ज्योतिष विशारद स्मिता अतुल गायकवाड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मेष : अचानक धनलाभ

नोव्हेंबर २०१८ – गुरू, शनी, मंगळ यांचे सहकार्य उत्तम लाभेल. कायदेशास्त्र, गूढशास्त्र, संशोधन या क्षेत्रांतील व्यक्तींना हे ग्रहमान सुरेख आहे. वैवाहिक, कौटुंबिक सौख्य चांगले राहील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आध्यात्मिकदृष्टय़ा ग्रहांची साथ राहील. कोणतेही काम धैर्याने घ्यावे, त्रास होणार नाही.

डिसेंबर २०१८ – मंगळ-नेपच्युन युतीमुळे मित्र, सहकारी कुमार्गी असण्याची शक्यता. नवीन मैत्री करताना सावधानता बाळगा. वाईट संगतीमुळे नुकसान होऊ शकते. शत्रूपीडा राहील. सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल. गुरू-शनी युती अध्यात्मात मन रमेल. त्यामुळे आध्यात्मिक ओढा राहील. कोणतीही कृती घाईगडबडीने करू नका. अध्यात्मामुळे मानसिक समाधान मिळेल.

जानेवारी २०१९ – ज्यांचे वय ३६ वर्षे आहे अशा व्यक्तींच्या भाग्योदयाला सुरुवात होईल. वरिष्ठ मंडळी, कामावरील वरिष्ठ यांच्याशी आदराने वागा. कौटुंबिक वातावरण तप्त राहील. प्रॉपर्टीचा प्रश्न निकालात निघेल. सासूरवाडीचे सौख्य लाभेल. गुरू-शुक्र यांची युती फार मोठा धनलाभ करून देणारा योग आहे. शेअर्स, वारसा हक्क, गुप्तधन या गोष्टींचा अचानक लाभ होऊ शकतो.

फेब्रुवारी २०१९ – अनावश्यक प्रवास टाळा. हर्षल-मंगळ युती योग त्रासदायक ठरण्याची शक्यता असेल, तरी अतिधाडस करू नका. रागावर नियंत्रण ठेवल्यास त्रास होणार नाही. काहींना डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. भावनेच्या आहारी जाऊ नका. पूर्वार्धात बेफिकीर न राहिल्यास उत्तरार्ध चांगला जाईल. आरोग्य जपा.

मार्च २०१९ – कला क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना उत्तम ग्रहमान आहे. मंगळ-गुरू षडाष्टक जरी त्रासदायक असला तरी दशमातील शुक्रामुळे बराचसा त्रास कमी होईल. तरीही बेफिकीर राहून चालणार नाही. आरोग्याची काळजी घ्यावी. तिऱ्हाईत व्यक्तींना जामीन राहू नये.

एप्रिल २०१९ – आर्थिक स्थिती चांगली राहील, पण खर्चीक वृत्ती राहील. दोलायमान परिस्थिती राहील. कवी, लेखक यांना ग्रहमान चांगले राहील. नवीन ओळखीचा किंवा प्रतिष्ठित व्यक्तींचा फायदा होऊ शकतो. डोळ्यांची काळजी घ्यावी. वादविवादापासून लांब राहणे चांगले. धार्मिक क्षेत्रांना भेट द्याल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

मे २०१९ – रवी, मेष या उच्च राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. मिथुन राशीतील राहू-मंगळ पराक्रमाच्या दृष्टीने चांगले राहतील. खेळाडूंना ग्रहमान उत्तम आहे. राहू-मंगळ पराक्रमाच्या दृष्टीने चांगले असले तरी भावंडांच्या दृष्टीने चांगले नाहीत. भावा-भावात मतभेद होऊ शकतात. भांडणतंटा यांपासून दूर राहा.

जून २०१९ – गायनकलेची आवड राहील. बौद्धिक, साहित्यिक क्षेत्रातील लोकांना ग्रहमान चांगले आहे. उदार आणि खर्चीक वृत्ती राहील. रवी-गुरू शुभ योग अतिशय सुरेख आहे. त्यामुळे आर्थिक, प्रॉपर्टीचा प्रश्न मिटण्याची शक्यता.

जुलै २०१९ – शेतजमीन, जागा यांचे सौख्य राहील. वाहन जपून चालवावे. छोटे-छोटे प्रवास घडतील. घरातील वातावरण तापण्याची शक्यता. सहनशीलतेने सर्व काही ठीक होईल. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हाल. चिकित्सक वृत्ती राहील.

ऑगस्ट २०१९ – सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना त्रास होऊ शकतो. राजकारणात फारसे यश लाभणार नाही. बौद्धिक क्षेत्रातील लोकांना व्यासंगाच्या दृष्टीने वातावरण चांगले राहील. लेखन, साहित्य या दृष्टीने बुधाचे सहकार्य चांगले राहील. कौटुंबिक सौख्य राहील.

सप्टेंबर २०१९ – सिंहेचा रवी पंचमात आणि गुरूबरोबर शुभ योगात. त्यामुळे मोठय़ा लोकांचे सहकार्य मिळेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. उच्च शिक्षण पूर्ण होईल. आळशीपणामुळे आरोग्य बिघडेल, काळजी घ्यावी.

ऑक्टोबर २०१९ – नोकरीत भाग्योदय, उष्णतेच्या विकाराचे त्रास होतील. धरसोड वृत्ती राहील. कटू बोलण्याने शत्रुत्व येऊ शकते. स्वभाव अत्यंत अभिमानी आणि खर्चीक राहील. जोडीदाराला खूश ठेवाल. बुध आणि शुक्र यांची उत्तम साथ राहील.

वृषभ : रखडलेली कामे मार्गी लागतील

नोव्हेंबर २०१८- खेळाडूंना पराक्रमाच्या दृष्टीने चांगले आहे. जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल. नवीन तांत्रिक शिक्षण आत्मसात करणाऱ्यांना जास्त वेळ द्यावा लागेल. विमा एजंट, शिक्षक, कारकून यांना उत्तम कालखंड. पाण्याशी संबंध येणारे व्यवसाय, गूढविद्या, चित्रकला, शिल्पकला अशांना आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. काहींना नोकरीतील त्रास कमी होईल.

डिसेंबर २०१८ – विद्यार्थी वर्गाने अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. काहींना नोकरी-व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करावे लागेल. त्याचा त्यांना फायदा होईल. ज्यांना स्वतंत्र व्यवसाय करावयाचा आहे त्यांना विचार करायला हरकत नाही. कर्मचारी वर्गाचे सहकार्य चांगले लाभेल. गुरू-रवी शुभयोगत यश मिळेल.

जानेवारी २०१९ – सध्या रवी, शनी यांचे सहकार्य नसले तरी गुरू आणि मंगळ यांचे सहकार्य मात्र लाभेल. सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल. सामाजिक कार्यात पडताना वरिष्ठांशी हुज्जत घालू नका. त्यामुळे शत्रूवर विजय मिळवता येईल. महिला वर्गाना आनंदी दिवस जातील. मनाजोगी आणि उंची वस्तूंची खेरदी कराल. सांपत्तिक उत्कर्ष चांगला राहील. प्रेमविवाहाच्या दृष्टीने ग्रहमान उत्तम.

फेब्रुवारी २०१९ – हर्षल-मंगळ युतीमुळे अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवून चालणार नाही. ज्यांचा स्वतंत्र व्यवसाय आहे त्यांनी सर्व जबाबदारी कर्मचारीवर्गावर टाकून चालणार नाही. गूढविद्या, तंत्रमंत्र विद्या शिकण्यास ग्रहमान चाग्ांले आहे. ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना लाभदायक आहे. शेअर्समध्ये फायदा होऊ शकतो.

मार्च २०१९ – मित्रपरिवार मोठा असेल. त्यांच्यात वेळ घालवण्याने आनंदी वाटेल. गुरू ग्रहाचे सहकार्य तुम्हाला चांगले मिळणार आहे. कला क्षेत्रात यश मिळेल. शिक्षणातील अडथळे दूर होतील. नोकरीत अधिकाराचे पद मिळेल. तुम्ही तुमचे अस्तित्व टिकवण्याकडे प्रयत्नशील राहाल. शरीरिक, मानसिक समाधना लाभेल.

