मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा २०२३ मधील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला. प्रभास, कृती सेनॉन, सैफ अली खान यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीतही चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. ७०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने ३९२.७० कोटींची कमाई केली. सैफने रावणाची भूमिका केली होती, पण त्याचा मुलगा तैमूरलाही चित्रपट आवडला नाही. व्हीएफएक्स, डायलॉग्स आणि वेशभूषेवर प्रचंड टीका झाली.