मेष : प्रगतीसाठी संधी
नोव्हेंबर २०१४ : १६ नोव्हेंबपर्यंत तुळेचा सूर्य अनुकूल राहील. नोकरीत जबाबदारीची कामे सांभाळावी लागतील. नवीन आव्हाने स्वीकारून ती यशस्वी करून दाखवाल. महिलांना गृहव्यवस्थापनेत यश मिळेल. अनपेक्षित लाभ होतील.
डिसेंबर २०१४ : बुध, शुक्र अनुकूल आहेत. व्यवहार चातुर्य दाखवाल. बचतीकडे अधिक लक्ष द्याल. अनावश्यक खर्च टाळण्यात यशस्वी व्हाल. संघर्ष व वादविवादापासून दूर रहाल. प्रवास कार्यसाधक होतील. आरोग्यातही सुधारणा होईल.
जानेवारी २०१५ : १४ जानेवारीनंतर मकरेचा कर्मस्थानातील सूर्य अनुकूल होईल. मंगळ, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. नोकरीत बढतीचे योग येतील, नवीन ओळखी होतील. आरोग्यात सुधारणा होईल. स्पर्धा-पैजा जिंकू शकाल.
फेब्रुवारी २०१५ : सूर्य, मंगळ, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. वेळेचा छान उपयोग कराल. बचतीकडे लक्ष घाला. आरोग्य छान राहील. विद्यार्थ्यांना अध्ययनात उज्ज्वल यश मिळेल.
मार्च २०१५ : १४ मार्चपर्यंत कुंभेचा सूर्य अनुकूल राहील. अर्थप्राप्तीत वाढ होईल. बुध, शुक्र शुभयोगात आहेत. उद्योग व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्याल. नवीन ओळखी होतील. कलावंतांना मानसन्मान प्राप्त होतील.
एप्रिल २०१५ : ४ एप्रिलचे चंद्रग्रहण शुभ फल देणारे आहे. अनपेक्षित लाभदायक घटना घडतील. बुध, शुक्र प्रसन्न आहेत. उद्योग व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्याल. कोर्ट कचेरीची कामे मार्गी लागतील. शरीरस्वास्थ्य मिळेल.
मे २०१५ : बुध, शुक्र अनुकूल आहेत. आर्थिक येणे वसूल होईल. मनासारखा हौसेमौजेसाठी खर्च कराल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारून त्या यशस्वी करून दाखवाल. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील, प्रवास घडेल.
जून २०१५ : १५ जूनपासून मिथुनेचा सूर्य शुभयोगात येईल. सर्व रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. मंगळ-शुक्र अनुकूल आहेत. अर्थप्राप्ती होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. गृहसौख्य मिळेल. आरोग्य ठीक राहील.
जुलै २०१५ : १६ जुलैपर्यंत मिथुनेचा सूर्य पराक्रमस्थानी शुभयोगात राहील. गुरू अनुकूल झाल्याने परिस्थितीत अनुकूल बदल होईल. मुलांच्या प्रगतीच्या आनंदवार्ता समजतील. आर्थिक येणे वसूल होईल.
ऑगस्ट २०१५ : ग्रहमान छान आहे. बुध, गुरू व शुक्र तुमची स्वप्ने साकार करतील. प्रगतीसाठी संधी मिळेल. बेकार असल्यास कामे िंमळतील. कलावंतांना मानसन्मान प्राप्त होतील. आरोग्य छान राहील.
सप्टेंबर २०१५ : १७ सप्टेंबरपासून कन्येचा सूर्य अनुकूल होईल. बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. आर्थिक येणे वसूल होईल. इतरांचे देणे फेडू शकाल. आरोग्य छान राहील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील.
ऑक्टोबर २०१५ : सूर्य, बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. प्रत्येक कामात यश मिळेल. इतरांची शाबासकी मिळवाल, आनंददायक घटना घडतील. जमीन खरेदी-विक्री व्यवहारात लाभ होतील. आरोग्यात सुधारणा होईल.
नोव्हेंबर २०१५ : १६ नोव्हेंबपर्यंत तुळेचा सूर्य शुभयोगात राहील. मंगळ, बुध व गुरू शुभयोगात आहेत. कार्यक्षमता वाढेल. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. आरोग्य छान राहील. कामात उत्साह राहील.
ज्याची स्वत:वर सत्ता असते तोच खरा सत्ताधीश असतो. तुम्ही प्रत्येक काम अगदी मनापासून करता. स्वत:च्या कार्यक्षमतेवर तुमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच तुम्ही इथपर्यंत यश मिळविले आहे. नूतन वर्ष प्रगतीचे जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वृषभ : मेहनतीस न्याय
नोव्हेंबर २०१४ : तुळेचा शनी २ नोव्हेंबपर्यंत अनुकूल राहील. सूर्य, बुध शुभयोगात आहेत. कर्तव्यपूर्तीचे समाधान लाभेल. हातून सत्कृत्ये घडतील. मन:स्वास्थ्य मिळेल. आरोग्य छान राहील. सुसंवाद साधून कामे कराल.
डिसेंबर २०१४ : १६ डिसेंबपर्यंत वृश्चिकेचा सूर्य अनुकूल राहील. कामे मार्गी लागतील. बुध-शुक्र अनुकूल आहेत. प्रसंगावधान दाखवाल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारून त्या यशस्वी करून दाखवाल. कार्यतत्परता दाखवाल.
जानेवारी २०१५ : या महिन्यांत खर्च खूप होईल. ग्रहमानाची मदत मिळणार नाही. मन:स्थितीमुळे निर्णय घेणे कठीण जाईल. संयम, सावधानता आणि सहनशीलता ठेवून वागावे लागेल. मन:स्वास्थ्यास जपावे.
फेब्रुवारी २०१५ : १३ फेब्रुवारीनंतर कुंभेचा सूर्य मदत करील. मंगळ, शुक्र शुभयोगात आहेत. आपले निर्णय अगदी योग्य असतील. परिस्थितीत सुधारणा होईल. योग्य कृती कराल. अर्थप्राप्ती चांगली होईल.
मार्च २०१५ : कुंभ-मीनेचा सूर्य, मीनेचा मंगळ शुभयोगात आहेत. तुमचे अंदाज खरे ठरतील. आर्थिक लाभ होतील. राजकारणातील डावपेच यशस्वी होतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. आरोग्य ठीक राहील.
एप्रिल २०१५ : ४ एप्रिलचे चंद्रग्रहण मिश्र फळ देणारे आहे. महत्त्वाची कामे १४ एप्रिलपर्यंत करून घ्या. मीनेचा सूर्य अनुकूल राहील. कामे मार्गी लागतील. सुसंवाद साधाल. नोकरीत बढतीचे योग येतील. आरोग्य सुधारेल.
मे २०१५ : ग्रहमान प्रतिकूल राहील. शुक्र मदत करील. कामात वाढ होईल. आरोग्यावर ताण पडेल. मन:स्वास्थ्यास जपावे लागेल. प्रलोभनांपासून दूर रहावे. तडजोडीचे धोरण ठेवावे. नम्रपणे वागावे.
जून २०१५ : अजूनही ग्रहमानात विशेष सुधारणा नाही. प्रयत्नात सातत्य ठेवावे लागेल. मेहनतीत वाढ करावी लागेल. निर्णय घेणे काहीसे कठीण जाईल. धोकादायक गुंतवणूक टाळावी. कामाचा ताण वाढेल.
जुलै २०१५ : १६ जुलैपासून कर्केचा सूर्य अनुकूल होईल. तुमची कार्यक्षमता वाढेल. कठीण प्रश्नांची उत्तरे मिळतील. उद्योग-व्यवसायात योग्य निर्णय घ्याल. विरोधक माघार घेतील. प्रगतीचा वेग वाढवू शकाल.
ऑगस्ट २०१५ : कर्केचा सूर्य १७ ऑगस्टपर्यंत अनुकूल राहील. तोपर्यंत महत्त्वाची कामे करून घ्या. ती यशस्वी होतील. मंगळ, बुध, व शुक्र प्रसन्न आहेत. आनंददायक घटना घडतील. मोबल वाढेल. लाभ होतील.
सप्टेंबर २०१५ : मंगळ, बुध व शुक्र अनुकूल आहेत. नोकरी-व्यवसायात छान प्रगती होईल. आर्थिक प्रश्न सुटतील. परिस्थितीत सुधारणा होईल. प्रवास कार्यसाधक होतील. कर्तृत्व दाखविण्याची संधी प्राप्त होईल.
ऑक्टोबर २०१५ : १० ऑक्टोबरपासून तुळेचा सूर्य अनुकूल राहील. बुध, शुक्र शुभयोगात आहेत. घरात प्रसन्नता राहील. प्रियजनांच्या भेटीगाठी होतील. विरोधक माघार घेतील. अडथळे दूर होतील. आरोग्य ठीक राहील.
नोव्हेंबर २०१५ : सूर्य-बुध व शुक्र शुभयोगात आहेत. देवाची मर्जी राहील. स्वप्ने साकार होतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. प्रवास कार्यसाधक होतील. महिलांना गृहसौख्य मिळेल. घरगुती प्रश्न सुटतील.
स्वत:च्या मेहनतीवर तुमचा पूर्ण विश्वास आहे. त्यामध्ये तुम्ही कुठेही कमी पडत नाही. तुम्ही प्रत्येक काम जीव ओतून करीत असता. संयमाने वागून इतरांची मने जिंकून घेत असता. या वर्षी मेहनतीस न्याय मिळालेला दिसून येईल.
मिथुन : पूर्वार्ध चांगला
नोव्हेंबर २०१४ : परिस्थितीत अनुकूल बदल होतील. वृश्चिकेचा शनी २ नोव्हेंबरपासून अनुकूल होईल. रेंगाळलेले प्रश्न सुटतील. १६ नोव्हेंबरपासून वृश्चिकेचा सूर्य अनुकूल होईल. ताणतणाव दूर होतील. मन:स्वास्थ्य मिळेल. कार्यक्षमता वाढेल.
डिसेंबर २०१४ : दैवाची मर्जी राहील. योग्य निर्णय घ्याल. योग्य कृती कराल. आर्थिक लाभ होतील. कर्केचा गुरू आणि वृश्चिकेचा शनी अनुकूल आहे. कल्पकता दाखवाल. योग्य कृती कराल. आरोग्य ठीक राहील. उत्साह वाढेल.
जानेवारी २०१५ : महत्त्वाची कामे १४ जानेवारी पूूर्वी करा. धनुचा सूर्य अनुकूल राहील. बुध, गुरू, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. आर्थिक येणे वसूल होईल. आनंदवार्ता समजतील. मानसन्मान प्राप्त होतील. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील.
फेब्रुवारी २०१५ : बुध, गुरू, शुक्र व शनी अनुकूल आहेत. कामे मार्गी लागतील. जमीन, घर खरेदी-विक्री व्यवहारात लाभ होतील. सुसंवाद साधून कामे कराल. संघर्ष टाळण्यात यशस्वी व्हाल. आरोग्यात छान सुधारणा होईल.
मार्च २०१५ : १४ मार्चपासून मीनेचा सूर्य कर्मस्थानी शुभयोगात येईल. कार्यक्षमता वाढेल. आर्थिक देणे वसूल होईल. गुंतवणुकीवर लाभ होतील. बुध, गुरू, शुक्र व शनी प्रसन्न आहेत. आरोग्यात सुधारणा होईल. मनोबल वाढेल.
एप्रिल २०१५ : ४ एप्रिलचे चंद्रग्रहण जरी प्रतिकूल असले तरी इतर ग्रहमान अनुकूल आहे. सूर्य, मंगळ, बुध, गुरू, शुक्र व शनी प्रसन्न आहेत. अर्थप्राप्ती होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. व्यवहारी रहाल. बचत कराल, अध्ययनात यश मिळेल.
मे २०१५ : १५ मेपर्यंत मेषेचा सूर्य अनुकूल राहील. आर्थिक लाभ होतील. मंगळ, गुरू व शनी शुभयोगात आहेत. योग्य निर्णय घ्याल. योग्य कृती कराल. अधिकारांचा योग्य उपयोग कराल. प्रवास कार्यसाधक होतील.
जून २०१५ : गुरू, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. सर्व कामे मनाजोगी होतील. आर्थिक येणे वसूल होईल. प्रिय घटना घडतील. प्रवास आनंददायी होतील. आर्थिक गुंतवणुकीवर लाभ होतील. आपले अंदाज खरे ठरतील.
जुलै २०१५ : कर्केचा गुरू १४ जुलैपर्यंत अनुकूल राहील. महत्त्वाची कामे तोपर्यंत करून घ्या. ती यशस्वी होतील. पूर्वीच्या चुका दुरूस्त करता येतील. शनी तुमचे मनोबल वाढवील. आरोग्यात छान सुधारणा होईल.
ऑगस्ट २०१५ : १७ ऑगस्टपासून सिंहेचा सूर्य अनुकूल राहील. पूर्वीच्या चुका दुरूस्त कराल. व्यवहारात लाभ होतील. सामंजस्य दाखवून प्रश्न सोडवाल. कलावंत, साहित्यिक, क्रीडापटू यांना मानसन्मान प्राप्त होतील.
सप्टेंबर २०१५ : सिंहेचा सूर्य १७ सप्टेंबपर्यंत अनुकूल राहील. मंगळ, बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. वेळेचा व संधीचा योग्य उपयोग करून घ्याल. महत्त्वाकांक्षी स्वभाव स्वस्थ बसू देणार नाही. मोठय़ा यशासाठी प्रयत्न कराल.
ऑक्टोबर २०१५ : ग्रहमान उत्तम आहे. तुमची स्वप्ने साकार होतील. नवीन आश्वासने स्वीकाराल. ती यशस्वी कराल. प्रसंगावधान दाखवाल. मनोबल वाढेल, कर्तव्यपूर्तीचे समाधान लाभेल. आरोग्य छान राहील.
नोव्हेंबर २०१५ : १६ नोव्हेंबरपासून वृश्चिकेचा सूर्य अनुकूल होईल. कामे मार्गी लागतील. व्यवहार कौशल्य दाखवाल. बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. अनपेक्षित लाभ होतील. प्रिय घटना घडतील. उत्साह राहील.
जीवन हे ध्येयामुळेच अर्थपूर्ण बदलत असते. तुम्ही प्रथम ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करीत असता. कोणतेही काम लक्ष देऊन केले की लक्ष्य गाठणे सुलभ जाते. तुम्हालाही हे चांगले माहीत आहे. नूतन वर्षी पूर्वार्धात अनुकूल घटना याच्या साक्षीदार असतील.
कर्क : दैवाची मर्जी
नोव्हेंबर २०१४ : मंगळ, बुध, शुक्र शुभयोगात आहेत. स्पर्धा, पैजा जिंकू शकाल. इतरांचे सहकार्य मिळेल. दिलेला शब्द पाळाल. कर्तव्यपूर्ती कराल. समाधान वाटेल. आर्थिक प्रश्न सुटतील. आरोग्य ठीक राहील.
डिसेंबर २०१४ : १६ डिसेंबरपासून धनूचा सूर्य अनुकूल राहील. परिस्थितीत चांगला बदल होईल. तुमची स्वप्ने साकार होतील. नवीन ओळखी होतील. राहत्या घरासंबंधीचे प्रश्न सुटतील. आनंद वार्ता समजतील.
जानेवारी २०१५ : सूर्य, बुध, शनी अनुकूल आहेत. प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हाल. आर्थिक प्रश्न सुटतील. इतरांचे देणे फेडाल. नोकरीत बढतीचे योग येतील. तुमच्या कामाचे कौतुक होईल. अंदाज खरे ठरतील.
फेब्रुवारी २०१५ : मकरेचा सूर्य १३ फेब्रुवारीपर्यंत अनुकूल राहील. महत्त्वाची कामे तोपर्यंत करून घ्या. ती यशस्वी होतील. कुंभ-मीनेचा शुक्रही शुभयोगात आहे. अर्थप्राप्ती झाली तरी खर्च खूप होईल. शरीरस्वास्थ्य राहील.
मार्च २०१५ : ग्रहमानाची मदत मिळणार नाही. मेहनतीवरच भर द्यावा लागेल. प्रयत्नात सातत्य ठेवावे लागेल. संयम, सावधानता आणि सहनशीलता ठेवावी लागेल. वेळेचा व संधीचा योग्य उपयोग करावा लागेल.
एप्रिल २०१५ : ४ एप्रिलचे चंद्रग्रहण शुभ फळ देणारे आहे. त्यामुळे परिस्थितीत थोडा अनुकूल बदल होईल. १४ एप्रिलपासून मेषेचा सूर्य अनुकूल होईल. अर्थप्राप्ती होईल. खर्च मनासारखा करू शकाल.
मे २०१५ : ग्रहमानात अनुकूल बदल होईल. परिस्थितीत सुधारणा होईल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. सूर्य, मंगळ, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. आर्थिक लाभ होतील. आरोग्यात सुधारणा होईल. यश मिळेल.
जून २०१५ : वृषभेचा सूर्य १५ जूनपर्यंत अनुकूल राहील. महत्त्वाची कामे तोपर्यंत करून घ्या. ती यशस्वी होतील. नवीन कार्यक्षेत्राशी परिचय होईल. उद्योग-व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्याल. शरीरस्वास्थ्य मन:स्वास्थ्य राहील.
जुलै २०१५ : मागील काही दिवस ताण-तणावाचे गेले. आता परिस्थितीत सुधारणा होईल. १४ जुलैपासून सिंहेचा गुरू धनस्थानी येईल. तो प्रगती घडवील. अर्थप्राप्ती होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. यशस्वी व्हाल.
ऑगस्ट २०१५ : सिंहेचा गुरू अनपेक्षित लाभ घडवील. मोठय़ा लोकांच्या भेटीगाठी होतील. आनंदवार्ता समजतील. प्रवास कार्यसाधक होतील. कल्पकता दाखवून कामे कराल. बचतीकडे अधिक लक्ष द्याल. आरोग्य ठीक राहील.
सप्टेंबर २०१५ : १७ सप्टेंबरपासून कन्येचा सूर्य शुभयोगात येईल. सर्व प्रश्न सुटतील. जमीन खरेदी-विक्री व्यवहारात लाभ होतील. नवीन आव्हाने स्वीकारून ती यशस्वी करून दाखवाल. आरोग्यात सुधारणा होईल.
ऑक्टोबर २०१५ : १७ ऑक्टोबपर्यंत कन्येचा सूर्य अनुकूल राहील. बुध, गुरू, शुक्र प्रसन्न राहतील. ग्रहमान उत्तम आहे. प्रगतीसाठी संधी प्राप्त होईल. मनावरचा ताणतणाव दूर होईल. शरीरस्वास्थ्य राहील.
नोव्हेंबर २०१५ : दैवाची मर्जी राहील. मंगळ, बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. व्यवसाय-उद्योगात नवीन संधी प्राप्त होईल. पूर्वीच्या चुका सुधारू शकाल. आरोग्यात छान सुधारणा होईल. अध्ययन ठीक चालेल.
जो कर्तव्यावर निष्ठा ठेवून कार्य करतो, स्वकर्म करीत राहणे पसंत करतो, न्याय त्याच्याच बाजूने दिला जातो. त्यामुळेच नूतन वर्षी तुम्हाला दैवाची चांगली साथ मिळणार आहे.
सिंह : मने जिंकाल
नोव्हेंबर २०१४ : तुळेचा शनी २ नोव्हेंबपर्यंत अनुकूल राहील. ताणतणाव दूर होतील. समयसूचकता दाखवाल. वृश्चिकेचा सूर्य १६ नोव्हेंबरपासून अनुकूल होईल. त्यामुळे कौटुंबिक प्रश्न सुटतील. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल.
डिसेंबर २०१४ : मकरेचा मंगळ, वृश्चिक-धनूचा बुध, धनूचा शुक्र अनुकूल आहे. आनंददायक घटना घडतील. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. कर्तव्यपूर्तीसाठी वेळ व पैसे खर्च कराल. यशस्वी व्हाल.
जानेवारी २०१५ : १४ जानेवारीनंतर मकरेचा सूर्य शुभयोगात येईल. मंगळ, बुध ग्रहही शुभयोगात आहेत. वेळेचा व संधींचा योग्य उपयोग करून घ्याल. इतरांना दिलेला शब्द कसोशीने पाळाल. अर्थप्राप्ती होईल.
फेब्रुवारी २०१५ : सूर्य, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. तुमची स्वप्ने साकार होतील. इतरांना मदतही कराल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न सुटतील. आर्थिक येणे वसूल होईल. आरोग्यात सुधारणा होईल. उत्साह वाढेल.
मार्च २०१५ : १४ मार्चपर्यंत कुंभेचा सूर्य अनुकूल राहील. महत्त्वाची कामे करून घ्या. ती यशस्वी होतील. बुध-शुक्र शुभयोगात आहेत. स्पर्धा, पैजा जिंकू शकाल. तब्येतीत सुधारणा होईल. मन:स्वास्थ्य राहील.
