Amitabh Bachchan and Abhishek Bachchan: प्रयत्न करून यश मिळाल्यानंतर ते टिकवून ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं. बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांच्या मुलांनी इंडस्ट्रीत नशीब आजमावलं. पण आपल्या आई-वडिलांप्रमाणे लोकप्रियता काहींना मिळाली नाही. काही जणांच्या पदरी तर अपयशचं आलं. हाताच्या बोटांवर मोजण्या इतकी सुपरस्टार्स बापलेक किंवा मायलेक आहेत. त्यापैकी एक म्हणजे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या बापलेकाची जोडी.

एकाबाजूला अनेक दशकांपासून सुपरहिट चित्रपट देणारे महानायक तर दुसऱ्याबाजूला करिअरच्या सुरुवातीला फ्लॉप चित्रपट आणि अभिनयावरून ट्रोल झालेला अभिषेक. पण करिअरची सुरुवात जरी फ्लॉप चित्रपटाने झाली असली तरी ‘गुरू’ चित्रपटानंतर त्याचं नशीब पालटलं. खऱ्या अर्थाने त्याच्या करिअरच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. त्यानंतर अभिषेकने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. असे हे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या या बापलेकाच्या नावाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड’मध्ये आहे. अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) व अभिषेक बच्चन यांचा हा रेकॉर्ड अजूनपर्यंत कोणीही मोडला नाही. पण बॉलीवूडच्या या सुपरहिट बापलेकाच्या जोडीच्या नावाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड’ का झाली? यामागचं नेमकं कारण काय ते जाणून घ्या…

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Family recreate iconic Hum Aapke Hain Koun scene
‘गाने बैठे गाना, सामने…’ कुटुंबातील सदस्यांनी ‘हम आपके है कौन’मधील ‘ते’ गाणं केलं रिक्रिएट; VIRAL VIDEO पाहून वाजवाल टाळ्या
Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
Amitabh Bachchan angry post
“मूर्ख आणि बिनडोक…”, अमिताभ बच्चन कोणावर भडकले? म्हणाले, “विवेकहीन आणि अर्धवट बुद्धी…”

हेही वाचा – Aditi Sarangdhar: ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत अदिती सारंगधरची जबरदस्त एन्ट्री, झळकणार ‘या’ भूमिकेत

२००९ साली ‘पा’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आर. बाल्की दिग्दर्शित ‘पा’ चित्रपट सुपरहिट झाला होता. या चित्रपटात खऱ्या आयुष्यातील बापलेकाने म्हणजेच अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) व अभिषेक बच्चनने उलट भूमिका साकारली होती. अमिताभ बच्चन मुलाच्या भूमिकेत दिसले होते तर अभिषेकने वडिलाची भूमिका साकारली होती. असं पहिल्यांदाच बॉलीवूडमध्ये घडलं होतं. त्यामुळेच अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन या बापलेकाच्या नावाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड’मध्ये करण्यात आली होती.

हेही वाचा – “आता बाबा असते तर…”, अभिनय बेर्डेने वडील लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दल इच्छा केली व्यक्त, म्हणाला…

Amitabh Bachchan and Abhishek Bachchan

‘पा’ चित्रपटातील बिग बींचा लूक पाहून प्रेक्षक झाले होते हैराण

‘पा’ चित्रपटात बिग बींनी १२ वर्षांच्या ऑरो नावाच्या मुलाची भूमिका निभावली होती. हा ऑरो प्रोजेरिया नावाच्या दुर्मिळ आजाराने पीडित असतो. या आजारात कमी वयात मुलांमध्ये वृद्धपणाचे लक्षणे दिसतात. चित्रपटात अभिषेकने ऑरोच्या वडिलाची भूमिका साकारली आहे; जो एक नेता असतो. विशेष म्हणजे ‘पा’ चित्रपटातील अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) यांच्या लूकने प्रेक्षकांना हैराण करून टाकलं होतं.

दरम्यान, याआधीही अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांची नावं ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड’मध्ये नोंद केली गेली आहेत. ‘दिल्ली ६’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान १२ तासांत अनेक शहरांमध्ये फिरल्यामुळे अभिषेकचं नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड’मध्ये नोंद केलं आहे. याआधी हा रेकॉर्ड डेनियल ब्रोहल आणि जोर्गन वोगेल यांच्या नावे होता. तसंच बिग बी १९ प्रसिद्ध गायकांबरोबर ‘हनुमान चालीसा’ गाणारे एकमेव अभिनेते असल्यामुळे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड’मध्ये त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली होती.

Story img Loader