पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन दस्तावेज असे आहेत, जे प्रत्येक भारतीयासाठी आवश्यक आहेत. मात्र, सरकारने आधार कार्डसोबत पॅन लिंक करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही ३१ मार्च २०२३ पूर्वी आधारशी पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड रद्द होईल. म्हणजे प्राप्तिकर परतावा भरण्यासोबतच तुम्ही बँकेतून पैशांचा व्यवहार करू शकणार नाही.
१००० रुपये दंड भरावा लागेल
त्याचप्रमाणे ३१ मार्च २०२३ नंतर आधारशी पॅन लिंक करण्यासाठी १००० रुपये दंड भरावा लागेल. अशा परिस्थितीत सर्व भारतीय नागरिकांनी ३१ मार्च २०२३ पूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक करावे. तुमचा पॅन आधारशी लिंक झाला आहे की नाही हे कसे शोधायचे असा प्रश्न तुम्हाला आता पडला असेल, पण त्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. तुमचा पॅन आधारशी लिंक झाला आहे की नाही हे तुम्ही घर बसल्या तपासू शकता.
पॅन आधारशी लिंक आहे की नाही हे कसे तपासायचे
पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी तुम्हाला प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
यानंतर तुम्हाला ‘Link Aadhaar Status’ वर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल.
यामध्ये तुम्हाला ‘View Link Aadhaar Status’ वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्या समोर एक मेसेज येईल.
यावरून तुम्हाला कळेल की तुमचा आधार आणि पॅन लिंक आहे की नाही.
आधारशी पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत अनेक वेळा बदलण्यात आली आहे. यापूर्वी पॅनला आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ होती. मात्र, नंतर ५०० रुपयांच्या दंडासह ती ३० जून २०२२ पर्यंत वाढवण्यात आली. त्याचप्रमाणे आता ३१ मार्च २०२३ नंतर १००० रुपये दंड भरावा लागेल.