Adhaar Card Linked With Bank For Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदाराचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे. ज्यांची खाती आधार कार्डशी लिंक नाहीत, त्यांची खात्री स्वीकारली जात नाहीत. सरकारकडून अशी खाती लिंक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात आदेश दिले आहेत. परंतु, तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे की नाही हे कसं तपासाल? तेच या माध्यमातून जाणून घेऊयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आधार कार्डच्या संकेतस्थळावरून कसं तपासाल (Through UIDAI (Aadhaar) website)
- https://myaadhaar.uidai.gov.in/ या संकेतस्थळावर जा
- संकेतस्थळावर उजव्या बाजूला लॉगिन बार असेल. तिथे तुमच्या आधार कार्डचा नंबर आणि कॅप्चा टाकून सबमिट करा.
- सबमिट केल्यानंतर तुम्हाला ओटीपी प्राप्त होईल. ओटीपी एक मिनिटाच्या कालावधीत आला नाही तर थोडावेळा थांबून रिसेंड ओटीपी क्लिक करा. तुम्हाला ओटीपी प्राप्त होईल.
- ओटीपी सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर सर्व्हिसेस हे पेज ओपन होईल. तिथं खालच्या बाजूला बँक सिंडिग स्टेटस नावाचा बॉक्स असेल. तिथे क्लिक केल्यानंतर तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेत लिंक आहे याची माहिती समोर येईल.
फोनद्वारे तपासा (Through phone call)
- 99991# हा क्रमांक तुमच्या मोबाईलवरून डायर करा.
- त्यानंतर तुमच्या आधार कार्डा १२ अंकी क्रमांक टाका
- हाच नंबर पुन्हा टाका
- आता तुम्हाला तुमच्या बँकेचं आधार कार्ड लिकिंग स्टेटस तुम्हाला प्राप्त होईल.
mAadhaar App वरून तपासा (Through mAadhaar app)
- mAadhaar App डाऊनलोड करा.
- या अॅपवर लॉगिन करा.
- My Aadhaar वर क्लिक करा.
- Aadhaar Bank Account Link status सिलेक्ट करा.
- तुमच्या आधार कार्डचा नंबर, सिक्युरिटी कोड टाका आणि रिक्वेस्ट ओटीपीवर क्लिक करा.
- ओटीपी सबमिट केल्यानंतर Verify वर क्लिक करा. तुमच्यासमोर आता लिंक असलेले बँक अकाऊंट येईल.
बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ (Ladki Bahin Yojana)
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही, अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे. कोणतीही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाहीत. १७ ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावेत, असे आवाहनही आदिती तटकरे यांनी केले.
टप्प्याटप्प्याने वाढवणार योजनेतील रक्कम
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या आर्थिक वर्षात योजनेसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होत जाईल, तसे सद्यस्थितीत असणारी दरमहा 1 हजार 500 रुपयांची रक्कम वाढवत जाऊन टप्प्याटप्प्याने ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिली.