Aditya Roy Kapoor Situationship Meaning: कॉफी विथ करणच्या नव्या भागात करण जोहरने आदित्य रॉय कपूर आणि अर्जुन कपूरशी गप्पा मारल्या. अन्य भागांइतका हा भाग अद्याप चर्चेत आला नसला तरी यातून एक संकल्पना मात्र पुन्हा नव्याने ट्रेंड होत आहे. झालं असं की, आदित्यला अनन्या पांडेसह त्याच्या नात्याबद्दल विचारले असता तो लाजला, त्याने अफवेला दुजोरा दिला नाही पण अनन्याचे कौतुक केले. करणचा प्रश्न टाळताना तो म्हणाला की, “तू मला कोणतंही सिक्रेट विचारलं नाहीस तर मी तुला सगळी खरीच उत्तरं देईन” ज्यावर पुन्हा करणने त्याला अनन्या पांडेने केलेली ‘अनन्या कॉय (लाजाळू) कपूर” ही कमेंट सांगितली जी ऐकून आदित्य म्हणाला हे ऐकून मी आता “आदित्य जॉय (आनंदी) कपूर” झालो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रश्नांची अस्पष्ट उत्तर मिळत असतानाच शेवटी करणने थेट मुद्द्याला हात घालून म्हणजे तू आता ‘आनंदाने सिच्युएशनशिप’ मध्ये आहेस का? असे विचारले. यावर आदित्यने मी आनंदी आहे असं म्हटलं. सिच्युएशनशिप ही संकल्पना केवळ बॉलिवूड किंवा सेलिब्रिटी जगतातच नव्हे तर सामान्य तरुणांमध्ये सुद्धा अत्यंत प्रसिद्ध आहे. पण याचा अर्थ नेमका काय व यानुसार नात्यांची व्याख्या कशी बदलते हे आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया..

सोशल मीडिया अभ्यासक मुक्ता चैतन्य यांनी आपल्या एका वर्कशॉपमधील चर्चेचा दाखला देत यापूर्वी लोकसत्ताच्या विशेष लेखात ‘सिच्युएशनशिप’ बद्दल काही उलगडे केले होते. यापूर्वी लग्नापुर्वीच्या नात्याला ‘रिलेशनशिप’ म्हणायचे त्यात हळू हळू ‘सिरीयस रिलेशन’, ‘कॅज्युअल रिलेशन’ हे प्रकार पडले. नावाप्रमाणेच एक नातं सुरुवातीपासूनच लग्न ठरवून केलेलं आणि दुसरं म्हणजे डेटिंगपुरतं मर्यादित असं स्वरूप होतं. हळूहळू यात ‘फ्रेडन्स विथ बेनिफिट्स’ या संकल्पनेची भर पडली, याचा अर्थ फक्त दोन व्यक्ती एखादी शारीरिक किंवा मानसिक गरज पूर्ण करण्यासाठी एकमेकांसह राहतात.

आता मुद्दा सिच्युएशनशिप काय तर, “आम्ही फक्त मित्र नाही. मैत्रीपेक्षा अधिक काहीतरी आमच्यात आहे पण आम्हाला इतक्यात कमीट करायचं नाहीये. डेट करायचं नाहीये. आम्ही एकमेकांचे गर्लफ्रेण्ड/ बॉयफ्रेण्ड नाहीयोत.” हे नातं प्रसंग व परिस्थितीवर आधारित असतं, ज्यात तुम्ही एकमेकांसह अगदी रिलेशनमध्ये असल्यासारखेच वागता पण त्या नात्याला कोणताही ‘टॅग’ नसतो.

कॉफी विथ करणच्या एपिसोडची झलक

सिच्युएशनशिप निवडण्याचं कारण काय?

१) ऑनलाईन डेटिंगचे वाढते प्रमाण पाहता लॉन्ग डिस्टन्स म्हणजेच वेगवेगळ्या शहरात राहत असताना नात्यात असण्याची पद्धत पण सुरु झाली आहे. अशावेळी एकमेकांप्रती भावना असतानाही फक्त त्यात अडकून राहू नये म्हणून हा सिच्युएशनशिप पर्याय निवडला जातो.

२) डेटिंगचे प्रमाण १५ -१६ व्या वर्षापासूनच सुरु झाल्याने शिक्षण व नोकरीकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून सिच्युएशनशिप पर्याय आपलासा वाटतो.

३) समलिंगी टीन्स ज्यांनी त्यांचा लैंगिक अग्रक्रम घरात सांगितलेला नसतो किंवा सांगितला असेल तर त्याला घरुन पाठिंबा नसतो. अशावेळी सिच्युएशनशिप सहज सोपा मार्ग वाटतो.

वयाच्या विशीत साधारणतः लग्न किंवा लिव्ह इनचा विचार केला जातो तेव्हा ही सिच्युएशनशिप संपवली जाते. अर्थात डेटिंगचा प्रकार काहीही असला तरी आता वयाच्या सुरुवातीच्या टप्यातच नात्यामध्ये जपाव्या लागणाऱ्या अनेक नाजूक गोष्टींबद्दल जाणीव करुन देणंही तितकंच महत्वाचं आहे.