एप्रिल २०१५ : ४ एप्रिलचे चंद्रग्रहण मिश्रफळ देणारे आहे. अर्थप्राप्ती झाली तरी खर्च वाढेल. उद्योग-व्यवसायात कामात वाढ होईल. बुध, शुक्र प्रसन्न आहेत. शरीरस्वास्थ्य, मन:स्वास्थ्य राहील.
मे २०१५ : ग्रहमानाची मदत मिळेल. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. कामात उत्साह राहील. कलावंतांना मानसन्मान प्राप्त होईल. नवीन ओळखी होतील. प्रवास कार्यसाधक होतील. महिलांना आनंदवार्ता समजतील.
जून २०१५ : सूर्य, मंगळ, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. अर्थप्राप्ती चांगली झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. आपला स्वभाव महत्त्वाकांक्षी राहील. मोठय़ा यशासाठी प्रयत्न कराल. महिलांना गृहसौख्य मिळेल. स्पर्धा जिंकाल.
जुलै २०१५ : १६ जुलैपर्यंत मिथुनेचा सूर्य व्ययस्थानी राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. शरीरस्वास्थ्य आणि मन:स्वास्थ्य राहील. मंगळ, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. स्पर्धा-पैजा जिंकू शकाल.
ऑगस्ट २०१५ : शुक्र वगळता इतर ग्रहमान अनुकूल नाही. मेहनतीवरच भर द्यावा लागेल. सहनशीलता, संयम आणि सावधानता ठेवून वागावे लागेल. कार्यक्षमता वाढवावी लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
सप्टेंबर २०१५ : बुध-शुक्र शुभयोगात आहेत. अर्थप्राप्ती झाली तरी खर्चाचे प्रमाण वाढेल. मोठी आर्थिक गुंतवणूक सावधानतेने करावी लागेल. द्विधा मन:स्थितीमुळे निर्णय घेणे कठीण जाईल. आरोग्य ठीक राहील.
ऑक्टोबर २०१५ : १७ ऑक्टोबरपासून तुळेचा सूर्य अनुकूल होईल. परिस्थितीत हळूहळू अनुकूल बदल होतील. आरोग्यात सुधारणा होईल. नोकरी-व्यवसायात प्रगतीसाठी संधी प्राप्त होईल. मुलांकडून आनंदवार्ता समजतील.
नोव्हेंबर २०१५ : तुळेचा सूर्य १६ नोव्हेंबपर्यंत अनुकूल राहील. कार्यतत्परता दाखवाल. महत्त्वाची कामे तोपर्यंत करून घ्या. ती यशस्वी होण्यास मदत होईल. बुध-शुक्र शुभयोगात आहेत. आर्थिक सुधारणा होईल.
आप्तेष्ट-मित्रांशी चांगले हितसंबंध ठेवण्याकडे तुम्ही अधिक लक्ष देत असता. स्वत:वरील जबाबदाऱ्या छान पार पाडत असता. इतरांच्या अपेक्षा जाणून घेऊन त्या पूर्ण करण्याचा नेहमी प्रयत्न करीत असता. अशाच गोष्टींमुळे नतून वर्षी तुम्ही सर्वाची मने जिंकून घेणार आहात.
कन्या : समाधानाचे वर्ष
नोव्हेंबर २०१४ : २ नोव्हेंबरपासून तुमच्या राशीची शनीची साडेसाती संपेल. वृश्चिकेचा शनी २ नोव्हेंबरपासून पराक्रम स्थानी शुभयोगात येईल. आर्थिक येणे वसूल होईल. प्रसंगावधान दाखवाल. आरोग्यात सुधारणा होईल.
डिसेंबर २०१४ : १६ डिसेंबपर्यंत वृश्चिकेचा सूर्य अनुकूल राहील. महत्त्वपूर्ण घटना घडतील. कर्केचा गुरू लाभस्थानी शुभयोगात आहे. नोकरी-व्यवसायात छान प्रगती होईल. तब्येतीत सुधारणा होईल. आनंदवार्ता समजतील.
जानेवारी २०१५ : ग्रहमान उत्तम आहे. मंगळ, बुध, गुरू, शुक्र व शनी प्रसन्न आहेत. प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक येणे वसूल होईल. आनंदवार्ता समजतील. खर्चाचे प्रश्न सुटतील. स्पर्धा-पैजा जिंकाल. आरोग्य छान राहील.
फेब्रुवारी २०१५ : १३ फेब्रुवारीपासून कुंभेचा सूर्य अनुकूल होईल. संघर्ष टाळून कामे करून घेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमची स्वप्ने साकार होतील. कल्पकता दाखवून कामे कराल. इतरांची शाबासकी मिळवाल. आरोग्यात सुधारणा होईल.
मार्च २०१५ : ग्रहमान उत्तम आहे. अनपेक्षित आनंदवार्ता समजतील. इतरांचे देणे फेडू शकाल. आर्थिक गुंतवणुकीवर लाभ होतील. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य राहील. व्यवसायात छान प्रगती होईल.
एप्रिल २०१५ : ४ एप्रिलचे चंद्रग्रहण प्रतिकूल आहे. इतर ग्रहमान मात्र शुभयोगात आहे. चिंता करू नका. अंतिम यश तुमचेच असेल. तुमचे प्रयत्न सार्थकी लागतील. अर्थप्राप्ती होईल. त्यामुळे खर्चाचे प्रश्न सुटतील.
मे २०१५ : गुरू व शनी शुभयोगात आहेत. प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हाल. काळजी करण्याची गरज नाही. समाधान प्राप्त होईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारून तुम्ही त्या यशस्वी करून दाखवाल. यशस्वी व्हाल.
जून २०१५ : १५ जूनपासून मिथुनेचा सूर्य अनुकूल होईल. कल्पकता दाखवून काम कराल. आपले अंदाज खरे ठरतील. इतरांना दिलेला शब्द पाळाल. तुमची पतप्रतिष्ठा वाढेल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. आरोग्य छान राहील.
जुलै २०१५ : कर्केचा गुरू १४ जुलैपर्यंत मदत करील. महत्त्वाची कामे करून घ्या. ती यशस्वी होतील. सामाजिक कार्यात भाग घ्याल. इतरांना मदत कराल. व्यवहारी राहाल. वेळेचा उपयोग कराल. धार्मिक कार्यात भाग घ्याल.
ऑगस्ट २०१५ : कर्केचा सूर्य १७ ऑगस्टपर्यंत मदत करील. मंगळ, बुध, शुक्र व शनी अनुकूल आहेत. विरोधकांचा विरोध मावळेल. प्रगतीचा वेग वाढवू शकाल. शरीरस्वास्थ्य राहील. मन:स्वास्थ्य राहील. उमेद वाढेल.
सप्टेंबर २०१५ : वृश्चिकेचा शनी तृतीयात पराक्रमस्थानी आहे. चिंता करू नका. अंतिम विजय तुमचाच असेल. मंगळ-शुक्र शुभयोगात आहेत. आवडत्या छंदांसाठी वेळ द्याल. कलावंतांना मानसन्मान प्राप्त होतील.
