अंगराकी गणेश चतुर्थी निमित्त राज्यभरातील सर्व गणपती मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असायची. पाठच्या वर्षी पासून सगळी मंदिर बंद असल्यामुळे सगळेच घरच्या घरीच पूजा करत आहेत. वर्षभरात वेगवेगळ्या प्रकारच्या चतुर्थी येत असतात. या चतुर्थीची नावं, प्रकार जरी वेगळे असले तरी उद्देश मात्र नेहमीच एक असते. भारताच्या कानाकोपऱ्यात गणेश देवाचे असंख्य भक्त आहेत. आपल्या पुराणात प्रत्येक चतुर्थीच महत्त्व आहे. आजच्या अंगारकी गणेश चतुर्थी निमित्त जाणून घेऊयात या दिवशी उपवास का करतात? दिवसाचे महत्त्व काय आहे? आणि चतुर्थीचे प्रकार व अंगारकी गणेश चतुर्थी पूजेसाठी शुभ मुहूर्त.
….म्हणून करतात उपवास
प्रत्येक महिन्यात कृष्णपक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दिवशी गणपतीची विधिनुसार पूजा केली जाते . सोबतच काही लोक उपवासही करतात. पण यावेळी पावसाळ्यात येणारी चतुर्थी म्हणजे अंगारकी चतुर्थी आहे. जेव्हा कृष्ण पक्षाची चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात. चतुर्थी मंगळवारी असल्यास मंगळाचा प्रभाव देखील गणेशाच्या पूजेमध्ये वाढतो. पुराणानुसार असं म्हटलं जातं की जो कोणी या दिवशी गणेशाची पूजा करतो आणि उपवास ठेवतो, त्याला शुभ फळ प्राप्त होते. म्हणून उपवास केला जातो.
चतुर्थीचे महत्त्व
याबद्दल पुराणात वेगवेगळ्या कथा आहेत. मंगळवारी येणाऱ्या गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. प्राचीन कथे नुसार, पार्वती देवीच्या सांगण्यावरून भगवान शिव जी ने हत्तीचा चेहरा आपल्या मुलाला लावला आणि त्याच नंतर त्याचे नाव गजानन झाले. या दिवशी अनेक माता आपल्या मुलांच्या चांगल्या आयुष्यासाठी, दीर्घायुष्यासाठी हा उपवास करतात.
चतुर्थीचे हे आहेत प्रकार
जसं प्रत्येक महिन्याच्या कृशपक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात तसंच प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात विनायक चतुर्थी साजरी केली जाते. सोबगच भाद्रपद पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणतात. पुराणानुसार या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता म्हणून या दिवशी चतुर्थी साजरी केली जाते.
अंगारकी चतुर्थी २०२१ चा शुभ मुहूर्त
चतुर्थी तिथीची सुरुवात : २७ जुलै रोजी सकाळी २ वाजून ५४ मिनिटे
चतुर्थी तिथीची समाप्ती : २८ जुलै रोजी सकाळी २ वाजून २९ मिनिटे