Aadhar Card Update : भारतात आधार कार्ड हा आता एक महत्वाचा पुरावा मानला जातो. अनेक सकारी कामांसाठी आता आधार कार्ड सादर करावे लागते. अगदी पीएफपासून ते रेल्वे तिकीट काढण्यापर्यंत अनेक ठिकाणी पहिल्यांदा आधार कार्ड दाखवावे लागते. त्यामुळे वाहन परवाना, पॅन कार्ड, मतदान, ओळखपत्र, रेशन कार्डप्रमाणेच आता आधार कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. यामुळे देशातील जवळपास ९० टक्क्यांहून अधिक लोकांकडे आधार कार्ड आहे. पण वेळोवेळी आधार कार्डमध्ये अपडेट करणे महत्वाचे असते. यात लग्नानंतर विशेषत: महिलांना त्यांचे नाव, आडनाव आणि पत्ता बदलून घ्यावा लागतो. आधारकार्डवरील बदल करण्यासाठी काही कागदपत्रे सादर करत प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
लग्नानंतर आधार कार्डमध्ये बदल कसे करायचे?
लग्नानंतर महिला पतीच्या घरी येतात. अशावेळी लग्नानंतर त्यांना त्यांच्या आधार कार्डवर पतीने नाव, आडनाव अपडेट करणे गरजेचे असते. पण ते कसे करायचे अनेकांना समजत नाही. पण काळजी करु नका. आधार कार्डमधील बदलाची ही प्रक्रिया खूप सोपी आणि सुटसुटीत आहे.
आधार केंद्रावर जाऊन करा बदल
लग्नानंतर महिलांना आधार कार्डवरील पत्ता, नाव, आडनाव बदलण्यासाठी जवळच्या आधार कार्ड केंद्रावर जावे लागते. यानंतर तिथे तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल. या अर्जात तुम्हाला मागितलेली माहिती , आवश्यक कागदपत्र जोडावी लागतील, त्याद्वारे पत्ता अपडेट करण्यात येईल, पतीच्या आधार कार्ड आधारे पत्नीचा पत्ता, नाव, आडनाव बदलले जाईल.
लग्नानंतर तुम्हाला नाव, आडनावात बदल करण्यासाठी लग्नपत्रिका पुरावा म्हणून जोडावा लागतो. विवाह प्रमाणपत्र, पतीच्या आधार कार्डची प्रत, जुने आधार कार्ड महिलांना अर्जासह जोडावे लागते. आडनाव बदलण्यासाठी महिलांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. पण तुम्ही लग्न पत्रिका देखील जोडू शकता, यानंतर तुम्हाला बायोमॅट्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक स्लिप मिळेल ज्यात अपडेट रिक्वेस्ट नंबर असेल, ही स्लिप तुम्हाला सांभाळून ठेवावी लागेल, कारण अर्जाची प्रक्रिया कुठपर्यंत आली हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही स्लिप विचारली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेसाठी तुम्हाला ५० रुपये खर्च येतो.
या सर्व बदलानंतर काही दिवसांनी अपडेट आधार कार्ड तुमच्या नवीन पत्त्यावर म्हणजे पतीच्या घरी येईल, हे आधार कार्ड तुम्ही आधार नंबरचा वापर करुन ऑनलाईन सुद्धा डाऊनलोड करु शकता.
तुम्हाला आधार कार्डवरील हे बदल पोस्ट जाऊन देखील करता येतात.