ऑक्टोबर २०१५ : उद्योग-व्यवसायात अधिक गुंतवणूक कराल. मुलांकडून आनंदवार्ता समजेल. व्यवहारी राहून बचत कराल. संयमाने वागाल. प्रलोभने टाळण्यात यशस्वी व्हाल. दैवाची मर्जी राहील.
नोव्हेंबर २०१५ : १६ नोव्हेंबरपासून वृश्चिकेचा सूर्य अनुकूल होईल. बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. उद्योग-व्यवसायातील आर्थिक देणे वसूल होईल. प्रवास कार्यसाधक होतील. आनंदवार्ता समजेल.
वेळेचा आणि संधीचा तुम्ही जास्तीतजास्त छान उपयोग करून घेत असता. इतरांकडून कमीतकमी अपेक्षा ठेवता. नूतन वर्षी ग्रहमान तुम्हाला समाधानी ठेवणार आहे. तुमची स्वप्ने साकार करणार आहे.
तूळ : आनंदवार्ता समजतील
नोव्हेंबर २०१४ : मंगळ, बुध आणि शुक्र शुभयोगात आहेत. २ नोव्हेंपासून शनीच्या साडेसातीचा अखेरचा अडीच वर्षांचा कालखंड सुरू होईल. ताणतणाव दूर होतील. संयम, सावधानता ठेवावी. संघर्ष टाळणे योग्य होईल.
डिसेंबर २०१४ : १६ डिसेंबरपासून धनूचा सूर्य अनुकूल होईल. आर्थिक लाभ होतील. नवीन ओळखी होतील.
बुध, शुक्र शुभयोगात आहेत. प्रिय घटना घडतील. शरीरस्वास्थ्य आणि मन:स्वास्थ्य राहील. कामात उत्साह वाढेल.
जानेवारी २०१५ : १४ जानेवारीपर्यंत धनूचा सूर्य अनुकूल राहील. तुमची रेंगाळलेली सर्व कामे मार्गी लागतील. बुध, शुक्र शुभयोगात आहेत. अर्थप्राप्ती होईल. सुसंवाद साधून कामे कराल. स्पर्धा-पैजा जिंकाल.
फेब्रुवारी २०१५ : मंगळ, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. चिंता करू नका. सर्व कामे मार्गी लागतील. ताणतणाव दूर होतील. नवीन ओळखी होतील. व्यवहार कौशल्य दाखवाल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल.
मार्च २०१५ : १४ मार्चपासून मीनेचा सूर्य अनुकूल होईल. परिस्थितीत अनुकूल बदल होतील. कार्यक्षमता वाढेल. कामांचा उरक राहील. आरोग्यात छान सुधारणा होईल. मन:स्वास्थ्य मिळेल. अध्यापनात यश मिळेल.
एप्रिल २०१५ : आर्थिक प्रश्न सुटतील. सूर्य, बुध व शुक्र प्रसन्न आहेत. नवीन कार्याचा परिचय होईल. आरोग्यात छान सुधारणा होईल. परोपकाराची संधी प्राप्त होईल. इतरांना मदत कराल. आनंदवार्ता समजतील.
मे २०१५ : महत्त्वाची कामे १५ मेपर्यंत करून घ्या. मेषेचा सूर्य सप्तमस्थानी शुभयोगात आहे. बुध, शुक्र अनुकूल आहेत. नोकरी-व्यवसायात प्रगतीसाठी संधी प्राप्त होईल. महिलांना गृहसौख्य मिळेल.
जून २०१५ : फक्त बुध अनुकूल आहे. इतर ग्रहमान प्रतिकूल आहे. द्विधा मन:स्थितीमुळे निर्णय घेणे कठीण जाईल. प्रलोभने टाळावी लागतील. संयम, सहनशीलता आणि सावधानता ठेवावी.
जुलै २०१५ : मागील काही दिवस खूप ताणतणावाचे गेले. आता परिस्थितीत अनुकूल बदल होईल. १४ जुलैपासून सिंहेचा गुरू लाभस्थानी शुभयोगात येईल. व्यवहारात लाभ होतील. आरोग्य सुधारेल.
ऑगस्ट २०१५ : सूर्य, बुध, गुरू व शुक्र अनुकूल आहेत. हाती घेतलेली सर्व कामे यशस्वी होतील. महत्त्वपूर्ण लाभदायक घटना घडतील. समाजकार्यात भाग घ्याल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील.
सप्टेंबर २०१५ : सिंहेचा सूर्य १७ सप्टेंबपर्यंत शुभयोगात राहील. अनपेक्षित लाभ होतील. आर्थिक देणे वसूल होईल. सुसंवाद साधून कामे कराल. नवीन ओळखी होतील. यशस्वी व्हाल.
ऑक्टोबर २०१५ : सिंह राशीतील गुरू, शुक्र व मंगळ अनुकूल आहेत. तुमची स्वप्ने साकार होतील. आनंदवार्ता समजतील. आरोग्यात छान सुधारणा होईल. अर्थप्राप्ती होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील.
नोव्हेंबर २०१५ : ग्रहमान उत्तम आहे. बुध, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. अर्थप्राप्ती चांगली झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. प्रसंगावधान दाखवाल. नवीन जबाबदारी स्वीकाराल.
अनुकूल संवेदना म्हणजे सुख आणि प्रतिकूल संवेदना म्हणजे दु:ख! नूतन वर्षी उत्तरार्धात सिंहेचा गुरू तुम्हाला सौख्य मिळवून देणार आहे. आनंदवार्ताही समजतील. मेहनतीस न्याय मिळेल. यशस्वी व्हाल.
वृश्चिक : साडेसातीतही यश
विद्यार्थ्यांची प्रगती होईल.
नोव्हेंबर २०१४ : २ नोव्हेंबरपासून शनीच्या साडेसातीचा मधला टप्पा सुरू होईल. प्रयत्नात सातत्य ठेवावे. आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावे. संघर्ष टाळणे हिताचे ठरेल. कर्केचा गुरू भाग्यस्थानी आहे. चिंता करू नका.
डिसेंबर २०१४ : ग्रहमान उत्तम आहे. कर्केचा गुरू, मकरेचा मंगळ, धनूचा बुध-शुक्र. साडेसातीतही छान प्रगती करू शकाल. दैवाची मदत मिळेल. पूर्वीच्या चुका सुधारू शकाल. आर्थिक चिंता दूर होईल. यश येईल.
जानेवारी २०१५ : १४ जानेवारीपासून मकरेचा सूर्य अनुकूल होईल. बुध, गुरू, शुक्र शुभयोगात आहेत. कार्यक्षमता वाढवावी लागेल. कामे मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात लाभ होतील. महिलांना गृहसौख्य लाभेल.
फेब्रुवारी २०१५ : मकरेचा सूर्य १३ फेब्रुवारीपर्यंत अनुकूल राहील. महत्त्वाची कामे तोपर्यंत करून घ्या. ती यशस्वी होतील. खर्च वाढला तरी अर्थप्राप्ती होईल. चिंता दूर होईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल.
मार्च २०१५ : ग्रहमान छान आहे. बुध, गुरू व शुक्र प्रसन्न आहेत. ग्रहांची अनुकूलता राहील. आनंददायी घटना घडतील. जमीन खरेदी-विक्री व्यवहारात लाभ होतील. आरोग्य ठीक राहील. उमेद वाढेल.
