Aadhaar Card Updates: आधार कार्ड हा भारतातील सर्वांत महत्त्वाचा आणि आवश्यक असा दस्तऐवज मानला जातो; जो विविध उद्देशांसाठी वापरला जातो. आधार कार्डाचा १२ अंकी युनिक आयडी नंबर बँक अकाऊंट, कॉलेजमधील प्रवेश किंवा अनेक प्रकारचे अर्ज अशा बऱ्याच ठिकाणी हा नंबर खूपच आवश्यक असतो. अनेकांकडे आधार कार्ड तर आहे. पण, त्यात आपण आपली माहिती अपडेट करू शकतो का? त्याची मर्यादा किती? हे अनेकांना माहीत नसतं.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) कार्ड वापरकर्त्यांना आधार कार्डाची माहिती अपडेट करण्याची परवानगी देत. पण, त्यात काही मर्यादा आहेत. आज या लेखातून आपण आधार कार्डवर एक किंवा दोन वेळा बदलता येणाऱ्या मर्यादांबद्दल जाणून घेणार आहोत.

हेही वाचा… UPI आणि UPI Wallet मधला फरक तुम्हाला माहितीये का? कोणती पद्धत आहे अधिक सुरक्षित? जाणून घ्या

नावात बदल

सर्वांत महत्त्वपूर्ण निर्बंध नाव बदलण्यावर आहे. आधार कार्ड वापरताना तुम्ही तुमच्या आयुष्यात दोनदा नाव बदलू शकता. ही बाब चुका सुधारणे आणि लग्नानंतर आडनाव जोडणे या दोन्हींसाठी लागू होते.

लिंगबदल

त्याचप्रमाणे आधार कार्डावर फक्त एकदाच लिंगबदलाची माहिती नमूद केली जाऊ शकते. जर तुम्ही तुमचे लिंग अपडेट करताना चुकलात, तर ते पुन्हा बदलता येणार नाही.

हेही वाचा… भारतातील ‘या’ शहराला म्हणतात ‘सिटी ऑफ जॉय’, यामागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या…

अमर्यादित पत्ताबदल

तुमच्या आधार कार्डावरील नाव आणि लिंगबदलापेक्षा पत्ता बदलणे आणि अपडेट करण्यावर कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही हा बदल बऱ्याच वेळा करू शकता. जे लोक वारंवार स्थलांतर करतात, त्यांच्यासाठी ही बाब सोईची ठरते. तुम्ही पाण्याची बिले, वीज बिले किंवा भाडेकरार यांसारखी कागदपत्रे वापरून, तुमचा पत्ता ऑनलाइन पद्धतीने अपडेट करू शकता. वैकल्पिकरीत्या तुम्ही आधार सेवा केंद्राला भेट देऊ शकता.

संवेदनशील माहिती अपडेट करताना सावधगिरी बाळगा

तुम्ही तुमच्या आधार कार्डावर संवेदनशील माहिती अपडेट करताना सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. उदा.

नाव

लिंग

जन्मतारीख

हेही वाचा… ‘या’ भारतीय रेल्वे स्थानकांवरून थेट जाऊ शकता परदेशात; जाणून घ्या सविस्तर माहिती

यातील एक जरी गोष्ट चुकली तरी त्याचे दीर्घकाळ दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. तुमची अपडेट केलेली रिक्वेस्ट सबमिट करण्यापूर्वी सर्व डिटेल्स दोनदा तपासा.