विजय पाडळकर

‘जगातील सर्वश्रेष्ठ चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक’ अशी मान्यता मिळालेल्या इंगमार बर्गमनचे हे जन्मशताब्दी वर्ष. यानिमित्ताने त्यांच्या ‘wild Strawberries’ या अविस्मरणीय चित्रपटाचा रसास्वाद..

kranti redkar shares special post for husband sameer wankhede
“२७ वर्षांपूर्वी त्यांना पहिल्यांदा पाहिलं…”, क्रांती रेडकर अन् समीर वानखेडेंच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण, दोघांची पहिली भेट कुठे झाली?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
रशिया-युक्रेन युद्धात ३२ वर्षीय भारतीय तरुणाचा मृत्यू झाला, तो केरळ येथील रहिवासी होता. (फोटो सौजन्य @YashBarapatre6)
बिनिल टी.बी कोण होता? तो रशियन सैन्यात कसा भरती झाला होता?
Sabalenka Zverev progress
सबालेन्का, झ्वेरेवची विजयी सलामी
January Born Babies
January Born Baby Names : जानेवारी महिन्यात जन्मलेल्या बाळांचे ठेवा हटके नावं, ऐकताक्षणीच आवडेल सर्वांना
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…

चित्रपट सुरू होतो आणि आपल्याला एक पाठमोरा वृद्ध एका टेबलाजवळ बसून काहीतरी लिहिताना दिसतो. तो आपली कहाणी लिहीत आहे हे लगेच कळते. कारण आता ती त्याच्या आवाजात आपल्याला ऐकू येऊ लागते. तो लिहीत असतो..

‘‘आपल्या आणि जगाच्या संदर्भात आपण नेहमी इतरांचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणून मी या साऱ्यापासून माझ्या मर्जीने दूर झालो आहे. म्हणूनच मी या वयात एकाकी जीवन कंठतो आहे. माझे आयुष्य तसे कष्टात गेले. पण जे काही मिळाले त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. ब्रेडसाठी संघर्ष करण्यापासून माझ्या जीवनाची सुरुवात झाली आणि विज्ञानाच्या प्रेमात पडून मी इथपर्यंत आलो. (कॅमेरा त्याच्या समोर असलेल्या मुलाच्या, सुनेच्या, आईच्या आणि बायकोच्या फोटोंवरून फिरतो.) माझा डॉक्टर मुलगा लुंड येथे राहतो. लग्न होऊन बरीच वष्रे झाली, पण त्याला अजून मूलबाळ नाही. माझी आई ९६ वर्षांची आहे. पण ती तिच्या घरी एकटी राहते. मला घरकाम करण्यासाठी एक चांगली बाई मिळाली आहे आणि हे माझे भाग्य आहे.

‘माझे नाव इसाक बोर्ग. मी ७८ वर्षांचा आहे. मी उद्या लुंड येथे ‘ऑनररी डॉक्टरेट’ स्वीकारण्यासाठी जाणार आहे.’

दृश्य बदलते..

बोर्ग झोपलेला आहे. त्याचा चेहरा कसले तरी स्वप्न पडत असल्यासारखा. त्याच्या स्वप्नातले दृश्य आता आपल्याला पडद्यावर दिसू लागते. तो फिरण्यासाठी बाहेर पडला आहे. रस्त्यावर दुसरे कुणीच नाही. भोवती एक अनसíगक शांतता. सूर्याचा प्रखर प्रकाश आणि वस्तूंच्या गडद काळ्या सावल्या. फक्त त्याच्याच बुटांचा आवाज त्याला ऐकू येत आहे.

तो एका घडय़ाळाच्या दुकानाजवळ आला. त्याच्या दर्शनी बाजूस एक भलेमोठे घडय़ाळ होते आणि त्याखाली दोन डोळे आणि त्यांच्यावर लावलेला चष्मा यांच्या प्रतिमा होत्या. मात्र, या घडय़ाळाला काटेच नव्हते. त्याने खिशातले घडय़ाळ काढून पाहिले. त्यावरही काटे नव्हते.

तेवढय़ात त्याला रस्त्याच्या वळणावर एक माणूस पाठमोरा उभा असलेला दिसला. बोर्गने त्याच्या पाठीला स्पर्श केल्यावर त्या माणसाने चेहरा वळवला. तो जणू मेणाचा असल्यासारखा निर्जीव होता. बोर्गच्या स्पर्शाने तो माणूस बारीक धूलिकणांचा असल्यासारखा जमिनीवर सांडला. रस्त्यावर त्याचा पोशाख पडलेला होता, पण आतील माणूस अदृश्य झाला होता.

अचानक इसाक बोर्गच्या कानावर घंटांचा आवाज आला. समोरून दोन अशक्त घोडे एक प्रेतवाहक गाडी ओढत आणीत होते. ती गाडी रस्त्याच्या दिव्याच्या खांबाला अडकली, तिचे एक चाक निसटले व त्याच्या अंगावर धावून आले. तो बाजूला सरकला. गाडी पुढे निघून गेली. पण तिच्यातील पेटी रस्त्यावर पडली होती. तिच्यातून कुणीतरी कण्हल्यासारखा आवाज ऐकू येत होता. इसाक पुढे सरकला. त्या पेटीतील प्रेताने एक हात बाहेर काढला आणि त्याने इसाकचा हात धरून ओढायला सुरुवात केली. त्या प्रेताचा चेहरा इसाक बोर्गचाच होता..

झोपेतल्या इसाकचा चेहरा वेदनेने पिळवटल्यासारखा झाला. त्याला जाग आली.

पहिले स्वप्न येथे संपते. चित्रपटाचा शेवटही इसाक पाहत असलेल्या एका स्वप्नानेच होतो. मात्र, ते स्वप्न पाहताना इसाक बोर्गचा चेहरा शांत, निरामय, ‘आतून प्रकाशमान झाल्यासारखा’ आहे.

या दोन स्वप्नांच्या मधला कालावधी म्हणजेच महान दिग्दर्शक इंगमार बर्गमन याचा ‘वाइल्ड स्ट्रॉबेरीज’ हा चित्रपट होय.