एप्रिल २०१५ : ४ एप्रिलचे चंद्रग्रहण शुभफल देणारे आहे. अनपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवीन ओळखी होतील. सुसंवाद साधून कामे करण्यावर भर द्यावा. प्रियजनांच्या भेटीगाठी होतील. आरोग्य ठीक राहील.
मे २०१५ : दैवाची मर्जी राहील. सूर्य, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. इतरांचे मार्गदर्शन मिळेल. सद्विचारांची संगत लाभेल. हातून सत्कार्ये घडतील. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य मिळेल. चातुर्य दाखवाल.
जून २०१५ : १५ जूनपर्यंत वृषभेचा सूर्य अनुकूल राहील. गुरू-शुक्रही शुभयोगात आहेत. व्यवहारात लाभ होतील. उद्योग-व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्याची संधी प्राप्त होईल. यशस्वी व्हाल.
जुलै २०१५ : कर्केचा गुरू १४ जुलैपर्यंत मदत करील. महत्त्वाची कामे तोपर्यंत करून घ्या. ती यशस्वी होतील. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. सर्वाचे सहकार्य मिळेल. आरोग्य छान राहील. उत्साह वाटेल.
ऑगस्ट २०१५ : १७ ऑगस्टपासून सिंहेचा सूर्य दशमस्थानी शुभयोगात येईल. आर्थिक व्यवहारात कौशल्य दाखवाल. प्रसन्नता राहील. बुध-शुक्र शुभयोगात राहतील. स्वप्ने साकार होतील. यश मिळेल.
सप्टेंबर २०१५ : कार्यक्षमता वाढेल. सूर्य, बुध व शुक्र अनुकूल आहेत. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारून त्या यशस्वी करून दाखवाल. दैवाची मर्जी राहील. आनंदवार्ता समजतील. गृहव्यवस्थापनात यश मिळेल.
ऑक्टोबर २०१५ : १७ ऑक्टोबपर्यंत कन्येचा सूर्य अनुकूल राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. कन्येचा बुधही शुभयोगात आहे. इतरांना मदत कराल. अधिकाराचा योग्य उपयोग करून घ्याल.
नोव्हेंबर २०१५ : खर्च खूप होईल; परंतु अर्थप्राप्तीही होईल. त्यामुळे मनावरचा ताणतणाव दूर होईल. स्पर्धेत यश मिळेल. इतरांची शाबासकी मिळेल. राजकीय डावपेच यशस्वी होतील.
सध्या वृश्चिक राशीला शनीच्या साडेसातीचा मधला अडीच वर्षांचा कालखंड चालू आहे. तरीही इतर ग्रहमान, विशेषत: गुरू ग्रह अनुकूल असल्याने शनीच्या साडेसातीतही तुम्ही छान प्रगती करणार आहात. छान यश मिळविणार आहात.
धनू : योग्य निर्णय! योग्य कृती!
नोव्हेंबर २०१४ : २ नोव्हेंबरपासून शनीच्या साडेसातीचा पहिला अडीच वर्षांचा कालखंड सुरू होईल. द्विधा मन:स्थितीमुळे निर्णय घेणे कठीण जाईल. इतरांशी जमवून घ्यावे लागेल. आरोग्यावर ताण पडेल. संयम ठेवावा.
डिसेंबर २०१४ : या महिन्यात ग्रहमानाची विशेष मदत मिळणार नाही. प्रयत्न आणि मेहनत यावरच अवलंबून राहावे लागेल. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा. संयम, सावधानता आणि सहनशीलता ठेवावी.
जानेवारी २०१५ : मंगळ, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. खर्चाचे प्रश्न सुटतील. आर्थिक येणे वसूल होईल. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. महिलांना गृहव्यवस्थापनात यश मिळेल. मानसन्मान प्राप्त होतील.
फेब्रुवारी २०१५ : १३ फेब्रवारीपासून कुंभेचा सूर्य अनुकूल होईल. राजकारणातील डावपेच यशस्वी होतील. आनंदवार्ता समजतील. तब्येतीत सुधारणा होईल. मन:स्वास्थ्य मिळेल. स्पर्धा-पैजा जिंकाल.
मार्च २०१५ : कुंभेचा सूर्य १४ मार्चपर्यंत अनुकूल राहील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. बुध, शुक्र शुभयोगात आहेत. उद्योग-व्यवसायात अधिक गुंतवणूक कराल. छान प्रगती होईल. आरोग्यात सुधारणा होईल.
एप्रिल २०१५ : ४ एप्रिलचे चंद्रग्रहण शुभफल देणारे आहे. त्यामुळे अनपेक्षित लाभ होतील. इतरांचे छान सहकार्य मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील. नवीन ओळखी होतील. खर्चाचे प्रश्न सुटतील. मनोबल वाढेल.
मे २०१५ : १५ मेपासून वृषभेचा सूर्य शुभयोगात येईल. मंगळ, बुध अनुकूल आहेत. पूर्वीच्या चुका दुरुस्त कराल. नोकरी-व्यवसायात छान प्रगती होईल. कलावंतांना मानसन्मान प्राप्त होतील. शरीरस्वास्थ्य मिळेल.
जून २०१५ : सूर्य, मंगळ, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. प्रत्येक कामात यश मिळेल. नवीन आव्हाने स्वीकारून ती यशस्वी करून दाखवाल. परोपकाराची संधी मिळेल. धार्मिक मंगलकार्यात भाग घ्याल.
जुलै २०१५ : दैवाची मर्जी राहील. परिस्थितीत सुधारणा होईल. ग्रहमान उत्तम आहे. १४ जुलैपासून सिंह राशीतील गुरू भाग्यस्थानी येत आहे. तो प्रगतीसाठी नवीन संधी प्राप्त करून देईल. आनंदवार्ता समजेल.
ऑगस्ट २०१५ : आर्थिक प्रश्न सुटतील. बुध, गुरू व शुक्र अनुकूल आहेत. इतरांचे देणे फेडाल. मनावरचा ताण दूर होईल. आर्थिक गुंतवणुकीवर लाभ होईल. योग्य निर्णय घ्याल. योग्य कृती कराल. यश येईल.
सप्टेंबर २०१५ : कन्येचा सूर्य १७ सप्टेंबरपासून अनुकूल होईल. आर्थिक प्रश्न सुटतील. महिलांना गृहव्यवस्थापनात यश मिळेल. आनंदवार्ता समजतील. आरोग्य ठीक राहील. कामात उत्साह राहील.
ऑक्टोबर २०१५ : दैवाची मर्जी राहील. अनपेक्षित लाभ होतील. नोकरी-व्यवसायात अनुकूलता राहील. इतरांना दिलेला शब्द पाळाल. सुसंवाद साधून कामे करण्यावर भर द्याल. विरोधक माघार घेतील.
नोव्हेंबर २०१५ : १६ नोव्हेंबपर्यंत तुळेचा सूर्य लाभस्थानी अनुकूल राहील. कार्यक्षमता वाढेल. इतरांचे छान सहकार्य मिळेल. आनंदवार्ता समजतील. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य टिकून राहील. यश मिळेल.
