दैनंदिन जीवनात आपल्याला आरोग्याच्या लहान-मोठ्या तक्रारी उद्भवत असतात. या तक्रारी अशा असतात की त्यासाठी डॉक्टरांकडे जाण्याचीही आवश्यकता नसते तरीही त्या त्रासदायक असतात. अशावेळी काही सोपे उपाय केल्यास या त्रासांपासून आपली सुटका होऊ शकते. सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाणी पिण्याची सवय आरोग्यासाठी फायद्याची असते. मात्र प्रत्यक्षात उठल्यावर चहा पिण्याची सवय काही केल्या जात नाही. सकाळी उठल्यावर चहाऐवजी कोमट पाणी हळद घालून प्यायल्यास त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. अर्थात सुरुवातीला ही सवय लावून घेणे अवघड वाटले तरी त्याचे फायदे जाणून घेतल्यावर तुम्हीही नक्कीच याबद्दल विचार कराल…

१)
अन्नपचन चांगले होते

diy health benefits of onions what happens your body if yo do not eat onions for a month
आहारात महिनाभर कांद्याचे सेवन न केल्यास शरीरात काय बदल होतील? तज्ज्ञ म्हणाले…
This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
Stale vs fresh roti Find out which one might help regulate blood sugar
रात्री फ्रिजमध्ये ठेवलेली पोळी सकाळी खावी का? शिळी पोळी रक्तातील साखरेचे नियमन करू शकते का? तज्ज्ञ काय सांगतात
speech fasting benefits if you stay silent for an entire day this is what happens to your body
तुम्ही पूर्ण दिवस न बोलता शांत राहिल्यास शरीरात नेमके काय बदल होतात? जाणून घ्या ‘स्पीच फास्टिंग’चे फायदे

हळद ही आरोग्याच्या अनेक समस्यांवरील उत्तम उपाय म्हणून ओळखली जाते. हळदीमुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यास मदत होते तसेच पित्त रसाची निर्मिती होण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. पित्तरसामुळे अन्नाचे पचन चांगल्या पद्धतीने होते. त्यामुळे शरीरातील पचनक्रीया सुरळीत राहण्यास मदत होते. तसेच तुम्ही जंकफूड खात असाल तर तुम्ही सकाळी उठल्यावर कोमट पाणी आणि हळद घ्यायलाच हवे.

२)
शरीराची सूज कमी करण्यास मदत

अनेकांना विविध कारणांनी शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना सूज येते. हळदीमध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ज्यांना अर्थायटीससारख्या समस्या असतील त्यांनी न चुकता सकाळी उठल्यावर कोमट पाणी आणि हळद घ्यायलाच हवे.

नक्की वाचा >> टाचांच्या भेगांपासून ते मासिक पाळीसंदर्भातील उपचारांपर्यंत… जाणून घ्या कढीपत्त्याचे १५ हून अधिक फायदे

३)
साखरेची पातळी नियमित राहण्यास उपयुक्त

शरीरात असणाऱ्या साखरेची योग्य पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी हळद उपयुक्त असते. यामुळे शरीरातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण राहण्यास मदत होते. मधुमेह असणाऱ्यांनी रोज सकाळी उठल्यावर कोमट पाणी आणि हळद प्यायल्यास त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

४)
चेहरा उजळण्यास मदत

हळद ही त्वचेसाठीही उत्तम औषध आहे. तुम्ही नियमितपणे चेहऱ्याला हळद लावली तर चेहरा उजळण्यास मदत होते. हळदीमुळे रक्त शुद्ध होण्यास तसेच शरीरातील अनावश्यक टॉक्सिन्स काढून टाकण्यास मदत होते. त्यामुळे तुमची त्वचा उजळण्यास आणि आरोग्यदायी राहण्यास मदत होते. त्यामुळे हळद आणि कोमट पाण्याचे सेवन त्वचेसाठीही फायद्याचे ठरते.

नक्की वाचा >> रक्त शुद्धीकरणापासून ते वजन कमी करण्यापर्यंत… बडीशेपचे ‘हे’ आठ फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

५)
प्रतिकारशक्ती वाढते

कोणत्याही आजाराशी ऋतूशी, अन्न-पाण्याशी सामना करण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक असते. हळदीमुळे ही प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.