२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ‘या’ नऊ मंत्र्यांचा पराभव, पंकजा मुंडेंसह ‘या’ बड्या नेत्यांचा समावेश

Ministers who lost maharastra Assembly elections 2019 : २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काही मंत्र्यांचा दारुण पराभव झाला होता. एकूण ३७ मंत्र्यांपैकी नऊ मंत्र्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्या नऊ मंत्र्यांमध्ये दोन कॅबिनेट मंत्री आणि सात राज्यमंत्र्यांचा समावेश होता. जाणून घेऊ त्याबद्दल सविस्तर..

9 Ministers who lost maharastra Assembly elections 2019 | Vidhansabha election 2024
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत 'या' नऊ मंत्र्यांचा पराभव (Photo : Loksatta)

Maharastra Assembly Elections 2019 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ कडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. कोणता पक्ष सत्तेत येणार, कोणाच्या पदरात मुख्यमंत्री पद पडणार, हे पाहण्यास सर्व जण उत्सुक आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये यंदा जोरदार लढत दिसून येईल. मागील विधानसभा निवडणुक २०१९ मध्ये पार पडली होती. त्यानंतरच्या पाच वर्षांत पक्ष, पदांसह सत्ताही बदलली आणि अनेक मोठे राजकीय बदल दिसून आले.

विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये कोणाच्या पदरी अपयश येईल आणि कोणाला यश मिळेल, हे मतदारांच्या हाती आहे; पण तुम्हाला माहीत आहे का की, २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काही मंत्र्यांचा दारुण पराभव झाला होता. एकूण ३७ मंत्र्यांपैकी नऊ मंत्र्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्या नऊ मंत्र्यांमध्ये दोन कॅबिनेट मंत्री आणि सात राज्यमंत्र्यांचा समावेश होता. जाणून घेऊ त्याबद्दल सविस्तर… (9 Ministers who lost maharastra Assembly elections 2019)

Shindes supporters in Navi Mumbai signaled their support for vijay Nahata
मुख्यमंत्र्यांसमोर नाईक विरोधाचा पाढा
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Cabinet meeting Ajit pawar left Cm Eknath Shinde
Ajit Pawar: अजित पवारांची मंत्रिमंडळ बैठकीतून १० मिनिटांत एक्झिट, विजय वडेट्टीवारांना मात्र भलताच संशय; म्हणाले, “त्यांना बाजूला सारण्याचे…”
bjp eight minister lost election
Haryana Assembly Election 2024 : हरियाणात भाजपाला पूर्ण बहुमत; पण कृषी आणि अर्थमंत्र्यांसह ‘या’ आठ मंत्र्यांचा पराभव
Eknath shinde influence on modi
विश्लेषण: मुख्यमंत्र्यांच्या प्रभावापुढे ठाण्यात भाजपची कोंडी? पंतप्रधान दौऱ्याचा काय सांगावा?
मंत्रालयात विधानसभा उपाध्यक्षांसह आमदारांच्या जाळ्यांवर उड्या मुख्यमंत्री भेट देत नसल्याने टोकाचे पाऊल
Prime Minister Narendra Modi Home Minister Amit Shah visit Thane district
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपची मोर्चेबांधणी सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा ठाणे जिल्हा दौरा
Udayanidhi Stalin become deputy chief minister
Udhaynidhi DCM : तमिळनाडूच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल; उदयनिधी यांची उपमुख्यमंत्री पदी नियुक्ती, तर तुरुंगातून सुटून आलेल्या नेत्यालाही मंत्रीपदाची माळ!

पंकजा मुंडे (कॅबिनेट मंत्री, भाजपा)

२०१९ च्या निवडणुकीत सर्वांत मोठ्या पराभवाची नामुष्की ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पदरी आली होती. त्यांचा चुलतभाऊ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी परळीमध्ये ३० हजारपेक्षा अधिक मतांनी पंकजा मुंडे यांना हरवले होते. पंकजा मुंडे या भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पुढे चालवीत आहेत.

राम शिंदे (कॅबिनेट मंत्री, भाजपा)

१९९५ पासून भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कर्जत जामखेडमध्ये नगरचे पालकमंत्री, तसेच जलसंधारण मंत्री राम शिंदे यांना पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी ४३ हजारपेक्षा अधिक मतांनी शिंदे यांना हरवले.

संजय (बाळा) भेगडे (राज्यमंत्री, भाजपा)

विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील शेळके यांनी इतिहास घडविला. राष्ट्रवादी काँग्रेसने २५ वर्षांचे भाजपाचे या मतदारसंघातील वर्चस्व जमीनदोस्त केले.भाजपा नेते व कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन संजय (बाळा) भेगडे यांचा ९५ हजार मतांनी दारुण पराभव झाला. प्रदीर्घ काळापासून भाजपाचे नेते असलेल्या शेळके यांनी ऐन निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.

विजय शिवतारे (राज्यमंत्री, शिवसेना)

पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील तीन वेळा शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आलेल्या जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते संजय जगताप यांनी पराभूत केले.

अर्जुन खोतकर (राज्यमंत्री, शिवसेना)

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांना जालना मतदारसंघातून काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल यांनी सुमारे २० हजार मतांनी हरविले.

अनिल बोंडे (राज्यमंत्री, भाजप)

२०१९ च्या निवडणुकीत अमरावतीमधील मोर्शी विधानसभा मतदारसंघात कृषिमंत्री भाजप नेते अनिल बोंडे यांचा स्वाभिमानी पक्षाचे नेते देवेंद्र भुयार यांनी हरविले होते.

जयदत्त क्षीरसागर (राज्यमंत्री, शिवसेना)

बीड विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांना त्यांचाच पुतण्या राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांनी पराभूत केले होते. जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीपूर्वी आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम ठोकत थेट शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर जूनमध्ये त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्रिपद दिले होते.

अंबरीश आत्राम (राज्यमंत्री, भाजप)

नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम यांनी भाजपाचे राज्याचे आदिवासी विकास व वन राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अंबरीश आत्राम यांचा जवळपास १५ हजार मतांनी पराभव केला होता.

मदन येरावार (राज्यमंत्री, भाजपा)

यवतमाळ मतदारसंघामध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे अनिल ऊर्फ ​​बाळासाहेब शंकरराव मांगूळकर हे आठ हजार मतांच्या फरकाने निवडून आले होते. या निवडणुकीत ऊर्जा, पर्यटन, अन्न व औषधी प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांचा त्यांनी पराभव केला होता.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 9 ministers who lost maharastra assembly elections 2019 big leaders including pankaja munde faced defeat election news ndj

First published on: 19-08-2024 at 19:03 IST

संबंधित बातम्या