(२)

इंगमार बर्गमनचा जन्म १४ जुल १९१८ रोजी उप्साला, स्वीडन येथे झाला. ८९ वर्षांचे दीर्घ आणि कृतार्थ जीवन जगलेल्या बर्गमनने जवळपास साठ चित्रपट आणि वृत्तचित्रांचे दिग्दर्शन केले. याशिवाय त्याने १७० नाटकेही दिग्दíशत केली. आज तो विसाव्या शतकातील श्रेष्ठ चित्रपट दिग्दर्शकांपकी एक मानला जातो. त्याने दिग्दíशत केलेल्या चित्रपटांपकी बहुतेकांच्या कथा-पटकथा त्याने स्वत:लाच सुचलेल्या कथाकल्पनेवर आधारित तयार केल्या आहेत. तो म्हणतो, ‘चित्रपटाचे साहित्याशी काही देणेघेणे नाही. या दोन्ही कला एकमेकांच्या विरोधी आहेत. साहित्य हे प्रथम आपल्या बुद्धीला आवाहन करते. हळूहळू ते आपली कल्पनाशक्ती आणि आपल्या भावना यांच्यावर परिणाम करू लागते. चित्रपट हा थेट आपल्या भावनांनाच हात घालतो.’ त्याच्या पटकथांच्या पुस्तकाला त्याने जी प्रस्तावना लिहिली आहे त्यात तो लिहितो, ‘चित्रपट हा माझ्या मनात एखाद्या क्षुल्लक घटनेने सुरू होतो. कुणाशी तरी झालेल्या संवादाचा एखादा तुकडा, कुणी मारलेला रिमार्क, कसलेही वेगळेपण नसलेली लहानशी घटना, एखादा संगीताचा तुकडा, किंवा सडकेवर पडलेली एखादी प्रकाशाची तिरीप.. या गोष्टींचा मनावर पडलेला परिणाम क्षणिक असतो. दुसऱ्याच क्षणी त्या मागे पडतात. पण त्या मनाचा एक मूड निर्माण करतात. एखादे स्वप्न पाहिल्यावर निर्माण होतो तसा. ती एक मनाची अवस्था असते- जिच्यात अनेक शक्यता, अनेक संगती, अनेक प्रतिमा सामावलेल्या असतात. अज्ञाताच्या काळोख्या पडद्यातून बाहेर येणारी ती एक रंगीत दोरी असते. ती दोरी जर ओढली तर तिच्यातून एक पूर्ण चित्रपट निर्माण होऊ शकतो.

हा मूळ िबदू एका विशिष्ट फॉर्ममध्ये व्यक्त होण्यासाठी धडपडत असतो. त्याची हालचाल फार संथ आणि अर्धजागृत असते. ही हालचाल लय आणि ताल निर्माण करते. आणि ही लय प्रत्येक चित्रपटासाठी वेगळी आणि एकमेवाद्वितीय असते. हे जे मनात तयार झाले आहे, त्याच्यावर विचार करताना मला कधी कधी निश्चितपणे वाटते, की यांतून एक चित्रपट तयार करता येईल. मग मी त्या कल्पनेवर काम करू लागतो.’

‘वाइल्ड स्ट्रॉबेरीज’ हे चित्रपटाच्या जागतिक आवृत्तीचे नाव असले तरी मूळ शीर्षकाचा अर्थ ‘स्ट्रॉबेरीचा वाफा’ असा आहे. हा बर्गमनच्या सर्वश्रेष्ठ चित्रपटांपकी एक गणला जातो. या चित्रपटाची कथा त्याला एका प्रसंगाने सुचली, असे तो म्हणतो. स्टॉकहोमहून प्रवास करीत असताना तो एकदा आपल्या गावी सहज थांबला. आपल्या आजीच्या घराजवळ गेल्यावर त्याला अकस्मात असे वाटले की, आपण जेव्हा हे बंद दार उघडून आत जाऊ तेव्हा ते जुने, भूतकाळातील जग आपल्याला जसेच्या तसे, काहीच न बदलता दिसले तर कसे होईल? त्याने ‘बर्गमन ऑन बर्गमन’ या पुस्तकात लिहिले आहे- ‘त्यावेळी माझ्या मनात कल्पना आली की, या थीमवर एक चित्रपट तयार करता येईल. उदाहरणार्थ, तुम्ही चालत आहात आणि एक दरवाजा उघडता व सरळ तुम्ही तुमच्या बालपणात प्रवेश करता. नंतर तुम्ही एक दुसरे दार उघडता आणि वास्तव जगात परत येता. मग तुम्ही एका रस्त्याच्या कोपऱ्यावरून वळता आणि तुम्हाला दिसते की, अस्तित्वाच्या एका नव्या प्रदेशात तुम्ही आला आहात. ही ‘वाइल्ड स्ट्रॉबेरीज’मागची कल्पना होती.’

मात्र, आपल्या कलाकृतीविषयी कलावंत जे लिहितो ते (आणि कलाकृतीत जे दाखवतो तेही!) संपूर्ण सत्य मानू नये, हे आता माझ्या चांगलेच ध्यानात आले आहे. कारण नंतर लिहिलेल्या ‘इमेजेस’ या पुस्तकात बर्गमन लिहितो-

‘मी ‘बर्गमन ऑन बर्गमन’मध्ये जे लिहिले आहे ते असत्य आहे. सत्य हे की, मी कायमच माझ्या बालपणात वावरतो आहे.. खरे तर मी सततच माझ्या स्वप्नात जगतो. आणि कधी कधी त्यांतून बाहेर प्रत्यक्षात येतो.’

हा चित्रपट बनवताना बर्गमन आणि त्याचे वडील यांच्यातील संबंध अतिशय दुरावलेले होते. ‘इमेजेस’मध्ये बर्गमन लिहितो, ‘वाइल्ड स्ट्रॉबेरीज’ म्हणजे माझ्या वागणुकीचे समर्थन करण्याचा निर्वाणीचा प्रयत्न होता. पण नंतर मी हा सिनेमा का बनवला, हेच विसरून गेलो. आणि जेव्हा त्याविषयी बोलायची वेळ आली तेव्हा माझ्याजवळ बोलण्यासारखे काहीच नव्हते. ही गोष्ट माझ्यासाठी आता एक मनोरंजक गूढ बनली आहे.’

हा जो गोंधळ बर्गमनच्या मनात आहे, त्याचे प्रतििबब ‘वाइल्ड स्ट्रॉबेरीज’मध्ये स्पष्ट पडलेले दिसते. पण तेच या चित्रपटाचे महत्त्वाचे बलस्थान आहे. काहीसे धूसर, स्पष्ट-अस्पष्ट; पण म्हणूनच अधिक सुंदर भासणारे दृश्य आपण पाहतो आहोत असे चित्रपट पाहताना जाणवत राहते. आपल्याला काय सांगायचे आहे त्याबद्दल बर्गमन जे काही लिहितो ते पूर्णपणे विसरूनच आपण या चित्रपटाकडे वळले पाहिजे.

