Street Shopping Places in Mumbai : मुंबईला ‘स्वप्नांची नगरी’ म्हटले जाते. केवळ भारतातूनच नाही, तर जगभरातून लाखो पर्यटक मुंबईला भेट देण्यासाठी येत असतात. मुंबईत सुंदर ऐतिहासिक पर्यटनस्थळेच नाहीत, तर अतिशय प्रसिद्ध मार्केट्सदेखील आहेत. त्यामुळे तुम्ही मुंबईत फिरण्यासाठी येण्याचा प्लॅन करत असाल, तर मुंबईतील काही खास मार्केट्समध्ये खरेदी केल्याशिवाय तुमची मुंबई ट्रिप पूर्ण होऊच शकत नाही. या मार्केट्समध्ये अगदी ५० रुपयांपासून ते तुम्हाला पाहिजे त्या किमतींपर्यंत आकर्षक कपडे खरेदी करू शकता. केवळ कपडेच नाही, तर मेकअप ते किचनपर्यंतच्या ए टू झेड वस्तू अगदी स्वस्त दरात तुम्ही खरेदी करू शकता. त्यामुळे आज आपण मुंबईतील सर्वांत स्वस्त आणि मस्त शॉपिंगसाठी प्रसिद्ध अशा १० मार्केट्सबद्दल जाणून घेणार आहोत. (Know Best Places in Mumbai for Street Shopping)

कुलाबा कॉजवे, कुलाबा

कुलाबा कॉजवे हे स्ट्रीट शॉपिंगसाठी मुंबईतील सर्वांत लोकप्रिय मार्केट आहे. या मार्केटमध्ये शॉपिंगसाठी नेहमी गर्दी होत असते. ट्रेंडी कपडे, रंगीबेरंगी दागिने आणि प्राचीन घड्याळांपासून ते ब्रास ट्रिंकेट्स, बॅकपॅक आणि फॅशनेबल शूज, चप्पल , तसेच प्राचीन वस्तूही या ठिकाणी मिळतात. मुंबईला भेट देण्यासाठी आलेले अनेक परदेशी पर्यटक या ठिकाणी शॉपिंगसाठी येत असतात. पण, येथे शॉपिंग करताना तुमच्याकडे ‘बार्गेनिंग’चे कौशल्यही असायला हवे.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर

लिंकिंग रोड, वांद्रे

वांद्रे येथील लिंकिंग रोड हा स्ट्रीट शॉपिंगसाठी प्रसिद्ध आहे. अपडेटेड फॅशन आणि बजेट शॉपिंगसाठी तुम्ही लिंकिंग रोडला नक्की भेट देऊ शकता. खास करून वेस्टर्न आऊटफिट व लूकचे कपडे इथे अगदी स्वस्तात मिळतात. ट्रेंडी कपडे, दागिने, शूजची भन्नाट व्हरायटी या ठिकाणी पाहायला मिळते. त्याशिवाय ट्रेंडी बॅग्स, गॉगल्सही तुम्हाला येथे खरेदी करता येतील. अगदी हजार रुपयांतही तुम्ही खूप शॉपिंग या मार्केटमध्ये करू शकता.

हिल रोड, वांद्रे

वांद्रे लिकिंग रोडप्रमाणे हिल रोडदेखील खरेदीसाठी एक उत्तम ठिकाण आहे. सेलिब्रिटीप्रमाणे लूक कॅरी करायचा असेल, तर तुमच्यासाठी हिल रोड हे शॉपिंगसाठी एक चांगले ऑप्शन आहे. फॅन्सी कपडे, फूटवेअर, तसेच बॅग्स आणि ज्वेलरीही येथे तुम्हाला स्वस्तात मिळेल. त्याचसोबत नाईट सूट, काही फॅन्सी कुर्तेदेखील स्वस्त दरात तुम्हाला इथे मिळू शकतात. तसेच ॲंटिक ज्वेलरी व गॉगल्स या वस्तूंच्या लेटेस्ट डिझाइन या ठिकाणी पाहायला मिळतात.

क्रॉफर्ड मार्केट, सीएसटी

क्रॉफर्ड मार्केट हे दक्षिण मुंबईतील १५० वर्षांहून अधिक जुने मार्केट आहे. नेहमी गजबजलेले हे मार्केट इंडियन वेअर व वेस्टर्न वेअर कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. तुम्हाला इथे ज्वेलरी, मेकअप, बॅग्स, तसेच लहान मुलांसाठीही कपडे आणि खेळणी अगदी स्वस्तात खरेदी करता येतात. इतकेच नाही, तर होम डेकोरेटिव्ह वस्तूंपासून ते फळ, भाज्यांपर्यंत अनेक लहान-मोठ्या गोष्टी या ठिकाणी खरेदी करता येतात.

भुलेश्वर मार्केट, मरीन लाईन्स

भरजरी साड्या, रेडीमेड हेवी ब्लाउज, घागरा-चोली, तसेच कुर्ता आणि लेहंग्याचे कापड खरेदी करायचे असेल, तर भुलेश्वर मार्केट उत्तम पर्याय आहे. या ठिकाणी तुम्हाला लग्नासाठी लागणारी ज्वेलरी, मेकअप प्रॉडक्ट्सही अगदी स्वस्त दरात उपलब्ध आहे. लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी अनेक साड्यांची होलसेल दुकाने या ठिकाणी आहेत. येथील प्रत्येक गल्लीत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची दुकाने पाहायला मिळतात.