एप्रिल २०१९ – मिथुन राशीत राहूचे भ्रमण तुमच्या राशीसाठी फार चांगले आहे. पराक्रमाच्या दृष्टीने कार्यतत्पर व्हाल. स्वतंत्र वृत्तीने काम कराल. प्रत्येक कार्यात उत्साहाने भाग घ्याल. तुम्ही तुमच्या व्यवहारचातुर्यावर व्यवसायात कमिशन काढण्याकडे कल राहील आणि तो यशस्वी होईल.

मे २०१९ – मीनेचा शुक्र तुम्हाला लाभ मिळवून देईल. कलाकौशल्य, फॅशन डिझायनर, चित्रकला, शिल्पकला अशा कलांत प्रावीण्य मिळेल. हॉटेलिंग, कॅटरिंग व्यवसायातसुद्धा लाभ मिळेल. नवीन मित्र-मैत्रिणी भेटतील.

जून २०१९ – आत्मबल वाढेल. मानसिक कणखरपणा राहील. ज्या कामांना वेग येत नव्हता त्यांना वेग येईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. व्यक्तिमत्त्व उठून दिसेल. पण स्वभावात अहमपणा ठेवू नका. एखादी वस्तू घ्यायची म्हटली तर घ्यायची असा स्वभाव राहील.

जुलै २०१९ – बुध, शुक्र यांची मदत होणार आहे. हस्तकलाकौशल्य यांची आवड निर्माण होणार आहे. कोणती ना कोणती तरी कला तुम्ही अवगत कराल. तुम्ही तुमची मते दुसऱ्यांवर लादू नका. भावंडांशी वाद-विवाद करू नका. बोलण्यातील अहमपणा सोडा. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल.

ऑगस्ट २०१९ – संधीचे सोने करून घ्या. खेळाडू, कलाकार यांना उत्तम कालखंड आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना अभ्यासात मन लागेल. त्याचा फायदा करून घ्या. तुम्हाला एखादे अधिकार पद मिळण्याची शक्यता आहे. अचानक एखादी चांगली बातमी कानावर येईल. घरात आनंदी वातावरण राहील.

सप्टेंबर २०१९ –  नवीन वास्तूविषयक प्रश्न सुटतील. काही जण नवीन वास्तूत प्रवेश करतील. जुन्या प्रॉपर्टीचा प्रश्न सोडवताना संयम ठेवा. तुमची स्वप्ने पूर्ण होतील.

ऑक्टोबर २०१९ – विद्यार्थी वर्गाला शिक्षणात अडथळे येण्याची शक्यता विद्यार्थ्यांनी अभ्यासात टंगळमंगळ करून चालणार नाही. तुम्ही नियोजनात्मक राहा. कोणतेही काम घाईगडबडीने करू नका.

मिथुन : नोकरी-व्यवसायात भरभराट

नोव्हेंबर २०१८ – न्यायनिष्ठूर आणि दिलदारपणामुळे सामाजिक क्षेत्रात प्रशंसा होईल. तुमचा समाजात एक प्रकारचा दरारा असेल. समाजात तुम्हाला मानसन्मान कीर्ती मिळेल. तडजोड आणि मध्यस्थी करण्याकडे कल राहील. स्वभावातील हट्टीपणा कमी करा. चुकीच्या बोलण्याने त्रास होऊ शकतो.

डिसेंबर २०१८ – शुक्राचे भ्रमण तुम्हाला कलेत यश मिळवून देईल. फुले, अत्तरे, सुगंधी वस्तू, दाग-दागिने, उंची वस्त्रे असे व्यवसाय करणाऱ्यांना ग्रहमान अतिशय शुभ आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाला स्वतंत्रपणे सुरुवात करू शकता. त्यात तुम्हाला यश मिळेल. भागीदारीत व्यवसाय करू नका. सध्या शनीची साथ मिळत नाही.

जानेवारी २०१९ – तुम्हाला तुमच्या आरोग्याची हेळसांड करून चालणार नाही. आराहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घ्यावी. वरिष्ठांशी वाद-विवाद करू नये. वैवाहिक जीवनात रुसवे-फुगवे जाणवतील. रागावर नियंत्रण ठेवा.

फेब्रुवारी २०१९ – चेहऱ्यावर सतत काळजीचे सावट न ठेवता आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या स्वभावात थोडा बदल केल्यास हे ग्रहमान तुम्हाला उत्तम जाईल. काही गोष्टींचा तिटकारा वाटत होता तो कमी होईल. नातेवाईक, मित्र-मंडळी यांच्याशी आदराने वागा.

मार्च २०१९ – शेअर्स, लॉटरी या व्यवसायांना गती मिळेल, लाभ होतील. गुरू आणि शुक्र यांचा योग फायदा मिळवून देईल. अचानक लाभ होतील. मित्रमंडळी यांच्याशी वादाचे प्रसंग येऊ देऊ नका. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोला. एकमेकांपासून लांब राहू नका. समजून घ्या.

एप्रिल २०१९ – कला क्षेत्रात यश लाभेल. वक्तृत्व, लिखाण यांची आवड निर्माण होईल. फोटोग्राफी व्यवसायाला अतिशय सुरेख ग्रहमान आहे. शुक्र या ग्रहाची मदत तुम्हाला होणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. कोर्ट-कचेरी यांपासून लांब राहा. एखादी गोष्ट स्वत:हून अंगावर ओढवून घेऊ नका. प्रवासासाठी खर्च कराल. मानसिक आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा.

मे २०१९- गुरू आणि रवी या ग्रहांची साथ उत्तम राहणार आहे. इच्छापूर्ती होणारा कालावधी आहे. सांपत्तिक दर्जा चांगला राहील.  मित्रांसोबत वेळ घालवाल, पण मित्रमंडळींवर महत्त्वाची जबाबदारी देऊ नका. तुम्ही तुमची कामे स्वत: करा. वाहन आणि प्रॉपर्टीचे योग संभवतात. प्रयत्न करा. यश मिळेल.

जून २०१९ – कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी नियोजन करा. कोणत्याही संकटाला न घाबरता तुम्ही प्रत्येक कार्यात सहभाग घ्याल. मंगळ या ग्रहामुळे घरातील वातावरण तप्त राहील. पण तुम्हीच जर शांत राहिलात तर घरातील वातावरण बिघडणार नाही. डोक्यावर बर्फ तोंडात खडीसाखर, असे राहा म्हणजे त्रास होणार नाही.

जुलै २०१९ – मानसिक कणखरपणा असेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्याल. बोलण्यात कोणाला मानणार नाही. वक्तृत्व चांगले राहील. वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घ्या. कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करा. शनीचे सहकार्य कमी राहील.

ऑगस्ट २०१९ – रवी, गुरू, यांचा शुभयोग सत्कारणी लागेल. गायन, वादन, कवी यांना ग्रहमान उत्तम आहे. ज्यांचा वैद्यकीय व्यवसाय आहे त्यांनाही लाभदायक आहे. इतके दिवस ज्या नातेवाईकांबरोबर कटुता होती ती आता कमी होणार आहे.

सप्टेंबर २०१९ – सिंहेतील रवी तुम्हाला धाडस देईल. दृढनिश्चयाने वागाल. कोणाच्याही मदतीची अपेक्षा तुम्ही ठेवणार नाही. स्वकर्तृत्वावर पुढे याल. स्वभावात अहमपणा असेल. खेळाडूंना अतिशय चांगला कालखंड आहे.

ऑक्टोबर २०१९ – राजकारण, समाजकारण या लोकांनी थोडे सावधानतेने पाऊल उचलावे. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करावा. प्रॉपर्टीचा प्रश्न सध्या तरी बाजूला ठेवा. नवीन वास्तू, जागा घेणाऱ्यांना वेळ लागेल. हॉटेल, कॅटरिंग व्यवसायांना पूरक वातावरण राहील.

कर्क : शुभदायक वर्ष

नोव्हेंबर २०१८ – गुरूचे पंचमातून होणारे भ्रमण अतिशय सुरेख होणार आहे. नवीन विद्या शिकण्यास  कालखंड चांगला. शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवाल. बौद्धिक प्रगती होईल. हजरजबाबीपणा चांगला असेल. वाचन आणि लिखाणाची आवड निर्माण होईल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नातेवाइकांच्या आनंदात सहभागी व्हाल. सूचक स्वप्ने पडतील. अध्यात्मात प्रगती होईल.

डिसेंबर २०१८ – विरोधकांवर मात करणारे ग्रहमान आहे. वडीलधाऱ्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. शत्रूपीडा कमी राहील. गुरू, मंगळ, शनी यांनी अजूनही तुमची साथ सोडली नाही. काहींना अचानक वाहन योग संभवतो. ज्यांना नवीन वाहन खरेदी करावयाचे आहे, त्यांनी खरेदी करावयास हरकत नाही.

जानेवारी २०१९ – नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी थोडी ऊठबस होईल. पळापळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळ चिडचिड होईल. त्याचा शरीरावरही परिणाम होईल. हाडांचे दुखणे मागे लागेल. सकस आणि वेळेवर आहार घ्या, त्यामुळे त्रास कमी होईल. ज्यांना गूढशास्त्राची आवड आहे, त्यांनी नवीन काही शिकल्यास फायदा होईल. आध्यात्मिक ओढ लागेल. शांत चित्ताने सर्व गोष्टी करा. गुरू आणि मंगळ तुम्हाला या कटकटीतून बाहेर काढतील.

फेब्रुवारी २०१९ – लेखनात यश प्राप्त होईल. शिक्षणात प्रगती होईल. विद्यार्थीवर्गाला मागील वर्षांपेक्षा या वर्षी अभ्यासात प्रगती जाणवेल. उर्जितावस्था निर्माण होईल. उगाचच काहीच नसताना मनाला हुरहुर लावून घेऊ नका. संततीची चांगली बातमी कानावर येईल. गुरूचे सहकार्य तुम्हाला फार चांगले आहे.

मार्च २०१९ – वडीलधाऱ्या व्यक्तींचे सहकार्य कमी राहील. त्यांचा विरोध मावळेपर्यंत शांत राहा म्हणजे सर्व ठीक होईल. व्यापार, वैद्यकीय, यांत्रिकी क्षेत्रात यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी थोडी धावपळ होईल. गुरू आणि मंगळ या ग्रहांची तुम्हाला मदत होईल. थोडे चित्त शांत करून राहा. तुम्ही तुमच्या जोडीदाराला दुखवू नका.

एप्रिल २०१९ – मिथुन राशीतील राहूचे भ्रमण तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे तुम्हाला शत्रूपीडा कमी होईल. राजकीय लोकांना यशदायक वातावरण राहील. काहींना परदेश प्रवासाचे योग आहेत. ज्यांना प्रॉपर्टीचा वारसा हक्क पाहिजे आहे त्यांना मिळण्याची शक्यता. अचानक धनलाभ संभवतो.

मे २०१९ – भाग्यातील शुक्र आणि पंचमातील गुरू तुम्हाला फार काही मिळवून देणार आहे. ज्यांना  नवीन घर घ्यावयाचे आहे त्यांना योग आहे. काहीजण आपल्या स्वत:च्या वास्तूत राहायला जातील. जागेचा प्रश्न मिटेल. नोकरीत तुम्हाला अधिकारपद मिळेल.

जून २०१९ – ओळखीमुळे फायदा होईल. आर्थिक कल वाढण्याकडे कल राहील. लाभातील शुक्रामुळे तुम्हाला फायदा होईल. परंतु व्ययातील मंगळाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गुप्त, शत्रू धननाश, विश्वासघात यांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा.

जुलै २०१९ – रवी आणि शनी यांचा योग थोडा कटुता आणणारा आहे. वरिष्ठ आणि उच्चपदस्थांचे सौख्य कमी राहील. आध्यात्मिक शक्ती कमी होईल. कागदपत्रे व्यवस्थित हाताळा. कारण नसताना काही गोष्टी अंगलट येऊ शकतात. भांडण-तंटा आपसात मिटवा.

ऑगस्ट २०१९ – तुमच्या व्यक्तिमत्त्वात खानदानीपणा आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव दिसून येईल. अतिशय धाडसाने आणि कर्तबगारीने पुढे याल. रवी आणि गुरू यांचा शुभयोग तुम्हाला उपयोगी पडणार आहे.

सप्टेंबर २०१९ – बोलण्यातील अहमपणामुळे त्रास होऊ शकतो. थोडे नम्रतेने घ्या, कौटुंबिक प्रश्न हळुवारपणे सोडवा. जोडीदाराच्या मनाविरुद्ध काही करू नका. ग्रहमान फारसे चांगले नाही. परंतु अतिशय खराबही नाही. मानसिकता खराब होऊ देऊ नका.

ऑक्टोबर २०१९ – खेळाडूंना अतिशय चांगले ग्रहमान आहे. बुध आणि शुक्राचे सहकार्य असल्याने तुम्हाला यश प्राप्त होईल. पराक्रमाच्या दृष्टीने उत्तम आहे. भावंडांचे सहकार्य कमी राहील.

सिंह : यश मिळेल

नोव्हेंबर २०१८ – भावंडाचे सौख्य राहील. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हाल. प्रवास मनाजोगे होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष लागणार नाही. पालकांनी आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. संततीचा त्रास देण्याकडे कल असेल. सध्या शनीची साथ तुम्हाला नाही. त्यामुळे काळजीपूर्वक संततीकडे लक्ष द्या.

डिसेंबर २०१८ – सरकारी कामे असतील तर ती मार्गी लागतील. ज्यांना सरकारी नोकरी हवी आहे त्यांनी प्रयत्न करा. यश मिळेल. भागीदारी व्यवसाय करू नका. भागीदारीत यश मिळणार नाही. त्यामुळे व्यवसायावर भर द्या. प्रत्येक व्यवहार जपून करावा.

जानेवारी २०१९ – नवीन काही इच्छित कार्य सफल होईल. नवीन वास्तू, नवीन वाहन खरेदी कराल. ज्यांनी संततीचा विचार केला आहे त्यांनी प्रयत्न करा. थोडा धीर धरून चाला.

फेब्रुवारी २०१९ – रवी-शनी योग हा वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याच्या दृष्टीने फारसा चांगला नाही. ज्यांना पोटदुखीचा त्रास आहे, त्यांनी काळजी घ्यावी. व्यवसाय, नोकरीच्या दृष्टिकोनातून गाफील राहून चालणार नाही. थोडे परिश्रम वाढवावे लागतील. विनाकारण त्रागा करून घेण्यात अर्थ नाही. त्यावर नियंत्रण ठेवा, सहनशीलतेने वागावे लागेल. जोडीदाराला समजून घ्या. आर्थिक ओघ मध्यम राहील.

मार्च २०१९ – शनी-रवी योग पुन्हा त्रासदायक राहणार आहे. वडीलधाऱ्या मंडळीशी मिळतेजुळते घ्यावे लागेल. नोकरीत वरिष्ठांना तुमच्या गोष्टी पटणार नाहीत. तुम्ही तुमचे काम चोख करीत आहात, हे दाखवण्यास जाऊ नका. त्याचा फारसा फायदा होणार नाही. शांत राहा. भागीदारी व्यवसायात पडू नका.

एप्रिल २०१९ – स्थिर अवस्था यायला थोडा वेळ लागेल. पण उशिराने का होईना, स्थिर अवस्था येईल. अतिविचार करू नका. स्वभावात धरसोड वृत्ती ठेवू नका. बुध, रवी अािण शुक्र यांची मदत तुम्हाला मिळणार आहे. शिक्षणात मन लावून अभ्यास करावा लागेल. संततीसाठी थोडा वेळ काढून ठेवा.

मे २०१९ – इतके दिवस ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, ती आता पूर्ण होण्याच्या मार्गावर असेल. गुरू आणि शुक्राचा शुभयोग तुम्हाला लाभ मिळवून देणारा असेल. तुमचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. नवीन वास्तू खरेदी कराल. ज्यांना सासरहून प्रॉपर्टी मिळणार होती अशांना मिळण्याचे योग आहेत.

जून २०१९ – कलाकार लोकांना मोठी संधी आहे. मोठे यश प्राप्त होणारा कालखंड आहे. संधीचे सोने करून घ्या. काहींना वास्तू योग, वाहन योग संभवतात. ज्यांची सरकारी कामे रखडलेली आहेत ती मार्गी लागतील. शनी-रवीचा योग कामात अडथळा आणणारा असला तरी गुरूमुळे निवळणारा आहे. काळजीचे सावट दूर होईल.

