70th National Film Awards: देशातील कलाकारांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी कला क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारकडून राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. भारतात १९५४ पासून राष्ट्रीय पुरस्कारांची सुरुवात झाली. १६ ऑगस्टला ७० व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर विजेत्यांना बक्षीस म्हणून सरकारकडून काय देण्यात येतं, त्याबद्दल जाणून घेऊयात.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना काय मिळते?

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना पदकानुसार रजत कमळ किंवा सुवर्ण कमळ दिले जाते. यासोबतच रोख बक्षीसही दिले जाते. तर, काही श्रेणींमध्ये फक्त सुवर्ण कमळ किंवा रजत कमळ दिले जाते, कोणतेही रोख बक्षीस दिले जात नाही.

दादासाहेब फाळके पुरस्कार- सुवर्ण कमळ, १५ लाख रुपये, सन्मानपत्र आणि शाल देण्यात येते.

70th National Film Awards : राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘वाळवी’ने मारली बाजी! तर सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला…; पाहा विजेत्यांची यादी

यंदाचे सुवर्ण कमळ विजेते –

या विजेत्यांना सुवर्ण कमळ व तीन लाख रुपये रोख देण्यात येतील.

  1. सर्वोत्कृष्ट चित्रपट: अट्टम (दिग्दर्शक: आनंद एकरशी, निर्माता: अजित जॉय)
  2. दिग्दर्शकाच्या पदार्पणातील सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट: फौजा (दिग्दर्शक: प्रमोद कुमार)
  3. सर्वोत्कृष्ट मनोरंजन करणारा चित्रपट: कांतारा (निर्माता: विजय किरगांडूर, दिग्दर्शक: ऋषभ शेट्टी)
  4. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: उंचाई (दिग्दर्शक: सूरज बडजात्या)
  5. सर्वोत्कृष्ट एव्हीजीसी (अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक) चित्रपट: ब्रह्मास्त्र-भाग 1: शिवा (प्रॉडक्शन हाऊसेस: धर्मा प्रोडक्शन्स, प्राइम फोकस, स्टारलाईट पिक्चर्स; दिग्दर्शक: अयान मुखर्जी)

यंदाचे रजत कमळ विजेते

या विजेत्यांना सुवर्ण कमळ व दोन लाख रुपये रोख देण्यात येतील.

  1. सर्वोत्कृष्ट अभिनेता: ‘कांतारा’साठी ऋषभ शेट्टी
  2. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: ‘तिरुचित्रंबलम’ (तमिळ) नित्या मेनन आणि ‘कच्छ एक्सप्रेस’साठी (गुजराती) मानसी पारेख
  3. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: ‘फौजा’साठी (हरयाणवी) पवनराज मल्होत्रा
  4. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: ‘उंचाई’साठी नीना गुप्ता
  5. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: ब्रह्मास्त्र-भाग 1 मधील ‘केसरिया’साठी अरिजित सिंग

“मला नेहमी सचिनची बायको म्हणतात…”, सुप्रिया पिळगांवकर यांचं वक्तव्य; जया ‘अमिताभ’ बच्चन वादाबद्दल म्हणाल्या…

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतून वगळली दोन नावं

इंदिरा गांधी पुरस्कार विजेत्यांना सुवर्ण कमळ १.२५ लाख रुपये देण्यात यायचे. तर, नर्गिस दत्त पुरस्कार विजेत्यांना चांदीचे कमळ आणि दीड लाख रुपये देण्यात यायचे. पण, फेब्रुवारी २०२४ मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि दिवंगत अभिनेत्री नर्गिस दत्त यांची नावं राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतून वगळली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशींवर आधारे हे बदल करण्यात आले. ‘दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार’ आता ‘दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट’ या नावाने ओळखला जातो.