरणपणे कोणत्याही दिवा लावायचा झाल्यास त्यात तेल किंवा तूप वापरले जाते कारण तेल हा ज्वलनशील पदार्थ आहे. पण तुम्ही कधी पाणी वापरून लावलेले दिवे पाहिले आहेत का? होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. आम्ही तुम्हाला एक हटके जुगाड सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही जास्त तेल न वापरता, पाणी वापरून दिवा कसा लावावा हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या…
पाण्यावर दिवे कसे लावावे? जाणून घ्या जुगाड
सर्व प्रथम तुम्ही मातीचा दिवा घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही काचेचा ग्लास किंवा छोटी काचेची बाटली वापरू शकता
- मातीच्या दिव्यात अथवा काचेच्या ग्लासात आधी थोडेसे पाणी घ्या.
- दिव्यांच्या सजावटीसाठी काचेच्या ग्लासामध्ये वात लावण्यापूर्वी तुम्ही हवी तशी सजावट करू शकता. त्यात फुल किंवा फुलांच्या पाकळ्या टाकू शकता. तुम्ही पाण्यात रंगही टाकू शकता.
- त्यानंतर एक प्लास्टिक बाटली घ्या. त्याचा छोटासा तुकडा कापा. तुकड्याला वात लावण्यासाठी छोटे छिद्र करा आणि या छिद्रात तेल टाका. वातीच्या टोकाला तोडेसे तेल लावा.
- आता दिव्यामध्ये पाण्यामध्ये १-२ थेंब तेल टाका. त्यानंतर तयार प्लास्टिकच्या तुकड्यामध्ये लावलेली वात त्या तेलावर ठेवा. त्यानंतर दिवा लावा.
- हे दिव्याची ज्योत शांतपणे जळते. हे दिवे साधारण १ ते २ तास टिकतात. कमी तेलाचा वापरून आणि सजावट करून हे दिवे लावता येतात.