उन्हाळ्याच्या दिवसांत तयार होणारे, कलिंगड हे फळ म्हणजे आपल्यासाठी एक वरदान आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत प्रखर उष्णतेने अंगाची लाही लाही होते, त्या वेळी कलिंगडाच्या सेवनाने शरीराला शीतलता प्राप्त होते आणि अतिघामामुळे निर्माण झालेला थकवा दूर होऊन उत्साह निर्माण होतो. मधुर, शीतल, तृष्णाशामक आणि उत्साहवर्धक अशा कलिंगडाला शास्त्रीय भाषेत ‘स्रिटलस व्हल्गॅरिस’ असे म्हणतात. मूळ आफ्रिकेतील असणारे हे फळ भारतात कर्नाटकमध्ये सर्वाधिक प्रमाणात तयार होते. त्याच्या अनेक जाती आपल्याकडे प्रचलित आहेत.

औषधी गुणधर्म-

कलिंगड हे अल्कली गुणधर्माचे फळ आहे. त्यामुळे आम्लतेने निर्माण होणाऱ्या आजारांवर ते उपयोगी पडते. उष्णतेने निर्माण होणाऱ्या घामातून शरीरातील जलउत्सर्जन मोठय़ा प्रमाणात होते. त्यामुळे शरीरातील खनिजे घामाद्वारे निघून जातात. पर्यायाने अशा वेळी थकवा जाणवतो. त्या वेळी कलिंगड खाल्ल्याने तहान भागते व घामाद्वारे शरीरातील झालेला खनिज द्रव्यांचा ऱ्हास भरून येतो. कलिंगडाच्या बियांचा उपयोग शक्तिवर्धक म्हणून केला जातो. कारण या बियांमध्ये ‘कुम्बोट्रिन’ नावाचा ग्लुकोसाइड घटक असतो. यातील साखर सहज पचून रक्तामध्ये मिसळत असल्याने ते आरोग्यपूर्ण आहे. कलिंगड शक्तिवर्धक, पौष्टिक, दाहशामक, पित्तनाशक आहे. त्याची साल, फळ व बी या तिघांचाही उपयोग केला जातो.

thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
How to choose a perfectly ripe pomegranate with expert tips
रसाळ, लाल दाणे असलेले डाळिंब कसे ओळखावे? उत्तम प्रकारे पिकलेले डाळिंब कसे निवडावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स
What happens to your body if you only eat foods cooked in olive oil
तुम्ही फक्त ऑलिव्ह ऑइलमध्ये शिजविलेले अन्न खाता का? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो माहित्येय का?

नक्की वाचा >> सकाळी चहाऐवजी एक ग्लास हळदीचं पाणी प्यायल्यास होणारे पाच फायदे वाचून थक्क व्हाल

१)
मूतखडा झाला असेल तर तो लघवीतून पडून जाण्यासाठी कलिंगडाचा रस सतत काही दिवस द्यावा. * आम्लपित्ताचा त्रास होत असेल तर पित्त कमी करण्यासाठी कलिंगड खावे.

२)
उन्हातून आल्यानंतर किंवा उष्णतेच्या विकाराने डोकेदुखीचा त्रास होत असेल तर गर काढलेल्या अध्र्या कलिंगडाची टोपी डोक्यात घालावी. डोकेदुखी थांबून शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो.

३)
कलिंगडामध्ये टोमॅटोप्रमाणे लायकोपिनचे प्रमाण भरपूर असते. लायकोपिन अ‍ॅण्टिऑक्सिटेंट असल्यामुळे कर्करोग दूर ठेवायला उपयुक्त ठरते.

४)
कलिंगड खाल्ल्याने त्यामध्ये असणारा चोथा व आद्र्रतेमुळे मलावरोधाची तक्रार कमी होऊन पोट साफ होते.

५)
उष्माघातामुळे शरीराची आग होत असेल तर तसेच उष्णतेमुळे डोळ्यांची, तळपायांची आग होत असेल तर कापलेल्या टरबुजाची साल त्या भागावर ठेवावी. थोडय़ाच वेळात शरीराची आग कमी होते.

६)
सौंदर्यवर्धनासाठीही कलिंगड उपयुक्त ठरते. कलिंगडाची साल चेहऱ्यावर चोळल्याने चेहऱ्यावरचा तजेला वाढतो.

