Aadhaar Verification : आजकाल अनेक सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डची गरज असते. म्हणून महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड गणले जाते. पण अनेकदा आधार कार्डचा गैरवापर होतो. ज्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हे टाळण्यासाठी आधार कार्ड ऑनलाइन किंवा ऑफलाइन व्हेरिफाय करणे आवश्यक आहे. पण तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने क्यूआर कोड स्कॅन करुनही आधार कार्ड वहे
UIDAI द्वारे भारतातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्डवर १२ अंकी विशिष्ट ओळख क्रमांक दिला जातो, जो आधार क्रमांक म्हणूनही ओळखला जातो. हे तुमचे एक प्रकारचे ओळखपत्र असते, त्यावर तुमच्या राहण्याच्या पत्त्यासह अनेक महत्त्वाची माहिती असते.
आधार वापरून तुम्ही अनेक सरकारी सुविधांचा लाभ घेऊ शकता. याशिवाय बँक अकाउंट ओपन करण्यासाठीही आधार कार्डची गरज भासते.
या कारणामुळे आधार सुरक्षित आणि अपडेटेड ठेवणे आवश्यक आहे. पण अनेक कारणांमुळे आधार कार्ड अनेकदा डिसेबल केले जाते. अशा स्थितीत तुम्हाला अनेक सेवांचा लाभ घेण्यापासून वंचित राहावे लागू शकते. यामुळे वेळोवेळी आधार कार्ड व्हेरिफाय करून घ्या. आधार कार्ड व्हेरिफिकेशन ऑनलाइन करणे सोपे आहे. हे काम तुम्ही घरी बसूनही करू शकता.
क्यूआर कोड स्कॅन करून आधार कार्ड करा व्हेरिफाय
आधार कार्डवर छापलेल्या क्यूआर कोडनेही तुम्ही सहज व्हेरिफिकेशन करू शकता, पण यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइलमध्ये MAadhaar ॲप डाउनलोड करावे लागेल. तुम्ही हे ॲप गुगल प्ले स्टोअर किंवा इतर अधिकृत ॲप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता.
आता ॲप ओपन करून त्यात तुम्ही QR कोडच्या ऑप्शनवर क्लिक करा. स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात तुम्हाला QR कोडचे आयकन दिसेल.
तुम्ही त्या आयकनवर क्लिक करताच तुमच्या फोनचा कॅमेरा ओपन होईल. तुम्हाला ज्या आधार कार्डचे व्हेरिफिकेशन करायचे आहे त्यावर छापलेल्या QR कोडवर कॅमेरा ठेवा.
आता ते ॲप तुमच्या आधार कार्डवरचा QR कोड स्कॅन करेल आणि संबंधित कार्डधारकाचे नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता आणि फोटो यांसारखे तपशील प्रदर्शित करेल. हे तपशील UIDAI द्वारे डिजिटल साइन केलेले असतात.
याशिवाय, व्हेरिफिकेशन करण्याचे इतरही अनेक ऑप्शन्स आहेत. UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही आधार कार्ड व्हेरिफाय करू शकता. याशिवाय १९४७ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करूनही हे काम करता येईल. त्याच वेळी कोणत्याही आधार नोंदणी केंद्रामध्ये त्याची ऑफलाइन व्हेरिफिकेशनही केली जाऊ शकते.