Which animals are banned in India? : वन्यजीवांचं संरक्षण करण्यासाठी व पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी काही प्राण्यांना पाळणं भारतात प्रतिबंधित आहे. जैवविविधतेला हानी पोहोचू नये यासाठी काही प्राण्यांसाठी विशेष कायदे व नियम लागू आहेत. यापैकी अनेक प्राणी नैसर्गिक अधिवासात राहतात व तिथेच ते अधिक सुरक्षित आहेत, अथवा तिथेच त्यांची अधिक आवश्यकता आहे. भारतात आपण कुत्रा, मांजर व इतर काही प्राणी बिन्धास्त पाळू शकतो. मात्र काही प्राण्यांसाठी कडक कायदे आहेत. आज आपण अशा २० प्राण्यांबद्दल जाणून घेणार आहोत जे घरात बाळगण्यावर बंदी आहे. या प्राण्यांचं संवर्धन करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यांची विशेष काळजी घेत आहे. माणसाने हे प्राणी घरी बळगल्यामुळे त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते.
या प्राण्यांचा बेकायदेशीर व्यापार रोखण्यासाठी देखील सरकारने ही पावलं उचलली आहेत. तर, काही प्राण्यांच्या प्रजाती नामशेष होण्यापासून वाचवणं हे त्या कायद्यांमागचं उद्दीष्ट आहे.
पाळीव प्राणी म्हणून बाळगण्यास बंदी असलेल्या प्राण्यांची यादी
- साप
- कोल्हा
- काळं हरण
- हत्ती
- स्टार टर्टल (कासव)
- सिंह
- ओरंगउटान (वनमानव)
- खवले मांजर
- रानमांजर
- लाल पांडा
- अस्वल
- बिबट्या
- वाघ
- सिंह
- वानर
- लाल मुनिया
- घुबड
- घोरपड
- मगर
- पिटबुल प्रजातीचा कुत्रा
यापैकी काही प्राणी घरात बाळगण्याचे प्रयत्न होतात. मात्र प्रशासनाकडून अशा कुटुंबांवर कारवाई झाल्याचे समोर आले आहे. खवले मांजर, साप व मांडुळाच्या तस्करीचे प्रकारही अनेकदा समोर आले आहेत. अनेकदा अंधश्रद्धेपोटी अशा प्राण्यांचा बळी देखील दिला जातो. त्यामुळे या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने कठोर पावलं उचलली आहेत.