Amazon Black Friday Sale: ब्लॅक फ्रायडे सेलच्या निमित्ताने ऍमेझॉनवर इयरफोन्स, ब्लूटूथ स्पीकर, कॅमेरा अॅक्सेसरीज, स्मार्टफोन, टॅब्लेट आणि लॅपटॉप यांसारख्या विविध उत्पादनांवर भन्नाट डील्स मिळत आहेत. JBL, BOAT सारख्या बड्या ब्रँडच्या उत्पादनांची खरेदी करताना तुम्हीही पैसे वाचवू शकता. तसेच जर तुम्ही Apple उत्पादनांवर डील शोधत असाल तर, क्रोमाच्या ब्लॅक फ्रायडे सेलचा पर्याय सुद्धा विचारात घेऊ शकता. तुमचे पैसे वाचणार ही तर अर्थात आनंदाची बातमी आहे, पण हा ब्लॅक फ्रायडे सेल म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहित आहे का? भारतात सहसा मुख्य सणाच्या वेळी मोठमोठया कंपनीचे सेल सुरु असतात, स्वातंत्र्य दिन, दसरा, दिवाळी, होळी अशा मुहूर्तांवर सेल होतात पण ब्लॅक फ्रायडे सेल हा ही एका खास सणाच्या निमित्ताने पार पडतो हे तुम्ही जाणता का? आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेऊयात..

ब्लॅक फ्राय डे चे महत्त्व

जगभरात अनेक ठिकाणी साजरा होणारा Thanks Giving सप्ताह संपताच त्याच्या पुढच्या आठवड्यातील शुक्रवार हा ब्लॅक फ्रायडे म्हणून ओळखला जातो. आकडेवारी पाहिल्यास युनायटेड स्टेट्समधील वर्षातील सर्वात जास्त खरेदी होणाऱ्या दिवसांपैकी एक आहे. थँक्सगिव्हिंगच्या निमित्ताने अनेक दुकानांमध्ये तसेच ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर मोठी सूट दिली जाते. परिणामी सर्वाधिक खरेदी होऊनही या दिवशी अनेक व्यवसायांना नुकसान सहन करावे लागत असल्याने हा दिवस ब्लॅक म्हणजेच काळा दिवस म्हणून ओळखला जातो असा समज आहे मात्र हे अद्याप सिद्ध झालेले नाही.

Multi-candidate contests on most seats in Nashik 196 candidates in 15 constituencies
नाशिकमध्ये बहुसंख्य जागांवर बहुरंगी लढती; १५ मतदारसंघात १९६ उमेदवार
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
tujhyat jeev rangala fame actor amol naik bought a new car
रुपाली भोसलेनंतर ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्याने दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी केली आलिशान गाडी, पाहा फोटो
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
Apple CEO Tim Cook give diwali wishes with an photo of diyas clicked by an Indian photographer
भारतीय फोटोग्राफरने काढलेला सुंदर फोटो शेअर करत Appleचे सीईओ टीम कुक यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; पाहा, पोस्ट होतेय व्हायरल
students revealing the contents of their lunch boxes
Viral Video: ‘जिलेबी देणाऱ्या आईला भेटायचंय…’ चिमुकल्यांच्या डब्यातील पदार्थ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; म्हणाल, ‘आमच्या वेळी…
man light a small rocket using Alexa
“अलेक्सा रॉकेट लाँच कर…” मालकाने सूचना देताच फटाके फोडण्यासाठी Alexa तयार, पाहा दिवाळीचा हा खास VIRAL VIDEO

१९६० च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा फिलाडेल्फियामधील पोलीस अधिकार्‍यांनी “ब्लॅक फ्रायडे” हा शब्दप्रयोग वापरण्यास सुरुवात केली होती, याचे कारण म्हणजे थँक्सगिव्हिंग नंतर याच दिवशी शहरात सर्वाधिक गर्दी जमा होत असे यामुळे वाहतुकीची कोंडी, अपघात, चोरी असे गुन्हेही वाढीस लागत होते, या समस्यांचे वर्णन करताना काही वर्षांतच, ब्लॅक फ्रायडे हा शब्द फिलाडेल्फियामध्ये रुजला. मात्र शहरातील व्यापाऱ्यांना या गर्दीचा लाभ होऊ लागला परिणामी त्यांनी या दिवसाचे नाव बदलून “बिग फ्रायडे” म्हणून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

ब्लॅक फ्राय डे सेल मागील लॉजिक

मागील काही वर्षात मात्र ब्लॅक फ्रायडे हा अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने तयार केलेला सेल ठरत आहे. म्हणजेच सहसा अनेकांना शनिवार, रविवार सुट्टी असते. अशावेळी अनेकजण बाहेर जाऊन किरकोळ खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. सोमवार हा कामामुळे व्यस्थ दिवस मानला जातो तर मंगळवार गुरुवार हे धार्मिक कारणाने व्यस्थ दिवस मानले जातात. बुधवार सुद्धा आठवड्याच्या मध्यात येत असल्याने त्यादिवशी खरेदीचे प्रमाण कमी असते, परिणामी शुक्रवार हा सेलसाठी उत्तम ठरू शकतो .

ऐतिहासिकदृष्ट्या, ब्लॅक फ्रायडेचा आणखी एक अर्थ आहे, जो खरेदीशी संबंधित नाही. १८६९ मध्ये वॉल स्ट्रीट फायनान्सर्स जे गोल्ड आणि जिम फिस्क यांनी न्यू यॉर्क गोल्ड एक्स्चेंजमध्ये देशाच्या सोन्याच्या बाजारपेठेवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. भविष्यात किंमती गगनाला भिडण्याच्या उद्देशाने शक्य तितकी मौल्यवान धातू खरेदी केली. शुक्रवार, २४ सप्टेंबरला, अध्यक्ष युलिसिस एस. ग्रँट यांच्या हस्तक्षेपामुळे त्यांची योजना कोलमडली. शेअर बाजार तत्काळ घसरला आणि हजारो अमेरिकन नागरिकांना नुकसान सहन करावे लागले.