जुलै २०१९ – सामाजिक गोष्टींची आवड निर्माण झाली तरी गुप्त शत्रूंकडे लक्ष ठेवावे लागेल. खोटय़ा जाहिरातीला भुलू नका. कोणतीही गोष्ट करताना विचाराने वागा. मित्रमंडळी यांच्याशी जवळीक करताना नवीन मैत्रीला हातमिळवणी करू नका. एखादी व्यक्ती तुम्हाला फसवण्याचा बहाणा करून मैत्रीसाठी पुढे येईल. आर्थिक स्तर वाढेल.

ऑगस्ट २०१९ – तुम्हाला एखादी व्यक्ती मनापासून आवडायला लागेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडाल. राजकारणांतील लोकांनी हातचे राखून वागावे. तुमच्या प्रतिष्ठेला ठेच पोहचणार नाही याची काळजी घ्यावी. काहींना वडिलोपार्जित इस्टेटीचा लाभ होईल.

सप्टेंबर २०१९ – आतापर्यंत तुम्ही धीराने घेतले, पण आता मात्र तुम्ही स्वत: आत्मविश्वासाने आणि धाडसाने, बेधडक काम कराल. संधीचे सोने करून घ्याल. सध्या तुम्हाला सिंह राशीतील रवीची भरपूर साथ मिळणार आहे. आर्थिक लाभ वाढेल. वातावरण आनंदी असेल.

ऑक्टोबर २०१९ – गुरू, मंगळ, बुध यांच्या सहयोगाने बराच काही फायदा होणार आहे. आर्थिकदृष्ट्या उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक लाभ मोठय़ा प्रमाणात होतील. दळणवळण, संदेशवहन अशा व्यवसायांना चालना मिळेल. टूरिस्ट व्यवसायालाही उत्तम ग्रहमान. मनासारख्या घटना घडतील. नातेवाईक तुमच्यावर खूश असतील.

कन्या : उत्तम काळ

नोव्हेंबर २०१८ – गुरू, शनी, शुक्र या ग्रहांची साथ तुम्हाला उत्तम राहील. तुमच्या बोलण्यात गोडवा राहील. आर्थिक आवक चांगली राहील. नवीन कला शिकलेल्यांना फायदा होईल. एखादी अचानक संधी चालून येईल. त्याचा पुरेपूर वापर करून घ्या. अडलेली कामे मार्गी लागतील. गायकांना संधीची सुरुवात होईल. कोणतीही गोष्ट करायची म्हटली तर संधी मिळावी लागते.

डिसेंबर २०१८ – मानसिक शक्ती, उच्च महत्त्वाकांक्षा राहील. जिद्दीने आणि कर्तबगारीने पुढे याल. गुरू, शनी, मंगळ यांचा शुभयोग तुम्हाला मदत करणारा आहे. तुम्ही कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा ठेवणार नाही. तुम्ही तुमच्या जोडीदाराला खूश ठेवण्याचा प्रयत्न कराल.

जानेवारी २०१९ – ज्यांना विवाहाची बोलणी करावयाची आहेत अशांनी बोलणी करायला हरकत नाही; पण विवाह ठरवून न ठेवता लवकर करण्याचा निर्णय घ्या. वाहन नवीन घेण्याचा विचार असेल तर तो पुढे ढकला. ज्यांचे नवीन वाहन आहे अशांनी प्रवास जपून करा.

फेब्रुवारी २०१९ – तुमचा राजकीय कल जास्त असणार आहे. वरिष्ठांबरोबर पटणार नाही. वडीलधाऱ्या व्यक्तीची काळजी घ्या. मंगळ, हर्षल अष्टमात एकत्रित येत आहेत. वीज, मोटार, रेल्वे, अग्नी यांपासून त्रास संभवतो. नोकरी-व्यवसायात थोडा फार चढ-उतार राहील. मन शांत ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. अध्यात्मात रमून जा.

मार्च २०१९ – कलाकार व्यक्तींना मोठे यश मिळवून देणारा कालावधी आहे. मनोरंजनाची आवड राहील. बँकिंगसंदर्भात काही कामे असतील तर लवकर होण्याच्या मार्गावर नसतील. नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने स्थिर अवस्था यायला थोडा वेळ लागेल. घाई करू नका. वरिष्ठांशी मतभेद होतील. कोणताही वाद टोकाला नेऊ नका. समजून घेण्याचा प्रयत्न करा. गुरू या ग्रहाची साथ तुम्हाला मिळेल.

एप्रिल २०१९ – मर्दानी खेळ, यांत्रिकी उद्योगधंदे, तांत्रिक ज्ञान, वैद्यकीय व्यवसाय यांना उत्तम कालावधी राहील. वकिली व्यावसायिकांनासुद्धा ग्रहमान चांगले आहे. हाताखालील नोकर-चाकर यांच्यावर पूर्ण जबाबदारी टाकून राहिलात तर काम वेळेवर पूर्ण होणार नाही. स्वत:हून शत्रुत्व ओढवून घेऊ नका.

मे २०१९ – मागील काही कालावधी थोडा ताण-तणावाचा गेला असला तरी तो आता निवळणारा आहे. कारण गुरू आणि शुक्राची साथ तुम्हाला मिळणार आहे. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. गूढशास्त्र, ज्योतिषी, आर्किटेक्ट, प्रिंटिंग, लोख्ांड अशा व्यवसायांना एक प्रकारची संधीच आहे. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.

जून २०१९ – सरकारी कामांना गती मिळेल. दर्जा आणि मान वाढविण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल. गुरू आणि रवी यांची तुम्हाला साथ मिळेल. स्वभावात उतावळेपणा जाणवेल. तडफ, धैर्य, झुंजार व्यक्तिमत्त्व असण्याची शक्यता. नोकरी-व्यवसायात यश मिळेल.

जुलै २०१९ – दशमातील शुक्र कलाकारांना मोठे यश प्राप्त करून देणारा आहे. काही जणांना कीर्ती-लोकप्रियता मिळेल. वाईट मित्रांच्या संगतीला लागू नका. त्यामुळे नुकसान होऊ शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. स्वभावात शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा.

ऑगस्ट २०१९ – लाभातील रवी, मंगळ तुम्हाला फारसे लाभदायक नसले तरी त्रासदायकसुद्धा नाहीत. अविचाराने वागू नका. तडकाफडकी बोलू नका, म्हणजे तुम्हाला त्रास जाणवणार नाही. एकटय़ा गुरूचे तुम्हाला सहकार्य मिळणार आहे. गाफील राहू नका. चलाखीने वागावे लागेल.

सप्टेंबर २०१९ – व्ययातील शुक्रामुळे तुमचा प्रेमप्रकरणात पाय घसरण्याची शक्यता आहे. मन उदास ठेवून राहू नका. तुम्हाला जे वाटते ते मनमोकळेपणाने बोला. स्वभावात दिलदार वृत्ती राहील.  मानसिकता नीट ठेवा. बरेच काही प्रश्न सुटतील.

ऑक्टोबर २०१९ – बौद्धिकदृष्टय़ा विचार कराल. स्मरणशक्ती चांगली राहील. टीकात्मक दृष्टिकोन बदलावा लागेल. लेखन, वाचन, यांत धरसोड वृत्ती ठेवू नका. बोलण्यात तुम्ही हार मानणार नाही. बुद्धिचातुर्यावर लाभ मिळवाल. आर्थिक लाभ होतील.

तूळ : आर्थिकदृष्टय़ा यशदायक

नोव्हेंबर २०१८ – गुरू, शनी, मंगळ यांचा शुभयोगाचा कालखंड तुम्हाला चांगला अनुभवायला मिळेल. जे काही करणार ते स्वत:च्या हिमतीवर कराल. शत्रूवर मात करणारे ग्रहमान आहे. संधी आली आहे, तयारीला लागा. सध्या लगेच घाई घाईने निर्णय घेऊ नका.

डिसेंबर २०१८ – नवीन प्रकल्प हाती घ्याल. त्यात यशस्वी व्हाल. मोठय़ा लोकांचे सहकार्य लाभेल. कोणतेही काम जिद्दीने पूर्ण करा. सध्या गुरू, मंगळ, शनी या ग्रहांनी तुमची अजूनही साथ सोडली नाही. ताण-तणाव कमी होतील. धनलाभाचे अचानक योग संभवात. त्याचा पुरेपूर वापर करून घ्या. वेळेचे नियोजन करा.

जानेवारी २०१९ – सामाजिक क्षेत्रात पदार्पण करताना घाई करू नका. सध्या तुमच्यावर वरिष्ठांची मर्जी राहणार नाही. त्यामुळे घाई करून चालणार नाही. मोठी भावंडे यांच्याशी वादविवाद होण्याची शक्यता. शांत राहा म्हणजे त्रास होणार नाही. हॉटेल, कॅटरिंग व्यवसायांना आर्थिक लाभाच्या दृष्टीने ग्रहमान चांगले आहे.

फेब्रुवारी २०१९ – ज्यांना नवीन नोकरी करावयाची आहे अशांनी प्रयत्न करायला हरकत नाही. नोकरी मिळण्याचे योग आहेत. कला क्षेत्रातील लोकांना फारसे यश मिळवून देणारा कालखंड नाही. नवीन कला शिकावयाची असल्यास सुरुवात करावी. वाहन व्यवसाय करणाऱ्यांना थोडय़ा अडचणी येण्याची शक्यता आहे.

मार्च २०१९ – चतुर्थातील शुक्रामुळे तुम्हाला चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मोह होईल. काहींना नवीन वास्तूचे योग आहेत. सर्व प्रकारची सुखे भोगण्याचा प्रयत्न कराल.

एप्रिल २०१९ – कलेची आवड निर्माण होईल. मनोरंजनाकडे कल राहील. भाग्यातील मिथुन राशीतील राहूचे भ्रमण तुम्हाला चांगले राहील. जे अधिकार पद मिळवण्यासाठी तुम्ही आतापर्यंत प्रयत्न करीत होता तो आता मिळणार आहे. नोकरी-व्यवसायात भाग्योदय करणारा कालखंड आहे. काही जणांना नोकरीत बढती मिळेल. काहींना सूचक स्वप्ने पडतील. त्याचा खोल विचार करू नका. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका.

मे २०१९ – राजकारणात, समाजकारणात तुमचा ठसा उमटेल. एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून तुम्ही प्रसिद्धीच्या मार्गावर असाल. विरोधक माघार घेतील असे ग्रहमान आहे. त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. गुरू आणि शुक्र या ग्रहांनी तुम्हाला उंचावर नेण्याचा प्रयत्न केला आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढले आहे. अचानक तुमच्या आयुष्याला चांगली कलाटणी मिळणार आहे.

जून २०१९ – तुम्ही तुमच्या स्वकर्तृत्वावर प्रयत्न कराल. त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. गुरू आणि रवी यांचा शुभयोग तुम्हाला लाभदायक ठरणारा आहे. तुम्हाला एखादे अधिकारपद मिळेल. नोकरीत बढती मिळेल. अचानक संपत्ती मिळण्याचे योग आहेत.

जुलै २०१९ – व्यापारात कमिशन काढण्याकडे कल राहील. उद्योगधंद्यात मोठा झोत निर्माण होईल. व्यावसायिक लोकांनी गिऱ्हाईकांशी तोडून बोलू नका. कलाकार लोकांना उत्तम कालावधी आहे. वैवाहिक जीवनाची घडी विस्कळीत होऊ देऊ नका.

ऑगस्ट २०१९ – पोलीस, लष्कर, सैन्यदल इथे काम करणाऱ्यांपैकी काहीजणांना अचानक बढती मिळेल. गुरू आणि रवी शुभयुती तुम्हाला चांगली फळे मिळवून देईल. स्वकर्तृत्वाने पुढे चाला. वरिष्ठांची ऊठबस कराल. कौटुंबिक सौख्याचे ग्रहमान चांगले आहे. घरातील वातावरण खेळीमेळीचे असेल.

सप्टेंबर २०१९ – लाभस्थानातील सिंह राशीचे रवीचे भ्रमण तुम्हाला फार चांगले लाभ मिळवून देईल. आजवर झालेल्या त्रासाचे फळ सध्या तुम्हाला मिळणार आहे. मोठमोठय़ा ओळखीचा फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल. सुंदर कालावधी आहे.

ऑक्टोबर २०१९ – खर्चाचे प्रमाण कमी ठेवा. अचानक पैसे खर्च होतील. जिथे आवश्यक आहे तेवढाच खर्च करा. अनावर खर्च करू नका. भांडण-तंटा या गोष्टींपासून लांब राहा. कर्ज घेण्याच्या भानगडीत पडू नका. दुसऱ्यावर हुकमत गाजवू नका, म्हणजे त्रास कमी होईल.

वृश्चिक : भाग्य उजळेल

नोव्हेंबर २०१८ – शनी, मंगळ, गुरू यांच्या सहकार्याने काही गोष्टींचा त्रास कमी होईल. तुम्ही तुमच्या कामाचे नियोजन करा. म्हणजे त्याचा पुढे जाऊन पुरेपूर वापर करता येईल. व्ययातील रवीकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही. शिळे अन्न खावू नका. दाताची, घशाची काळजी घ्या. मित्र आणि सहकारी यांच्यापासून जरा जपून राहा.

डिसेंबर २०१८ – तुळेतील शुक्रांमुळे तुमचे मनपरिवर्तन होणार आहे. काहीजण वाम मार्गाला जाण्याची शक्यता आहे. स्वभावात हट्टीपणा राहील. विद्यार्थी वर्गाला बऱ्यापैकी यश संपादन होईल. घर, जमीनजुमला, शेतीवाडी यादृष्टीने फायदा होईल. उत्साहाने आणि श्रमाने पैसा मिळवाल. आर्थिक लाभ होतील.

जानेवारी २०१९ – ज्यांना प्रेमविवाह करावयाचा आहे त्यांचा विवाह होईल. परंतु घाईने काही चुकीचे पाऊल उचलू नका. गुरूची साथ राहिल्याने सर्व गोष्टी चांगल्या होणार आहेत. वरिष्ठ तुमच्यावर रागावलेले असतील तर त्यांची मर्जी राखा. काहींना सार्वजनिक काम करायला आवडेल. ज्यांचा बांधकामाच्या संदर्भात व्यवसाय आहे त्यांना कामाचा लोड येईल. त्यामुळे तुमची चिडचिड होईल.

फेब्रुवारी २०१९ – जे काम करावे लागते त्याला जरा पराक्रमाची जोड असेल तर उत्तमच.. असा कालखंड तुमचा आहे. कोणाच्या आधारावर तुम्ही कोणतीही गोष्ट करणार नाही. त्यात तुम्हाला यश मिळेल. गुरू आणि रवी यांची मदत होणार आहे.

मार्च २०१९ – मिथुन राशीतील राहूचे भ्रमण गूढ विद्या ज्योतिषी, संशोधक, डॉक्टर यांना अतिशय उत्तम आहे. ज्यांना याच व्यवसायात करिअर करायचे आहे अशांनी प्रयत्न करा, यश मिळेल.

एप्रिल २०१९ – लेखनाच्या दृष्टीने बुध चांगला राहील. शास्त्रीय व्यासंगाच्या दृष्टीनेही बुध चांगला राहील. कला, संगीत क्षेत्रात यश प्राप्त होईल. विद्यार्थी वर्गाला नवीन शाखेत प्रवेश मिळेल. बुध आणि शुक्र यांचा शुभयोग तुम्हाला चांगला आहे. विवाह ज्यांना करावयाचा आहे त्यांना थोडय़ा अडचणी येतील. थोडा काळ जाऊ द्या. सर्व ठीक होईल.

मे २०१९ – वा! काय ग्रहमान आहे. पंचमातला शुक्र तुम्हाला यशाकडे खेचून नेणारा आहे. तुमची सांपत्तिक स्थिती उत्तम राहील. काही गोष्टी सहज मिळतील. ज्यांचा आर्किटेक्ट, ब्युटिपार्लर, साडी सेंटर, ज्वेलरी हा व्यवसाय आहे त्यांना भरघोस यश  मिळणार आहे.

