तरुणाईच्या उत्साहाला उधाण आणणारा प्रेमाचा सप्ताह (व्हॅलेंटाइन वीक) आजपासून सुरू होत आहे. फेब्रुवारी महिन्यातील या आठवड्याला आणि १४ फेब्रुवारी या दिवसाला खूप महत्त्व येऊ लागलंय. प्रेमाच्या या दिवसाने तरुणाईला वेड लावलंय असंही म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अगदी ठरवून या दिवशी कुणी प्रेमात पडत नाही, मात्र तरीही वर्षभर याची तयारी सुरू असते. मग गुलाबाची फुलं, गिफ्ट्स, भेटकार्ड, भेटवस्तू काय द्यायचा या गोंधळात तरुणाई गिफ्टशॉपमध्ये दिसतेच. खरंतर वर्षाचे ३६५ दिवस हे प्रेमाचे असतात पण व्हॅलेंटाइन डे की बात ही कुछ और है!

हा दिवस साजरा करत असताना त्यामागचा इतिहास काय हे जाणून घेणेही गरजेचे आहे. रोम राज्यात सुमारे आठशे वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाइन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी घातली होती. हा राजा प्रेम म्हणजे निव्वळ टाईमपास आहे, असे मानत होता. त्यामुळे प्रेम करणार्‍यांचाही त्याला राग यायचा. संत व्हॅलेंटाइनने याला विरोध करून काही सैनिकांचा विवाह लावून दिला. केलेडियसला हे समजल्यानंतर त्याने व्हॅलेंटाइनला तुरुंगात डांबले.

hostel food viral video
“…कोणत्या जेलमध्ये राहतेस?” ‘हॉस्टेल’च्या जेवणाचा ‘हा’ व्हायरल Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण!
Twinkle Khanna reacts on performing in Dawood Ibrahim party
ट्विंकल खन्नाने अंडरवर्ल्ड डॉनच्या पार्टीत केला होता डान्स? प्रतिक्रिया देत म्हणाली, “दाऊदने…”
This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
civil service servants vehicle with a board coming to wrong side
चक्क अधिकाऱ्याच्या गाडीने मोडला वाहतूक नियम! भर रस्त्यावर थांबवताच पेटला वाद, पाहा VIDEO

तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाइनचे जेलरच्या मुलीवर प्रेम बसले. प्रेम केल्याची शिक्षा म्हणून इसवी सन २६९ च्या १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइनला फाशी देण्यात आली होती. फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाइनने प्रेयसीला पत्र लिहिले आणि पत्राचा शेवट ‘युअर व्हॅलेंटाइन, तुझा चाहता’ असा केला. तेव्हापासूनच १४ फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो, अशी आख्यायिका आहे.

आणखी वाचा – प्रेमात लाल गुलाबाला आहे इतकं महत्त्व, कारण…

वेगवेगळ्या देशात व्हॅलेंटाइन डे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. प्रत्येकासाठी प्रेमाच्या संकल्पनाही वेगवेगळ्या असतात. एखादा मुलगा आपल्या ७० वर्षीय आजीलाही गुलाब देऊ तिला व्हॅलेंटाइन बनवू शकतो. एखाद्या आईसाठी आपल्या मुलापेक्षा कोणता प्रेमळ व्हॅलेंटाइन असू शकेल? मित्रदेखील आपला व्हॅलेंटाईन होऊ शकतो. कोणत्याही स्वार्थाविना केलेलं प्रेम हाच व्हॅलेंटाइनचा खरा अर्थ आहे.