अनेकांनी इसाक बोर्गला पडलेल्या सुरुवातीच्या स्वप्नाचे विश्लेषण करून काही सुसंगत अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. आपला मृत्यू जवळ आल्याची भावना इसाकच्या मनात अस्वस्थता निर्माण करते आहे असा एक निष्कर्ष आहे. मृत्यूची चाहूल लागल्यावर माणसाचे मन त्याला टाळण्याचा प्रयत्न करत असते. पण तो वेगवेगळ्या रूपांत समोर येत राहतोच. कपडय़ांतून अदृश्य होणारा माणूस हे त्याचेच प्रतीक असू शकते. जणू चतन्य निघून गेल्यानंतर ‘जमिनीवर पडणारे’ शरीर! या दृश्यातील सावल्या, ध्वनीचा अभाव आणि काटे नसलेल्या घडय़ाळाची प्रतिमा यांनाही वेगवेगळे अर्थ लावता येतील. मात्र, अशा विश्लेषणातून फारसे काही सिद्ध होत नाही. कॉनराड रिक्टरने एके ठिकाणी लिहिले आहे, ‘विश्लेषणाने काहीच साध्य होत नाही. आपण आपल्यालाच पारखे बनतो.’ शिवाय असे विश्लेषण कधीही पूर्णपणे ु्नीू३्र५ी नसतेच. कारण त्या ‘दृष्टिकोना’त आपल्या दृष्टीचे गुणदोष, आपली मते, आपले अनुभव आणि आपल्या जीवनविषयक, कलाविषयक संकल्पना सतत मधे येत राहतातच.

सुदैवाने चित्रपट पाहताना समोर जे येत राहते ते इतके सुंदर आणि मन खिळवून टाकणारे आहे की ‘विश्लेषण’ वगरे आपण विसरूनच जातो. आपण विश्लेषण करू लागतो ते पुन्हा एकदा सिनेमा पाहताना किंवा त्याची आठवण काढताना, किंवा त्याच्यावर लिहिताना..

(३)

तर आपण पुन्हा आपल्या ७८ वर्षांच्या म्हाताऱ्याकडे वळू..

इसाक बोर्ग पहाटेच उठून लुंडकडे जाण्याची तयारी करतो आहे. त्याच्या घरी राहणारी, काम करणारी मिस अ‍ॅग्डा अनेक वर्षांपासून येथे राहते. पदवीदान समारंभ आपणही पाहावा अशी तिची फार इच्छा आहे. दोघांनी विमानाने जायचे ठरले आहे. पण ऐनवेळी इसाक विमानाने जाण्याऐवजी कार घेऊन जाण्याचे ठरवतो. मिस अ‍ॅग्डा चिडते, रागावते. पण त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. त्याची सून मारियन काही दिवसांपूर्वी नवऱ्याशी भांडून इकडे आली आहे. तिला आता नवऱ्याकडे जायचे आहे. ती बोर्गला त्याच्यासोबत येण्याची परवानगी मागते. तो तिला घेऊन आपल्या कारने निघतो आणि एका विलक्षण प्रवासाला सुरुवात होते. या दोघांच्या आपसातील बोलण्यातून इसाकचे आणि इव्हाल्डचे- त्याच्या मुलाचे, इसाकचे आणि त्याच्या सुनेचे आणि त्याचा मुलगा आणि सून यांचे संबंध स्पष्ट होत जातात. इसाकने काही रक्कम इव्हाल्डला उधार दिली आहे. दरमहा एक विशिष्ट रक्कम त्याने परत करावी असा त्याचा आग्रह आहे. सुनेला वाटते की, सासऱ्याला पशांची काहीच कमतरता नाही, त्याने ही रक्कम वसूल करण्यासाठी मागे लागावे हे योग्य नव्हे. इसाकचे म्हणणे असे की, दोघांत तसा करार झाला होता. आणि ‘करार म्हणजे करार’! इसाक असेही म्हणतो की, मी तत्त्वाने वागतो हे जाणून इव्हाल्ड माझा आदर करतो.

त्यावर मरियन म्हणते, ‘तो तुमचा तिरस्कारही करतो.’ ती पुढे म्हणते, ‘‘तुम्ही आत्मकेंद्रित व स्वार्थी आहात. तुम्ही अविचारी तर आहातच; शिवाय स्वत:खेरीज इतर कुणाचेही तुम्ही कधी ऐकले नाही. एकटेपणाचा मुखवटा तुम्ही चेहऱ्यावर घातला आहे आणि त्यामागे खरा चेहरा दडवून ठेवला आहे.’’

‘‘तू माझा तिरस्कार करतेस हे पाहून मला वाईट वाटते,’’ बोर्ग म्हणतो.

‘‘मी तुमचा तिरस्कार करीत नाही, मी तुमची कींव करते.’’

तिची बोलण्याची पद्धत, तिचे तर्कशास्त्र यांचे इसाकला हसू आले. तीदेखील हसली व वातावरणातील ताण थोडा कमी झाला.

माणसाची स्वत:विषयीची कल्पना आणि इतर माणसांची त्याच्याविषयीची मते यांत फार मोठी तफावत असते, हे या चित्रपटाचे एक महत्त्वाचे आशयसूत्र आहे.

महामार्ग सोडून एक लहान रस्ता पकडून इसाक झाडांच्या गर्दीत असणाऱ्या एका जुनाट बंगल्यापाशी येतो. तो वीस वर्षांचा होईपर्यंत प्रत्येक उन्हाळ्यात या घरी राहायला यायचा.

‘‘येथे एक स्ट्रॉबेरीचा वाफा आहे. तुला पाहायचाय?’’ तो विचारतो.

‘‘त्यापेक्षा मी समुद्रात डुबकी मारून येते,’’ असे म्हणून मरियन जाते. इसाक एकटाच त्या वाफ्यापाशी जातो. तिथे झाडांना खूप स्ट्रॉबेरी लगडलेल्या असतात. तो दोन-तीन स्ट्रॉबेरी तोंडात टाकतो. भोवतीची ती बाग.. समोर दिसणारे घर.. एकटेपण आणि तोंडातील स्ट्रॉबेरीची चव.. पाहता पाहता त्याचे मन भूतकाळात जाते..