आर्थिक गोष्टींबाबत तुम्ही व्यवहारी असता. तुमचा हिशेबीपणा तुम्हास उपयोगी पडत असतो. तुम्ही तुमचे मन सतत कामात गुंतवून ठेवत असता. नूतन वर्षी योग्य निर्णय घेण्याचे आणि योग्य कृती करण्याचे बल तुम्हास प्राप्त होणार आहे.
मकर : छान योगायोग
उरक ठेवाल.
नोव्हेंबर २०१४ : २ नोव्हेंबरपासून वृश्चिकेचा शनी लाभस्थानी येत आहे. तो परिस्थितीत सुधारणा करील. प्रगती होईल. कर्तव्यपूर्तीसाठी वेळ व पैसे खर्च कराल. अधिकारांचा योग्य उपयोग कराल. आरोग्य ठीक राहील.
डिसेंबर २०१४ : १६ डिसेंबपर्यंत वृश्चिकेचा सूर्य अनुकूल राहील. कर्केचा गुरू प्रसन्न आहे. इतरांना कठीण वाटणारी कामे तुम्ही यशस्वी करून दाखवाल. दिलेली आश्वासने पूर्ण कराल. आर्थिक लाभ होतील.
जानेवारी २०१५ : कर्केचा गुरू सप्तमस्थानी शुभयोगात आहे. वृश्चिकेचा शनी लाभस्थानी अनुकूल आहे. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. नोकरी-व्यवसायात छान प्रगती होईल.
फेब्रुवारी २०१५ : दैवाची मर्जी राहील. मंगळ, गुरू, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. प्रत्येक कामात यश मिळेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारून त्या यशस्वी करून दाखवाल. शरीरस्वास्थ्य लाभेल. उमेद वाढेल.
मार्च २०१५ : १४ मार्चपासून मीनेचा सूर्य अनुकूल होईल. मंगळ, बुध, गुरू, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. स्पर्धा-पैजा जिंकू शकाल. आर्थिक लाभ होतील. इतरांचे देणे फेडू शकाल. मनावरचा ताणतणाव दूर होईल.
एप्रिल २०१५ : ४ एप्रिलचे चंद्रग्रहण मिश्रफल देणारे आहे. अर्थप्राप्ती झाली तरी खर्च खूप होतील. कामात वाढ होईल. नवीन ओळखी होतील. महिलांना मौल्यवान वस्तूंची खरेदी करता येईल. चांगली कामे होतील.
मे २०१५ : सर्व कामे यशस्वी होतील. बुध, गुरू, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. आनंदवार्ता समजतील. इतरांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. आप्तेष्ट- मित्रांच्या भेटीगाठी होतील, यश मिळेल.
जून २०१५ : १५ जूनपासून मिथुनेचा सूर्य षष्ठस्थानी शुभयोगात येईल. कल्पकता दाखवून कामे करून घ्याल. अधिकारांचा योग्य उपयोग कराल. मंगळ, बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. उत्साह वाढेल.
जुलै २०१५ : सूर्य, मंगळ, बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. प्रत्येक कामात यश मिळेल. नवीन आव्हाने स्वीकारून ती यशस्वी करून दाखवाल. कर्केचा गुरू १४ जुलैपर्यंत मदत करील.
ऑगस्ट २०१५ : कर्केचा सूर्य १७ ऑगस्टपर्यंत अनुकूल राहील. नवीन ओळखी होतील. बुध, शुक्र व शनी शुभयोगात राहील. प्रगतीसाठी नवीन संधी उपलब्ध होईल. कार्यतत्परता दाखवाल.
सप्टेंबर २०१५ : वृश्चिकेचा शनी लाभस्थानी आहे. इतर ग्रहमान प्रतिकूल असले तरी चिंता करू नका. अंतिम विजय तुमचाच असेल. द्विधा मन:स्थितीमुळे निर्णय घेणे कठीण जाईल. आरोग्यावर ताण पडेल.
ऑक्टोबर २०१५ : १७ ऑक्टोबरपासून तुळेचा सूर्य कर्मस्थानी शुभयोगात राहील. शुक्र व शनी शुभयोगात आहेत. अनपेक्षित लाभ होतील. प्रसंगावधान दाखवाल. कौटुंबिक स्वास्थ्य मिळेल.
नोव्हेंबर २०१५ : सूर्य, बुध, शुक्र व शनी शुभयोगात आहेत. कल्पकता दाखवून कामे कराल. नोकरी व्यवसायात ठीक प्रगती होईल. विरोधक माघार घेतील. मार्गातील अडथळे दूर होतील.
ग्रहमान चांगले असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. प्रगतीसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. छान योगायोगांचा अनुभव येईल. आनंद वाढेल. अनपेक्षित लाभही होतील.
कुंभ : छान अर्थप्राप्ती
पूर्वीची रेंगाळलेली कामे १४ जुलैनंतर पूर्ण होतील. रेंगाळलेले प्रश्न सुटतील. आर्थिक येणे वसूल होईल. प्रवास कार्यसाधक होतील. नवीन ओळखी होतील. नूतन वर्षी तुम्ही चांगली बचत करू शकाल. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. कामात उत्साह राहील. महिलांना गृहव्यवस्थापनात यश मिळेल. विरोधकांनी माघार घेतल्याने मार्गातील अडथळे दूर होतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त होईल.
नोव्हेंबर २०१४ : १६ नोव्हेंबरपासून वृश्चिकेचा सूर्य अनुकूल होईल. मंगळ, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. सुसंवाद साधून कामे करण्यावर भर द्याल. आप्तेष्ट-मित्रांच्या भेटीगाठी होतील. आरोग्यात सुधारणा होईल.
डिसेंबर २०१४ : दैवाची मर्जी राहील. ग्रहमान उत्तम आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. सूर्य, बुध व शुक्र अनुकूल आहेत. सुसंवाद साधून कामे कराल. मनोबल वाढेल. पूर्वीच्या चुका सुधाराल.
जानेवारी २०१५ : महत्त्वाची कामे १४ जानेवारीपूर्वी करून घ्या. धनूचा सूर्य लाभस्थानी शुभयोगात राहील. बुध-शुक्र मदत करतील. नवीन गोष्टी शिकून घ्याल. आप्तेष्ट-मित्रांच्या भेटीगाठी होतील. संयम ठेवावा.
फेब्रुवारी २०१५ : ग्रहमान प्रतिकूल आहे. मेहनतीवरच भर द्यावा लागेल; बेफिकीर राहून चालणार नाही. खर्च खूप वाढेल. आरोग्यावर ताण पडेल. व्यवहारी राहावे लागेल. प्रवासात काळजी घ्यावी. संघर्ष टाळणे हिताचे होईल.
मार्च २०१५ : परिस्थितीत थोडा बदल होईल. मंगळ, बुध व शुक्र अनुकूल होतील. संयमाने वागाल. संघर्ष टाळणे हिताचे होईल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. कामात वाढ होईल. आरोग्यात छान सुधारणा होईल. उमेद वाढेल.
एप्रिल २०१५ : ४ एप्रिलचे चंद्रग्रहण प्रतिकूल आहे. सावधानता ठेवावी लागेल. नवीन ओळखी होतील. समाजकार्यात भाग घ्याल. नोकरी-व्यवसायातील कामात वाढ होईल. त्याचा आरोग्यावर ताण पडेल.
