First college in Maharashtra : असं म्हणतात, कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा हा त्या संस्थेचे ग्रंथालय आणि माजी विद्यार्थी यावर ठरत असतो. लोकमान्य टिळक, वि. का. राजवाडे, सेनापती बापट, गोपाळ गणेश आगरकर ही एवढी दिग्गज मंडळी एखाद्या संस्थेचे माजी विद्यार्थी असतील तर ती शैक्षणिक संस्था कशी असेल? आज आपण महाराष्ट्रातील पहिल्या महाविद्यालयाविषयी जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय

पुण्यातील १८२१ साली स्थापित झालेले डेक्कन कॉलेज हे भारतातील तिसरे आणि महाराष्ट्रातील पहिले सर्वात जुने महाविद्यालय आहे. पेशवे काळात वेद शास्त्रांच्या अभ्यासासाठी संस्कृत पाठशाळांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या मृत्युपत्रातील तरतुदीनुसार दक्षिणा निधी उपलब्ध करून दिला जात असे. दक्षिणा निधीतून पुणे येथे संस्कृत पाठशाळा उभी असावी, म्हणून विश्रामवाड्यात डेक्कन कॉलेजची मुहूर्तमेढ रोवली गेली.

who is sanjay verma
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलेले संजय वर्मा कोण आहेत? जाणून घ्या…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Nagpur video
“उठा उठा दिवाळी झाली, पुणे मुंबईला जाण्याची वेळ आली” नागपूरचा VIDEO होतोय व्हायरल
saras baug pune diwali pahat
“आमच्याकडे सारसबाग आहे!”; काकांचा डान्स अन् तरुणांचा धिंगाणा, पुण्यातील दिवाळी पहाटचा हा व्हिडीओ पाहिलात का?
Shikhar Dhawan Spotted With Mystery Girl At Airport Avoids Sharing Frames Video Goes Viral
Shikhar Dhawan Video: घटस्फोटानंतर शिखर धवन पुन्हा प्रेमात? मिस्ट्री गर्लबरोबरचा Video होतोय व्हायरल, ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
Pam Kaur appointed as Chief Financial Officer at Hong Kong and Shanghai Banking Corporation
पाम कौर… ‘एचएसबीसी’च्या सीएफओ
Aishwarya Narkar And Avinash Narkar Dance Video (1)
Video: ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकरांचा दिवाळी स्पेशल Reel व्हिडीओ पाहिलात का? नेटकरी करतायत कौतुक
Firecrackers video
ऐन दिवाळीत मुलांच्या हॉस्टेलमध्ये पेटला वाद! विद्यार्थ्यांनी एकमेकांवर सोडले रॉकेट, धक्कादायक घटनेचा Video Viral

हेही वाचा : मिथून चक्रवर्ती ते कियारा अडवाणी, बॉलीवूडमधील ‘या’ लोकप्रिय कलाकरांची खरी नावे माहित आहेत का?

पाहा व्हिडीओ

डेक्कन कॉलेजचा प्रवास

पुढील काळामध्ये विश्रामवाड्याची जागा अपुरी पडू लागली, तेव्हा १८६३ मध्ये हे महाविद्यालय विश्रामबाग वाड्यातून पुणे उपनगरातील वानवडी येथे स्थलांतरित करण्यात आले; पण विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता या विद्यालयासाठी कायमस्वरुपीच्या प्रशस्त इमारतीची गरज भासू लागली. यासाठी दुसरे बॅरोनेट जमशेदजी जीजीभॉय यांनी एक लाख रुपयांचे अनुदान दिले आणि नवीन इमारत उभी राहिली.

१५ ऑक्टोबर १८६४ मध्ये पुणे शहराबाहेर येरवडा येथे रम्य परिसरात विद्यमान इमारतीचे उद्धाटन तेव्हाचे बॉम्बेचे गव्हर्नर सर हेनरी बार्टले फ्रेरे यांच्या हस्ते करण्यात आले. वास्तु बांधकामाचे कार्य पूर्णत्वास आल्यानंतर सन १८६८ मध्ये या दिमाखदार वास्तुमध्ये या कॉलेजचं स्थलांतर झालं आणि त्याचं नामांतरण ‘डेक्कन कॉलेज’ असं झालं

हेही वाचा : Countries Without Natural Forest : काय सांगता? ‘या’ देशांमध्ये नैसर्गिक जंगलच नाही! जाणून घ्या, कोणते आहेत हे देश?

एकेकाळी इंग्रजांनी बंद केलं होतं डेक्कन कॉलेज

विसाव्या शतकाच्या प्रारंभी डेक्कन महाविद्यालयात शिक्षण घेणे विद्यार्थ्यांना महागडं भासू लागलं, त्यावेळेस पुणे शहराच्या मध्यवर्ती परिसरात काही नवीन महाविद्यालये उदयास आली होती. तिथे विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे सोयीचे ठरत होते. यामुळे या महाविद्यालयाच्या विद्यार्थी संख्येत घट होत गेली. त्यानंतर निकृष्ट आर्थिक परिस्थितीचे कारण पुढे करत ब्रिटीश सरकारने १९३४ मध्ये डेक्कन कॉलेज कायमचं बंद करण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन माजी विद्यार्थ्यांनी या निर्णयाविरोधात मोठा लढा दिला. उच्च न्यायालयाने त्यांच्याच बाजूने निर्णय देत शासनाला हे कॉलेज पुन्हा सुरू करून कायमस्वरुपी त्याची जबाबदारी उचलण्याचा निर्णय दिला. १७ ऑगस्ट १९३९ रोजी डेक्कन कॉलेज पुन्हा सुरू झाले. आता हे कॉलेज ‘डेक्कन कॉलेज, पदव्युत्तर आणि संशोधन संस्था’ म्हणून ओळखले जाते

सुमारे २०० वर्षांचा शैक्षणिक वारसा जपत भाषा, संस्कृत आणि पुरातत्त्वशास्त्र या विषयाचं अध्ययन, अध्यापन आणि संशोधन अशी जबाबदारी सांभाळत ही संस्था तिचं वेगळंपण टिकवून आहे.