कोशिंबीरीमधली सर्वात आवडती फळभाजी म्हणजे काकडी होय. काकडी ही शीतल, पित्तशामक आहे. त्याचप्रमाणे काकडीमध्ये असलेल्या गुणधर्मामुळे शरीरातील मूत्रप्रमाण वाढते म्हणून मुत्रविकारासाठी काकडी ही उपयुक्त असते. काकडीमध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ‘क’ जीवनसत्त्व, पोटॅशिअम, मीठ, मॅग्नेशिअम, गंधक, सिलिकॉन, ग्लोरीन, बम्लोरीन आणि तंतुमय पदार्थ मुबलक प्रमाणात असतात म्हणून आयुर्वेदातही काकडीला विशेष महत्त्व आहे.

काकडी फ्रिजमध्ये का ठेवू नये?

काकडी ही शीत गुणधर्माची असते, त्यामुळे तिच्या अतीसेवनानं खोकला, सर्दी होते. म्हणूनच ती फ्रिजमध्ये ठेवून अधिक थंड करू नये. यामुळे वरील त्रास तर वाढतोच पण त्याचबरोबर तिच्यामधले पोषणमुल्येही कमी होतात. म्हणून ती फ्रिजमध्ये न ठेवता बाहेर ठेवून सामान्य तापमानालाच खावी.

israil
लेख: गाझा संहार : अमेरिका काय करणार?
Stridhan belongs to the woman husband has no right over it
स्त्रीधन महिलेचेच, त्यावर पतीचा अधिकार नाही…
anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप

काकडी सालीसकट का खावी?

काकडीत विपुल प्रमाणात खनिजे आहेत. अनेक जण काकडीची साल काढून काकडी खातात; पण शक्यतो साल काढूच नये. कारण काकडीच्या सालीलगतच क्षार आणि जीवनसत्त्वे विपुल प्रमाणात असतात. साल काढल्यानं ती निघून जातात म्हणून ती सालीसकटच खावी.

नक्की वाचा >> घरी ‘या’ पाच गोष्टी असतील तर अ‍ॅसिडिटीवर मिळवता येईल सहज मात

काकडीचे फायदे

– आम्लपित्त, गॅसेस यांसारख्या विकारांवर काकडी फायदेशीर आहे, यामुळे पोटातील उष्णता कमी होऊन थंडावा निर्माण होतो.

– शरीरावरील भाजलेल्या जखमेची आग होत असेल तर काकडीचा रस लावल्यास लवकर आराम पडतो.

– निद्रानाश ही समस्या भेडसावत असेल तर काकडीचे काप डोक्यावर ठेवून झोपल्यास झोप लवकर येते.

– भूक मंद झाली असेल तर काकडीचे काप करून पुदिना, काळे मीठ, लिंबू रस, मिरे व जिरेपूड घालून खावेत. यामुळे भूक चांगली लागते.

– काकडी ही पित्तशामक असल्याने अपचन, उलटी, मळमळ यांसारख्या त्रासावरही ती फायदेशीर ठरते.