समोरच्या दृश्यात आता आश्चर्यकारक बदल झालेला आहे. पलीकडले- क्षणापूर्वी जुनाट दिसणारे घर आता नवे, प्रकाशमान बनले आहे. घराच्या खिडक्या उघडय़ा आहेत आणि त्यांतून हसण्याचे, गाण्याचे, संगीताचे आवाज ऐकू येत आहेत. अचानक इसाकला ‘ती’ दिसली. एक सुंदर तरुणी. शरीरात नुकत्याच प्रवेश केलेल्या स्त्रीत्वाने प्रफुल्लित झालेली, पांढऱ्याशुभ्र कपडय़ातील मुग्धा. वृद्ध इसाक तिचे निरीक्षण करतो आहे. ही तर सारा आहे. एकेकाळी त्याने तिच्यावर मनापासून प्रेम केले होते. त्याने तिला हलकेच हाक मारली. पण तिने कसलीच प्रतिक्रिया दिली नाही. ती स्ट्रॉबेरी गोळा करून बास्केटमध्ये भरू लागली. तेवढय़ात तेथे एक तरुण मुलगा आला. आपला मोठा भाऊ सिगफ्रिडला इसाकने ओळखले. त्याने आक्रमकपणे पुढे होत साराचे चुंबन घेतले. ‘‘मी इसाकला सांगेन..’’ ती तक्रार करीत म्हणाली. ‘‘हुं.. इसाक! हात पाठीमागे बांधूनही मी त्याला केव्हाही लोळवू शकेन,’’ तो म्हणाला. ‘‘आम्ही गुप्तपणे लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या आहेत,’’ सारा म्हणाली. ‘‘आणि ही गुप्त गोष्ट सगळ्यांना माहीत आहे,’’ सिगफ्रिड तिला चिडवत, हसत म्हणाला.

घरातून घंटेचा आवाज आला. अनेक मुले-मुली घराकडे जाऊ लागली. आतून एक मुलगी इसाकला हाका मारू लागली. दुसरी म्हणाली, ‘‘इसाक येथे नाही. तो वडिलांबरोबर मासे पकडायला गेला आहे.’’

सारी मुले आत गेली. वृद्ध इसाकही त्यांच्यामागे गेला. त्याने काचेतून आत पाहिले. आत वाढदिवसाची पार्टी चालू होती. त्याची सख्खी, चुलत भावंडे, आत्या, काका सारे हसत-खिदळत होते. पण त्याला त्या जगात प्रवेश नव्हता. कुणीतरी साराला इसाकवरून चिडवले. ती रडत बाहेर आली. तिच्या बहिणीला सांगू लागली, ‘‘इसाक किती सुसंस्कृत आहे! किती संवेदनशील! त्याला कविता आवडतात. आणि तो स्वर्गीय जीवनाबद्दल बोलू पाहतो. त्याला पियानोवर द्वंद्वगीते म्हणायला आवडतात. आणि जवळ कुणी नसताना अंधारातच तो माझे चुंबन घेतो. पाप-पुण्याबद्दल त्याच्या स्पष्ट कल्पना आहेत. तो अतिशय बुद्धिमान आहे. नीतिमान आहे.’’

सारा पळत बागेकडे गेली. इसाक तिच्यामागे गेला. पण ती नाहीशी झाली होती. इसाकला दिसले- की तो त्या स्ट्रॉबेरीच्या वाफ्याजवळ एकटाच उभा आहे. त्याच्या मनात उदासीनता दाटून आली.

४)

पुढल्या साऱ्या चित्रपटाची दिशा अधोरेखित करणारा हा कळीचा प्रसंग आहे. सदेह बालपणात परत जाता येणे कुणाही माणसाला शक्य नाही. मग इसाकने जे पाहिले ते काय होते? त्याच्या आठवणीतला एक तुकडा? की त्याचा भ्रम? की आणखी एक स्वप्न? की त्याच्या मनातील कल्पना?

त्याला जो भूतकाळ दिसतो तो म्हणजे त्याच्या आठवणी आहेत असा अनेकांनी अर्थ लावला आहे. पण ते चुकीचे आहे. दिग्दर्शकाने एक क्ल्यू दिला आहे. हा प्रसंग घडताना इसाक तेथे नव्हता. ज्या प्रसंगात आपण हजर नव्हतो तो आपल्याला कसा आठवेल? कारण आठवण ही अनुभवाशी बद्ध असते.  ‘असे घडले असावे’ असे इसाकला वाटते. अनेकदा स्वप्न पाहतानाही आपल्याला जे ‘घडावे वाटते’ ते आपण पाहतो. त्यामुळे हे इसाकला जागेपणी पडलेले एक स्वप्नच आहे. मग या स्वप्नाचा अर्थ काय? पुढे आपल्याला समजते, की सारा आणि सिगफ्रिड यांचे लग्न झाले. त्यांना सहा मुले झाली. इसाकच्या मनात साराविषयी प्रेम होते. तिने आपला अव्हेर का केला, याचे दु:ख त्याला सतत जाणवत राहिले असले पाहिजे. त्याचे मन स्वप्नात एक दिलासा शोधते.. ‘सिगफ्रिडने आक्रमकपणे तिला आपल्यापासून ओढून नेले असले पाहिजे. नाही तर तिचे आपल्यावरच प्रेम होते.’ इतरांच्या मनातील आपली प्रतिमा चांगलीच असेल अशी आपली कल्पना असते. त्यानुसार साराच्या मनात ‘इसाक किती सुसंस्कृत आहे! किती संवेदनशील! तो अतिशय बुद्धिमान आहे, नीतिमान आहे,’ असे विचार आहेत अशी कल्पना इसाकचे मन करते.

स्वप्नात (की विचारांत?) गुंगलेला इसाक एका तरुणीच्या आवाजाने भानावर येतो. ही तरुणी दिसायला ‘त्या’ बालपणीच्या सारासारखीच आहे आणि तिचे नाव ‘सारा’च आहे. (या दोन्ही भूमिका बीबी अँडरसननेच केल्या आहेत.) ही सारा आणि तिचे दोन तरुण मित्र भटकायला निघाले आहेत. ती इसाकला लुंडपर्यंत लिफ्ट मागते.

त्यांना घेऊन इसाकचा प्रवास पुढे सुरू होतो. रस्त्यात एका पेट्रोल पंपाशेजारी इसाक गाडी थांबवतो. पंपाचा मालक इसाकला चांगलाच ओळखतो. ‘‘हे जगातील सर्वोत्तम डॉक्टर आहेत. आई, बाबा आणि हा सगळा प्रदेश अजून त्यांचे नाव काढीत असतो,’’ अशी तो डॉक्टरांची ओळख बायकोला करून देतो. गाडीत पेट्रोल भरून घेण्याचा एक साधा, नेहमीचा प्रसंग. मात्र त्यात छोटासा तपशील भरून बर्गमन त्याला लक्षणीय बनवतो. या पेट्रोल पंपाच्या मालकाच्या मनात इसाकची अतिशय चांगली प्रतिमा आहे. असे दिसते की, समाजाकडून त्याला मान्यता आणि प्रेम मिळाले आहे. दुर्दैवाने स्वत:च्या कुटुंबाकडून मात्र त्याला प्रतारणा, अवहेलना आणि तिरस्कारच मिळाला आहे. कुणाच्या नजरेतील इसाक खरा? वारंवार चित्रपट आणि इसाकदेखील या ‘थीम’भोवती फिरताना आढळतो.

पेट्रोल घेतल्यावर काही अंतर गेल्यानंतर तळ्याकाठच्या एका सुरेख हॉटेलपाशी थांबून ते जेवण घेतात. येथून जवळच इसाकची आई राहत असते. मुलांना तिथेच थांबवून इसाक मरियनला घेऊन आईला भेटण्यास जातो.

इसाकची आई ९६ वर्षांची असली तरी अजून तिच्या चेहऱ्यावर तेज आहे. तिला दहा मुले होती. त्यापकी फक्त इसाकच आता उरला आहे. २० नातवंडांपकी पंधरांना तिने पाहिलेलेही नाही. सोबतीला एक नर्स घेऊन ती एकटीच राहते. आपले एकटेपण तिने स्वीकारले आहे. इसाकदेखील एकटा राहतो. पण तो आईला सोबत राहा म्हणून म्हणत नाही आणि आईही त्याच्याबरोबर राहण्याचा विचार करीत नाही. तिच्या नातवाला एक सोन्याचे घडय़ाळ भेट द्यावे अशी तिची इच्छा आहे. ती ते घडय़ाळ पेटीतून काढून इसाकला दाखवते. त्या घडय़ाळाला काटेच नसतात!

काटे नसलेले घडय़ाळ ही प्रतिमा बर्गमन येथे पुनरावृत्त करतो. बंद पडलेले घडय़ाळ किमान एक वेळ तरी बरोबर दाखवते. काटे नसलेले घडय़ाळ म्हणजे अर्थशून्य जीवन. फक्त अस्तित्व असलेले. निरुपयोगी.

आईचा निरोप घेऊन इसाक व मरियन परततात. प्रवास पुढे सुरू होतो. आता मरियन कार चालवीत आहे. बसल्या बसल्या इसाकला डुलकी येते. पुन्हा एकदा स्वप्नात त्याला तो स्ट्रॉबेरीचा मळा दिसतो. तेथे सारा बसलेली असते. यावेळी मात्र ती त्याच्याशी बोलते.

‘‘तू आरशात पाहिलेस का इसाक? मी तुला तू कसा दिसतोस हे दाखवते. तू अनेक काळज्यांनी घेरलेला एक म्हातारा माणूस आहेस आणि तू लवकरच मरणार आहेस.’’

सारा इसाकला आरसा दाखवते. त्या आरशात त्याला आपला थकलेला, वृद्ध चेहरा दिसतो. आरशाहून परावर्तित झालेला प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडतो. त्याचा चेहरा जणू चटका बसल्यासारखा. आपल्याला दोघेही दिसत असतात. एक सळसळते तारुण्य आणि दुखावला गेलेला एक विकल वृद्ध. दोन्हींच्या मधे आरसा. आरसा सत्य दाखवतो असे म्हणतात. येथे सत्य कोणते आहे? सारा म्हणते- ‘‘तू दुखावला गेला आहेस, कारण तू सत्याला सामोरा जाऊ शकत नाहीस.’’

‘‘होय, मला समजते.’’ इसाक उत्तरतो.

‘‘तुला काहीच समजत नाही. मला समजते, कारण मी समजदार आहे. कदाचित त्यामुळेच क्रूरही. तू एवढा शिकलेला आहेस, तुला सारे समजायला हवे. पण समजत नाही.’’

डोस्टोव्हस्कीच्या ‘द इडियट’ या कादंबरीची नायिका नायकाला म्हणते, ‘‘There is nothing but the truth in you, so you are unfair.’’ सत्य हे माणसाला भावनांपासून दूर नेते. पण मग जीवनात काय महत्त्वाचे? सत्य की उत्कट भावना? अनेक कलावंतांनी हा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.

दूरवर कोठेतरी मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. ‘माझा मुलगा रडतो आहे. मला गेले पाहिजे..’ असे म्हणून आरसा फेकून देऊन सारा तिकडे पळत जाते. बागेत एका पाळण्यात मुलगा ठेवलेला आहे. ती त्याला उचलून घेते. घरातून सिगफ्रिड तिला आवाज देतो. मुलाला घेऊन दोघे आत जातात. इसाक खिडकीच्या काचेतून पाहतो. आत ती दोघे हसत, विनोद करीत असतात. त्या जगात इसाकला प्रवेश नसतो..

आकाशात चंद्र उगवलेला आहे, पण त्याच्याभोवती ढग गोळा होत आहेत. इसाक उदास नजरेने तिकडे पाहतो. तेवढय़ात त्याला एक हाक ऐकू येते. पलीकडले एक दार उघडून एक मध्यमवयीन गृहस्थ त्याला बोलावत असतात. तो त्यांच्यासोबत जातो. एका मोठय़ा हॉलमध्ये काही बाके मांडलेली. त्यावर दहा-बारा मुले बसलेली आहेत. त्यांत सारा आणि तिचे मित्रही आहेत. आता ही खोली इसाकला ओळखू येते. येथेच तो मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेत असे.

आज हा गृहस्थ इसाकची परीक्षा घेतो आहे. तो काही प्रश्न विचारतो. एकाही प्रश्नाचे उत्तर इसाकला देता येत नाही. तो गृहस्थ म्हणतो, ‘‘तुम्ही पास होण्याच्या लायकीचे नाही. शिवाय तुमच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. स्वार्थीपणा, सहानुभूतीशून्यता आणि औदासीन्य. आणि हे आरोप तुमच्या पत्नीने केलेले आहेत. तुम्ही तिला भेटू इच्छिता का?’’

‘‘ती बऱ्याच वर्षांपूर्वी मरण पावली आहे.’’

‘‘म्हणजे मी खोटे बोलतोय का? चला, माझ्यासोबत.’’

इसाक विचार करतो.

‘‘चला. दुसरा पर्याय नाही.’’

दोघेजण झाडांनी वेढलेल्या एका जागी येतात. तेथे इसाकची पत्नी तिच्या प्रियकराबरोबर प्रणयक्रीडा  करीत असते. इसाकसोबतचा माणूस म्हणतो, ‘‘ते दृश्य तुमच्या चांगलेच स्मरणात आहे. होय ना? ३० वर्षांपूर्वी मरण पावलेल्या पत्नीला अनेक माणसे विसरून जातात. पण तुम्ही हे दृश्य नेहमीच आठवता. हे चमत्कारिक आहे, नाही का? मंगळवार, एक मे १९७१ रोजी तुम्ही येथेच उभे होता व ती स्त्री आणि तो मनुष्य काय करतात हे पाहत होता.’’

इसाकची पत्नी निघून जाते. इसाक म्हणतो, ‘‘ती कोठे गेली?’’

तो गृहस्थ म्हणतो, ‘‘तुम्हाला ठाऊक आहे. ती गेली. सारेजण गेले. जणू एखादी मोठी अवघड शस्त्रक्रिया झाल्यासारखे. एक अप्रतिम शस्त्रक्रिया. वेदना नाही. रक्तस्राव नाही. ही शांतता. तुम्हाला ही शांतता जाणवत नाही का?

इसाक म्हणतो, ‘‘होय. सारे शांत आहे खरे. आणि या साऱ्याची शिक्षा काय?’’

‘‘शिक्षा? मला ठाऊक नाही. कदाचित ती नेहमीचीच शिक्षा असेल.’’

‘‘नेहमीचीच?’’

‘‘होय. एकाकीपणाची शिक्षा.’’

‘‘एकाकीपणाची?’’

‘‘होय.’’

‘‘शिक्षेत काही सूट.. काही दया?’’ इसाक केविलवाणा चेहरा करून विचारतो.

‘‘ते मला विचारू नका. मला या गोष्टींची फारशी माहिती नाही.’’

इसाक स्वप्नातून जागा होतो.

(५)

आयुष्यभर आपण ज्या चुका करतो त्याची शिक्षा आपल्याला वृद्धपणी भोगावी लागते. ही शिक्षा असते एकाकीपणाची. आणि ती ‘नेहमीचीच’ असते. प्रत्येकाला भोगावी लागणारी. इसाक एकामागोमाग ही तीन स्वप्ने पाहतो. पहिल्या स्वप्नात आपण आता वृद्ध झालो आहोत, आपला मृत्यू जवळ आला आहे, ही बोचणारी जाणीव त्याला पुन्हा होते. आपले पहिले प्रेम कायमचे हरवले आहे, याचीही. दुसऱ्या स्वप्नाचा संबंध त्याच्या व्यावसायिक कौशल्याशी आहे. आपण परीक्षेत नापास होऊ की काय, ही भीती इसाकला सतत वाटत असली पाहिजे. आपल्या कौशल्याविषयी एक प्रकारची साशंकताही त्याच्या मनात आहे. आणि आपण एकाकी पडलो असल्याची जाणीव! ती तर त्याचा पिच्छाच सोडत नाही. त्याचे तिसरे स्वप्न त्याच्या पत्नीच्या संदर्भात आहे. आपल्या पत्नीचा व्यभिचार आपण स्वत: पाहिला आहे असा त्याचा दावा आहे. हा दावा खरा आहे का? (चित्रपटात काही वेळानंतर एक प्रसंग येतो. त्यात इसाकचा मुलगा त्याच्या पत्नीला म्हणत असतो, ‘व्यक्तिश: मीदेखील एका नरकसदृश्य लग्नबंधातील अवांछित मूल होतो. मी माझ्या बापाचाच मुलगा आहे की नाही याबद्दल खुद्द माझा बापच साशंक आहे. तटस्थता, भीती, अपराधी भावना, फसवणूक यासोबत मी वाढलो आहे.’)

इंगमार बर्गमनची या चित्रपटामागील भूमिका आता आपल्या ध्यानात येऊ लागते. ‘सांगितली जाणारी प्रत्येक गोष्ट ही वास्तव आणि कल्पिताचे मिश्रण असते.’ काही गोष्टी घडल्या असाव्यात असे आपल्याला वाटते व त्या घडल्याच असे आपण समजू लागतो. एका विशिष्ट टप्प्यावर मागे वळून पाहताना माणसाला काय आठवते? सारे आठवते का? नाही. अनेक गोष्टी विसरलेल्या असतात. की मन ते मुद्दाम विसरते? जे आठवते त्यातही आपल्या कल्पनेचे मिश्रण असतेच. इसाकची पत्नी व्यभिचारी होती की नव्हती, हा आता महत्त्वाचा प्रश्न उरलेला नाही. ती वारली त्यालाही आता ३० वष्रे झाली आहेत. महत्त्वाचे हे आहे, की या संशयाने बाप आणि मुलाची आयुष्ये कायमची जखमी बनली आहेत. एकमेकांपासून दुरावली आहेत. हे ओझे ते दोघेजण अजून वाहत आहेत. दोघांत विसंवादाची एक प्रचंड दरी आहे. या विसंवादाचा दोघांच्या जीवनावर कसा परिणाम झाला आहे, हे आपल्या ध्यानात पुढील प्रसंगात येतेच. इसाक स्वप्नातून जागा झाल्यावर मरियन त्याला तिच्या आणि तिच्या नवऱ्यामधील भांडणाबद्दल सांगते. फ्लॅशबॅकने हा प्रसंग बर्गमन आपल्यासमोर सादर करतो..

एक पावसाळी दुपार. मरियन नवऱ्याला घेऊन समुद्रकिनाऱ्यावर आलेली आहे. आपल्याला मूल होणार असल्याची बातमी ती इव्हाल्डला सांगते. आणि हेही सांगते, की इव्हाल्डची इच्छा नसली तरी हे मूल वाढविण्याचा तिने निर्णय घेतला आहे. तो म्हणतो, ‘तुला मी किंवा मूल यांतून एकाची निवड करावी लागेल.’ कारण ‘या जगात जगत राहणे हेच निर्थक आहे. पण या जगाची लोकसंख्या वाढवून नवे बळी निर्माण करणे अधिक हास्यास्पद आहे. आणि त्याहून हास्यास्पद आहे ते त्यांच्यासाठी अधिक चांगल्या भविष्याची कल्पना करणे.’ आपल्या वडिलांसोबत आपले जे बालपण गेले त्यामुळे आपली अशी मते तयार झाली आहेत, असेही तो सांगतो. त्याला आपले आयुष्य उबगवाणे वाटते. आणि ही गोष्ट चुकीची आहे असे तिला वाटते. इव्हाल्ड म्हणतो, ‘कुठल्याही गोष्टीला चूक किंवा बरोबर असे ठामपणे सांगता येत नाही. आपल्या गरजांप्रमाणे आपण वागत असतो. जगणे आणि निर्मिती करणे या तुझ्या गरजा आहेत.’