लोखंडवाला मार्केट, अंधेरी

अंधेरीतील लोखंडवाला मार्केटदेखील स्ट्रीट शॉपिंगसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. फॅशनेबल कुर्ता-लेहंग्यासह सेलिब्रिटी लूकचे कपडे, ब्रँडेड कपड्यांची कॉपी, ट्रेंडी शूज, सँडल येथे स्वस्तात मिळतात. सोबतच वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या बॅग्स, गॉगल्स येथे खरेदी करता येतात.

हिंदमाता मार्केट, दादर

लग्नाची शॉपिंग करायची असेल, तर दादर पूर्वेकडील हिंदमाता मार्केट एक बेस्ट ठिकाण आहे. पारंपरिक, फॅशनेबल साड्या, कुर्ता, पंजाबी ड्रेस, तसेच ड्रेस मटेरियलसाठी या बाजाराला नक्की भेट द्या. बजेटनुसार साडीखरेदीची शेकडो दुकाने या ठिकाणी आहेत. याशिवाय ज्वेलरी आणि रेडिमेड ब्लाऊज खरेदीसाठी अनेक जण या ठिकाणी भेट देतात.

नटराज मार्केट, मालाड

नटराज मार्केट हा मुंबईतील शॉपिंगसाठी चांगला पर्याय आहे. या मार्केटमध्येही तुम्हाला साड्यांपासून ते फॅशनेबल कपड्यांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यासोबत ज्वेलरी, शूज, बॅग्स आणि बऱ्याच विविध प्रकारच्या वस्तूंसाठी हे एक बेस्ट मार्केट आहे. केवळ मुलींचेच नाही तर मुलांच्या कपड्यांचीही अनेक दुकाने या ठिकाणी आहेत.

मंगलदास मार्केट, काळबादेवी

मंगलदास मार्केट हेदेखील मुंबईच्या जुन्या मार्केट्सपैकी एक आहे. तुम्हाला ड्रेस, शर्ट किंवा कोणतेही फॅब्रिक विकत घ्यायचे असेल, तर हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य आहे. येथे तुम्हाला सर्व प्रकारचे प्रिंटेड फॅब्रिक मिळेल; जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिवून घेऊ शकता. तुम्हाला येथे डिझायनर कलेक्शनदेखील मिळेल. डिझायनर कुर्ती व सलवार कमीजचे बरेच पर्याय येथे मिळतील. हे मार्केट भारतातील सर्वांत मोठ्या होलसेल कपड्यांच्या मार्केट्सपैकी एक आहे. तुम्हाला ड्रेस मटेरियलसाठी सर्व प्रकारचे कापड येथे मिळेल. याच्या अगदी जवळ मूलजी जेठा मार्केट (एम. जी. मार्केट)देखील आहे; जे कपड्यांसाठीही प्रसिद्ध आहे.

चोर बाजार, मोहम्मद अली रोड

चोर बाजार हे मुंबईतील सर्वांत जुने स्ट्रीट मार्केट आहे. हे उत्कृष्ट पर्यटनस्थळांपैकीही एक आहे. चोर बाजारात तुम्हाला विविध प्रकारची खेळणी, टेडी बेअर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, जुने मोबाईल, जुनी कास्यशिल्पे, कास्य वस्तू, पुरातन नाणी, कारचे सुटे भाग, कपड्यांपासून ते स्मार्टफोनपर्यंत, ऑटोमोबाईलचे भाग देखील उपलब्ध आहेत. तुम्हाला डेध गली नावाच्या ठिकाणी स्वस्त दरात ब्रँडेड शूजदेखील मिळतील, हे मार्केट जुन्या व सेकंड हॅण्ड वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला घर सजवण्यासाठी अनेक गोष्टी मिळतील. काही गोष्टी इथे महाग असू शकतात; पण त्या गोष्टी तुम्हाला इतर मार्केटमध्ये मिळणार नाहीत.

फॅशन स्ट्रीट (FS मार्केट), मरीन लाईन्स

फॅशन स्ट्रीट हे मुंबईतील सर्वांत जुने मार्केट असल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी तुम्हाला अनेक फॅशनेबल कपडे, फूटवेअर, बॅग्स आणि सनग्लासेस स्वस्तात खरेदी करता येतात. याशिवाय शॉर्ट पॅन्टसह डेनिम्स आणि ट्राउझर्सची अनेक प्रकारची व्हरायटी या ठिकाणी खरेदी करता येते. कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुण, तरुणींसाठी या ठिकाणी अनेक फॅशनेबल कपड्यांचे पर्याय उपलब्ध आहेत.

तसेच मनीष मार्केट, विलेपार्लेमधील इर्ला मार्केट या ठिकाणीही तुम्ही स्वस्तातील शॉपिंगसाठी एक फेरफटका नक्की मारू शकता.