अमरनाथ यात्रा २०२३ ला १ जुलैपासून सुरुवात होणार आहे. या यात्रेसाठी आता नाव नोंदणी सुरु झाली आहे. ६२ दिवसांची ही पवित्र यात्रा १ जुलै २०२३ ला सुरु होईल आणि ३१ ऑगस्ट २०२३ रोजी संपेल. हे पवित्र स्थळ राजधानी श्रीनगर शहरापासून १४१ किलोमीटर अंतरावर वसलेल्या लाडर व्हॅलीमध्ये आहे. जे वर्षभर हिमनद्या आणि बर्फाच्छादित पर्वतांनी व्यापलेले आहे. या यात्रेसाठी देशासह जगभरातून पर्यटक, भक्त येत असतात. पण यात्रेला जाण्यासाठी तुम्हाला नोंदणी करणे बंधनकारक असते.
तुम्ही जवळच्या अधिकृत बँकेच्या शाखेतून अमरनाथ यात्रेसाठीचा नोंदणी फॉर्म आणि मेडिकल सर्टिफिकेट मिळवू शकता. हा फॉर्म भरल्यानंतर तु्म्हाला तो बँकेच्या शाखेत १०० रुपयांचे शुल्क देऊन जमा करावा लागतो. यानंतर प्रत्येक व्यक्तीला एक टोकन नंबर दिला जातो, जो तुमच्या अमरनाथ यात्रेचा प्रवेश पास असतो. तुम्ही ही यात्रेसाठी ठरावीक ठिकाणानंतर चालत किंवा हेलिकॉप्टरने पोहचू शकता.
अमरनाथ यात्रेसाठी कोण पात्र असते?
नियमांनुसार, १३ ते ७० वयोगटातील कोणीही २०२३ मध्ये अमरनाथ यात्रेसाठी रजिस्ट्रेशन करु शकते. पण यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने, सहा आठवडे किंवा त्याहून अधिक गरोदर असलेल्या महिलांना या यात्रेसाठी परवानगी नाही.
अमरनाथ यात्रा २०२३ साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया
१) श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड (SASB) च्या अधिकृत वेबसाइट http://www.jksasb.nic.in वर जा.
२) ऑनलाइन सर्व्हिसेज टॅबवर क्लिक करा आणि ‘रजिस्टर’ बटणावर क्लिक करा.
३) आवश्यक फील्ड पूर्ण करा सबमिट बटणावर क्लिक करा.
४) अर्ज प्रक्रियेनंतर मोबाइल डिव्हाइसवर एक मेसेज येईल. यानंतर तुम्ही एंटर केलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक OTP येईल.
५) नावनोंदणी फी जमा करा.
६) तुमची नोंदणी पूर्ण केल्यानंतर यात्रा परमिट डाउनलोड करा.
अमरनाथ यात्रेसाठी मेडिकल सर्टिफिकेट कसे मिळवाल?
१) मेडिकल सर्टिफिकेटसाठी मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेतून एक मेडिकल फॉर्म घ्यावा लागतो.
२) तुम्हाला हा फॉर्म आवश्यक डेटासह पूर्णपणे भरावा लागतो.
३) मेडिकल फॉर्मवर शक्य तितक्या लवकर डॉक्टर आणि स्थानिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्याची सही मिळवावी लागते.
४) मेडिकल फॉर्म पूर्ण करण्यासाठी तुमची तब्येत आधी चांगली असणे आवश्यक आहे.
५ ) कारण यात्रेचा ट्रेक पूर्ण करण्यासाठी तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम असायला हवे, कारण जास्त उंचीवर पोहचल्यानंतर अनेकांना ऑक्सिजन घेण्यास अडचणी येतात.
हेलिकॉप्टर कसे बुक करावे?
हेलिकॉप्टरसाठी बुकिंग अगोदर किंवा नंतरही केले जाऊ शकते. बालटाल आणि पहलगाम या ठिकाणी तुम्हाला हेलिकॉप्टर बुकिंग करता येते. सर्वात आव्हानात्मक प्रवास हेलिकॉप्टरने पूर्ण केला जातो, अशा प्रकारे अमरनाथ यात्रेसाठी हेलिकॉप्टर बुक करून तुम्ही तुमचा ट्रेक एकाच दिवसात पूर्ण करू शकता.
हेलिकॉप्टरची नोंदणी करण्यासाठी प्रति व्यक्ती २००० ते ३५०० रुपये खर्च येतो. अमरनाथ यात्रेसाठी हेलिकॉप्टर आरक्षित करण्यासाठी +911942313146 वर कॉल करा किंवा shriamarnathjishrine.com वर जा.