७)
कलिंगडाचे बी हे अतिशय पौष्टिक व चवदार असते. मुखशुध्दीसाठी बडिशेपमध्ये कलिंगडाचे बी वापरावे तसेच घरी बनवलेले लाडू, बर्फी यामध्येही या बीचा सजावटीसाठी वापर करावा. यापासून केलेले तेल हे पौष्टिक असते. त्याच्याही खाद्यपदार्थ म्हणून वापर करता येतो.

८)
कलिंगडाचे बी टणक असल्यामुळे सोलायला कठीण असते. म्हणून थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करावे व त्याचा रस गाळणीतून गाळून घ्यावा व हे गाळलेले पांढरे दूध रश्श्याच्या भाजीत किंवा आमटीत घालावे. या बियांमध्ये प्रथिने, क्षार व शरीरास उपयुक्त असा मेद भरपूर प्रमाणात असतात व त्याचा आरोग्य चांगले राहण्यासाठी उपयोग होतो.

नक्की वाचा >> रक्त शुद्धीकरणापासून ते वजन कमी करण्यापर्यंत… बडीशेपचे ‘हे’ आठ फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

९)
कलिंगडाचा लाल गर काढल्यानंतर, सालीचा पांढरा गर हा फेकून न देता त्याचा वापर कोिशबीर, थालीपीठ, कटलेट, भजी, धिरडे, भाजी यांमध्ये करावा.

१०)
कलिंगडाची हिरवी साल स्वच्छ धुऊन बारीक किसून सांडगे बनविण्यासाठी वापरावी यामध्ये लोह, चोथा व ‘ब’ जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते.

११)
कलिंगडामध्ये पाणी व पोटॅशिअमचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. त्यामुळे मूत्राशयाच्या व किडनीच्या तक्रारींवर व लघवीला जळजळ होत असेल तर कलिंगड खाल्ल्यास फायदा होतो.

१२)
कलिंगडमध्ये लाइकोपिन असते. लाइकोपिनने आपली त्वचा तरुण राहते.

१३)
अपचन, भूक वाढवणे तथा रक्ताची कमतरता असेल तर कलिंगड खूप लाभदायी ठरते.

१४)
कलिंगडच्या फोडींवर काळी मिरी पावडर, सैंधव भुरभुरून खाल्याने आंबट ढेकर येणे थांबते.

१५)
कलिंगडचा पल्प ‘ब्लकहेड्स’ने प्रभावित झालेल्या जागेवर चोळा आणि एक मिनिटांनी  चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या.

नक्की वाचा >> टाचांच्या भेगांपासून ते मासिक पाळीसंदर्भातील उपचारांपर्यंत… जाणून घ्या कढीपत्त्याचे १५ हून अधिक फायदे

सावधानता-

कलिंगड हे फळ पिकल्यानंतर माठाखाली ठेवावे. पाण्याने ओले केलेले थंड कापड त्यावर टाकावे. त्यानंतर चार ते पाच तासांनी कलिंगड खावे. फ्रिजमध्ये ठेवून थंड केलेले कलिंगड खाऊ नये. तसेच एकदा कापलेले कलिंगड पुन्हा फ्रिजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाऊ नये. कारण फळ कापल्यानंतर त्यातील पौष्टिक घटक कमी होतात. म्हणून ते लगेचच खावे. अनेक जण कलिंगड खाताना त्यात मीठ टाकून खातात; परंतु कलिंगडामध्ये नसíगकरीत्याच सोडियम क्लोराइड, पोटॅशिअम हे क्षार असतात व मीठ टाकून या क्षारांचे प्रमाण अधिकच वाढते. म्हणून मीठ, साखर यांचा वापर न करता आहे त्या नसíगक स्थितीतील पिकलेले कलिंगड कापून लगेचच खावे. फ्रिजमध्ये कापून ठेवलेले शिळे कलिंगड खाल्ल्यास अनेक वेळा फूड पॉयझिनग (अन्न विषबाधा) होऊन जुलाब, उलटय़ा, ताप, सर्दी, खोकला हे आजार होतात.

नक्की वाचा >> …म्हणून काकडी फ्रिजमध्ये ठेऊ नये आणि सालीसकटच खावी

कलिंगड खाताना एक गोष्ट लक्षात ठेवा- कलिंगड खाऊन झाल्यावर एक तासभर पाणी पिऊ नका. नाही तर लाभ होण्याऐवजी शरीराला नुकसान होऊ शकते.

– डॉ. शारदा महांडुळे

मूळ लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा