घरातील मोठे कार्य, मुलांच्या लग्न-शिक्षणासाठी पैसा हवा तर पगारदारांसाठी त्यांच्या भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) खात्यातील रक्कम मोठा आधार असतो. पण पीएफमधील रक्कम तात्काळ मिळत नाही. पण आता कर्मचारी भविष्य निधी संघटना ( EPFO ) लवकरच नोकरदारांसाठी खास भेट देणार आहे. EPFO कमिशनर सुनील बर्थवाल यांच्या माहितीप्रमाणे, पीएफची रक्कम अवघ्या तीन दिवसांत मिळणार असून सध्या यावर काम सुरू आहे. EPFO कडून याची चाचणी सुरू आहे.

ईपीएफओ सर्व अकाउंट होल्डर्ससाठी एक युनिव्हर्सल अकाउंट नंबर प्रसिद्ध करतं. हा नंबर सुरू असणं गरजेचे आहे. तसंच कर्मचाऱ्यांचा मोबाइल, पॅन आणि आधार नंबरही डेटाबेसमध्ये अपडेट असावा. थोडक्यात KYC चा वापर करणाऱ्यांना आणि तीन दिवसांत PF चे पैसे मिळतील, असं ईपीएफओनं ठरवलं आहे.

thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
Dolly chaiwala in malvids video viral
Video : बिल गेट्सला चहा दिल्यानंतर मालदीवमध्ये फिरतोय डॉली चायवाला! मात्र नेटकरी झालेत नाराज…

(आणखी वाचा : या सोप्या पद्धतीनं तपासा PF बॅलन्स )

असा करा अर्ज –

– EPFO च्या ई पोर्टलवर लॉग इन करा. https://www.epfindia.gov.in/

– UAN नंबर आणि पासवर्डने लॉगइन करा

– आधार बेस्ट ऑनलाइन क्लेम (Online Services)सबमिशन टॅब निवडावा

– KYC डिटेल्स वेरिफाय करा

– क्लेम विथड्रॉल करण्यासाठी दिलेल्या पर्यायांना निवडावा

EPFO तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर वन टाइम पासवर्ड म्हणजेच OTP पाठवेल. हा OTP एंटर करून क्लेम फॉर्मवर सबमिट करावा लागेल. क्लेम प्रोसेस पूर्ण झाल्यावर रक्कम तुमच्या रजिस्टर्ड बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर होईल.