देशात महिलांबरोबर घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या लक्षणीय आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत देशात वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, आपल्या फोनवर एक विश्वासार्ह सुरक्षा साधन असणे पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचे झाले आहे. महिलांसाठी सर्वात उपयुक्त साधन म्हणजे स्मार्टफोन, आणि दुसरे महत्त्वाचे साधन म्हणजे 112 India अॅप, हे अॅप अँड्रॉइड आणि iOS दोन्हीवर उपलब्ध आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
112 India अॅप हे भारताचे अधिकृत आपत्कालीन प्रतिसाद अॅप आहे, हे अॅप गृह मंत्रालयाने महिलांना धोकादायक परिस्थितीत तातडीने मदत करण्यासाठी तयार केले आहे. तुम्ही रात्री उशिरा प्रवास करत असाल, एकटे प्रवास करत असाल , तर हे अॅप तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.
सरकारच्या मते, 112 India मोबाईल अॅप आपत्कालीन परिस्थितीत त्वरीत मदत मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते. एका बटणावर क्लिक करून, तुम्ही तुमच्या लोकेशनसह अलर्ट संदेश पाठवू शकता आणि ११२ वर आपत्कालीन कॉल करू शकता. यामुळे आपत्कालीन सेवा तुमच्यापर्यंत अधिक जलद पोहोचतात.
112 India अॅपची वैशिष्ट्ये
-महिलांसाठी खास आपत्कालीन प्रतिसाद सेवा उपलब्ध.
– तुम्ही विविध प्रकारे मदतीची मागणी करू शकता. यात व्हॉइस कॉल, एसओएस बटण, एसएमएस, ई-मेल, वेब रिक्वेस्ट किंवा पॅनिक बटणा याद्वारे मदतीची मागणी करू शकता.
– अॅप तुमचे लोकेशन आपोआप ओळखते आणि तुम्हाला जवळच्या आपत्कालीन प्रतिसाद वाहनाशी जोडते (कनेक्ट करते.)
– हे अॅप पोलिस, अग्निशमन विभाग, वैद्यकीय पथके आणि आपत्ती व्यवस्थापन पथक यांची सेवा पुरवते.
– राज्याच्या राजधानीत किंवा केंद्रशासित प्रदेशातील केंद्रीकृत नियंत्रण केंद्र यासाठी समन्वय साधते, ज्यामुळे निर्णय घेणे सोपे होते आणि कमीत कमीत वेळेत प्रतिसाद मिळतो.
– या अॅप मध्ये तुम्हाला आपत्कालीन सेवा वाहनांचे ‘लाईव्ह ट्रॅकिंग’ देखील करता येते.
112 India अॅप कसे डाउनलोड करावे ?
-112 India अॅप गूगल प्ले स्टोअर आणि अॅपलच्या अॅप स्टोअरवर उपलब्ध आहे.
– iPhone वापरकर्ते अॅप स्टोअरला भेट देऊ शकतात आणि Android वापरकर्ते गूगल प्ले स्टोअरमध्ये जाऊ शकतात.
– सर्च बारमध्ये 112 India असे टाइप करा.
– शोध परिणामांमधून अॅप वर टॅप करा आणि Install किंवा Get बटणावर क्लिक करा.
– अॅप डाउनलोड आणि इन्स्टॉल होईपर्यंत प्रतीक्षा करा.
112 India अॅप कसे वापरावे?
अॅप उघडा
– तुमच्या होम स्क्रीनवरील 112 India अॅप आयकॉनवर टॅप करा.
– नोंदणी करा
– तुमचा फोन नंबर टाका आणि मिळालेल्या OTP (वन टाइम पासवर्ड) द्वारे तो व्हेरिफाय (सत्यापित) करा.
– तुमचे नाव आणि आपत्कालीन संपर्क यासारखी इतर आवश्यक माहिती भरा.
– अॅप ला तुमच्या लोकेशनचा अॅक्सेस द्या. यामुळे आपत्कालीन सेवांना तुमच्यापर्यंत जलद पोहोचता येईल.
– आपत्कालीन परिस्थितीत अॅप उघडा आणि ‘Emergency’ बटणावर टॅप करा.
– अॅप तुम्हाला पोलिस, अग्निशमन दल किंवा रुग्णवाहिका यांसारख्या जवळच्या आपत्कालीन प्रतिसाद सेवेशी कनेक्ट करून देईल.
– तुम्ही तुमचे लाईव्ह लोकेशन आपत्कालीन संपर्कांबरोबर शेअर करू शकता.