AMUL Full Form : अमूल ही देशातील एक महत्त्वाची आणि मोठी दूध उत्पादक संस्था आहे. १४ डिसेंबर १९४६ रोजी अमूल या संस्थेची स्थापना झाली. या ७८ वर्षांमध्ये या संस्थेने आपले नाव देशाच्या कानाकोपऱ्यात कोरले.अमूलमुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक पर्याय उपलब्ध झाला. तुम्ही अमूलचे दूध किंवा अन्य अमूलचे पदार्थ अनेकदा विकत घेतले असेल पण तुम्हाला अमूलचा फुल फॉर्म माहिती आहे का? हो, अमूलचा फूल फॉर्म सुद्धा आहे. आज आपण त्या विषयीच सविस्तर जाणून घेऊ या.
अमूल हा गुजरातच्या को ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनद्वारे हाताळली जाणारी एक प्रसिद्ध ब्रॅण्ड आहे. ही सहकारी संस्था लाखो दूध उत्पादकांच्या मालकीची आहे. विशेष म्हणजे अमूलचे सर्व उत्पादने चाळीस पेक्षा जास्त देशांमध्ये विकली जाते. अमूल ही संस्था तीन पातळ्यांवर काम करते. एक म्हणजे दुग्ध सहकारी संस्था, दुसरी म्हणजे जिल्हा दूध संघ, आणि तिसरे म्हणजे राज्य दूध महासंघ.
AMUL चा फुल फॉर्म माहितेय?
अनेक लोकांना अमूलचा फूल फॉर्म सुद्धा आहे, हे आज माहिती पडले असावेत. तुम्हाला अमूलचा फूल फॉर्म माहिती आहे का? अमूलला इंग्रजीत AMUL असे लिहितात. AMULचा फुल फॉर्म आहे ‘Anand Milk Union Limited’ म्हणजेच ‘आनंद मिल्क युनियन लिमिटेड’होय. आता तुम्हाला वाटेल की आनंद नावच का? त्यामागे सुद्धा कारण आहे. डिसेंबर १९४६ मध्ये गुजरातमधील खैरा जिल्ह्यातील आनंद या गावी अमूलची स्थापना झाली त्यामुळे याला आनंद मिल्क असे नाव पडले. याशिवाय अमूल या शब्दाचा अर्थ अमूल्य असा होतो.
हेही वाचा : थंडी कडाक्याची आहे की नाही, हवामान विभाग कसा बांधतात अंदाज? जाणून घ्या सविस्तर
अमूलचे प्रोडक्ट
अमूलचे दूध, लोणी, तूप, दही, चीज, चॉकलेट, श्रीखंड, आईस्क्रीम असे अनेक दुग्धजन्य पदार्थ आहेत. अमूल बटर हा सर्वात लोकप्रिय पदार्थ आहे.
अमूल हा गेल्या पाच दशकांपासून सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह राहिलेला ब्रॅण्ड आहे. ज्या वेळी भारतात शेतकऱ्यांची आर्थित परिस्थिती चांगली नव्हती त्या वेळी ही संस्था सुरू करण्यात आली. सरदार पटेल यांच्या पुढाकाराने १५ दिवसांचा दूध संप सुरू करण्यात आला होता. अखेर सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या ज्याचा पुढे शेतकऱ्यांना फायदा झाला. या अमूल सारख्या संस्थेमुळेच भारत आघाडीचा दूध उत्पादक देश बनला आहे.