Snake On Tree Video: आजवर तुम्ही चंदनाच्या झाडाला साप विळखा घालून बसतात हे अनेकदा ऐकले असेल पण तुम्हाला माहित आहे का जगात असं एक शहर आहे जिथे चक्क सापांच्या झाडांची बाग आहे. म्हणजे एरवी बाग- बगीचा म्हणताच तुम्हाला छान हिरवळ, मातीचा सुगंध, एक ताजं टवटवीत करणारं वातावरण असं दृश्य डोळ्यासमोर उभं राहत असेल. हो ना? पण सापांची बाग पाहिल्यावर तुमचंही डोकं चक्रावून जाऊ शकतं. बरं मस्करी किंवा गंमत म्हणून नाही तर हा १२ एकरमध्ये पसरलेला हा एक खराखुरा व्यवसाय आहे. फक्त पैसे कमावण्यासाठीच नव्हे तर लोकांचे जीव वाचवण्यासाठी सुद्धा या सापांची बाग खूप कामी येत असल्याचे समजतेय. नेमकं हे प्रकरण काय आणि ही लागवड नेमकी कुठे व का केली जातेय हे पाहूया…
प्राप्त माहितीनुसार, व्हिएतनाममध्ये त्रि रान दांग टैम (डोंग टैम साप फार्म) सापांची बाग आहे. १२ एकरात पसरलेल्या या बागेतील झाडांच्या फांद्यांवर फळांच्या जागी साप लटकलेले असतात. या बागेत तब्बल ४०० प्रजातींचे विषारी साप आहेत. यांचा वापर औषधे व अँटी डॉट्स बनवण्यासाठी केला जातो. तसेच सापांच्या संबंधित अभ्यासकांसाठी सुद्धा ही बाग अत्यंत मत्त्वपूर्ण भूमिका बजावते. सध्या या सापाच्या बागेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या सर्पोद्यानात १९९६ मध्ये बांधलेले एक सर्प संग्रहालय आहे ज्यामध्ये जवळपास १०० दुर्मिळ सापांच्या प्रजाती प्रदर्शित केल्या आहेत आणि सध्या व्हिएतनाममध्ये उपलब्ध असलेल्या बहुतेक सापांचे नमुने आहेत. ऑगस्ट २००५ मध्ये, व्हिएतनाम बुक ऑफ रेकॉर्ड सेंटरने पहिले साप संग्रहालय म्हणून घोषित केले.
हे ही वाचा<< मुंबईत ‘इथे’ आहे जगातील सर्वात मोठी लिफ्ट; मुकेश अंबानींशी आहे खास संबंध, Video पाहून डोकंच धराल
दरम्यान, या सापांच्या बागेची निर्मिती औषधे व अँटीडॉट्स बनवण्यासाठी केली गेली होती. तसेच सापांच्या संबंधित अभ्यासकांसाठी सुद्धा ही बाग अत्यंत मोलाची भूमिका बजावते. येथील संशोधकांनी सर्पदंशावर उपचार कारण्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या फार्ममध्ये पर्यटकांना अन्य प्राणी सुद्धा पाहता येतात. अशाच प्रकारचे एक उद्यान पुण्यात कात्रज येथे सुद्धा आहे.