Diwali 2023 Recipes : दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. घरामध्ये आता दिवाळीचा फराळ तयार करत आहे. चिवडा- लाडू- शंकर पाळ्या – चकली अशा पदार्थांचा घमघमाट घरात दरवळत असेल. तुम्हालाही जर दिवाळीचा फराळ खायला आणि बनवायला आवडत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊ आलो आहोत. यंदाच्या दिवाळीमध्ये तुम्ही विकतच्यासारखी बाकरवडी घरीच तयार करू शकता.

बाकरवडी करण्याची पारंपारिक पद्धत थोडी वेगळी आहे. अनेकांना पारंपारिक पद्धतीने तयार केलेली बाकरवडी आवडते. तर अनेकांना ही विकत मिळणारी कडक, कुरकुरीत अशी आंबट-गोडच -तिखट अशी एकत्र चव असलेली बाकरवडी प्रचंड आवडते. म्हणूनच तुमच्या आवडीच्या बाकरवडीची रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही रेसिपी बनवायला अत्यंत सोपी आहे. चल तर मग जाणून घेऊ या बाकरवडीची रेसिपी

bhakri
भाकरी थापताना नेहमी मोडते, भाजताना चिरते का? टेन्शन घेऊ नका; टम्म फुगलेली मऊसूत ज्वारीची भाकरी बनवा, फक्त या सोप्या टिप्स वापरून पाहा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Boondi curry recipe in Marathi how to make Boondi curry recipe
रोज काय भाजी करावी सुचत नाही? घरात असलेल्या बुंदीची करा “बूंदी करी”; झक्कास होईल बेत
Tawa Prawn Masala Recipe In Marathi)
नॉनव्हेज प्रेमींसाठी खास ‘झणझणीत तवा प्रॉन्स मसाला’ रेसिपी, रविवारी बेत कराच…
Fried Modak Recipe
Modak Recipe : माघी गणेश जयंतीला फक्त १ वाटी गव्हाच्या पिठाचे बनवा कुरकुरीत ‘मोदक’; रेसिपी वाचा पटकन
nutrition , students, twelve recipes , recipes ,
विद्यार्थ्यांसाठीच्या पोषण आहारात बदल; आता बारा पाककृती निश्चित
Khandeshi Shev Bhaji Recipe In Marathi
अस्सल झणझणीत खानदेशी शेव भाजी, रेसिपी वाचून तोंडाला सुटेल पाणी
Masale Bhaat Recipe
Masale Bhaat Recipe : घरीच बनवा लग्नसमारंभात बनवला जाणारा मसाले भात, अगदी सोपी आहे रेसिपी, पाहा VIDEO

अर्धा किलो बाकरवडीसाठी लागणारे साहित्य –

बाकरवडीकरिता पीठ तयार करण्यासाठी साहित्य

मैदा – २५० ग्रॅम (एक ते दीड कप)
बेसन – २५ ग्रॅम (पाव कप)
तेल – ४० ग्रॅम ( ३ ते चार टेबलस्पून)
ओवा – १ ते २ टेबलस्पून
मीठ – चवीनुसार

हेही वाचा- दिवाळीसाठी १/२ किलो तांदुळापासून बनवा जाळीदार अनारसे; तांदूळ भिजवण्यापासून तळण्यापर्यंतची सोपी रेसिपी

बाकरवडीसाठी पीठाची कृती
एका परातीत वर दिलेल्या प्रमाणानुसार मैदा, बेसन, तेल, ओवा आणि मिठ टाकून घट्ट मळून घ्या. तयार पीठ थोडा वेळ झाकून ठेवा.

बाकरवडीचा मसाला साहित्य
जिरे – २५ ग्रॅम (२ टेबलस्पून)
धने -१० ग्रॅम (२ टेबलस्पून)
बडीशेप -१५ ग्रॅम (३ टेबलस्पून)
तीळ – २० ग्रॅम (३ टेबलस्पून)
किसलेल सुक खोबरे – ४० ग्रॅम (दीड कप)
साखर -३५ ग्रॅम (३ ते ४ टेबलस्पून)
लाल तिखट – ~ १५ ग्रॅम (२ टेबलस्पून)
गरम मसाला – २० ग्रॅम (२ टेबलस्पून)
आमचुर – १० ग्रॅम (१ ते दीड टेबलस्पून)
हळद – चिमुटभर
हिंग – चिमुटभर
मीठ – चवीनुसार

जिभेवर ठेवताच विरघळणारी “खुसखुशीत करंजी”; दिवाळीच्या फराळाला परेफेक्ट रेसिपी

चिंच गुळाची चटणीसाठी
चिंच – २० ग्रॅम (२ टेबलस्पून)
गुळ – २० ग्रॅम (२ टेबलस्पून)
मिठ – चवीनुसार

बाकरवडीचा मसाला तयार करण्याची कृती
एक कढईत जिरे, झने, बडीशेप, तीळ, किसलेले सुके खोबरे व्यवस्थित भाजून घ्या. सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्या. त्यातच साखर. लाल तिखट, गरम मसाला, आमचूर, मीठ आणि हिंग टाकून मसाला मिक्स करून घ्या.

Diwali Special Recipe : दिवाळीनिमित्त बनवा पाकातली कुरकरीत, खमंग चंपाकळी; जाणून घ्या सोपी रेसिपी

बाकरवडी तयार करण्याची पद्धत

मळलेल्या पिठाच्या गोळी करुन मोठी पाती लाटून घ्या. त्यानंतर त्यावर चिंच गुळाची चटणी सर्वत्र पसरवून लावा. त्यावर तयार बाकरवडीचा मसाला पसरवा. त्यानंतर हलक्या हाताने त्यावर लाटणे फिरवा. त्यानंतर पातीची गोल गोल वळकुटी करा म्हणजेच गोल गुंडाळा. त्यानंतर तयार वळकुटीटे बारीक काप करून घ्या. गरम गरम तेलामध्ये ते तळून घ्या. विकत मिळते तशी कुरकुरीत बाकरवडी तयार आहे.

Story img Loader