जून २०१९ – ज्यांना सरकारी क्षेत्रासंदर्भात काम करावयाचे आहे अशांना ग्रहमान उत्तम आहे. प्रयत्न करा यश मिळेल. काहींना सरकारी कॉन्ट्रॅक्ट मिळतील. ज्यांना भागीदारीत व्यवसाय करावयाचा आहे त्यांना हरकत नाही. त्यांचा चांगला प्रतिसाद मिळणारा आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराविषयी अभिमान वाटेल. प्रवासयोग आहेत. पण ते जपून करा.

जुलै २०१९ – घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घ्या. अनावश्यक गोष्टींचा मोह टाळा. धैर्याने आणि धीराने घ्या. सध्या एकटय़ा गुरूची साथ तुम्हाला असणार आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात काळजीपूर्वक करा. हिंमत हरू देऊ नका. कौटुंबिक वातावरण बिघडू देऊ नका. बाकी ग्रहमान बरे राहील.

ऑगस्ट २०१९ – तुमच्या स्वभावातील लहरीपणा बदला. द्विधा मन:स्थिती ठेवून वागू नका. बरीच कामे तुम्हाला उरकायची आहेत. प्रगतीची घोडदौड सुरू होईल. भाग्याच्या दृष्टीने कालखंड चांगला आहे. आयुर्वेदिक, वैद्यकीय, व्यवसायाला पूरक असे वातावरण आहे.

सप्टेंबर २०१९ – दशमातील रवी, शुक्र व्यवसायात प्रगती करतील. उन्नतीचा कालखंड आहे, असा पुन्हा येण्याची वाट बघत बसू नका. ज्यांना नवीन व्यवसायात भांडवल गुंतवायचे आहे त्यांनी विचार करावयास हरकत नाही. धाडसाने प्रयत्न करा. ज्यांना नोकरी मिळत नाही अशांना नोकरी मिळेल. काहींना अधिकारपद मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील.

ऑक्टोबर २०१९ – ज्यांना तांत्रिक शिक्षणाची आवड आहे त्यांना प्रयत्न करावयाला हरकत नाही. सामाजिक क्षेत्रात कार्यतत्पर राहाल. आतापर्यंत गुरूचे सहकार्य तुम्हाला मिळाले आहे. कामाच्या ठिकाणी दगदग होईल. त्याचा राग दुसऱ्यांवर काढू नका.

धनू : अध्यात्माकडे कल

नोव्हेंबर २०१८ – मित्र-मैत्रिणीसोबत वेळ घालवाल. प्रतिष्ठित ओळखीचा फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड निर्माण होईल. कोणाला जामीन राहू नका. कर्जप्रकरणे आता लगेच करण्याची घाई करू नका. गुरू, शनी, मंगळ या शुभ योग बऱ्याच गोष्टींचा त्रास कमी करेल. त्यामुळे बारावा गुरू आहे म्हणून घाबरण्याचे कारण नाही.

डिसेंबर २०१८ – अध्यात्माकडे ओढ राहील. गुरू, शनी, मंगळ यांनी अजूनही तुमची साथ सोडलेली नाही. प्रयत्न करा. तुम्हाला यश नक्की मिळेल. काहींना भावंडांपासून त्रास संभवतो. वादविवादापासून लांब राहा. मुलांच्या शिक्षणांकडे लक्ष द्या.

जानेवारी २०१९ – प्रॉपर्टी आणि घराचे प्रश्न असतील तर मिटतील. नवीन वास्तूचा योग संभवतो. घरातील वडीलधाऱ्या मंडळींबरोबर थोडे पटणार नाही. त्यांचे सहकार्य मिळणार नाही. काही वडीलधाऱ्या मंडळींच्या तब्येतीला त्रास होऊ शकतो. गुरू आणि मंगळ यांची जोड तुम्हाला यांतून बाहेर काढेल.

फेब्रुवारी २०१९ – विद्यार्थी वर्गाने मन लावून अभ्यास करणे गरजेचे. अभ्यासात दुर्लक्ष करून चालणार नाही. पालकांनी मुलांच्या बाबतीत सतर्क राहिले पाहिजे. पंचमातील मंगळाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. खंड पडू शकतो. ज्यांना आध्यात्मिक विद्येत यश मिळवायचे आहे, त्यांना खरंच कालखंड सुरेख आहे.

मार्च २०१९ – गुरू आणि शनी अध्यात्माकडे ओढ लावील. जवळचे नातेवाईक, वडीलधारी मंडळी यांना तुमचे काही म्हणणे तुम्हाला शांततेने पटवून द्यावे लागेल. वरिष्ठांचा रुसवा तसा अजून गेलेला नाही. थोडय़ा कालावधीने कमी होईल.

एप्रिल २००९ – सध्याचा हा कालावधी चांगला जाईल. कलाकार, लेखक, साहित्यिक, पत्रकार यांना वेगवेगळ्या स्थरावर यश प्राप्त होईल. अनेकांशी सुसंवाद घडू शकतो. तुमच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळेल. बुध आणि शुक्र या ग्रहांची ताकद तुम्हाला यशाकडे नेईल. सामाजिक क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी घाई करू नका. तुमची सहनशीलता महत्त्वाची आहे.

मे २०१९ – चतुर्थातील शुक्र तुम्हाला गृहसौख्य मिळवून देईल. वाहन योग संभावतो. घराचे प्रश्न मिटतील. इतके दिवस तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होता ती आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. थोरामोठय़ांचे आशीर्वाद लाभतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.

जून २०१९ – सध्या शनी, मंगळाची कटुता कौटुंबिकदृष्टय़ा त्रासदायक असली तरी गुरू आणि शुक्र यांचा शुभयोग तुम्हाला मदत करेल. विरोधकांचा त्रास कमी होईल. नोकरचाकर यांचे सौख्य लाभेल. नोकरीत भाग्योदय होईल. व्यसनांपासून दूर राहा. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. आहार समतोल ठेवा.

जुलै २०१९ – मुलामुलींच्या वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास त्रास होईल. लक्षपूर्वक राहिले पाहिजे. शिक्षणात बदल घडू शकतात. वरिष्ठांशी मनमोकळेपणाने बोला. त्यातून तुम्हाला काही फायदा होईल. शांततेने सर्व गोष्टी करा. सध्या शनीचे वक्री भ्रमण जैसे थे असेल.

ऑगस्ट २०१९ – कायदा क्षेत्रात यश मिळवून देणारा कालखंड आहे. ज्यांना कायदाविषयक माहिती मिळवायची आहे त्यांनी जरूर प्रयत्न करा. अध्यात्मासाठीसुद्धा ग्रहमान चांगले आहे. काहींची तपश्चर्या फलद्रूप होईल. नवीन व्यवसाय चालू करताना थोडा वेळ द्या.

सप्टेंबर २०१९ – भाग्यातील रवी शुक्रामुळे तुमचे भाग्य उजळणार आहे. ज्यांना कला क्षेत्रात पदार्पण करावयाचे असेल त्यांना चांगले आहे. निरनिराळ्या कला तुम्हाला अवगत होतील. कला क्षेत्रांतील लोकांना यश मिळेल.

ऑक्टोबर २०१९ – धाडस आणि धैर्याने काम कराल. आता वेळ घालवत बसू नका. तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. काहींना नवीन मित्रमैत्रिणी मिळतील. नव्या मैत्रीला उजाळा मिळेल. सामाजिक क्षेत्रात चांगली कामगिरी बजावाल. शुक्र, मंगळ, रवी यांचे पाठबळ चांगले राहील. शैक्षणिक क्षेत्रात यश येईल.

मकर : इच्छापूर्तीचे वर्ष

नोव्हेंबर २०१८ – मागील काही वर्षी खर्चाचे प्रमाण वाढलेले होते. ते आता कमी होईल. मित्र-मैत्रिणी- सहकारी यांची मदत तुम्हाला मिळणार आहे. कलाकार मंडळींना भाग्याचे दिवस येणार. सुखाचा आणि समृद्धीचा काळ येणार आहे. ज्यांना समाजकारणात पदार्पण करावयाचे आहे त्यांनी प्रयत्न करा, अधिकारपद मिळेल.