मे २०१५ : १५ मेपर्यंत मेषेचा सूर्य अनुकूल राहील. बुध, शुक्र शुभयोगात आहेत. तुमची कार्यक्षमता वाढेल. अर्थप्राप्ती चांगली होईल. नवीन ओळखी होतील. पूर्वीच्या चुका दुरुस्त कराल. सहकार्य मिळेल.
जून २०१५ : बुध वगळता इतर ग्रहमान अनुकूल नाही. सावधानता ठेवावी लागेल. प्रवासात काळजी घ्यावी लागेल. नोकरी-व्यवसायात कामाचा ताप वाढेल. आरोग्यावर ताण पडेल. निर्णय घेणे कठीण जाईल.
जुलै २०१५ : १४ जुलैपासून सिंहेचा गुरू अनुकूल होईल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. राजकारणातील डावपेच यशस्वी होतील. आरोग्य ठीक राहील. व्यवहारात लाभ होतील. आरोग्य छान राहील. मन:स्वास्थ्य राहील.
ऑगस्ट २०१५ : सूर्य, मंगळ, बुध व गुरू शुभयोगात आहेत. सर्व प्रश्न सुटतील. इतरांचे छान सहकार्य मिळेल. सद्विचारांची संगत लाभेल. हातून सत्कार्ये घडतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल.
सप्टेंबर २०१५ : महत्त्वाची कामे १७ सप्टेंबरपूर्वी करून घ्या. सिंहेचा सूर्य अनुकूल होईल. मंगळ, बुध व गुरू शुभयोगात आहेत. दैवाची मर्जी राहील. स्पर्धा-पैजा जिंकू शकाल.
ऑक्टोबर २०१५ : बुध-गुरू अनुकूल आहेत. प्रश्न सुटतील, अर्थप्राप्ती होईल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. व्यवहार कौशल्य दाखवाल. प्रवास कार्यसाधक होतील. आरोग्य ठीक राहील.
नोव्हेंबर २०१५ : १६ नोव्हेंबरपासून वृश्चिकेचा सूर्य अनुकूल होईल. रेंगाळलेली सर्व कामे मार्गी लागतील. मनावरचा ताणतणाव दूर होईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. आनंदवार्ता समजतील.
माणसाला सर्व सोंगे आणता येतात; परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही, असे म्हटले जाते ते अगदी खरे आहे. खर्च वाढला, महागाई वाढली तरी आर्थिक प्राप्तीत वाढ झाली म्हणजे ताणतणावाचे वातावरण होत नाही. या नूतन वर्षी छान अर्थप्राप्ती झाल्याने सर्व प्रश्न सुटण्यात मदत होणार आहे.
मीन : आनंददायक घटना
नोव्हेंबर २०१४ : मंगळ, बुध, गुरू व शुक्र अनुकूल आहेत. कार्यक्षमता वाढवून कामांचा उरक ठेवाल. प्रलोभने मात्र टाळावी लागतील. कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील. आरोग्यात सुधारणा होईल.
डिसेंबर २०१४ : दि. १६ डिसेंबरपासून धनूचा सूर्य अनुकूल होईल. बुध, गुरू व शुक्र प्रसन्न आहेत. आरोग्यात छान सुधारणा होईल. तुमच्या मेहनतीस न्याय मिळेल. विद्यार्थ्यांना उज्ज्वल यश मिळेल. उत्साह वाढेल.
जानेवारी २०१५ : ग्रहमान उत्तम आहे. जे काम हाती घ्याल, त्यात यश मिळवाल. अर्थप्राप्ती होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. नवीन लोकांच्या ओळखी होतील. सूर्य, मंगळ, बुध, गुरू व शुक्र अनुकूल आहेत.
फेब्रुवारी २०१५ : मकरेचा सूर्य १३ फेब्रुवारीपर्यंत अनुकूल राहील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात छान प्रगती होईल. इतरांची शाबासकी मिळवाल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील.
मार्च २०१५ : दैवाची मर्जी राहील. बुध, गुरू व शुक्र अनुकूल आहेत. मनीची स्वप्ने साकार होतील. मन:स्वास्थ्य मिळेल. महिलांना गृहव्यवस्थापनात यश येईल. खर्चावर नियंत्रण राहील.
एप्रिल २०१५ : ४ एप्रिलचे चंद्रग्रहण मिश्रफल देणारे आहे. बुध, गुरू व शुक्र प्रसन्न आहेत. नोकरीत बढतीचे योग येतील. कामात उत्साह राहील. गुंतवणुकीवर चांगला फायदा होईल.
मे २०१५ : १५ मेपासून वृषभेचा सूर्य अनुकूल होईल. मंगळ, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. नोकरी-व्यवसायात छान प्रगती होईल. आपले निर्णय, कृती अगदी योग्य असेल. आनंद वाटेल.
जून २०१५ : १५ जूनपासून वृषभेचा सूर्य अनुकूल होईल. मंगळ, गुरू व शुक्र शुभयोगात आहेत. प्रियजनांच्या भेटीगाठी होतील. सुसंवाद साधून कामे कराल. आरोग्यात सुधारणा होईल. उत्साह वाढेल.
जुलै २०१५ : कर्क राशीतील गुरू १४ जुलैपर्यंत अनुकूल राहील. अर्थप्राप्ती होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. उद्योग क्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घ्याल. प्रलोभनांपासून मात्र दूर राहावे. यश मिळेल.
ऑगस्ट २०१५ : १७ ऑगस्टपासून सिंहेचा सूर्य अनुकूल होईल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. सुसंवाद साधून कामे कराल. नवीन आव्हाने स्वीकारून ती यशस्वी करून दाखवाल. उत्साह राहील.
सप्टेंबर २०१५ : चिंता करू नका. सूर्य-मंगळ शुभयोगात आहेत. खर्चाचे प्रश्न सुटतील. महत्त्वाचा पत्रव्यवहार होईल. सामंजस्य दाखवून प्रश्न सोडवाल. शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य राहील.
ऑक्टोबर २०१५ : कन्येचा सूर्य १७ ऑक्टोबपर्यंत अनुकूल राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. सिंहेचा मंगळ षष्ठस्थानी शुभयोगात आहे. कल्पकता दाखवाल. मानसन्मान प्राप्त होतील.
नोव्हेंबर २०१५ : बुध, शुक्र प्रसन्न आहेत. अर्थप्राप्ती होईल. अनावश्यक खर्च मात्र प्रथमपासून टाळावा लागेल. धोका स्वीकारून आर्थिक गुंतवणूक करू नये. अध्ययनात छान यश मिळेल.
मन:स्वास्थ्य हे शरीरस्वास्थ्याप्रमाणेच जास्त महत्त्वाचे आहे. शरीरस्वास्थ्यासाठी बाजारात औषधे मिळतात. परंतु मन:स्वास्थ्यासाठी स्वत:चे औषध स्वत:च शोधायचे असते. या नूतन वर्षी आनंदवार्ता समजतील. मन:स्वास्थ्य छान राहील.