‘आणि तुझ्या?’

‘संपून जाणे.. मरण पावणे.’

संपून जाणे ही गरज वाटावी या स्थितीला माणसाला का यावे लागते? इसाकला मृत्यूची स्वप्ने पडतात, म्हणजे त्याच्याही मनाला ‘संपून जाण्याची’ गरज जाणवते आहे काय? या पाश्र्वभूमीवर मरियनचे मत महत्त्वाचे आहे. इसाक स्वप्नातून जागा झाल्यावर तिला म्हणतो, ‘‘स्वप्नात मी मला काही सांगू पाहतो, जे जागेपणी मी ऐकू शकत नाही.’’

‘‘ते काय आहे ?

‘‘हे, की मी जरी जिवंत असलो तरी मेलेलो आहे.’’

‘‘तुम्ही आणि इव्हाल्ड दोघेही अगदी सारखे आहात.’’

माणसाच्या स्वत:च्या मर्यादा, स्वत:चे दोष आणि उणिवा या त्याच्याच नव्हे, तर त्याच्या संपर्कात येणाऱ्या अनेक जीवनांवर परिणाम करू शकतात. आज जेव्हा निवांतपणे इसाक हा दूरचा प्रवास करतो आहे तेव्हा हे सत्य त्याच्या ध्यानात येते आहे. हेच सत्य मरियनलाही जाणवते आहे.

ती म्हणते, ‘‘आपण तुमच्या आईला भेटायला गेलो तेव्हा तुम्ही आणि तुमची आई यांच्यात मला जे दिसले त्यामुळे मी हादरून गेले आहे. मी मनाशी म्हणाले, ही वृद्ध आणि बर्फासारखी थंड आई आणि तिचा हा वृद्ध मुलगा.. दोघांत कित्येक प्रकाशवर्षांइतके अंतर आहे. मुलगा स्वत:च म्हणतो, की तो एक जिवंत प्रेत आहे. आणि त्याचा मुलगा त्याच्याइतकेच एकाकी, थंड आणि प्रेतवत जीवन जगतो आहे. मग मला माझ्या पोटातील मुलाची आठवण झाली. ही घराण्याची परंपरा- जिच्यात एकाकीपणा आणि थंडपणा याशिवाय काहीच नाही, हे कुठेतरी संपले पाहिजे. म्हणून मी हे मूल वाढवणार आहे.’’

दोघेजण बोलत असतात आणि सारा व तिचे मित्र इसाकसाठी रानफुले तोडून आणतात व त्याला भेट देतात. त्यांना मरियनने आजच्या समारंभाबद्दल सांगितलेले असते. ती फुले पाहताच इसाकच्या चेहऱ्यावर निर्मळ हसू फुलते. मरियन गाडी चालू करते. प्रवास पुढे सुरू होतो.

६)

आतापर्यंतच्या विवेचनावरून जर कुणाला वाटत असेल, की हा एक तत्त्वचिंतनात्मक, विश्लेषणात्मक, चर्चात्मक आणि अत्यंत गंभीर चित्रपट आहे, तर ती माझी चूक आहे. कोठेही कंटाळवाणा न होणारा, खिळवून ठेवणारा आणि प्रेक्षणीय असा हा सिनेमा आहे. आणि याचे सारे श्रेय इंगमार बर्गमनला आणि इसाकची भूमिका जगणाऱ्या व्हिक्टर खोस्त्रामला आहे. एक तर या चित्रपटाला बर्गमनने उत्तम गती दिली आहे. तो कुठेच रेंगाळत नाही. शारीरिक प्रवासाबरोबरच तो प्रवास करणाऱ्या माणसांचा मानसिक प्रवासही बर्गमन चित्रित करीत जातो. इसाकचे पुन:पुन्हा जुन्या आठवणी काढणे आणि स्वप्नात जाणे व परत येणे यामुळे चित्रपटाला एक सुरेख काव्यात्म लय आली आहे. शिवाय पडद्यावर सतत काहीतरी नाटय़ घडत असते. (अनेक लहान लहान प्रसंग या चित्रपटात बर्गमनने पेरले आहेत. त्या साऱ्यांचा परामर्श एका लेखात घेता येणे शक्य नाही.) या चित्रपटात इसाकच्या सोबत बर्गमनने जी तरुण मंडळी आणली आहेत त्यामुळे सिनेमाला तारुण्याचा आणि टवटवीतपणाचा प्रसन्न स्पर्श झाला आहे. सारा आणि तिचे दोघे मित्र यांच्या रूपाने काळजीमुक्त तारुण्याचे मोठे लोभस दर्शन आपल्याला होत जाते. चित्रपटही द्विस्तरीय न राहता अनेक पातळ्यांवर फिरत राहतो.

पण खरे तर हा चित्रपट जेवढा बर्गमनचा आहे, तेवढाच तो व्हिक्टर खोस्त्रामचा आहे. या महान अभिनेत्याने इसाकची भूमिका ज्या पद्धतीने सादर केली आहे तिला तोड नाही. हा मूकपटांच्या काळापासून कार्यरत असणारा स्वीडनमधील एक श्रेष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता होता. ‘वाइल्ड स्ट्रॉबेरीज’चे चित्रीकरण होत असताना तो स्वत:देखील ७८ वर्षांचा होता. बर्गमनच्या कथेतील वृद्धाची प्रत्येक भावना तो जगला आणि ती त्याने प्रेक्षकांपर्यंत पोहोचविली. त्याचे उदास होणे, खिन्न होणे, आपल्यात हरवून जाणे, संभ्रमात पडणे, त्याचे समजूतदारपणे हसणे, सुनेविषयीची त्याच्या मनातील आपुलकी, सोबतच्या मुलांविषयीची जवळीक.. सारेच मोठे विलक्षण होते. त्याचा चेहरा इतका पारदर्शक होता की त्याच्या मनात काय चालले आहे हे स्पष्ट वाचता येत होते. इंगमार बर्गमनने लिहिले आहे, ‘व्हिक्टरने माझी कथा घेतली आणि तिला स्वत:ची बनविली. त्याची वेदना, त्याचा निर्दयपणा, त्याचे दु:ख, त्याची भीती, त्याचा एकाकीपणा, थंडपणा हे सारे त्याने माझ्या कथेत मिसळले. माझ्या वडिलांची आकृती त्याने उसनी घेतली आणि माझ्या आत्म्यात त्याने प्रवेश केला. माझे विश्व त्याने स्वत:चे बनवून टाकले. मला काहीही करावयाचे त्याने बाकी ठेवले नाही. ‘वाइल्ड स्ट्रॉबेरीज’ हा माझा चित्रपट राहिला नाही, तो व्हिक्टरचा बनून गेला.’