डिसेंबर २०१८ – अचानक एखादी चांगली बातमी तुमच्या कानावर येईल. राजकारणातील लोकांसाठी छप्पर फाडके ग्रहमान आहे. अजूनही गुरू, शनी, मंगळ या ग्रहांनी तुमची साथ सोडली नाही. कलाकार मंडळींना प्रसिद्धी मिळेल. संततीविषयी प्रश्न मिटेल.

जानेवारी २०१९ – भावंडांचे आणि नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. गुरू आणि मंगळाचा योग काही तरी नवीन गोष्ट श्किवून जाईल. काहींना कायदेशीर बाबींपासून त्रास संभवतो. वरिष्ठांशी वाद घालत बसू नका. एखादे संकट स्वत:हून ओढवून घेऊ नका. जिभेवर, मनावर ताबा ठेवा. शांत राहा. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.

फेब्रुवारी २०१९ – आध्यात्मिक दृष्टीने, पारमार्थिक दृष्टीने ग्रहमान चांगले आहे. काही धार्मिक स्थळांना भेट द्याल. विचार आणि आचार प्रामाणिक ठेवा. व्यापार करणाऱ्यांनी नुकसानीकडे दुर्लक्ष करू नका. वडिलोपार्जित इस्टेट त्रासदायक होऊ शकते. घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा जपून वापर करा. बिघडल्या असतील तर दुरुस्त करा. संततीचे लाड पुरवाल. गुरूची साथ तुम्हाला राहणार आहे.

मार्च २०१९ – तुमच्या व्यक्तिमत्त्वात भर पडेल. काहींना सौंदर्य प्रसाधनाची आवड निर्माण होईल. जागेचे व्यवहार करणाऱ्यांना अचानक लाभ होईल. जमीन जुमला, प्रॉपर्टी यांचे सौख्य लाभेल. गुरू, शुक्र, राहू यांचे सहकार्य मिळणार आहे. छोटे-मोठे प्रवास होतील.

एप्रिल २००९ – शुक्र, मंगळ, बुध, नेपच्युन या ग्रहांची तुम्हाला वैशिष्टय़पूर्ण साथ राहणार आहे. तुम्ही तुमच्या बुद्धीच्या चातुर्यावर यश संपादन कराल. बोलण्यात कोणाला हार मानणार नाहीत. वकिली क्षेत्रात यश मिळेल. कायदेशास्त्र शिकणाऱ्यांना ग्रहमान चांगले आहे. गायन, फोटोग्राफी यांनाही लाभाचे प्रमाण वाढेल.

मे २०१९ – मीनेचा शुक्र, पराक्रमात- तो तुहाला यश प्राप्त करून देईल. हॉटेल, केटरिंग, मिठाई, आर्किटेक्ट, ब्युटीपार्लर या व्यवसायांना भरपूर लाभ होईल. ज्यांना व्यवसाय चालू करावयाचा आहे त्यांना उत्तम कालावधी आहे. गुरू आणि शुक्राचा शुभयोग कीर्ती प्राप्त करून देणारा आहे. विद्यार्थी वर्गाला खेळात सहभागी होण्याची संधी मिळेल.

जून २०१९ – सामाजिक क्षेत्रात पुढे याल. तुमचा दबदबा चांगला राहील. सरकारी क्षेत्रातील कामांना गती मिळेल. ज्यांना अधिकारपद हवे आहे त्यांना यशदायक ग्रहमान आहे. सरकारी नोकरीत काहीजणांना यश मिळेल. विरोधकांचा विरोध मावळेल. गुरू, शुक्र, रवी या तिन्ही ग्रहांचा योग लाभदायक ठरणार आहे.

जुलै २०१९ – भागीदारी व्यवसायाला यश कमी मिळेल. काहींचा गैरसमज होईल. त्यामुळे गैरसमजांपासून दूर राहा. जोडीदाराकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला तुमच्या कुटुंबाला वेळ द्यावा लागेल. कुटुंबातील व्यक्तींशी शांतपणे वागा.

ऑगस्ट २०१९ – षष्ठातील मिथुनेचा राहू तुम्हाला विरोधकांसाठी चांगली फळे देईल. विरोधक माघार घेतील. तुमच्या स्वभावात हट्टीपणा आणि तापटपणा राहील. अतिमहत्त्वाकांक्षीपणा बाजूला ठेवा. अडचणीवर मात करून मार्ग काढाल. सध्या तुम्हाला टोकाचा निर्णय घेऊन चालणार नाही.

सप्टेंबर २०१९ – अष्टमातील शुक्र तुम्हाला अचानकपणे चांगली फळे देईल. सासरवाडीचे सौख्य लाभेल. कमी श्रमात जास्त पैसा मिळेल असा कालखंड आहे. शेअर्स, वारसा हक्क यांचेही लाभ होतील. नवीन व्यवसाय करणाऱ्यांनाही ग्रहमान उत्तम आहे.

ऑक्टोबर २०१९ – ईष्र्या, ताकद, तडफदारी वाढवणारे ग्रहमान आहे. व्यापार, वैद्यकीय व्यवसाय, यांत्रिकीकाम, लष्कर, पोलीसदल इथे काम करणाऱ्यांना लाभ मिळतील. उच्च प्रकारची कार्यशक्ती तुमच्याकडे आहे. त्याचा वापर करून घ्या.

कुंभ : सार्वजनिक क्षेत्रात यश

नोव्हेंबर २०१८ – भाग्योदय करणारे वातावरण राहील. अचानक लाभाच्या दृष्टीने ग्रहमान उत्तम आहे. अचानक संपत्तीचे योग आहेत. कर्तबगारीने तुम्ही तुमचे काम कराल. त्यात तुम्हाला यश प्राप्त होईल. गुरू, शनी, मंगळ यांचे सहकार्य लाभेल. व्यापारी क्षेत्रात यश मिळेल. नोकरीत स्थिर अवस्था प्राप्त होईल.

डिसेंबर २०१८ – परोपकारी वृत्ती राहील. धार्मिक कार्यात भाग घ्याल. धार्मिक क्षेत्रांना भेट द्याल. प्रवास जपून करावेत. राजकीय क्षेत्रात पदार्पण करायला काहींना अधिकार प्राप्त होईल. कला क्षेत्रात सुयश लाभेल. उत्कृष्ट कला अवगत कराल. काहींना नवीन नोकरीची संधी मिळेल. शनी, मंगळ, गुरू यांची मदत मिळेल. ग्रहमान उत्तम.

जानेवारी २०१९ – आर्थिकदृष्ट्या उत्तम. नोकरी-व्यवसायात लाभ होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढल्याने तुम्ही खूश असाल. घरातील कुटुंबासमवेत बाहेर जाण्याचे बेत आखाल. एखाद्या पर्यटनस्थळाला भेट द्याल. विद्यार्थी वर्गाकडे मात्र लक्ष दिले पाहिजे. दुर्लक्ष करू नका.

फेब्रुवारी २०१९ – वाईट गोष्टींचा परिणाम तुम्ही तुमच्या मनावर लगेच करून घेऊ नका. भांवंडाच्या संदर्भात काळजी निर्माण होईल. संयमाने राहा. बौद्धिकदृष्टय़ा विचारात राहाल. तुम्ही तुमची कला दुसऱ्यांना शिकवण्यास वेळ घालवू नका. मित्रमंडळी यांच्याशी दुरावा येऊ शकतो. गैरसमज वेळेवर दूर करा.

मार्च २०१९ – स्वभावात आळशीपणा निर्माण होईल तो झटकून कामाला लागा. खर्चीकपणा वाढेल. एखाद्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करीत असाल त्यात वेळ घालवू नका, त्रास होईल. जबाबदारीने वागा. कष्टाला कमी न पडता मेहनतीवर विश्वास ठेवा. आपली मते दुसऱ्यावर लादू नका. मिथुनेतला राहू पंचमात असल्याने गर्भवती स्त्रियांनी काळजी घ्यावी. आरोग्याची काळजी घ्या.

एप्रिल २०१९ – तुमच्यावर एक कौटुंबिक जबाबदारी येणार आहे. ती तुम्हाला चांगल्या रीतीने पार पाडावी लागेल. घरातील वातावरण तप्त ठेवू नका. चलाखीने कामे करावी लागतील. आर्थिकदृष्टय़ा  ग्रहमान चांगले आहे. काहीजण स्वप्न राज्यात रमून जातील. तुमच्या कामाचा वेग वाढवा. नवीन जागा घ्यावयाची असेल विचार करावा.

मे २०१९ – तुमच्या खाण्यात, बोलण्यात गोडवा राहील. गोड बोलून तुम्ही तुमचे कार्य सफल कराल. त्यात तुम्हाला यश मिळेल. धन स्थानातील मीन राशीतील शुक्र तुम्हाला पैसे मिळवून देईल. मिठाई, हॉटेलिंग, केटरिंग, ज्वेलरी यांना चांगला फायदा होईल. मेष राशीतील रवी तुम्हाला धाडसाने सर्व गोष्टी करायला लावेल. ग्रहमान उत्तम आहे.

जून २०१९ – काहींना नवीन वाहन योग संभवतो. नोकरी-व्यवसायात यश प्राप्त करून देणारा कालखंड आहे. नोकरीत वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. त्यामुळे कामावरील उत्साह वाढेल. व्यापारी लोकांनासुद्धा ग्रहमान चांगले आहे. संततीच्या शिक्षणात खंड पडू देऊ नका. काहींना शिक्षणात अडथळे येऊ शकतात.

जुलै २०१९ – तुम्ही तुमच्या बुद्धीचा दिमाग दाखवण्याचा प्रयत्न कराल. त्यात तुम्हाला थोडासा त्रास होईल. तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कलेची आवड निर्माण होईल. सुरुवातीला अडथळा जाणवेल. मनोरंजनाची आवड निर्माण होईल. आरोग्याची काळजी घ्या.

ऑगस्ट २०१९ – गुरूची मदत तुम्हाला मिळणार आहे. ज्यांना नवीन नोकरी करायची आहे. त्यांनी प्रयत्न करा यश मिळेल. काहींना नोकरीत पद चांगले मिळेल. व्यवसायिक लोकांनाही ग्रहमान चांगले आहे. तुमचा व्यवसाय वाढवण्याकडे कल आहे, गडबड करू नका.

सप्टेंबर २०१९ – तुम्ही तुमच्या जोडीदाराची कामात मदत मिळाल्याने खूश असाल. ज्यांना नवीन भागीदारी करावयाची आहे त्यांनी करावयास हरकत नाही. भागीदारी व्यवसायात यश लाभेल. धरसोड वृत्ती ठेवू नका. ठाम निर्णयाने वागा.

ऑक्टोबर २०१९ – लिखाण आणि वाचनाची आवड निर्माण होईल. बौद्धिकदृष्टय़ा ग्रहमान उत्तम आहे. नवीन योजना राबवाल. अष्टमातील मंगळाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घ्या. प्रवास जपून करावेत. भाग्यातील शुक्राची साथ मिळेल.

मीन : भाग्योदय करणारे वर्ष

नोव्हेंबर २०१८ – गुरू, शुक्र हा योग तुमचे भाग्य उजळून टाकणारा आहे. कमी श्रमात पैसा मिळवून देणारे ग्रहमान आहे. लिखाण, वाङ्मय यांची आवड निर्माण होईल. काहींना संतती सौख्य लाभेल. आरोग्य चांगले राहील. वैवाहिक जीवनात सुखदायक घटना घडतील. कौटुंबिक सौख्य चांगले राहील. त्रास कमी होईल.

डिसेंबर २०१८ – थोरामोठय़ांचे आशीर्वाद मिळतील. सामाजिक स्तरावर काम करण्यास वाव मिळेल. जनसंपर्क चांगला राहील. गुरू, शनी, मंगळ या ग्रहांचे सहकार्य लाभेल. काहींना शेअर मार्केटमध्ये फायदा होईल. बोलण्याचे व्यवसाय ज्यांचे आहेत त्यांना यश मिळेल. ज्यांना ग्रंथ प्रकाशन करावयाचे आहे त्यांनी प्रयत्न करा.

जानेवारी २०१९ – नोकरी- व्यवसायात वरिष्ठांना तुमच्या काही गोष्टी पटणार नाहीत. व्यापारात कमिशन मिळवण्याच्या नादात नुकसान करून घेऊ नका. विचाराने पाऊल टाका, म्हणजे नुकसान होणार नाही. सध्या गाफील राहून चालणार नाही. सतर्कता ठेवा. प्रॉपर्टी आणि दलाली व्यवसाय करताना काळजी घ्यावी.

फेब्रुवारी २०१९ – भागीदारी व्यवसायात अपयश. स्वतंत्र व्यवसाय करा. त्यात तुम्हाला यश मिळेल. पण एखादी गोष्ट करावयाची म्हटली की, तुम्ही ती करताच. भले त्यात नुकसान होऊ द्या. त्याचा विचार तुम्ही करीत नाही. बोलण्याच्या भरात अंगावर एखादी जबाबदारी घेऊन बसाल. ती निभावता निभावता नाकीनऊ येतील. काहींना डोळ्यांच्या समस्या भेडसावतील. काळजी घ्या, म्हणजे त्रास होणार नाही.

मार्च २०१९ – मित्र-मैत्रिणी यांचे सहकार्य मिळेल. लाभातील शुक्र तुम्हाला लाभ मिळवून देणारा आहे. काहींना मैत्री या नात्यातूनसुद्धा लाभ होऊ शकतो. त्यात गुरूचीही भर पडणार आहे, म्हणजे आणखी लाभदायक होणार. कलाकारांना ग्रहमान उत्तम आहे.

एप्रिल २०१९ – स्वत:च्या हिमतीवर तुम्ही काम कराल. आत्मविश्वास वाढवणारे ग्रहमान आहे. सामाजिक आणि मानसिक कणखरपणा चांगला राहील. वैचारिक आणि बौद्धिक राहाल. भावंडांशी मिळते-जुळते घ्या. वादविवादांपासून लांब राहा. वैद्यकीय आणि केमिस्ट व्यवसायाला पूरक वातावरण. प्रवास जपून करावेत.

मे २०१९ – विवाहाच्या दृष्टीने ग्रहमान उत्तम आहे. ज्यांचा विवाह होत नव्हता त्यांना संधी आली आहे. प्रयत्न करा. मीनेचा शुक्र आणि वृश्चिकेचा गुरू दोन्ही शुभयोगात आहेत. वैवाहिक सौख्य चांगले राहील. आरोग्याच्या समस्या दूर होतील. तुमची कामे मार्गी लागतील.

जून २०१९ – शिक्षणात प्रगती होईल. ज्यांचे शिक्षण अर्धवट राहिलेले आहे त्यांनी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. एखाद्या जाहिरातीवर विश्वास ठेवून भुलू नका. भावंडं, नातेवाईक यांच्यासमवेत वेळ घालवाल. त्यांच्याबरोबर एखादी ट्रिप काढाल. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हाल. दृढनिश्चयाने राहा.

जुलै २०१९ – तांत्रिक ज्ञान अवगत करण्याच्या दृष्टीने कालखंड चांगला आहे. नोकरी-व्यवसायात अडचणी निर्माण होतील. संततीविषयी चिंता राहील. ज्यांनी संततीचा विचार केला आहे त्यांनी थोडा वेळ जाऊ द्या, मग विचार  करा. गुरू आणि मंगळाचा योग शुभयोग देणारा आहे. घरातील वातावरण चांगले असेल.

ऑगस्ट २०१९ –  बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. गुरू आणि रवी यांचा योग तुम्हाला उंच नेणारा आहे. त्या संधीचा उपयोग करून घ्या. यश मिळेल. परंतु शनी, रवी षडाष्टक योग पितृचिंता दाखवतो. कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या.

सप्टेंबर २०१९ – ऐषारामात राहण्याकडे कल राहील. नोकरचाकर सुस्वभावी मिळतील. आजोळच्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. नमते घेणे तुम्हाला माहीत नसते. त्यामुळे बऱ्याच वेळा नुकसान होते. दुसऱ्याला शब्द देताना काळजी घ्या. खर्चीक वृत्ती राहील.

ऑक्टोबर २०१९- अनपेक्षित लाभ होतील. भाग्यातील गुरूचे भ्रमण अतिशय चांगले गेले. अतिविचाराने वागू नका. जोडीदाराला समजून घ्या. त्यामुळे त्रास कमी होईल. भागीदारी करू नका. सध्या भागीदारीस यशदायक वातावरण नाही. स्वतंत्र व्यवसाय करा.