सैफ अली खान आणि माझ्या अनेक वर्षे गाजत असलेल्या प्रेमप्रकरणाला आता पूर्णविराम मिळालाय. कारण आता मी सैफूची अधिकृत पत्नी झालेय. आता यापुढचं आयुष्यही असंच सुखाने परिपूर्ण असेल अशी माझी खात्री आहे. आमचं वैवाहिक आयुष्य सुरू झाल्यामुळे आता माझ्या आणि सैफूच्या लिव्ह-इन् रिलेशनशिपबद्दल काय बोलू? तो काळ खूपच भारावलेला होता आणि मी आमच्या नात्याबद्दल कधीच काही लपवलं नव्हतं. त्यामुळे मला या विषयावर बोलायला नक्कीच आवडेल.
त्यापूर्वी थोडंसं माझ्या गतायुष्याबद्दल.. माझी शाहिद (कपूर)शी फारकत झाल्यानंतर त्या प्रकरणाचा मला खूपच मानसिक त्रास झाला. सुदैवाने म्हणा वा दुर्दैवाने म्हणा, चंदेरी दुनियेत वावरताना सतत मुखवटा ओढावाच लागतो. गुडी गुडी हसावं-बोलावं लागतं. चेहरा हसरा ठेवण्याचं कसब इथं जणू आवश्यक अंगच आहे. असो. त्या दु:खद एपिसोडनंतर ‘टशन’ चित्रपटादरम्यान मी सैफच्या सहवासात  आले. वास्तविक त्यात मी त्याची नायिका नव्हते. पण ‘टशन’ने माझ्या आयुष्यात एक मोठ्ठं वळण आणलं. इतकं मोठ्ठं, की त्यामुळे माझं आयुष्यच संपूर्णत: बदलून गेलं.  Over the Period of time, We fallen in love with each other…
या काळात आमच्यातले प्रेमाचे बंध इतके मजबूत होत गेले, की सैफचं विवाहित असणं, त्याला दोन मोठी मुलं असणं, पत्नी अमृताशी विभक्त झाल्यानंतरही त्याचं एक सीरिअस प्रेमप्रकरण असणं, आमच्या दोघांमधला वयाचा फरक, माझं हिंदू, तर त्याचं मुस्लीम असणं.. अगदी कश्शा-कश्शाचाही विचार मी केला नाही. पण म्हणून काही माझं वागणं, माझा निर्णय अविवेकी ठरत नाही. मी खूप विचारी आहे. मी हा निर्णय खूप विचार करून, खूप गंभीरपणे घेतलेला आहे.
खरं तर सैफशी माझं लग्न दोन वर्षांपूर्वीच होणार होतं. पण आम्हा दोघांच्याही करिअर कमिटमेन्ट्स इतक्या होत्या, की लग्न केल्यानंतर आयुष्यात जरासुद्धा स्वस्थता मिळाली नसती. त्यामुळे एकमेकांना जाणून घेण्यासाठी ‘लिव्ह-इन् रिलेशनशिप’मध्ये राहण्यास माझी हरकत नव्हती. अर्थातच ‘टशन’नंतर मी मनोमनी त्याला माझा आयुष्याचा जोडीदार मानलंच होतं. आपल्याकडे लग्न हे एक पवित्र बंधन मानलं जातं. परंतु तरीही अनेकांच्या बाबतीत विवाहबाह्य़ संबंध निर्माण होतातच ना? एकमेकांना पारखून घेतलेल्या लग्नांमध्येही घटस्फोट होतातच ना? म्हणूनच मी नेहमी म्हणते की, लग्न हे कागदोपत्रीच असतं. निदान माझ्याबाबतीत तरी लग्न हे फक्त एक कागदी बंधन आहे. त्यामुळे कायम लिव्ह इन् रिलेशनशिपमध्ये राहायला माझी हरकत नव्हती. माझ्या आणि सैफूच्या मैत्रीला, प्रेमाला माझ्या आणि त्याच्या हितचिंतकांची, नातेवाईकांची मान्यता असली तरी मोठय़ा प्रमाणात समाजमान्यताही असावी, असं अम्मीजींना (सैफची आई शर्मिला टागोर) वाटत होतं. त्यांच्या इच्छेनुसारच लग्न करण्याचा निर्णय आम्ही उभयतांनी घेतला.
आमचा हा ‘लिव्ह इन् रिलेशनशिप’चा काळ थोडाथोडका नव्हता, तर गेली चार वर्षे आम्ही या नात्यात होतो. यादरम्यान आम्ही एकमेकांच्या खूपच जवळ आलो. माझ्या आयुष्यतलं त्याचं योगदान प्रचंडच आहे. व्यक्तिगतदृष्टय़ा विचार करता सैफ फारच मुक्त, मोकळ्या विचारांचा आहे. त्यानेच मला चित्रपटांच्या पलीकडे पाहायला शिकवलं. he gave me understanding that there is life beyond films… सैफू के मेरे जीवन में आने से पहले कुछ मशिनसी जिंदगी बन गई थी मेरी.. सैफू अंतर्यामी उत्साहानं, आनंदानं सळसळणारं व्यक्तिमत्त्व आहे. त्याचा ‘care a damn’ हा अ‍ॅटिटय़ूड मला खूप भावतो.