चित्रपटातील इतर भूमिका तशा लहानच होत्या. दोन्ही ‘सारा’ साकारणारी बीबी अ‍ॅँडरसन आणि मरियनची भूमिका करणारी इंग्रीड थुलीन यांनी त्या भूमिकांना न्याय दिला होता. इसाकच्या घरी काम करणाऱ्या मिस अ‍ॅग्डाची भूमिका ज्युलियन किंधालने रुबाबात केली होती.

गुंणार फिशरच्या अप्रतिम कृष्णधवल छायाचित्रणाचा ‘वाइल्ड स्ट्रॉबेरीज’च्या परिणामकारकतेत फार मोठा वाटा होता. विशेषत: स्वप्नदृश्यांतील प्रकाशयोजनेचा कल्पक उपयोग लक्ष वेधून घेणारा तर होताच; पण दिग्दर्शकाला जे सांगावयाचे आहे त्याचे सूचन करणाराही होता.

७)

लुंडला आल्यानंतर सारेजण इव्हाल्डच्या घरी उतरतात. मिस अ‍ॅग्डाही आलेली असते. इव्हाल्ड सर्वाचे प्रेमाने स्वागत करतो. त्याच्या वागण्यातून आता तो बराच सावरला आहे हे दिसते. संध्याकाळी पदवीदान समारंभ असतो. सारा आणि तिचे मित्रही या समारंभाला हजर राहतात. आपल्याला फार आवडू लागलेला हा म्हातारा एक ‘थोर’ माणूस आहे याची त्यांना गंमतही वाटत असते आणि अभिमानही. कार्यक्रमानंतर सारे घरी परततात. मुलांना आता आपल्या वाटेने पुढे जायचे आहे. ती इसाकचा हृद्य निरोप घेतात. आपणही त्यांना निरोप देतो. ‘तुमचा प्रवास आता आता चालू झाला आहे, तो सुखाचा होवो..’ अशी कामना आपल्याही मनात जागी झालेली असते. (नकळत आपण इसाकच्या भूमिकेत शिरलेलो असतो.)

इसाक दिवसभराच्या श्रमाने थकलेला. केवढा मोठा ‘प्रवास’ त्याने केलेला आहे! त्याला झोप येऊ लागते. तेवढय़ात इव्हाल्ड आत येतो. तो आणि मरियन नृत्यासाठी चालले आहेत, असे सांगतो. ‘मी तिच्याशिवाय राहू शकणार नाही..’ हे ऐकल्यावर पती-पत्नीमधील संबंध फारसे बिघडलेले नाहीत, किंवा ती दोघे जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत हे इसाकला जाणवते. त्याला आनंद होतो. त्याची सून खोलीत येते. तिने नृत्यासाठीचा उत्तम पोशाख घातला आहे. ती प्रेमाने त्याला ‘ॠ िल्ल्रॠँ३’ करते.

आता पुन्हा इसाक पलंगावर एकटा पडलेला आहे. पण हे एकटेपण त्याला खुपत नाही. अस्वस्थ करीत नाही. माणसे एकाकी असतात. पण काही काळ का होईना, एकमेकांना साथ देऊ शकतात. आणि यात समाधान मानावे, हे आज त्याला समजले आहे. काही ओझी मनावरून कमी झाली आहेत. या दिवशी त्याला फक्त ‘पदवी’ मिळालेली नाही, काही आनंददायी अनुभव या दिवसाने दिले आहेत. एका दिवसाने आणखी किती द्यावे? आता तो निवांत पहुडला असताना पुन्हा त्याचे मन नवे स्वप्न पाहू लागते..

पुन्हा तेच ‘आपले’ घर. त्याच्या लहानपणीच्या दिवसांतले. सुटीत एकत्र आलेली मुले बागेत खेळताहेत. इसाकला पाहून सारा धावत येते.

तो विचारतो, ‘‘आई-बाबा कोठे आहेत?’’

ती म्हणते, ‘‘चल, मी तुला शोधायला मदत करते.’’

गवतातून, लहान रानफुलांतून एका वृद्धाचा हात हाती धरून तारुण्य त्याला घेऊन जात आहे. साराच्या अंगावर पांढराशुभ्र ड्रेस आहे. पाश्र्वभूमीला आनंदसूचक संगीत. इसाक नििश्चतपणे चालला आहे. कारण ‘प्रेम’ आपल्याला ‘योग्य’ ठिकाणी नेईल याची त्याला खात्री पटली आहे. सारा त्याला एका टेकडीच्या उंचवटय़ावर नेऊन उभे करते. त्याला दाखवते.. दूर खाडीपाशी त्याचे आई-वडील बसलेले आहेत. आई त्याच्याकडे पाहत हात हलवीत असते.

इसाकचा चेहरा जीवनाचे गूढ उकलल्यासारखा.. तृप्त, शांत.

काळ पुढे सरकत जातो. निसटत जातो. पण भूतकाळाचे मनातील अस्तित्व पुसले जात नाही, हे त्याला समजले आहे. डोळे मिटून तो आई-वडिलांना समोर आणू शकतो. डोळे मिटून घेतल्यावर हरवलेले प्रेमही पुन्हा सोबत येऊ शकते.

रानातील इसाकचा चेहरा झोपलेल्या इसाकच्या चेहऱ्यावर २४स्र्ी१ ्रेस्र्२ी होतो. झोपलेल्या वृद्धाचा चेहराही आतून फुललेला..

चित्रपट संपतो.

मरियनचे शब्द आठवतात- ‘‘माणसाचे एकाकीपण आणि थंडपण.. कुठेतरी हे संपले पाहिजे..’’

Story img Loader