Android Mobiles News : स्मार्टफोन्स ही आपल्या दररोजच्या दैनंदिन आयुष्यातील एक गरज बनली आहे. फक्त संवाद साधण्यापुरता मोबाईलचा उपयोग मर्यादीत राहिलेला नाही, तर संवाद साधण्यासह मनोरंजन आणि कोणतीही माहिती एका क्लिकवर मिळवणं मोबाईलवर सहज शक्य आहे. या आधुनिक जगात स्मार्टफोनचा वापर करणं हे जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा भागच बनला आहे. मग आता तुम्हालाही स्मार्टफोन वापरताना असा अनुभव आला असेल की, तुमचा स्मार्टफोन तुमचं बोलणं ऐकतो आणि त्यानंतर तुम्हाला त्यासंदर्भातील जाहिराती स्मार्टफोनवर दिसायला लागतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकवेळा असं होतं की, तुम्ही एखाद्या वस्तुविषयी दुसऱ्या कोणाशी बोलत असता. मग तुम्ही ज्या संदर्भात बोललात त्या संदर्भात तुम्हाला काहीही सर्च न करता सुद्धा अचानक त्याची जाहिरात तुमच्या फोनवर दिसू लागते. त्यावेळी तुम्हालाही ‘माझा फोन माझं बोलणं ऐकतोय की काय?’ असा प्रश्न पडतो का? मग तुमच्याबरोबरही कधी असं झालंय का? आणि खरचं आपला फोन आपलं संभाषण ऐकतोय का? याविषयीची माहिती आज आपण जाणून घेऊयात…

हेही वाचा : सतत मोबाइल वापरत आहात? तुम्हालाही होऊ शकतो ‘स्मार्टफोन पिंकी सिंड्रोम’! जाणून घ्या नक्की काय आहे हा प्रकार?

डीकोडिंग ॲक्टिव्ह लिसनिंग

४०४ मीडियाच्या [४०४ Media] अहवालानुसार, तुमचा स्मार्टफोन तुमचं बोलणं गुपचूप ऐकत असतो, स्मार्टफोन आपलं बोलणं किंवा संभाषण ऐकण्यासाठी ‘ॲक्टिव्ह लिसनिंग’ हे तंत्रज्ञान वापरून तुमचं संभाषण ऐकू शकतात. मग आता ‘ॲक्टिव्ह लिसनिंग’ म्हणजे काय? ॲक्टिव्ह लिसनिंग हे तुमच्या मनातील संकल्पना कशा पद्धतीने ऐकतं? हे कॉक्स मीडिया ग्रुपच्या एका अहवालानुसार समोर आलं आहे. तुमचं बोलणं ऐकण्याचं तंत्रज्ञान AI चा वापर करून रीअल-टाइम डेटा गोळा करतं. या गोळा केलेल्या डेटाच्या माध्यमातून विश्लेषण करून त्यानंतर संबंधित जाहिराती दाखवणं शक्य होतं, असं फायनान्शिअल एक्स्प्रेसने एका वृत्तात म्हटलं आहे.

आता तुमचं सर्व संभाषण हे जाहिरात करणारे या माध्यमातून ऐकत असतात. इतकंच काय तर तुमच्या फोनमध्ये किंवा स्मार्ट टीव्हीमध्ये माईकच्या मदतीने या जाहिरात कंपन्यांना ग्राहकांचा डेटा मिळण्यास मदत होते. या डेटाच्या माध्यमातून अचूक ग्राहक ओळखता येतो आणि त्यानंतर योग्य जाहिराती दाखवण्यास मदत होते. मग यामध्ये तुम्ही फक्त काय सर्च करता एवढंच नाही तर तुम्ही फोनजवळ जे काही बोलता त्यावरूनही तुम्हाला जाहिराती दाखवल्या जातात.

अहवालानुसार, हे तंत्रज्ञान जाहिरातदारांना सध्याचा डेटा आणि व्हॉईस डेटा एकत्रित करण्यात मदत करतं. ही पद्धत जाहिरातदारांना त्यांच्या विशिष्ट गरजांवर आधारित प्रेक्षकांना लक्ष्य करण्यात मदत करते. आता उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास समजा तुम्ही एखाद्या पोशाखांवर चर्चा करत असाल तर तंत्रज्ञान त्याचा मागोवा घेईल आणि डेटा जतन करेल. हे जाहिरातदार तुमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर संबंधित जाहिराती दाखवण्यासाठी नंतर वापरतील. तसेच याव्यतिरिक्त असंही स्पष्ट केलं की, तंत्रज्ञान वापरकर्त्यांनी त्यांच्या परस्परसंवाद आणि ऑनलाइन सर्च केलेला डेटाही संकलित करते. याव्यतिरिक्त, AI वर चालणारे सॉफ्टवेअर अंदाजे ४७० पेक्षा जास्त व्यक्तींच्या व्हॉइस आणि वर्तणूक डेटा संकलित करते आणि विश्लेषण करते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Android mobiles is your phone really listening to you fyi marathi news gkt