तसं तर त्याचं राजेशाही खानदानी व्यक्तिमत्त्व कुणालाही भुरळ पाडणारंच आहे. पण त्याच्या देखण्या व्यक्तिमत्त्वापेक्षाही त्याचे अंगीभूत गुण मला वेळोवेळी आकृष्ट करत गेलेत. आम्ही अनेकदा सुट्टय़ा काढून जगभर मनमुराद भटकंती केली. सैफशी मैत्री होण्याआधीही मी परदेशात जात असे, पण त्या परदेश- वाऱ्यांमध्ये शूटिंग आणि शॉपिंग हाच मुख्य उद्देश असायचा. पर्यटनस्थळं पाहण्यासाठी जी सौंदर्यदृष्टी लागते त्याचा खरंच सांगते- माझ्याकडे पूर्णपणे अभाव होता. You know, I have developed a keen interest in art, Paintings, scluptures, museums, operas & the list is goes on…
सैफू से मेरा गहरा रिश्ता इस कदर बना, की त्याचा काहीसा असंयमी स्वभावही माझ्या अंगवळणी पडत गेला. आमचं ‘लिव्ह इन्’ म्हणजे केवळ एकत्र सिनेमे करणं नाही, तर सुट्टय़ा एकत्र घालवणं, स्किइंग, फिशिंग, कॅरम, स्विमिंग असा सगळ्याचाच आनंद आम्ही एकत्र घेतलाय.. पूर्वी मला चित्र-शिल्प प्रदर्शनं पाहणं अतिशय बोअरिंग वाटायचं, पण गेल्या चार-पाच वर्षांमध्ये मी सैफूच्या नजरेतून त्यांचा कलात्मक आनंद घ्यायला लागलेय.. सैफ कलासक्त आहे. रसिक आहे. त्याचं इंग्रजी वाचन तर अफाटच आहे. आणि हो- त्याचं फ्रेंच भाषेवरचं प्रभुत्व बघून मीही फ्रेंच भाषा शिकले. आल्प्स पर्वतराजींमध्ये आम्ही मनसोक्त हिंडलो. तिथे बसून दात गोठवणाऱ्या थंडीचा अनुभव आम्ही दोघांनी एकत्रितपणे घेतला. दोघांनी मिळून घेतलेल्या पेन्टहाऊसची सजावट आम्ही दोघांनी केलीय. लग्नापूर्वी सहजीवनाचा आनंद खऱ्या अर्थाने आम्ही दोघांनी घेतला. आमच्या या सहजीवनाने मला स्वत:ला खूप बदलवून टाकलंय. मला खूप काही मिळालंय- जे मला माझ्या गतआयुष्यात नव्हतं, हे माहीतही नव्हतं.
या काळात जरी माझं सैफूशी अधिकृतपणे लग्न झालेलं नव्हतं तरी त्यामुळे काहीही फरक पडला नव्हता. मी त्यांच्या पिढीजात पतौडी कुटुंबाच्या घरात अनेकदा गेलेली आहे. त्यांच्या कुटुंबाचा मी अविभाज्य भाग होते. आणि आता तर आहेच आहे..
पण या नात्याची गंमत अशी आहे की, मला माझं स्वतंत्र अस्तित्व जपता आलं. जरी गेली चार-पाच वर्षे मी ‘लिव्ह-इन्’मध्ये राहत असले तरी मला माझं खासगी अस्तित्व आहे- जे मी सहजगत्या.. थोडं जाणीवपूर्वक जपलंय. माझीच दुसरी बाजू म्हणजे लोलो (माझी बहीण करिश्मा कपूर), तिची मुलं, माझी मॉम (बबिता) आणि डॅड (रणधीर कपूर) यांच्या सहवासात रमणं मला मनापासून प्रिय आहे. माझं असं स्वत:चं  फ्रेन्डसर्कल आहे..
माझ्या पडद्यावरच्या अर्थात ‘रील लाइफ’शी सैफूचा काहीही संबंध नव्हता.. नाही.. पुढेही नसेल.. एकमेकांच्या व्यावसायिक कामांत कसलीही लुडबूड आम्ही केली नाही. आमच्या ‘लिव्ह-इन्’ आयुष्याचं एक ठळक वैशिष्टय़ हे की, आम्ही दोघांनीही आपापलं स्वतंत्र आयुष्य जपलंय. साहजिकच लग्नानंतरही ते कशाला बदलायला हवं?
सैफूची मुलं- विशेषत: मुलगी सारा सुल्तान आता तरुणी झालीये. सारा आणि इब्राहिम दोघंही मला जीव लावतात. दोघंही माझ्याशी आदराने बोलतात. त्यामुळे आमच्या लग्नानंतरही हे संबंध अधिक गहिरे होतील, हे मी गृहीत धरलंय. बहुतेक सेलेब्रिटीज् त्यांचे ‘लिव्ह-इन्’ संबंध का लपवतात, हे मला कधीच कळलं नाही.
I am very much open… why to shy away from accepting that we are in relationship!  It keeps me growing in life… We both are looking forword to spend our entire life together… preciously…
‘लिव्ह-इन्’मध्ये राहूनही आमच्या प्रेमाला ओहोटी लागली नाही. उलट, मी मलाच अधिक मिळाले. आणि आता लग्नानंतर तर आम्ही आमच्या अधिक वेगळ्या, सकस आयुष्याची स्वप्न बघतोय.. यातच सारं काही आलं. नाही का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा